जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/14. प्रकरण दाखल तारीख - 11/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 17/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य प्रसन्न पि. एकनाथराव उत्तरवार वय 34 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार रा. सिडको, नांदेड. विरुध्द. उत्तम गणपतराव पेन्सलवार वय 55 वर्षे, धंदा शेती व व्यापार गैरअर्जदार रा. द्वारा उत्तम ज्वेलर्स, शिवाजी चौक, सिडको, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.के.दागडिया गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.व्ही.जी.बारसे पाटील. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी. नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे नांदेड येथील रहीवासी आहेत. गैरअर्जदार यांनी नांदेड कौठा येथे प्लॉट स्कीम काढली होती व त्याप्रमाणे आर्य वैश्य नगर नवीन कौठा नांदेड या नांवाने कौठा येथे प्लॉटची लकी ड्रा स्किम सूरु केली. अर्जदाराचे वडील नामे एकनाथरावजी उत्तरवार यांनी सदर स्कीमची माहीती गैरअर्जदार यांचेकडून घेतली. एकनाथरावजी यांनी अर्जदाराच्या नांवाने स्कीम मध्ये भाग घेण्याचे ठरविले. अर्जदाराचे वडीलांनी गैरअर्जदाराकडे दि.20.02.1989 रोजी त्यांच्या कार्यालयात जाऊन रु.11/- जमा केले व त्याप्रमाणे त्यांना सभासद क्र.6 ची पावती देण्यात आली. आर्य वैश्य गृहनिर्माण संस्थेच्या स्कीम प्रमाणे प्रत्येक सभासदांना लकी ड्रा पध्दतीप्रमाणे प्लॉट अलॉट करण्यात येईल व प्रत्येक प्लॉटचा आकार 30 फूट x 40 फूट म्हणजे 1200 चौ फूटाचा राहील व नियम व अटी ठरल्याप्रमाणे प्लॉटचे हप्ते प्रतिमहा रु.300/- प्रमाणे 30 महिने गैरअर्जदार यांचेकडे भरणा केले. गैरअर्जदाराचे प्रतिनीधी श्री वसंत बससेठवार हे दर महिन्याला गैरअर्जदाराच्या वतीने अर्जदाराच्या वडिलाकडून प्लॉटचे हप्ते म्हणजे रु.300/- घेऊन पावती देत होते. प्लॉट बाबत विचारणा केली असता गैरअर्जदाराने सध्या ड्रा झालेला नाही व सध्या सदरील जमीन ले आऊट व एन.ए. झालेला नाही व ज्या तारखेला एन.ए.व ले आऊट होईल त्या तारखेला लकी ड्रा काढू असे सांगितले. स्कीम चालू असताना अर्जदार हा अज्ञान होता व त्यानंतर सन 1990 रोजी अर्जदाराचे वडीलाचे नीधन झाले. त्याच्या पश्चात त्यांची आई श्रीमती संजीवनी उत्तरवार यांनी गैरअर्जदाराचे प्रतिनीधी कडे हप्ते जमा केले. सन 1995-96 मध्ये अर्जदाराने गैरअर्जदाराकडे स्कीम मध्ये कोणते प्लॉट अलॉट केलेले आहेत व त्या बाबत रजिसट्री करुन देण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी दखल घेतली नाही. डिसेंबर 1996 मध्ये तोंडी कळविले की आपणास प्लॉट क्र.158 हा लकी ड्रा मध्ये आला आहे, परंतु रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करीत होते. अर्जदाराला सन 2008 मध्ये कळाले की, गैरअर्जदाराने आर्य वैश्य नगर मधील सभासदांना लकी ड्रा स्कीम मध्ये अलॉट झालेल्या प्लॉटचे विक्रीखत करुन दिले आहेत. त्यावरुन अर्जदाराने विनंती केली की प्लॉट क्र.158 चे विक्रीखत करुन दयावे पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. दि..11.11.2009 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदारास नोटीस पाठविली सदर नोटीस गैरअर्जदारास दि.20.11.2009 रोजी प्राप्त झाली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही व प्लॉट क्र.158 चे विक्रीखत करुन दिले नाही. दि.20.11.2009 पासून अर्जदाराची तक्रार ही कालमर्यादेत आहे व यांच दिवशी तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले आहे. अर्जदारास गैरअर्जदार यांनी प्लॉट न देऊन सेवा देण्यामध्ये ञूटी केली आहे त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराची तक्रार पूर्णत मंजूर करावी तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास आर्य वैश्य नगर, कौठा नांदेड येथील प्लॉट क्र.158 किंवा आज तारखेला त्याच स्कीम मधील शिल्लक असलेल्या प्लॉटचे विक्रीखत करुन देण्याचे आदेश करावेत, तसेच झालेल्या मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च रु.5000/- देण्याचा हूकूम व्हावा. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात जमिनी संदर्भात वाद असल्यामूळे त्यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागावी या मंचास अधिकार क्षेञ नाही म्हणून अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी. खोटया माहीतीच्या आधारावर अर्जदाराने तक्रार दाखल केलेली आहे. सदरील आर्य वैश्य नगर कौठा येथे गैरअर्जदाराच्या नांवे एकही प्लॉट नाही तसेच सध्या ती स्कीम अस्तित्वात सूध्दा नाही. अर्जदाराचे वडीलांनी दि.23.3.1989 ते 4.2.1992 या कालावधी मध्ये गैरअर्जदार यांचे आर्य वैश्य नगर नवीन कौठा नांदेड येथील स्कीम मध्ये प्रतिमहा रु.300/- प्रमाणे एकूण 30 हप्ते भरणा केले हे म्हणणे चूकीचे आहे. अर्जदाराने एकूण चार हप्ते रु.1200/- चे भरलेले आहेत. त्यामूळे अर्जदार यांनी सदर स्कीमच्या अटी व नियमाप्रमाणे पूर्ण 30 हप्ते भरलेले नाही त्यामूळे त्यांना सदर स्कीम मध्ये प्लॉट मिळू शकलेला नाही. ज्यांनी पूर्ण 30 हप्ते सलग भरले त्या सभासदाना स्कीम प्रमाणे प्लॉट देण्यात आले, अर्जदार यांनी पूर्ण हप्ते भरलेले नाहीत त्यामूळे त्यांना स्कीम प्रमाणे प्लॉट देण्यात आलेला नाही. सन 1992 ते 1993 या कालावधीत प्लॉट क्रमांक, ताबा रजिस्ट्री सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अर्जदाराने स्वतःहूनच फक्त चार हप्ते भरणा करुन उर्वरित सलग 26 हप्ते भरणा केलेले नाहीत, त्यांनीची नियम व अटीचे उल्लंघन केलेले आहे. त्यामूळे सदर स्कीमचा फायदा मागण्याचा कोणताही हक्क पोहचत नाही. अर्जदारानी हप्ते भरले नाही त्यामूळे त्यांचे सभासदत्व आपोआपच रदद झाले. स्कीम संपून 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामूळे अर्जदाराचा दावा हा मूदतबाहय आहे त्यामूळे तो खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदाराने वकिलामार्फत दि.11.11.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून दावा मूदतीत बसविण्याचा प्रयत्न केलेला आहे तो गैरअर्जदार यांना मान्य नाही. सन 1992 पासून 2010पर्यत अर्जदाराने त्यांचेकडे प्लॉटची मागणी केलेली नाही. अर्जदाराने दि.23.2.1989 रोजी रु.300/- पावती क्र.908, दि.17.4.1989 रोजी रु.300/- पावती क्र.930, दि.14.12.1991 रोजी रु.300/- पावती क्र.4383 व दि.04.02.1992 रोजी रु.300/- पावती क्र.4388 द्वारे भरलेले आहेत. गैरअर्जदार यांचे नियम व अटी प्रमाणे रु.300/- दरमहा प्रमाणे सलग 30 हप्ते अशी एकूण रु.9000/- भरावयाचे आहेत, परंतु अर्जदार यांनी सलग 30 हप्ते भरलेले नसल्यामूळे त्यांनीच नियम व अटीचे उल्लंघन केलेले आहे. गैरअर्जदार यांनी प्रत्येक पावतीवर निश्चित रु.300/- छापील असताना अर्जदार यांनी पावतीवर खाडाखोड करुन, स्वतःच्या मर्जीने 300 x 14 = रु.4200/- व 8 x 300 = 2400 अधिक रु.1100/- = 3500 अशी आकडेमोड केलेली आहे. ती बनावट व चूकीची असून ही आकडेमोड अर्जदार व त्यांचे वडीलांनी केली ती गैरअर्जदारास मान्य नाही. गैरअर्जदार यांनी स्कीमचे अटी व नियमाप्रमाणे आर्य वैश्य नगर नवीन कौठा नांदेड या नावांने एक पासबूक छापले होते त्यात एकूण 1 ते 30 हप्ते, दिनांक, रक्कम, पावती क्रमांक, वसूल करणा-याची सही असा मजकूर छापला होता. त्याप्रमाणे अर्जदार यांनी हप्ते क्र.1,2,4, 12 यांची पावती वर रु.300/- प्रमाणे पावती क्र.908,930,3483, 4388 यांच पावत्या रक्कमा भरुन घेतलेल्या आहेत.अर्जदार यांनी छापील रक्कम रु.300/- ची खाडाखोड केलेली आहे तसेच पावती क्रमांका ऐवजी दिनांक लिहीलेला आहे. अर्जदार यांनी बनावट आकडेमोड करुन, पूर्ण हप्ते भरल्याच्या बनावट प्रयत्न करुन मंचाची दीशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गैरअर्जदाराच्या स्कीमप्रमाणे दर महिन्याला सभासदाकडून रु.300/- घेऊन दर महिन्याची वेगळी पावती देण्याचे होते परंतु अर्जदार दर महिन्याला अटी व नियमाप्रमाणे रु.300/- भरीत नव्हते. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खोटी असून ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी आर्यवैश्य गृह निर्माण संस्था नवीन कौठा नांदेड येथे दि.20.02.1989 रोजी संभासद झालेले आहेत. त्या बददलचार सभासद क्र.6 चा पूरावा दाखल केलेला आहे. अर्जदार हे सभासद झाल्यानंतर 30 40 1200 स्क्वेअर फूटाचे प्लॉटसाठी दर महिन्याला रक्कम भरीत आहेत व दर महिन्याला गैरअर्जदार हे ड्रा काढत आहेत व ड्रा बददलचा पूरावा म्हणून गैरअर्जदार यांचे आर्यवैश्य चे पासबूक सभासद बददल अर्जदार यांनी दाखल केलेले आहे. याप्रमाणे मासिक हप्ता रु.300/- चा ठरलेला असून तो 30 महिन्यापर्यत भरावयाचा होता. यामध्ये गैरअर्जदार उत्तम गणपतराव पेन्सलवार यांचेही नांव छापलेले आहे. पासबूकावर लिहील्याप्रमाणे हप्ता क्र.1 पासून ते हप्ता क्र.30 पर्यत अर्जदाराने वेळोवेळी कमी जास्त रक्कम भरली व ती गैरअर्जदार यांना मिळाली व शेवटी रु.4383/- एकमूस्त नगदी भरल्याची नोंद पासबूकावर घेण्यात आलेली आहे. गैरअर्जदाराच्या मते आता त्यांचेकडे प्लॉट शिल्लक नाही. 1989पासून ते 2009 पर्यत अर्जदार ही गप्पच राहीले. अर्जदाराचे पश्चात त्यांचे वडील एकनाथराव ही रक्कम भरीत राहीले परंतु प्लॉट हा अर्जदार यांचे नांवेच घेतला असता व स्कीम ही अर्जदाराच्या नांवेच घेण्यात आली व आता अर्जदार हे सज्ञान झाले आहेत. गैरअर्जदार हे प्लॉट देण्यास टाळाटाळ करीत आहेत हे बघून त्यांनी वकिलामार्फत दि.1..11.2009रोजी नोटीस पाठविली परंतु गैरेअर्जदार यांनी या नोटीसचे उत्तर दिले नाही. खरे तर अर्जदार यांनी दि.22.034.2010 रोजी एक अर्ज दिला होता. व त्यात मी प्लॉटची पूर्ण रक्कम गैरअर्जदार यांना दिली आहे व मूळ पावत्या त्यांचेकडे नाहीत, या अर्जामध्ये गैरअर्जदार यांचे म्हणणे घेतलेले असताना त्यांनी मंचासमक्ष मला प्लॉटवीषयीची पूर्ण रक्कम भेटलेली आहे हे कबूल केलेले आहे. त्यामूळे आता रक्कम देण्याघेण्याचा वाद शिल्लक नाही, काय तो मूददा उरतो तो प्लॉट देण्याचा एवढया वर्षानी गैरअर्जदारयांचेकडे प्लॉट शिल्लक नाही असा उजर घेतलेला आहे. 1996 ला ड्रा मध्ये प्लॉट नंबर 158 हा अर्जदारास लागलेला होता हे ही म्हणणे नाकबूल केलेले आहे. यानंतर अर्जदारांनी प्लॉटची पूर्ण रकक्म भरली आहे. यांचा अर्थ ड्रा मध्ये जर प्लॉट लागला असता तर अर्जदारास पूढील रक्कम भरावयाची गरज नव्हती. गैरअरर्जदारांनी पूर्ण रक्कम घेतल्यामूळे प्लॉट देण्याची जबाबदारी त्यांचेवर आली आहे परंतु आता ते प्लॉट देऊ शकत नाहीत. अर्जदार यांचा निष्काळजीपणा 1989 पासून आता पर्यत ते फक्त प्लॉटच मागत राहीले त्यांनी कायदेशीर कारवाई काहीच केली नाही. यांस ते स्वतः कारणीभूत आहेत. हे मान्य आहे की आता प्लॉटच्या किंमती भरमसाठ झालेल्या आहेत. म्हणून आता अर्जदाराने भरलेली रक्कम जर त्यांना वापस केली त्यांची आता पर्यतच्या निष्काळीपणाबददल एवढे वर्ष ते गप्प राहील्यामूळे त्यांना ही दंड केल्यासारखे होईल परंतु ते उचितही राहील. गैरअर्जदार यांनी प्लॉट न देऊन निश्चितच सेवेत ञूटी केली आहे किंवा सेवेमध्ये अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे ही म्हणता येईल. अर्जदाराची प्लॉट नंबर 158 ची रजिस्ट्री करुन देण्याची प्रार्थना जरी असली तरी मंचाला शेवटी वाटेल तो आदेश करावा या आधारे त्यांना प्लॉट उपलब्ध नसल्याकारणाने त्यांना प्लॉटची रक्कम देता येईल. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांस प्लॉटची किंमत रु.9,000/- व स्कीम संपल्याची दि.04.02.1992 पासून 6 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम वसूल होईपर्यत दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.3,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक |