निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 07/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 11/11/2013
कालावधी 01वर्ष.11 महिने.04 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
कैलास पिता शंकरराव लंगोटे. अर्जदार
वय 39 वर्षे. धंदा.शेती. अॅड.डी.यु.दराडे.
रा.लंगोट गल्ली, परभणी.
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी. गैरअर्जदार.
तर्फे उप कार्यकारी अभियंता. अॅड.एस.एस.देशपांडे.
शहर उप विभाग जिंतूर रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सेवात्रुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी.
अर्जदाराने मा. मंचासमोर तक्रार क्रमांक 1/2011 ही दाखल केली होती तिचा निकाल दिनांक 11/08/2011 रोजी लागला मा.मंचाने दिलेल्या निकाल प्रमाणे सप्टेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 पर्यंतची विद्युत बिले रद्द केली, परंतु गैरअर्जदाराने त्याकडे दुर्लक्ष करुन तक्रारदारास पुन्हा दिनांक 27/09/2011 रोजी पूर्वी सारखेच बिल दिले. सामनेवाला यांनी दिनांक 01/11/2011 चे विद्युत देयक अर्जदारास दिले. त्या मध्ये त्यांनी 50 युनीट प्रती महीना वापर या प्रमाणे 1014 युनीटचे देयक दिले, सदर देयका मधून मागील भरणा केलेले देयकाची रक्कम रु. 8,345/- इतकी वजा केली. त्यामुळे तक्रारदाराचे सामनेवाला यांच्याकडे एकुण रु. 5,000/- जादाचे जमा झालेलेचे दाखविले. तक्रारदाराकडे कोणतीही समायोजित रक्कम थकबाकी नसतांना सामनेवाला यांनी रु. 13094/- इतकी समायोजित रक्कम व रु. 3,250/- इतकी व्याजाची रक्कम नमुद करुन एकूण थकबाकी रक्कम रु. 16,345/- इतकी दाखविली. वास्तविक पाहता सप्टेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 या कालावधीसाठीतील सर्व देयके तक्रार क्रमांक 01/2011 मध्ये दिलेल्या निर्णयाने रद्द करण्यात आलेली आहेत, म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने दिलेले दिनांक 01/11/2011 चे विद्युत देयक हे बेकायदेशिर असल्याचे मा.मंचाने जाहिर करुन तक्रार क्रमांक 01/2011 प्रमाणेच विद्युत देयक अर्जदारास देण्याचे आदेश द्यावेत तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- मिळावेत अशी मागणी अर्जदाराने मंचासमोर केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि. 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 6 वर मंचासमोर दाखल केली.
मंचाची नोटीस गैरअर्जदार यांना तामील झाल्यानंतर त्यांने लेखी निवेदन नि.क्रमांक 11 वर देवुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने या पूर्वी दिनांक 1/2011 रोजी मंचासमोर तक्रार दाखल केली होती व त्याचा निकाल दिनांक 11/8/2011 रोजी लागला होता व त्या निकाला नुसार अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यात आली होती, त्यामुळे सदर प्रकरणाला Principle of Res-Judicata हे तत्व लागु होते. त्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी विनेदना सोबत शपथपत्र नि. 12 वर मंचासमोर दाखल केले.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदार हा गैरअर्जदार विज वितरण कंपनीचा
ग्राहक आहे काय ? नाही.
2 आदेश काय? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
सदर प्रकरणात कायदेशिर मुद्दा असा उपस्थित होतो की, अर्जदार हा गैरअर्जदार विज वितरण कंपनीचा ग्राहक आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल कारण नि.क्रमांक 6/1 वर दाखल केलेल्या विद्युत देयकावरुन विज मिटर हे शेषाबाई शंकरराव लंगोटे यांच्या नावे आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातून अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीचा ग्राहक असल्या बाबतचे कथन केलेले नाही. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार विज वितरण कंपनीचा ग्राहक असल्याचे शाबीत न झाल्यामुळे त्यास गैरअर्जदारा विरुध्द दाद मागता येणार नाही, असे मंचाचे मत असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2 दोन्ही पक्षांनाआदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.