Maharashtra

Nagpur

CC/375/2019

SHRI. RAJU RAMBHAU MAHAJAN - Complainant(s)

Versus

VAASTU-VIHAR DEVELOPERS PVT. LTD., THROUGH DIRECTOR SHRI. YOGESH KAIKADE - Opp.Party(s)

ADV. S.M. KASTURE

17 Jul 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/375/2019
( Date of Filing : 05 Jul 2019 )
 
1. SHRI. RAJU RAMBHAU MAHAJAN
R/O. PLOT NO. 542, NR.HANUMAN TEMPLE, GOKULPETH, NAGPUR-10
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. VAASTU-VIHAR DEVELOPERS PVT. LTD., THROUGH DIRECTOR SHRI. YOGESH KAIKADE
201, GANESH CHAMBERS, 2ND FLOOR, MEHADIA CHOWK, DHANTOLI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 17 Jul 2020
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती चंद्रिका बैस, मा. सदस्‍या)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन  दिनांक १४/११/२००५ रोजी  मौजा बनवाडी, पटवारी हलका नंबर ४१, शिट सर्व्‍हे नंबर ५२/२, तालुका व जिल्‍हा नागपूर येथील भुखंड क्रमांक १२६, ज्‍याचे एकुण क्षेञफळ १,०००/- चौरस फुट असुन एकूण किंमत १.२०.०००/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार केला. त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास रुपये २६०००/- बयाणा रक्‍कम म्‍हणून अदा केले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक १४/३/२००९ पर्यंत दरमहा २,४००/- रुपयाच्‍या हप्‍त्‍याप्रमाणे वेळोवेळी रुपये ९६,०००/- विरुध्‍द पक्षाला अदा केले. याप्रमाणे विरुध्‍द पक्षास दिनांक १४/३/२००९ पर्यंत विक्रीपञ नोंदवून देणे आवश्‍यक होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे सदरचा भुखंड अकृषक व सदरचा लेआऊट शासनातर्फे मंजुर करुन देण्‍याकरीता  वारंवार विनवणी केली. परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍याकरीता वारंवार टाळाटाळ केली. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करुन सेवेत ञुटी केली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास सदरच्‍या भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपञ करुन देण्‍याकरीता रुपये ७,७००/- अतिरीक्‍त अदा केले होते. तरी देखील विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे नावे सदरच्‍या भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपञ करुन दिले नाही. तक्रारकर्त्‍याचे मागणीप्रमाणे विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करुन सेवेत ञुटी केली असल्‍याचे घोषित करावे. विरुध्‍द पक्षास निर्देशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी उपरोक्‍त भुखंड क्रमांक १२६ चे विरुध्‍द पक्षाकडे ठरल्‍याप्रमाणे संपूर्ण रक्‍कम अदा केल्‍यामुळे नोंदणीकृत विक्रीपञ तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून द्यावे व जागेचा प्रत्‍यक्ष ताबा द्यावा. तसेच शा‍रीरिक व मानसिक ञासाकरीता रुपये १,५०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- देण्‍यात यावे.
  3. विरुध्‍द पक्षाला मंचातर्फे नोटीस दिनांक १३/९/२०१९ रोजी प्राप्‍त होऊन सुद्धा ते मंचासमक्ष हजर झाले नाही. त्‍याकरीता दिनांक १२/२/२०२० रोजी मंचातर्फे सदरचे प्रकरण विरुध्‍द पक्षाविरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवज, बयाणा पञ, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास वेळोवेळी दिलेल्‍या पावत्‍या यांचे अवलोकन केले व तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलाचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर खालिल मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमीमांसा  खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                     अंतिम आदेशाप्रमाणे 

 

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन  दिनांक १४/११/२००५ रोजी  मौजा बनवाडी, पटवारी हलका नंबर ४१, शिट सर्व्‍हे नंबर ५२/२, तालुका व जिल्‍हा नागपूर येथील भुखंड क्रमांक १२६, ज्‍याचे एकुण क्षेञफळ १,०००/- चौरस फुट असुन एकूण किंमत १,२०,०००/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार केला. त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे वेळोवेळी ठरल्‍याप्रमाणे एकुण रक्‍कम रुपये १,२०,०००/- दिले. विरुध्‍द पक्षास दिनांक १४/३/२००९ पर्यंत तक्रारकर्त्‍याच्‍या नावे विक्रीपञ नोंदवून देणे आवश्‍यक होते. विरुध्‍द पक्षास सदरचा भुखंड अकृषक व सदरचा लेआऊट शासनातर्फे मंजुर करुन देणे आवश्‍यक होते. परंतु विरुध्‍द पक्षाने आजतागायत तक्रारकर्त्‍यास आवश्‍यक ती सेवा पुरविली नाही. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यासोबत अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करुन सेवेत ञुटी केली आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन सदरच्‍या भुखंडाची नोंदणी करुन देतो असे म्‍हणून त्‍याकरीता सुद्धा तक्रारकर्त्‍याकडुन रक्‍कम स्विकारुन सुद्धा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे नावे सदरच्‍या भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपञ करुन दिले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षासोबत केलेले बयाणापञ/विक्रीपञ व त्‍याच्‍याकडे वारंवार अदा केलेल्‍या रकमांच्‍या पावत्‍या अभिलेखावर दाखल केलेल्‍या आहेत. याचा अर्थ विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन उपरोक्‍त भुखंड क्रमांक १२६ चे ठरल्‍याप्रमाणे संपूर्ण रक्‍कम स्विकारुन सुद्धा सदरचा लेआऊट शासनातर्फे मंजुर केला नाही आणि अकृषक सुद्धा केला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या नावे सदरचे भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपञ सुद्धा करुन दिले नाही यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यासोबत अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करुन सेवेत ञुटी केली असल्‍याचे निष्‍पन्‍न होते. सबब खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

2. (अ)   विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त भुखंड क्रमांक १२६ शासनातर्फे स्विकृत  

         करुन त्‍याचे अकृषक करुन द्यावे.

   (ब)   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या उपरोक्‍त लेआऊट मध्‍ये आरक्षित   

         केलेला  भुखंड क्रमांक १२६ चे  तक्रारकर्त्‍याच्‍या नावे नोंदणीकृत  

         विक्रीपञ करुन द्यावे व जागेचा प्रत्‍यक्ष ताबा द्यावा.

        (क)   विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारीरिक   

              ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा

              करण्‍यात यावे.

                                                                     

                                                                         किंवा

             कायदेशीररित्‍या अथवा तांञिकदृष्‍टयासदरचा भुखंड शासनातर्फे स्विकृत न झाल्‍यास किंवा काही कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याच्‍या नावे सदरच्‍या भुखंडाचे विक्रीपञ तक्रारकर्त्‍याच्‍या नावे विरुध्‍द पक्षाने नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास खालिलप्रमाणे आदेशाचे पालन करावे.

(अ) विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन स्विकारलेली रक्‍कम रुपये  १,२०,०००/- ही तक्रारकर्त्‍यास त्‍वरीत परत करावी.

(ब) विरुध्‍द  पक्ष यांनी रक्‍कम रुपये १,२०,०००/- वर दिनांक  २५/१०/२००८ पासुन रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे.   १२ टक्‍के दराने व्‍याज तक्रारदारास द्यावे.

(क) शा‍रीरिक व मानसिक ञासाकरीता रुपये ३०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- देण्‍यात यावे. 

3. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून दोन  महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी. .

 

. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुःल्‍क देण्‍यात यावी.4

. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.5.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.