Maharashtra

Chandrapur

CC/20/16

Dhanaraj Sitaram Warjurkar - Complainant(s)

Versus

Up Karyakari Abhiyanta M.S.E.D.C.L. Up Vibhag Bhadravati - Opp.Party(s)

SELF

17 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/16
( Date of Filing : 26 Feb 2020 )
 
1. Dhanaraj Sitaram Warjurkar
Zade Plot,Bhutkala ward,Santosh kirana javal,Bhadravati tah.bhadravati,Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Up Karyakari Abhiyanta M.S.E.D.C.L. Up Vibhag Bhadravati
Navin Police Thane Samor Bhadravati,Tah.Bhadravati,Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Feb 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

             (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या)                  

                    (पारीत दिनांक १७/०२/२०२२)

 

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे  कलम १२ अन्‍वये  दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हा भद्रावती, जिल्‍हा चंद्रपूर येथील रहिवासी असून त्‍यांचे कार्ली सोनेगांव, येथे सर्व्‍हे क्रमांक ४०/१ ही शेतजमीन आहे. तक्रारकर्त्‍याने सन २०१५ विरुध्‍द पक्ष यांचेकडून विद्यूत पुरवठा घेतला असून ते नियमीतपणे विद्यूत देयकाचा भरणा करतात. तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त शेतात तामिलनाडू कृषी विद्यापीठाने प्रसिध्‍द केलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार दिनांक ३/१/२०१९ रोजी टरबूज व खरबूज यांची लागवड केली. दोन्‍ही  पीके दिनांक ३/१/२०१९ ते १५/०३/२०१९ पर्यंत उत्‍तम आले. परंतु दिनांक ३/१/२०१९ ते १५/०३/२०१९ च्‍या दरम्‍यान विद्यूत पुरवठा थोड्यावेळकरिता खंडित व्‍हायचा आणि पिकाला पाण्‍याची गरज जाणवत होती. टरबूज व खरबूज  दिनांक २५/०३/२०१९ च्‍या काळात फळधारणा व फळ परिपक्‍व होण्‍याच्‍या टप्‍प्‍यात होते.  परंतु दिनांक २८/०३/२०१९ ते ४/४/२०१९ व दिनांक १३/०४/२०१९ ते १९/४/२०१९ या कालावधीमध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या शेतातील ५ अश्‍वशक्‍तीचा ३ फेज विद्यूत कृषीपंप चालण्‍याकरिता आवश्‍यक असणारा विद्यूत प्रवाह चा पुरवठा सलग होत नव्‍हता. या कालावधीमध्‍ये भद्रावती येथील तापमान जास्‍त होते. अशा परिस्थितीमध्‍ये  पिकाला पाण्‍याची अत्‍यंत गरज होती परंतु शेतातील कृषी पंप विद्यूत पुरवठा खंडित झाल्‍याने चालु होऊ शकला नाही. त्‍यामुळे टरबूज व खरबूज या पिकाला पाणी देता न आल्‍याने ते करपले आणि त्‍याचे फळे गळून पडले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे पिकाचे मोठे नुकसान झाले. तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त  कालावधीमध्‍ये विद्यूत पुरवठा खंडित झाल्‍याने दिनांक ४/४/२०१९, २५/४/२०१९, २७/१२/२०१९ व १६/०१/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे लेखी तक्रार दिली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा निरंतर विद्यूत प्रवाह चालू केला नाही, ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील न्‍युनता आहे. विरुध्‍द पक्ष यांनी अखंडित विद्यूत पुरवठा न दिल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या पिकाचे उत्‍पन्‍न न झाल्‍यामुळे आर्थिक नुकसान झाले. सबब तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष यांचे विरुध्‍द तक्रार दाखल करुन अशी मागणी केली की, आर्थिक, शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये ९,१३,५००/- देण्‍याचे आदेशीत व्‍हावे.
  3. तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांना नोटीस काढण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष यांना नोटीस तामील झाल्‍यावर ते आयोगासमक्ष हजर झाले. विरुध्‍द पक्ष यांनी लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन अमान्‍य करुन नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या ७/१२ च्‍या उतारामध्‍ये तक्रारकर्ता आणि श्री सुभाष वारजुरकर यांचे नाव नमूद आहे. परंतु तक्रारकर्त्‍याला अर्जदार न करुन सदर तक्रार दाखल केली असल्‍याने ती खारीज होण्‍यास पाञ आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या शेतामध्‍ये कोणते पीक उत्‍तमरित्‍या होऊ शकते याबाबत कृषी विद्यापीठाकडून त्‍यांचा जमिनीचा नमुना घेऊन शेत जमिनीचा दर्जा तपासून घ्‍यावयास पाहिजे आणि त्‍याप्रमाणे पीक घेणे अपेक्षित आहे परंतु तक्रारकर्त्‍याने तपासणी केल्‍याबाबत त्‍यांच्‍या तक्रारीत नमूद नाही तसेच शेत जमिनीच्‍या  दर्जाप्रमाणे पिकाची लागवड केली याबाबत कृषी प्रमाणपञ दाखल केले नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या शेतामध्‍ये पीक करपले याबाबत कृषी अधिकारी यांनी पाहणी केल्‍याचा अहवाल सुध्‍दा सादर केला नाही. तक्रारकर्त्‍याने किती व कोणत्‍या  कारणाने नुकसान झाले याबाबत अहवाल तक्रारीसोबत दाखल केला नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या शेतातील विद्यूत पुरवठा कधीच कायम स्‍वरुपी बंद नव्‍हता व फक्‍त ट्रीपींग ची समस्‍या होती ते सुध्‍दा १०-१५ मिनिटच होती आणि त्‍याचे सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने तक्रार केल्‍यानंतर  निराकरण करुन तसे पञ त्‍यांना देण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याचा विद्यूत पुरवठा ज्‍या फीडरवरुन आहे त्‍या फीडरवरुन अनेक कास्‍तकारांना विद्यूत पुरवठा दिला आहे. परंतु सदर फीडरवरुन विद्यूत पुरवठा जास्‍त काळ किंवा कायमचे बंद असल्‍याची तक्रार तक्रारकर्ता सोडून कोणत्‍याही कास्‍तकाराने केली नाही. तक्रारकर्त्‍याचे कथन खोटे असून त्‍यांनी दाखल केलेली तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे.
  4. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ, लेखी युक्‍तीवाद आणि विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर आणि लेखी उत्‍तराला शपथपञ समजण्‍यात यावे अशी पुरसिस दाखल व लेखी युक्तिवाद तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद  यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या  विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमिमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

   अ.क्र.                 मुद्दे                            निष्‍कर्ष

    १.  तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक आहे कायॽ            होय

    २.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याप्रति न्‍युनतापूर्ण सेवा दिली       नाही

        आहे कायॽ

      ३.  आदेश कायॽ                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

 

  •  

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्ता यांनी त्‍यांच्‍या कार्ल्‍ली सोनेगांव, तहसिल भद्रावती, जिल्‍हा चंद्रपूर,  येथील सर्व्‍हे क्रमांक ४०/१ असलेल्‍या शेतामध्‍ये पीकाला पाणी देण्‍याकरिता ५ अश्‍वशक्‍ती चा कृषी पंप वापरण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष यांचेकडून तक्रारकर्त्‍याचे नावे दिनांक ९/४/२०१५ रोजी वीज पुरवठा घेतला. त्‍याचा मीटर क्रमांक ०६५०६५७०२८७ हा असून ग्राहक क्रमांक ४५८९९०००६३९० असा आहे. तक्रारकर्ता आणि श्री सुभाष वारजुरकर दोघांचे नावे ७/१२ उतारावर आहे. वीज पुरवठा देण्‍याकरिता श्री सुभाष वारजुरकर यांनी दिनांक ०८/१२/२०१४ चे पत्रानुसार संमती दिलेली आहे. सदर संमती पञ प्रकरणात दाखल आहे. तक्रारकर्ता हा शेतामध्‍ये उत्‍पन्‍न घेण्‍याकरिता वीज पुरवठ्याचा वापर करतो. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत निशाणी क्रं.३ सोबत दस्‍त क्रं. १ सातबारा उतारा, दस्‍तक्रमांक 2 विरुध्‍द पक्षाने  दिलेले विज देयक व समंतीपत्र प्रकरणात दाखल केलेले आहे.यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. प्रस्‍तुत तक्रारीत विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे उपरोक्‍त शेतामध्‍ये कृषी पंपाकारिता दिलेला वीज पुरवठा बंद झाल्‍याने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या शेतामध्‍ये टरबूज व खरबूज या पिकाला पाणी देता आले नाही. त्‍यामुळे पिकाचे उत्‍पन्‍न न झाल्‍याने नुकसान झाले याबाबत उभयपक्षात वाद आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या शेतातील वीज पुरवठा दिनांक २८/०३/२०१९ ते ४/४/२०१९ व दिनांक १३/४/२०१९ ते १९/०४/२०१९ पर्यंत बंद असल्‍याबाबत विरुध्‍द पक्ष यांचेकडे लेखी तक्रार केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे शेतातील वीज पुरवठा सुरळीत करुन दिला व तसे लेखी पञ दिनांक १०/०२/२०२० रोजी तक्रारकर्त्‍यास दिले. सदर पञ तक्रारकर्त्‍यानेच निशानी क्रमांक ३ सोबत दस्‍त क्रमांक ८ वर दाखल केलेले आहे. सदर पञाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये ‘ सदर कालावधी म्‍हणजेच दिनांक २८/०३/२०१९ ते ४/४/२०१९ आणि १३/०४/२०१९ ते १९/०४/२०१९  पर्यंत वीज पुरवठा हा कधीच कायमस्‍वरुपी बंद नव्‍हता. सदर कालावधीत तक्रारकर्त्‍याला वीज पुरवठा करणा-या ११ के.व्‍ही. वीज वाहनीवर ट्रीपींग झाले होते परंतु कोणतीही ट्रीपींग हे १५ मिनिटांपेक्षा जास्‍त नव्‍हते तसेच सदर कालावधीमध्‍ये सहायक तक्रारकर्त्‍याने भद्रावती ग्रामीण येथील अभियंता यांना फोन केल्‍यावर त्‍यांनी स्‍वतः तेथील ट्रांन्‍सफॉरमर योग्‍य ती दुरुस्‍ती करुन तक्रारकर्त्‍याकडील वीज पुरवठा सुरळित केलेला आहे.’ असे नमूद आहे. यावरुन तक्रारकर्त्‍याचा वीज पुरवठा हा कायमचा कधीच बंद नव्‍हता व तक्रारकर्त्‍याने केलेल्‍या लेखी तक्रारीचे सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांनी निरसन करुन वीज पुरवठा सुरळीत केला आहे व तसे दिनांक १०/२/२०२० चे पत्रान्‍वये तक्रारकर्त्‍यास कळविले हे स्‍पष्‍ट होते. यावरुन विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रति कोणतीही न्‍युनतापूर्ण सेवा दर्शविली नाही हे सिध्‍द होते या निष्‍कर्षाप्रत आयोग आले आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या शेतातील वीज पुरवठा कायमचा बंद होता तसेच त्‍यांच्‍या आजुबाजूच्‍या शेतातील वीज पुरवठा सुध्‍दा बंद होता हे त्‍या परिसरातील शेतक-यांचे शपथपञ वा दस्‍तावेज दाखल करुन सिध्‍द केले नाही आणि वीज पुरवठा बंद असल्‍यामुळे त्‍यांचे किती नुकसान झाले याबाबत कृषी तज्‍ज्ञाचा अहवाल दाखल केला नाही. सबब तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष यांचेकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍यास पाञ नाही. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. १६/२०२० खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.

 

    

 

     (किर्ती वैद्य (गाडगीळ))     (कल्‍पना जांगडे (कुटे))       (अतुल डी. आळशी)

            सदस्‍या                सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.