सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.16/2015
श्री चंद्रशेखर रवळनाथ पुनाळेकर
वय सु.39 वर्षे, धंदा – बागायती,
रा.तेर्से बांबर्डे, देउळवाडी, ता.कुडाळ,
जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार/फिर्यादी
विरुध्द
1) युटील कंपनी, 225/9 ए
जियाजी मॅन्शन, पुणे-सोलापूर मार्ग,
हडपसर, पुणे – 411 028
2) श्री अंकुश शृंगारे
शृंगारे अॅग्रो, कुडाळ – भैरववाडी,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः- 1) श्री. कमलाकांत ध.कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्य.
तक्रारदारतर्फे – समीर कुलकर्णी
विरुद्ध पक्षातर्फे – कोणी नाही.
आदेश नि.1 वर
(दि. 03/02/2016)
द्वारा : मा. श्री. कमलाकांत ध.कुबल, प्रभारी अध्यक्ष
1) मूळ तक्रार क्रमांक 34/2013 मधील दि.21/08/2014 चे आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष नं.1 व 2 यांनी न केल्यामुळे प्रस्तुतचे प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे.
2) सदर प्रकरणाची नोटीस उभय पक्षांना पाठवण्यात आली.
3) दरम्यान फिर्यादी/तक्रारदार यांनी आज नि.25 वर दोन कागदपत्रे दाखल केली. तसेच नि.26 वर पुरसीस दाखल करुन उभय पक्षात तडजोड झाली असल्याने फिर्याद मागे घेत असल्याचे कथन केले आहे. सदरच्या पुरसीसला अनुसरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार/फिर्यादी यांच्या नि.26 वरील अर्जास अनुसरुन सदरचे दरखास्त प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) आरोपी क्र. 2 यांचा जामीन कदबा रद्द करण्यात येतो.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 03/02/2016
सही/- सही/-
(व्ही.जे. खान) (के. डी. कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग