जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 42/2010 तक्रार दाखल तारीख- 04/03/2010
निकाल तारीख - 01/04/2011
------------------------------------------------------------------------------------
पंढरीनाथ पि. रामभाऊ जोगदंड,
वय -65 वर्षे, व्यवसाय – पेन्शनर
रा.गोविंद नगर, धानोरा रोड, बीड, ता.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
उप कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि,.बीड
माळीवेस, बीड ता.जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
सौ. एम.एस.विश्वरुपे, सदस्या
तक्रारदारातर्फे – वकील – एस.बी.वडमारे,
सामनेवालेतर्फे – वकील – एम.आर.गर्जे,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार सामनेवाले यांचे ग्राहक असुन ऑगस्ट,2009 पर्यन्त मिटर रिडींग प्रमाणे नियमित विज बीलाचा भरणा केलेला आहे.
जुलै,2009 मध्ये तक्रारदारांचे चालू असलेले मिटर क्रं.9006349206 हे बदलल्याने दुसरे मिटर क्र.7611592838 बसविण्यात आले. सदरचे मिटर बसविल्यानंतर ता.23.7.2009 ते 23.8.2009 चे विज बील देण्यात आले. सदर बीलावर “ INACCS ” व मागिल रिडिंग 1 असे म्हणुन अवरोज बील 49 युनिटचे देण्यात आले. तक्रारदारांनी सदर बीलाची रक्कम भरणा केली आहे. त्यानंतर ता. 23.8.2009 ते 23.9.2009 या एक महिन्याची चालू रिडींग 7303 व मागील रिडींग 1 समायोजीत युनिट 49 असे एकुण 1751 युनिटचे रक्कम रु.8,540/- चे विजबील देण्यात आले. त्यावेळी तक्रारदारांना सदरचे मिटर चुकीचे व अवास्तव रिंडींग देत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तक्रारदारांनी ता.3.10.2009 रोजी मिटर रिडींग 1718 युनिट असल्या बाबत तसेच ता.26.10.2009 रोजीचे अर्जानुसार मिटर रिडींग 2118 व ता.11.11.2009 रोजी 3200 युनिट असल्या बाबतचा तक्रारी अर्ज सामनेवाले यांचेकडे दिला आहे. परंतु सामनेवाले यांनी सदरच्या तक्रार अर्जाची दखल घेतली नाही. तक्रारदारांचे घरात एक बल्ब ( सी.एफ.एल-20 वॅट), पंखा 1 असे उपकरण आहेत. त्यामुळे सदरचे मिटर ता.24.11.2009 रोजी सामनेवाले यांचेकडून बदलून घेतले. तक्रारदारांचे नावाने मिटर क्र.6504222985 असे आहे. सदरचे मिटर मिटर रिडींग व्यवस्थीत देत आहे. परंतु सामनेवाले यांनी सदरचे मिटर रिडींग न घेता ता.23.11.2009 ते 23.12.2009 पर्यन्त अंदाज 100 युनिटचे बील रु.475.05 सह एकुण रु.12,300/- एवढे दिले आहे. तक्रारदारांचे ता.21.1.2010 पर्यन्त सदर मिटर रिडींग हे 27 युनिट एवढे आहे. यासंदर्भात तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे ता.21.1.2010 रोजी अर्ज दिला आहे. तक्रारदारांचे जुने मिटर क्र.11592838 चे मिटर टेस्टींग रिपोर्ट ता.12.12.2009 रोजी दिला आहे. सदर रिपोर्ट प्रमाणे तक्रारदारांचे वरील नमुद केलेले मिटर हे 14.88 जास्तीचे पुढे चालते. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे वापराचे हिशोबाने तक्रारदारांना बील देणे आवश्यक होते. तसेच ता.3.10.2009 रोजीचा अर्ज दिल्यानंतर तक्रारदारांचे विज बील कमी करणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले यांनी बील कमी केले नाही. त्यामुळे तक्रारदारांना शारिरीक मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागला, अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
तरी तक्रारदारांची विनंती की, सामनेवाले यांचेकडून चुकीचे दिलेले विज बील रु.12,300/- रद्द करण्यात यावे व वापरलेल्या युनिटचे बील देण्यात यावे. तसेच सामनेवाले यांनी दिलेल्या मानसिक, आर्थीक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- सामनेवाले यांचेकडून वसूल होवून मिळावेत.
सदर प्रकरणात सामनेवाले हजर झाले असुन त्यांनी त्यांचा खुलासा न्यायमंचात ता.21.12.2010 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले यांचा खुलासा थोडक्यात असा की,
सामनेवाले यांना तक्रारदारांनी ऑगस्ट,2009 पर्यन्त विज बील भरले असल्याचे मान्य आहे. मिटर क्रं.11592838 जून,2009 ते सप्टेंबर,2009 या 4 महिन्याचे बील देण्यात आले. तसेच आगोदरचे 3 महिन्याचे विज बील वजा केले आहे. जून,2009 ते ऑगस्ट,2009 अंदाजे लागलेले सप्टेंबर,2009 चे बीलातून वजा करण्यात आले. तसेच बील दिले आहे. सदरचे बील मिटर रिडींग प्रमाणे आहे. सामनेवाले यांनी नियमाप्रमाणे तक्रारदारांचे मिटरची तपासणी करुन अहवाल दिला आहे. त्याच प्रमाणे सदरचे मिटर 14.88 जास्तीचे पुढे चालत असल्यामुळे तक्रारदाराचे विज बील दुरुस्त करुन दिले. सामनेवाले यांनी जास्तीचे विज बील कमी करुन दिले आहे. तसेच मिटर तपासणी करुन बील दुरुस्त करुन दिले आहे, त्यामुळे तक्रारदारांना मानसिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता नाही.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र, सामनेवाले यांचा खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकिल एस.बी.वडमारे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे विद्वान वकिल एम.आर.गर्जे यांनी पुराव्याचे शपथपत्र हेच लेखी युक्तीवाद समजण्यात येणे बाबत ता.28.3.2011 रोजी पूर्सिस दाखल केली आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारानी सामनेवाले यांचेकडून घरगुती वापरासाठी विज पुरवठा घेतला असुन ऑगस्ट, 2009 पर्यन्त नियमाप्रमाणे विज मापक वाचना प्रमाणे दिलेल्या देयकाची रक्कम भरणा केली आहे. तक्रारदारांने ता.23.8.2009 ते 23.9.2009 चे अवास्तव चुकीचे विज देयक दिले बाबत तक्रारदारांनी ता.3.10.2009 रोजी सामनेवाले यांचेकडे तक्रारी अर्ज दिला आहे. त्याच प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदरचे मिटर बदलून देवून नविन मिटर ता.24.11.2009 रोजी बसविले आहे. परंतु तक्रारदारांना सप्टेंबर,2009 ते नोव्हेंबर,2009 या कालावधीचे रक्कम रु.11,800/- चे विज बील सामनेवाले यांनी दिले आहे. तक्रारदाराचे जुने विजमापकाची तपासणी करण्यात येवून ता.12.12.2009 रोजी सामनेवाले यानी तक्रारदारांना सदर मिटर तपासणीचा अहवाल दिलेला असुन सदर अहवालानुसार तक्रारदाराचे विज मापक 14.88 टक्के जास्तीचे फिरत असल्याचे नमुद केले आहे.
सामनेवाले यांचे खुलाशानुसार तक्रारदाराचे जून,2009 ते सप्टेंबर,2009 या कालावधीचे तसेच आधिच्या 3 महिन्याचे विज बील दुरुस्त करुन दिले आहे. जुन,2009 मध्ये अंदाजे लागलेले सप्टेंबर,2009 चे बीलातुन वजा करण्यात आले आहे. त्यानंतर दिलेले बील मिटर रिडींग प्रमाणे आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना आलेले जास्तीचे विज बील दुरुस्त करुन दिले आहे. तसेच जुने मिटर तपासण्ी करुन त्यासंबधीचा अहवाल दिलेला असल्याने सामनेवाले यांची सेवेत कसूरी होत नाही.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता, तक्रारदाराना सामनेवाले यांनी चुकीचे विज बील दिले असले तरी या संदर्भात तक्रारदारांनी तक्रारी अर्ज दिला असता सदरचे बील दुरुस्त करुन जुन्या मिटरची तपासणी करुन तपासणी अहवाल ता.12.12.2009 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना अल्पावधीतच चुकीचे बील दुरुस्त करुन दिले असल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे मानसिक त्रासाची व तक्रारीच्या खर्चाची मागणी मान्य करणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी चुकीचे बील दिल्यामुळे तक्रारदारांना निश्चितच मानसिक त्रास झाला आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांचा मिटर त्वरीत बदलून देवून चुकीचे बील दुरुस्त करुन दिल्यामुळे सदची रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि. बीड