2. अर्जदार हा भद्रावती येथील रहिवासी असून त्याच्या परिसरात पाण्याची सतत टंचाई निर्माण होत असल्याने अर्जदाराने पाणी साठवण्यासाठी त्याच्या घराचे वर बसविण्यासाठी प्लास्टिकची एक टॅंक विकत घेण्याचे ठरवले. गैरअर्जदार क्र. 1 यांच्याशी संपर्क साधला. गैरअर्जदार क्र. 1 हे भद्रावती शहरातील एक पाण्याची टाकी, हार्डवेअर साधने, रंगरंगोटी व पेंटिंग चे मटेरियल इत्यादी साहित्य विकणारे प्रतिष्ठीत प्रतिष्ठान आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे पाण्याची साठवणूक करणा-या टॅंकची निर्मीती करणारी कंपनी असून गैरअर्जदार क्र. 1 सारख्या वितरकांमार्फत ते ही टाकी ग्राहकांना पुरवत असतात. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास गैरअर्जदार क्र. 2 निर्मिती कोटेड असलेली वॉटरवेल वंडर नावाची 1000 लिटर पाणी साठवण्याची क्षमता व 20 वर्षांची गॅरेंटी असलेली पाण्याची टाकी दाखवून माफक दरात उत्कृष्ट उत्पादन असल्याचे आश्वासन दिले. अर्जदाराने सदर आश्वासनावर विश्वास ठेवून दिनांक 25/7/2014 रोजी रू.5,300/- नगदी रक्कम देऊन टॅंक खरेदी केली. त्यावेळी गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास सांगितले की गैरअर्जदार क्र. 2 निर्मित वॉटरवेल वंडरटँक पाच मजली इमारती वरून फेकल्यावर सुद्धा काही होणार नाही. नगदि रक्कम दिल्यावर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे कायदेशीर बिलाची मागणी केली असता गैरअर्जदार क्र. 1 सांगितले होते की गैरअर्जदार क्र. 1 हे गैरअर्जदार क्र. 2 चे अधिकृत विक्रेते असून गॅरेंटी कार्ड गैरअर्जदार क्र. 1 च्या प्रतिष्ठानाच्या शिक्क्यानिशी दिलेले असून त्यावर गैरअर्जदार क्र. 1 ची सही आहे, आणि अर्जदारानी गैरअर्जदार क्र. 2 निर्मित सदर वॉरंट टॅंक खरेदी केल्याचे पूर्ण प्रमाणपत्र आहे, त्यामुळे बिलाची गरज नाही, गैरअर्जदार यांनी उपरोक्त उल्लेखित वाटर टॅंक एप्रिल 2018 पर्यंत पाणी साठवण्याच्या वापरात असताना गॅरेंटी कालावधीत टॅंक ला तडा गेल्याचे अर्जदाराच्या निर्दशनास आले त्यामुळे अर्जदाराने दिनांक 15/4/2018 रोजी गैरअर्जदार क्र. 1 कडे सदर बाबीची तक्रार केली. त्यावेळी गैरअर्जदार क्र. 1 ने स्वत’ येऊन व्हिडीओ क्लिप घेतली व अर्जदारास नवीन पाणी साठविण्याची टाकी देण्याचे आश्वासन दिले. परंतु दिनांक 27/6/2018 पर्यंत गैरअर्जदार क्र. 1 ने आश्वासन दिल्याप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे दिनांक 27/6/2018 रोजी पत्र दिले. सदर पत्र गैरअर्जदार क्र.1 ला प्राप्त झाल्यावरही काही दिवस वाट पाहिल्यानंतरही त्यांचे उत्तर न आल्यामुळे दिनांक 4/7/2018 रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा भद्रावती यांच्याकडे अर्जदाराने अर्ज दिला व न्याय मिळवून देण्याची विनंती केली. अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी गैरअर्जदार क्र. 1 ला त्यांचे कार्यालयीन पत्र पाठवून अर्जदारास नवीन टाकी बदलवून न दिल्याने ग्राहकांची गैरसोय व फसवणूक करीत असल्याचे सुचवून दिलेल्या आश्वासनाचे पालन करण्याची समज दिली. परंतु गैरअर्जदार क्र.1 ने ग्राहक पंचायत यांनी सुचवल्याप्रमाणे मुदतीत कारवाही केली नाही व उलट कोणतीही तारीख नसलेले खोट्या आशयाचे पत्र ग्राहक पंचायत शाखा भद्रावती यांना गैरअर्जदार क्र. 1 ने पाठविले. गैरअर्जदार क्र. 1 ने वॉटर टंकला तडा गेलेल्या साठवण्याच्या अनुषंगाने गैरअर्जदार क्र. २ शी काय कार्यालयीन व्यवहार केला याची कोणतीही माहिती व सक्षम कागदपत्रे दिले नाही. त्यामुळे पुन्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायत दिनांक 22.8.2018 रोजी पत्र पाठवून गैरअर्जदाराने त्यांचे गॅरेंटी कार्ड व दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अर्जदाराचे नवीन टाकी देऊन जुनी टाकी घेऊन जाण्याची समज दिली. परंतु गैरअर्जदारराने त्याला उत्तर दिले नाही. याप्रमाणे गैरअर्जदार क्र. १ व २ ह्यांनी अर्जदाराच्या तक्रारीचे दाखल घेतली नाही. गैर अर्जदाराने अर्जदाराला नवीन टाकी बसूवून न दिल्यामुळे लागणाऱ्या दैनदिन गरजांसाठी पाण्याची टंचाई अर्जदाराला भासली. त्यामुळे शेजारीपाजारी ह्यांना पाणी मागून त्यांना स्वतःची पाण्याची पूर्तता करावी लागली. सबब अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याचा अर्ज गैरअर्जदार विरुद्ध अर्जदाराने तक्रार मंचातदाखल केली आहे. 3. अर्जदारांची मागणी अशी आहे की गैरअर्जदाराने दिलेली सेवा अनुचित व्यापारी पद्धती ठरवण्यात यावी.गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हजार रुपये पाणी साठवण्याची क्षमता आणि तीन कोटेड असलेली नवीन पाणी साठवण्याची टंक अर्जदारास बदलून द्यावी अथवा तांत्रिक कारणाने बदलून देणे शक्य नसल्यास अर्जदाराकडून घेतलेले रुपये 5,300/- रक्कम दिनांक २५.०७.२०१४ पासून रक्कम अर्जदाराच्या पदरी पडे पावेतो १८% दराने व्याज अशी रक्कम गैर अर्जदाराने अर्जदारास द्यावी तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरिक-मानसिक रुपये ७५,०००/- अर्जदाराच्या पदरी पडे पावेतो द सा द शे १८% टक्के व्याजासह द्यावे तसेच अर्जदाराचा केसचा खर्च १०,०००/-देण्यातयावे. 4. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठवण्यात आले गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी नोटीस प्राप्त निशाणी क्र.7 व 8 नुसार प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदार १ व २ तक्रारीत उपस्थित झाल्यामुळे दिनांक २०.१२.१८ रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालवण्याचे आदेश पारित करण्यात आले. 5. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवादाची पुर्सिस व तक्रारकर्ता तोंडी युक्तिवादा वरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष - गैरअर्जदारक्र. १ व २ यांनी अर्जदाराला न्युनतापूर्ण सेवा दिल्याची
बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय २. आदेश काय ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. १ बाबत :- 6. अर्जदार ह्यांनी पाण्याची साठवणूक करण्याकरिता गैरअर्जदार १ कडून गैर अर्जदार २ निर्मित वाटरवेल वंडर नावाची पाण्याची टाकी १००० लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेली दिनक २५.०७.२०१४ रोजी रु,५३००/-नगदी रक्कम देऊन खरेदी केली. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.१ ला कायदेशीर बिलाची मागणी केली परंतु गैर अर्जदार क्र. १ ने अर्जदाराला बिल न देता गैरअर्जदार क्र. १ प्रतीष्टानाचे शिक्कानिशी गॅरेंटी कार्ड दिले व त्यावर गैर अर्जदार क्र. १ ची सही आहे . सदर गॅरेंटी कार्ड अर्जदाराने निशाणी क्र. 5 सह दस्त क्र. १ वर दाखल केले आहे, त्यात पाण्याच्या टाकीची गॅरेंटी २० वर्षांची दिलेली आहे असे असतानासुद्धा एप्रिल २०१८ रोजी पाण्याची टाकीचा वापर चालू असताना टाकीला तडा गेल्याने अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ ला तक्रार करूनही गैर अर्जदार क्र. १ व २ ने ह्यांनी अर्जदाराचे म्हणणे एकूण न घेऊन पाण्याची टाकी नवीन बदलून दिली नाही हि बाब अर्जदाराने दाखल केलेल्या दस्त क्र. ३ वरील अर्जदाराने अखिल भारतीय ग्राहक पंचायत , भद्रावती ह्यांना दिलेल्या विनंती अर्जाबाबत तसेच दि. १८.७.२०१८ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत , भद्रावती ह्यांनी गैरअर्जदार क्र १ ह्यांना देलेल्या पत्रावरून सिद्ध होत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत,भद्रावती ह्यांनी गैरअर्जदार क्र. १ ला अर्जदाराला नवीन टाकी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिल्या नंतर हि दस्त क्र. ६ वर गैरअर्जदार क्र. १ ह्यांनी त्यांचे उत्तरात पाण्याच्या टाकीची २० वर्ष गॅरेंटी असूनही जवाबदारी टाळण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. अर्जदाराला त्यांच्या जीवनावश्यक असलेल्या रोजच्या वापरण्याचा पाण्याच्या साठवणुकीसाठी अडवणूक करून गैरअर्जदार क्र. १ व २ ह्यांनी अर्जदाराप्रती सेवेत न्यूनता दिली हि बाब सिद्ध होत आहे. 7. गैरअर्जदार क्र. १ व २ ह्यांनी मंचातर्फे नोटीस प्राप्त होऊन सुद्धा तक्रारीत उपस्थित न राहून अर्जदाराचे तक्रारीतील कथन खोडून काढले नाही. सबब गैरअर्जदार क्र. १ व २ विरूध्द दि.२०/१२/२०१८ रोजी प्रकरणांत एकतर्फ आदेश परीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र. १ व २ ह्यांनी गॅरेंटी असलेली पाण्याची टाकी बदलून नवीन टाकी अर्जदाराला न देउन अर्जदाराप्रति सेवेत न्यूनता दिली आहे हे सिद्ध होत असल्यामुळे मंच खालील आदेश पारित करीत आहे. 8. मुद्दा क्र. १ च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) अर्जदाराची तक्रार क्र. १७७/१८ अंशत मंजूर करण्यात येते. (2) गैरअर्जदार क्र. १ व २ ह्यांनी पाण्याच्या टाकीच्या दिलेल्या गॅरेंटी नुसार नवीन टाकी अर्जदाराला बदलवून द्यावी. (३) अर्जदाराला झालेल्या मानसिक व शाररीक व आर्थिक त्रासापोटी रु. ३०००/- गैरअर्जदार क्र. १ व २ ह्यानि वैयक्तीक वा संयुक्तपणे अर्जदारास द्यावे. (४) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |