Maharashtra

Kolhapur

CC/10/90

Tukaram Chandrapa Aagale - Complainant(s)

Versus

Vahandharak Nagari Sah. Pat Sanstha Ltd. Kolhapur - Opp.Party(s)

S.S. Gavali

30 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/90
1. Tukaram Chandrapa Aagale Aare Tal. Karveer Dist. Kolhapur2. Sou.Parvati Tukaram Agale,R/o.As above.3. Shri Bhagwan Tukaram Agale,R/o.as above4. Sou.Rani Bhagwan Agale,R/o. As above ...........Appellant(s)

Versus.
1. Vahandharak Nagari Sah. Pat Sanstha Ltd. KolhapurBakari Bazar,1968, C Ward, Maharana Pratap Chowk, Kolhapur2. Chairman.Krishnat Shripati Chavan.Pant Balekundrai Market.Shahupuri.Kolhapur.3. Shankar Hari Harale.Pirwadi.Tal - Karveer.Kolhapur4. Purushotam Ganeshram Mahaeshwari.Gala No - 11,Bazarget.Gandhi Market.Kolhapur5. Rajaram Lakhu Kambale.Haladi.Tal - Karveer.Kolhapur6. Pandurang Ganpati Khade.Jatharwadi.Tal - Karveer.Kolhapur7. Hanumant Ashru Patil.Omganesh Colony.Sambhaji Nagar.Kolhapur8. Namdev Pandurng Lohar.Chile Colony.Jawaharnagar.Kolhapur9. Shivaji Ashru PatilOmganesh Colony.Sambhajinagar.Kolhapur10. Baburao Dharmraj Jagtap.Mangeshkar Nagar.Kolhapur11. Smti.Sita Ramchandra Ingale.Maharashtra S.T.Canteen.Kolhapur12. Balwant Namadev Patil.Hasur Dumala.Tal - Karveer.Kolhapur13. Vilas Pandurang Patil.Hasur.Tal - Kolhapur14. Gen.Manager.Akaram Mahadev Gaikwad.Vahandharak Nagari Sah Pat Sanstha Bakari Bazar.Kolhapur15. Manager.Shamrao Ganpati Gurav.Haladi.Tal - Karveer.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.S.S.Gavali for all complainants

Dated : 30 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.30.10.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट, लक्षाधिश ठेव, कायम मुदत ठेव, सौरभ बॉण्‍ड, सौरभ ठेव डिपाझिटच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम/व्‍याजदर
1.
001554
1000/-
16.11.2001
16.05.2007
2000/-
2.
804
5000/-
11.10.2000
11.04.2006
10000/-
3.
2886
2000/-
15.01.2000
15.01.2005
4000/-
4.
021
3000/-
19.11.1990
15.10.2017
100000/-
5.
0120
1000/-
09.11.1996
--
5%
6.
2885
2650/-
15.01.2000
15.01.2005
5300/-
7.
0121
1000/-
09.10.1996
--
5%
8.
1513
1000/-
13.11.2001
13.05.2007
2000/-
9.
1512
1000/-
13.11.2001
13.05.2007
1000/-
10.
0031
1000/-
23.12.2000
23.12.2004
1720/-
11.
2896
5000/-
18.04.2000
18.04.2005
10000/-
12.
2895
5000/-
18.04.2000
18.04.2005
10000/-
13.
2/28
14300/-
--
--
--

 
(3)        तक्रारदार यांचे वय 71 वर्षे आहे. वयोमानपरत्‍वे ते सतत आजारी असतात. तक्रारदार हे निवृत्‍त झालेनंतर त्‍यांना रुपये 340/- इतकी पेन्‍शन मिळते. सदर रक्‍कमेत त्‍यांचे औषधोपचार व कुटुंबाचा खर्च भागू शकत नाही. त्‍यामुळे त्‍यांनी निवृत्‍त झालेनंतर ग्रॅच्‍युईटी व फंडाची रक्‍कम सामनेवाला संस्‍थेकडील ठेवींमध्‍ये गुंतविली. सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्‍कमांची त्‍यांचे औषधोपचारासाठीच्‍या व इतर कौटुंबिक गरजा भागविण्‍यासाठी आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.20.06.2009 रोजी नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, सौरभ ठेव डिपॉझिट खात्‍यांचे पासबुक व नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव पावत्‍यांपैकी बहुतांशी पावत्‍यांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. 
 
(6)        सामनेवाला क्र.1 ते 15 यांना या मंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. सबब, सामनेवाला क्र.1 ते 13 यांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 व 15 हे सामनेवाला संस्‍थेचे अधिकारी असल्‍याने त्‍यांना केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(7)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता काही ठेव पावत्‍या या दामदुप्‍पट ठेवींच्‍या व सौरभ बॉण्‍डच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या लक्षाधिश ठेव पावती क्र.021 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावतीची मुदत अ़द्याप पूर्ण झालेली नाही असे दिसून येते. म्‍हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्‍कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्‍यांच्‍या रक्‍कमा या भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि.22.02.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का वजाजाता होणा-या व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.
 
(9)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या कायम मुदत ठेवींच्‍या मुदत पावतींच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍यांना मुदत नसून केवळ सदर ठेव रक्‍कमांवर द.सा.द.शे.5 टक्‍के देय असलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा ठेव तारखेपासून त्‍यांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 5 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(10)       तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सौरभ ठेव डिपॉझिट च्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कम ठेवल्‍याचे दिसून येते. सदर सौरभ ठेव डिपॉझिट खाते क्र. 2/28 वर दि.14.02.2004 रोजीअखेर रुपये 14.02.2004 रोजीअखेर रुपये 14,300/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सौरभ ठेव डिपॉझिट खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(11)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील कायम मुदत ठेव रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवरठेव तारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.5 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
1.
0120
1000/-
09.11.1996
2.
0121
1000/-
09.10.1996

 
 
 
 
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट/सौरभ बॉण्‍डच्‍या रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर कोष्‍टकात नमूद तारखांपासून रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
देय मुदतपूर्ण रक्‍कम
व्‍याज देय तारीख
1.
001554
2000/-
16.05.2007
2.
804
10000/-
11.04.2006
3.
2886
4000/-
15.01.2005
4.
2885
5300/-
15.01.2005
5.
1513
2000/-
13.05.2007
6.
1512
2000/-
13.05.2007
7.
0031 Sourabh Bond
1720/-
23.12.2004
8.
2896
10000/-
18.04.2005
9.
2895
10000/-
18.04.2005

 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना लक्षाधिश ठेव पावतीची रक्‍कम रुपये 3,000/- द्यावी. सदर रक्‍कमेवर भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावतीची तक्रार दाखल दि. 22.02.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का व्‍याज वजाजाता होणारे व्‍याज द्यावे व दि.23.02.2010 रोजीपासून सदर रक्‍कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(5)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना त्‍यांच्‍या सौरभ ठेव खाते नं.2/28 वरील रक्‍कम रुपये 14,300/- (रुपये चौदा हजार तीनशे फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.14.02.2004 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(6)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 व 15यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER