जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/255 प्रकरण दाखल तारीख - 12/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 06/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या रुक्मीणबाई भ्र.बाबुराव गबाळे वय वर्षे 50, धंदा घरकाम रा.भवानी नगर कंधार ता.कंधार जि. नांदेड अर्जदार. यांचे मुखत्यारनामाधारक बुराव नामदेव गबाळे रा.भवानी नगर, कंधार ता.कंधार जि.नांदेड विरुध् 1. आर्य वैश्य नगर गृहनिर्माण संस्था तर्फे अध्यक्ष उत्तम गणपताव पेन्सलवार रा.आर्यवैश्यनगर नवीन कौठा ता.जि. नांदेड अन्नपुर्णा बिल्डींग सिडको फाटा नांदेड गैरअर्जदार 2. वसंत माधवराव बलशेटवार रा.संभाजी चौक, सिडको, नांदेड प्रतिनीधी आर्यवैश्य नगर गृहनिर्माण संस्था नवीन कौठा ता.जि. नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.वाय.एस.अर्धापूरकर गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.शिवराज पाटील निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या) 1. अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार ही भवानी नगर कंधार येथील रहिवासी असून दि.30.08.2010 रोजीच्या अधिकार पञाद्वारे सर्व अधिकारी त्यांचे पती बाबुराव गबाळे यांना दिले आहेत. अर्जदाराचे पती व गेरअर्जदार क्र.2 यांची चांगली ओळख आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराच्या पतीची गैरअर्जदार क्र.1 यांचेशी ओळख करुन दिली. गैरअर्जदार क्र.1 यांनी सूलभ हप्त्याने प्लॉटची योजना काढली.अर्जदाराच्या पतीने अर्जदाराच्या नांवाने सदर गृहनिर्माण संस्थेत रु.11/- भरुन सभासद म्हणून नोंद केली व त्यांचा सभासद क्र.217 असा होता. सदरयोजनेत दरमहा रु.300/- असे 30 महिने भरावयाचे होते व त्यानंतर 30 40 चौरस फूट चा प्लॉट देण्याचे संस्थेच्या अटी व नियमावली मध्ये नमूद होते. अर्जदाराने दि.30.03.1989 पासून सलग 25 महिने रु.300/- प्रमाणे संस्थेत पैसे भरणा केले. तसेच रु.1500/- चा एक हप्ता तसेच रु.1000/- चा एक हप्ता भरण्यात आला. अर्जदाराने नियमित पैसे भरल्याबाबत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास देण्यात आलेल्या पासबूक मध्हये वेळोवेळी सही करुन पैसे मिळाल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांना एकूण रु.10,000/- दिल्याचे पासबूकमध्ये नोंद आहे. अर्जदाराने पैसे भरुनही गैरअर्जदार यांनी अर्जदारास प्लॉट देण्यात सतत 1989 ते 2007 पर्यत टाळाटाळ केली आहे व अर्जदारास कोणतीही रक्कम अथवा प्लॉट आज रोजीपर्यत दिलेला नाही. अर्जदाराचे असे लक्षात आले की, आपली फसवणूक झाली असून त्यामूळे अर्जदारास मानसिक व शारीरिक ञास झाला म्हणून त्यांनी दि.12.09.2007 रोजी पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द भा.दं.वि.कलम 420 अन्वये गू.रं. नं.216/07 नोंदविण्यात आला होता तो न्यायप्रविष्ठ आहे. त्यामूळे गैरअर्जदार हे अर्जदाराच्या घरी येऊन अर्जदारास प्लॉट देण्याचे मान्य करुन तूम्ही काही दिवस थांबा आम्ही तूम्हास गट क्र.122 व 128 मधील जमीन देऊ असे सांगितल. दि.14 ऑगस्ट 2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारयांना प्लॉअ देण्याबाबत विचारणा केली असता आम्ही तूम्हास प्लॉट देणार नाही असे सांगण्यात आले. गैरअर्जदार यांनी असे करुन सेवेत ञूटी केली आहे म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, सदर गृहनिर्माण संस्थेचे असलेले प्लॉट देऊन व त्यांचे खरेदीखत करुन देण्यात बाबत आदेशीत करावे. तसेच मानसिक व शारिरीक ञासाबददल रु.1,00,000/-व दाव्याचा खर्च रु.5,000/- देण्यात यावा. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराची तक्रार ही मूदतीत नाही म्हणून ती फेटाळण्यात यावी. अर्जदाराच्या सांगण्याप्रमाणे सदर व्यवहार हा 21 वर्षापूर्वी झालेला आहे. कायदयानुसार सदरील मंचापूढे 1992 पर्यत येणे आवश्यक होते परंतु सदर तक्रार 2010 मध्ये दाखल केली. म्हणून सदर तक्रार मूदतीत नाही म्हणून खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. पासबूकावरील रक्कम वसूल करणा-याची सही कोणाची आहे यांचा तक्रारीमध्ये उल्लेख नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराकडून पैसे स्विकारलेले नाहीत. नवीन कौठा हे ठिकाणी मध्यवस्ती मध्ये आलेले आहे म्हणून गैरअर्जदाराकडून रककम उकळण्यासाठी सदर तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा अर्जदार यांचेशी कोणताही सबंध नाही. गैरअर्जदार क्र.1 हे डॉक्टर असून गैरअर्जदार क्र.2 हे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा प्रत्यक्ष आजपर्यत कोणताही संबंध आलेला नाही. गैरअर्जदारांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने नियम व अटी प्रमाणे रक्कम भरलेली नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात ते मूदे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदार यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदाराने सिध्द केली आहे काय ? होय. 4. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र. 1 ते 4 ः- अर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीसोबत गैरअर्जदार यांनी सुरु केलेल्या मासिक हप्ता प्लॉट योजनेचे पासबूकाची छायाकित प्रत दाखल केलेली आहे. यावरुनच अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. दिनांक 30.03.1989 पासून अर्जदार यांनी मासिक रु.300/- महिना गैरअर्जदार यांचेकडे भरणा केलेला आहे. अर्जदारांचा सभासद क्रमांक 217 असा आहे हे ही या पासबूकावरुन स्पष्ट होते. तसेच अर्जदाराने पोलिस स्टेशन सिडको, नांदेड येथे गैरअर्जदार यांचे विरुध्द फिर्याद दिलेली आहे त्याबददलही कागदपञे दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार यांचे लेखी जवाबात ते असे म्हणतात की, त्यांनी अर्जदाराकडून पैसे स्विकारलेच नाहीत व गैरअर्जदार क्र.1 हे व्यवसायाने डॉक्टर आहेत म्हणून पैसे काढण्यासाठी खोटी तक्रार अर्जदाराने केलेली आहे. पण गैरअर्जदार यांचे हे म्हणणे अर्जदाराने गैरअर्जदार यांनी रजिस्ट्री करुन दिलेल्या काही खरेदीखतांच्या प्रति दाखल करुन खोडून काढलेले आहे. गैरअर्जदार हे म्हणतात की, अर्जदार यांचे पैसे कोणी स्विकारलेत आम्हास माहीत नाही, पण गैरअर्जदारयांनी उघडलेल्या स्कीमच्या ऑफिसमध्ये जेव्हा अर्जदार पैसे दरमहा भरतो तेव्हा त्याजागेवर साहजिकच गैरअर्जदार यांचाच माणूस आहे हे सिध्द होते. गैरअर्जदार यांनी पैसे स्विकारुनही अर्जदारास गेल्या 22 वर्षापासून प्लॉट न देऊन सेवेत ञुटी केलेली आहे हे सिध्द होत आहे. सध्याच्या काळात जमिनीचे भाव हे गगनाला भिडलेले असल्यामुळे आजच्या तारखेत पाहिले असता अर्जदाराचे खुपच नूकसान गैरअर्जदार यांच्या वागण्यामूळे व सेवेतील ञूटीमूळे झालेले आहे हे स्पष्ट होते म्हणून गैरअर्जदारयांनी कबूल केल्याप्रमाणे त्यांच साईजचा प्लॉट अर्जदारास त्याच जागेच्या जवळपास एक महिन्यात दयावा असे शक्य नसल्यास गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी मिळून अर्जदारास रु.2,00,000/- एक महिन्यात दयावेत, मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- असे एकूण रु.2,12,000/- एक महिन्यात दयावेत असे न केल्यास रक्कम फिटेपर्यत संपूर्ण रक्कमेवर 10 टक्के व्याज दयावे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना त्यांच साईजचा प्लॉट त्यांच एरिया मध्ये दयावा, किंवा तसे शक्य नसल्यास रु.2,00,000/- अर्जदारास दयावेत. 3. निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत, असे न केल्यास संपूर्ण रक्कम रु.2,12,000/- वर 10 टक्के व्याज दयावे लागेल. 4. संबंधीतांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |