तक्रारदार : वकीलामार्फत हजर. सामनेवाले : वकीलामार्फत हजर. *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- आदेश तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- 1. तकारदार यांनी रु.6,300/- भरुन सा.वाले यांची SCUP ( Senior Citizen Plan of UTI ) 1993 मध्ये सभासद झाले होते. त्यांनी प्रत्येक युनिटचे 10 रुपये या प्रमाणे 630 युनिट घेतले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार व त्यांची पत्नी वयाच्या 58 वर्षापर्यत 2,50,000/- पर्यत वैद्यकीय सेवा संरक्षण व 61 वयानंतर रु.5 लाखापर्यत वैद्यकीय सेवा संरक्षण मिळण्यास पात्र होते. 2. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले यांनी एकाएकी फेब्रुवारी,2008 मध्ये SCUP योजना बंद केली. त्या संदर्भात तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 13.8.2008, 20.8.2008 व 29.8.2008 रोजी पत्रे पाठवून संपर्क साधला परंतु त्यांचेकडून उत्तर मिळाले नाही. 3. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार SCUP ही योजना एकाएकी बंद करणे हे चुकीचे असून बेकायदेशीर आहे. योजना एकतर्फा निर्णय घेवून बंद केलेली आहे. म्हणून सा.वाले यांच्या सेवेत कमतरता असून त्यांनी अनिष्ट व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. 4. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले यांनी अचानक SCUP योजना बंद केल्यामुळे त्यांचे व त्यांच्या पत्नीचे रु.5 लाखाचे नुकसान झाले आहे. म्हणून तक्रारदारांनी मंचापुढे तक्रार अर्ज दाखल करुन सा.वाले यांनी रु.5 लाख योजना बंद झाल्यापासून 9 टक्के व्याज दराने व्याजासह तक्रारदारांना द्यावेत अशी मागणी केली आहे. 5. सा.वाले हे मंचाकडून पाठविण्यात आलेल्या नोटीसीनुसार हजर झाले. व तकार अर्जास उत्तर दाखल केले आहे. 6. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले ही कायद्याने प्रास्तापित केलेली संविधानात्मक संस्था आहे. व सा.वाले यांनी SCUP ( Senior Citizen Plan of UTI ) ही योजना Unit Trust of India Act, 1963 च्या कलम 19 (1) (8) (सी) नुसार प्रस्तापित केलेली आहे. व Senior Citizen Unit Scheme Unit Trust of India Act, 1963 च्या हे कलम 21 प्रमाणे प्रस्तापित झाली. व ही योजना 28.8.1993 रोजीच्या केंद्र शासनाच्या अधिसूचनेव्दारे जाहीर केली. त्या दरम्यान लोकांना वैद्यकीय सेवा संरक्षण पुरविणारी कोणतीही व्यवस्था नव्हती. म्हणून सा.वाले यांनी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचा फायदा हा त्यांना वैद्यकीय संरक्षण मिळावे या हेतुने SCUP ही योजना काढली. 7. परंतु भारताच्या मुलभूत आर्थिक धोरणांच्या बदलामुळे व उदारी करणांमुळे कर्जावरील व्याजाच्या दरात मोठे बदल झाले व त्याचा परीणाम अशा प्रकारच्या योजनांवर झाला. अंतीमतः या परिस्थितीत सा.वाले यांना SCUP सारखी योजना रद्द करावी लागली. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, SCUP सारखी योजना ही गुंतवणुकदारांचे हित सांभाळण्यासाठीच करण्यात आली. या योजनेच्या तरतुदीनुसार व संबंधीत अधिका-यांकडून आवश्यक ती परवानगी घेवूनच ती रद्द करण्यात आलेली आहे. म्हणून ही योजना रद्द केली ते कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर नसून कायद्याच्या चौकटीबाहेर नाही. SCUP योजना रद्द करतेवेळी ज्यांची वयाची 58 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना SCUP च्या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे दिले गेलेत. परंतु SCUP रद्द करतेवेळी ज्यांच्या वयाची 58 वर्षे पूर्ण झालेली नव्हती त्यांना दुस-या योजना देवू केल्या. 8. सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार गुंतवणूकदारांची SCUP मधील गुंतवणूक हे SCUP योजनेच्या अटी शर्ती नुसारच आहे. सा.वाले हे तक्रारदारांचे म्हणणे-तक्रारदार वयाच्या 58 वर्षापर्यत रु.2,50,000/- वैद्यकीय सेवा संरक्षणास पात्र होते हे अमान्य करतात. सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार SCUP योजनेच्या तरतुदीनुसार वैद्यकीय सेवा संरक्षणाची सुविधा हे सभासदांच्या वयाच्या 58 वर्षापासून मिळण्यास पात्र होते. 9. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हे SCUP मध्ये गुंतवणूक करतेवेळी 35 वर्षे वयाचे होते. व त्यांच्या पत्नीचा जन्म दिनांक 6.1.1961 असे नमुद केले होते. म्हणून योजना रद्द करतेवेळी तक्रारदार यांना योजने अंतर्गत मिळणा-या वैद्यकीय सेवा संरक्षण सुविधेसाठी ते पात्र नव्हते. 10. सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार SCUP च्या अर्जावर SCUP च्या तरतुदीनुसारच अर्जदारांना युनिट दिले जातील असे नमुद केले आहे. त्यानुसार तक्रारदारांनी SCUP च्या अटी शर्तीनुसारच अर्ज भरुन सही करुन SCUP मध्ये पैसे गुंतविले. त्यामुळे SCUP च्या अटी शर्ती सर्व सभासदांनावर बंधनकारक आहेत. 11. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, योजना बंद करतेवेळी सर्व सभासदांना 26 जानेवारी ,2008 च्या "लोकमत" मध्ये कळविले होते. व तसेच प्रत्येकाला वैयक्तीकरित्या कळविले आहे. 12. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, योजना 18.2.2008 रोजी रद्द झाली त्यावेळी तक्रारदारांचे 1584.746 युनिट होते. व पुर्नर खरेदीसाठी प्रत्येक युनिटची किंमत 23.2257 येवढी होती. या प्रमाणे तक्रारदारांची एकूण रक्कम 36806.85 येवढी होती. परंतु तक्रारदारांनी अजून पर्यत पर्यायी योजना घेतली नाही. 13. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, योजना ही कायदेशीरपणे रद्द केलेली आहे, त्यामुळे सा.वाले यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवेत कमतरता नाही किंवा त्यांनी कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सा.वाले यांनी तक्रार अर्ज रद्द करावा अशी मागणी केली आहे. 14. तकार अर्ज, कैफीयत, व पुराव्याचे शपथपत्र यांचे वाचन केले असता निकालासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1. | तक्रारदार सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | नाही. | 2. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रार अर्जात केलेल्या मागणीनुसार रु.5 लाख 9 टक्के व्याज दराने व्याजासह मागू शकतात काय ? | नाही. | 5. | आदेश ? | तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो. |
कारण मिमांसा 15. सा.वाली ही एक संविधात्मक संस्था आहे. 1993 चे दरम्यान लोकांना वैद्यकीय सेवा देणारी कोणतीही सेवा सुविधा नव्हती म्हणून गुंतवणूकदारांच्या त्यांच्या गुंतवणीचा फायदा मिळावा या हेतुने सा.वाले यांनी जेष्ट नागरीकांसाठी 1993 मध्ये ही SCUP योजना Unit Trust of India Act, 1963 च्या कलम 19 (1) (8) (सी) नुसार प्रस्तापित केलेली आहे. व Senior Citizen Unit Scheme Unit Trust of India Act, 1963 च्या हे कलम 21 प्रमाणे प्रस्तापित झाली. ही योजना व त्यांच्या तरतुदी दि.28.8.1993 च्या केंद्र शासनाच्या अधिसूचनेव्दारे जाहीर केली. 16. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे रु.6,300/- भरुन 630 युनिट विकत घेतले व त्याचे सभासद झाले या बद्दल वाद नाही. 17. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, तक्रारदारांनी ही योजना एकाऐकी बेकायदेशीरपणे व एकतर्फा निर्णय देवून बंद केली. त्यामुळे तक्रारदारांस या योजने अंतर्गत ते 58 वर्षापर्यत 2,50,000/- पर्यत वैद्यकीय सेवा संरक्षण व 61 वयानंतर रु.5 लाखापर्यत वैद्यकीय सेवा संरक्षण मिळण्यास पात्र होते. परंतु SCUP ही योजना बंद केल्यामुळे त्यांचे रु.5 लाखाचे नुकसान झाले. यावर सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, ही योजना केंद्र सरकारच्या अधिसूचनेव्दारे जाहीर केलेली आहे. सरकारच्या आर्थिक धोरणाच्या बदलामुळे कर्जावरील व्याजदरावर विपरीत परीणाम झाला. त्यामुळे SCUP सारख्या योजना सा.वाले यांना बंद कराव्या लागल्या. सा.वाले यांनी ही योजना दि.18.2.2008 रोजी बंद केली. शासन अधिसुचना पृष्ट क्र.14,461 वर XXX नुसार टर्मिनेशन ऑफ स्कीम ची तरतुद नोंदविली आहे. तसेच या योजने अंतर्गत मिळणारे वैद्यकीय सेवा संरक्षण सूविधा फॉर्म A-Unit Trust of India ( Senior Citizen Plan of UTI ) 1993 मेंबरशिब सर्टीफीकेटवर नमुद केले आहे. Medical insurance benefits under the plain For those joining the plan before the age of 55 years. Members joining the plan before the age of 55 will be Entitled for a medical benefits cover of Rs 2.5 lakh from the age of 58 years. This benefit is available either for the member or for both the member and spouse. After the age of 61 years, he/they will be eligible for a cover of Rs.5 lakhs after adjusting for any claims made earlier. यावरुन तक्रारदारांचे म्हणणे – ते वयाच्या 58 वर्षा पर्यत 2.5 लाखापर्यत वैद्यकीय सेवा संरक्षण मिळण्यास पात्र होते. हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. वरील तरतुदीनुसार गुंतवणूकदारांना वयाच्या 58 वर्षापासून 2.5 लाखापर्यत वैद्यकीय सेवा संरक्षणाची सुविधा मिळणार होती. गुंतवणूकदारांना जे 58 वर्षाचे नाहीत त्यांना त्या वैद्यकीय सेवा संरक्षणाचा फायदा मिळणार नव्हता. तक्रारदारांनी त्यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जात कोठेही ही योजना बंद झाली त्यावेळी म्हणजेच दि.18.2.2008 रोजी त्यांचे वय किती होते हे नमुद केलेले नाही. या उलट सा.वाले यांनी त्यांच्या कैफीयतीमध्ये परिच्छेद क्र.16 मध्ये तकारदारांचे वय SCUP योजनेमध्ये पैसे गुंतवितेवेळी 35 वर्षे होते व त्यांच्या पत्नीची जन्म तारीख दिनांक 6.1. 1961 असे नमुद केले होते. हे सा.वाले यांचे म्हणणे तक्रारदारांनी खोडले नाही. यावरुन SCUP बंद होते वेळी तक्रारदाराचे वय 58 वर्षापेक्षा कमी होते व तक्रारदार SCUP च्या तरतुदीनुसार गुतवणूकीदारांना मिळणा-या वैद्यकीय सेवा संरक्षणाच्या फायद्यास पात्र नव्हते हे सिध्द होते. 18. दि.28.8.1993 च्या केंद्र शासनाच्या अधिसूचनेमध्ये पृष्ट क्र.14461 वर XXX व पृष्ट क्र.14455 वर टर्मिनेशन ऑफ दि स्कीम ची तरतुद नोंदविली आहे. Termination of the plan The Plan shall stand finally terminated at the discretion of the Trust. In the event of termination of the plan no new entrants shall be allowed to join the plan after the specified date of termination. The outstanding uits of the Members whose names are entered in the Register on the date to the specified shall be repurchased at such a rate as may be decided by the Trust. The members shall be paid the amount due as early as possible, after the membership certificate/s with the from on the reverse thereof duly completed has been received by it. The membership Certificate received for repurchase shall be retained by the trust for cancellation. When the Trust decides to terminate the plan, it will be binding on the members and they shall have no right to persuade the Trust to continue the plan. यावरुन सा.वाले यांची ही योजना SCUP योजनेच्या तरतुदीनुसार बंद झालेली आहे. व ही योजना बंद करतेवेळी सा.वाले यांनी संबंधित अधिका-यांकडून परवानगी घेवून रद्द केलेली आहे. त्या बाबतचे भारत सरकारचे दिनांक 26.1.2007 चे पत्र व सेबी चे पत्र सा.वाले यांनी अभिलेखावर दाखल केले आहे. व योजनेच्या, XXXI या तरतुदीनुसार या योजनेच्या अटी व शर्ती सर्व सभासदांवर बंधनकारक आहेत. 19. जर ही योजना सा.वाले यांनी त्यांना असलेल्या योजना रद्द करण्याच्या अधिकाराखाली योजना रद्द केली व तसेच ही योजना ग्राहकांच्या हितासाठीही रद्द केली असेल तर त्यात सा.वाले यांच्या सेवेत कमतरता नाही व कोणत्याही प्रकारे व्यापारी अनुचित प्रथा अवलंबविली असे म्हणता येणार नाही. 20. सा.वाले यांनी अनेक जिल्हा ग्राहक मंचाच्या न्याय निवाडयाच्या प्रती तसेच राज्य ग्राहक आयोगाच्या निवाडयाच्या प्रती दाखल केल्या आहेत. प्रत्येक निवाडयामध्ये यु.टी.आय.ने अशा प्रकारे योजना बंद केल्या. ते कायदेशीर तरतुदीनुसारच बंद केल्या असे ग्राहय धरले आहे. 21. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 172/2009 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |