जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/56 प्रकरण दाखल तारीख - 15/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 08/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या भारत पि.विश्वनाथ रामीनवार, अर्जदार. रा.वय 51 वर्षे धंदा व्यापार, रा. साईबाबा नगर, पुर्णा रोड, नांदेड. विरुध्द. 1. व्ही.जी.गडड्म ट्रेडर्स, गैरअर्जदार. गडड्म मार्केट,शिवाजीनगर,नांदेड. 2. एशियन पेंटस लि, भारतीया स्टेड गोडाऊन नं. 6, हायवे नं.6 जवळ,रिदोरा, व्हिलेज, अकोला. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.ए.कदम. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - एकतर्फा. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख, सदस्या ) अर्जदाराने ही तक्रार त्याला मिळालेल्या त्रुटीयुक्त सेवेबद्यल दाखल केलेली असुन, अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, त्याच्या घरामध्ये दि.27/11/2009 रोजी लग्नांचा कार्यक्रम असल्यामुळे घराला रंगवण्याचे ठरले होते. सदरील रंग त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 व्ही.जी.ट्रेडर्स, गडड्म मार्केट, शिवाजीनगर यांच्याकडुन विकत घेतला. गैरअर्जदार यांच्या सांगण्यावरुन एशियन पेंटस कंपनीचा अपेक्स अल्टीमा चांगला असुन पाच वर्षाची वॉरंटीसह घेतलेले असुन ते लवकरच खराब होऊन फिक्का पडु लागला व त्याचे पापुद्रे पडु लागले म्हणुन सदरील तक्रार अर्जदाराने मंचा समोर दाखल केली. गैरअर्जदार क्र. 2 हे हजर झाले व त्यांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागीतला व आजपर्यंत त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केलेले नाही. गैरअर्जदार क्र. 1 हे गावातील असुन देखील त्यांनी हजर झाले नाही व त्यांचे म्हणणे मांडले नाही म्हणुन अर्जदाराच्या अर्जावर एकतर्फा सुनावणीचे आदेश पारीत करण्यात आले. अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्र तपासुन व अर्जदारातर्फे युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित झाले आहे. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांनी त्रुटीची सेवा दिली आहे काय? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 अर्जदार यांचे घर पुर्णा रोड नांदेड येथे असुन त्यांचेकडे लग्नांचा कार्यक्रम दि.27/11/2009 रोजी होता त्यासाठी त्यांनी घराची रंगरंगोटी करुन घेतली. गैरअर्जदार क्र. 1 व्हि.जी.ट्रेडर्स यांचेकडे माहीती घेतली असता, एशियन पेंटस कंपनीचा अपेक्स अल्टीमा कलर चांगला असुन त्याची वॉरंटी पाच वर्षाची असल्याबद्यलची माहीती गैरअर्जदार क्र. 1 यानी दिली वत्या रंगाबद्यल खात्री दिली. गैरअर्जदार क्र. 1 च्या सांगण्यावर विश्वास ठेवुन अर्जदाराने अपेक्स अल्टीमा गैरअर्जदार क्र. 1 यांच्या दुकानातुन एकुण रु.93,918/- चा रंग खरेदी केला. त्याबद्यलची पावती अर्जदाराने मंचा समोर दाखल केली. संपुर्ण रक्कम अर्जदाराने गैरअर्जदार यांना नगदी स्वरुपात दिली व रंग काम हे गीरीष चौधरी या गुत्तेदाराला दिले. घराचे अंदाजपत्रक त्यांनी एकुण 200 ब्रॉस काम होईल व एवढे काढले व प्रती ब्रॉस कामाची मजुरी रु.500/- ठरवून देण्यात आले. रंग देण्यापुर्वी घसाई करणे पुटटी लावणे या कामासाठी प्रती ब्रॉस रु.300/- ठरवून घेतले असे एकुण रु.1,60,000/- एवढी मजुरी अर्जदार यांनी गुत्तेदार गिरीष चौधरी यांना दिली. रंग लावण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच अर्जदाराला असे दिसुन आले की, लावलेला रंग हा फिक्का होत असून त्याचा पापुद्रा गळत आहे ही गोष्ट अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्या दुकानात जाऊन सांगीतले. गैरअर्जदार क्र. 1 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कंपनीने उब्यावर पाच वर्षाची वॉरंटी दिलेले असल्यामुळे त्यास आम्ही जबाबदार नाही, ही कंपनीची जबाबदारी आहे असे म्हणुन अर्जदारास उडवून लावले. अर्जदार यांच्या म्हणण्यानुसार सदरील रंग हे गैरअर्जदार क्र. 1 यांनी सुचवल्यामुळे त्यांचेवर विश्वास ठेवून विकत घेतला होता म्हणुन गैरअर्जदार हे सदरील नुकसानीस जबाबदार आहे. दि.16/01/2010 रोजी अर्जदाराने वकीला मार्फत कायदेशिर नोटीस गैरअर्जदार क्र. 1 यांना पाठविली जी की, त्यांना दि.19/01/2010 रोजी प्राप्त झाली. सदरील नोटीसची पोहच पावती अर्जदाराने मंचा समोर दाखल केलेली आहे तरीही देखील गैरअर्जदारांनी अर्जदारास कुठलीही सेवा दिली नाही. म्हणुन अर्जदाराने रंग खरेदी केलेली रक्कम रु.93,918/- व रंग लावण्याची मजुरी रु.1,60,000/- व मानसिक व शारीरिक त्रास रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- असे एकुण रु.3,08,918/- नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडुन मागणी केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे हजर झाले व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागीतला व आजपर्यंत त्यांनी कुठलेही म्हणणे मांडले नाही. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे कुठलेही म्हणणे मांडण्याच्या तयारीत नसल्यामुळे एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. अर्जदाराने तक्रारीसोबत त्यांच्या घरातील भिंतीवर रंग लावलेले पापुद्रे गळाले याबद्यलचे फोटोग्राफ मंचा समोर दाखल केलेले आहे. अर्जदाराने संपुर्ण बंगल्याला रु.2,53,918/- खर्च करुन रंगरंगोटी केली व प्रत्यक्ष किती स्क्वेअर फुट जागा खराब झाले याबद्यलचे स्पष्टीकरण मंचा समोर अर्जदाराने केलेले नाही किंवा प्रत्यक्ष किती ठिकाणी रंगाची दुरावस्था झाली आहे, केवळ फोटोवरुन गृहीत धरणे चुकीचे ठरेल. गैरअर्जदार क्र.1 हे गावातील रहीवाशी असुन देखील त्यांनी अर्जदाराच्या तकारीकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले हे अर्जदाराने सिध्द केले म्हणजेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराला त्रुटीची सेवा दिली हे स्पष्ट होत आहे. अर्जदाराची ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे, रंग खराब झालेले आहे पापुद्रे गळाले आहे ते सर्व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरित्या दुरुस्त करुन द्यावे या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या घरी जाऊन रंगाचे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करुन एक महिन्याच्या आत अर्जदारास सदरील रंग पुटटी अथवा पापुद्रा गळने, रंग खराब झालेले असतील ती जागा गैरअर्जदारांनी अर्जदारास दुरुस्त करुन द्यावी तसे न केल्यास एक महिन्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.25,000/- नुकसान भरपाई म्हणुन द्यावी, या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात आला आहे. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरित्या अर्जदारास ज्या ठिकाणचे नुकसान झाले आहे ते सर्व एक महिन्यात व्यवस्थीत करुन द्यावी तसे न केल्यास एक महिन्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या अर्जदारास एक महिन्यात रु.25,000/- द्यावे. तसे न केल्यास रु.25,000/- रक्कम फिटेपर्यंत गैरअर्जदारांनी अर्जदारास 12 टक्के व्याज द्यावे लागेल. 3. दावा खर्चापोटी रु.2,000/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास द्यावे. 4. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयूक्तीकपणे अर्जदारास मानसिक त्रासाबद्यल रु.2,000/- द्यावेत. 5. संबंधीत पक्षकार यांना निकालाची प्रत देण्यात यावी. अध्यक्ष सदस्या (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा देशमुख) गो.प.निलमवार,लघुलेखक. |