(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 18 सप्टेंबर, 2014)
तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडून विकत घेतलेल्या Renault कार मध्ये उत्पादन दोष असल्यामुळे व विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे वाहन बदलून देण्याची विनंती मान्य न केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार मंचात दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याला स्वतःकरिता व त्याच्या व्यवसायाकरिता वाहनाची आवश्यकता असल्यामुळे त्याने विद्यमान न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात Renault कंपनीच्या वाहनांचे Sub dealer असलेल्या विरूध्द पक्ष 1 यांच्याकडून दिनांक 20/08/2013 रोजी PULSE DIESEL Rxl.dci with single Airbag, Model – E1DSA, Chassis no. MEEAHBA30D1501047 या वर्णनाचे वाहन रू. 6,14,252/- किमतीत विकत घेतले. विरूध्द पक्ष 2 हे Renault कंपनीचे Dealer असून विरूध्द पक्ष 3 हे वाहनाचे उत्पादक आहेत. तक्रारकर्त्याने वाहन विकत घेतले तेव्हा त्याला फ्री सर्व्हिसींग तसेच वाहनाची वॉरन्टी सुध्दा देण्यात आली होती.
3. दिनांक 25/09/2013 रोजी तक्रारकर्त्याच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचे वाहन accident spot वरून जमा केले व दुरूस्त करून दिनांक 27/10/2013 रोजी तक्रारकर्त्याच्या ताब्यात दिले. परंतु तक्रारकर्त्याने वाहन जेव्हा विकत घेतले तेव्हापासूनच 70 ते 80 प्रति तास वेगाने वाहन चालविल्यास वाहनाच्या इंजिनमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आवाज येत होता. तक्रारकर्त्याने सदरहू बाब विरूध्द पक्ष 1 व 2 यांना कळविली होती. तक्रारकर्त्याने सदरहू वाहन इंजिनमधील आवाजाच्या दुरूस्तीकरिता दिनांक 09/12/2013 रोजी विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे दिले होते. विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याचे वाहन विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे दुरूस्तीकरिता पाठविले व तेव्हापासून तक्रारकर्त्याचे वाहन हे विरूध्द पक्ष 2 यांच्याकडेच आहे.
4. तक्रारकर्त्याच्या मुलाने वाहन दुरूस्तीबद्दल विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे चौकशी केली. परंतु त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही तसेच तक्रारकर्त्याने मोबाईलवर संपर्क साधला असता त्याच्या तक्रारीचे निराकरण झाले नाही. विरूध्द पक्ष 2 यांनी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे वाहनाच्या तकारीबद्दल संपर्क करा असे कळविले. परंतु त्यानंतर सुध्दा विरूध्द पक्ष यांचेकडून तक्रारकर्त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्याचे वाहन फक्त 2000 ते 2500 कि. मी. चाललेले असून ते वॉरन्टी कालावधीत समाविष्ट असल्यामुळे व तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निराकरण न झाल्यामुळे तसेच तक्रारकर्त्याच्या वाहनामधील दोष हा उत्पादन दोष असून सदर दोष दूर करण्यात विरूध्द पक्ष असमर्थ ठरल्यामुळे तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागला. त्यामुळे तक्रारकर्त्याला Cause of action दिनांक 09/12/2013 रोजी उत्पन्न झाल्यापासून मुदतीत तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात तक्रारकर्त्याचे वाहन बदलून देण्याबद्दल अथवा तक्रारकर्त्याच्या वाहनाची किंमत खर्चासह मिळण्याबद्दल दाखल केली आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 17/04/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीसेस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी त्यांचे लेखी जबाब दाखल केले.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब दिनांक 09/07/2014 रोजी दाखल केला असून त्यांनी आपल्या जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांचेकडून वाहन विकत घेतले हे म्हणणे खरे आहे. परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार ही खोट्या स्वरूपाची आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 25/09/2013 रोजी तक्रारकर्त्याच्या वाहनाला झालेला अपघात होण्यापूर्वी म्हणजेच दिनांक 21/09/2013 रोजी तक्रारकर्त्याने वाहनाची प्रथम सर्व्हीसींग विरूध्द पक्ष यांचेकडून केली होती व तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे व Satisfaction नुसार सर्व्हीसींग करून देण्यात आली होती. तक्रारकर्त्याच्या वाहनाला अपघात झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 यांचा ड्रायव्हर सोनू भाटी हा तक्रारकर्त्याचे वाहन तक्रारकर्त्याच्या विनंतीवरून दुरूस्तीकरिता विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे आणत असतांना अपघातामुळे व इंजिन मधील बेल्ट हा लोकल मेकॅनिक कडून लोकल कंपनीचा बेल्ट लावल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वाहनामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आवाज येत असलेला जाणवला. तक्रारकर्त्याने वाहनाची दुरूस्ती ही विरूध्द पक्ष यांच्या संमतीशिवाय अनधिकृत गॅरेजमधून केल्यामुळे व कमी प्रतीचे पार्टस् लावल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वाहनाच्या इंजिनमध्ये fault निर्माण झाला. त्यामुळे उत्पादक कंपनीच्या वॉरन्टीनुसार कुठलीही मोफत सेवा मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नसून वाहनाच्या उत्पादन दोषाबद्दल तक्रारकर्त्याने सदरहू तक्रारीमध्ये कुठलाही तज्ञाचा पुरावा दाखल केला नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असे जबाबात म्हटले आहे.
विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा जबाब दिनांक 31/05/2014 रोजी दाखल केला असून विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने सदरहू तक्रारीमध्ये महत्वाच्या घटना Suppression केल्यामुळे तो Suppression vary and suggestion false या कृतीकरिता जबाबदार आहे. तक्रारकर्त्याने वाहनाच्या उत्पादन दोषाबद्दल कुठलाही Cogent evidence सदरहू तक्रारीमध्ये दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार ही उत्पादन दोष या सदराखाली समाविष्ट होत नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 21/09/2013 व 08/10/2013 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे वाहन सर्व्हीसींग करिता आणले होते तेव्हा Repair Order मध्ये वाहन 70 ते 80 कि.मी. प्रति तास वेगापेक्षा जास्त वेगाने चालविल्यास इंजिनमध्ये Jerking and Jolting होते असे तक्रारकर्त्याला सांगितले नव्हते. तक्रारकर्त्याने त्याच्या वाहनाची दुरूस्ती Authorised Renault Work Shop मधून न केल्यामुळे तसेच त्याने इंजिन बेल्ट हा लोकल कंपनीचा वापरल्यामुळे व Expert Mechanic कडून न लावल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वाहनामधील आवाजाचे कारण असू शकते व त्याकरिता तक्रारकर्ता हा स्वतःच जबाबदार असल्यामुळे त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने वाहन बाहेरच्या मेकॅनिककडून दुरूस्त करून घेणे म्हणजेच breach of warrantee condition असल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
7. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत वाहन विकत घेतल्याचे दिनांक 20/08/2013 चे बिल पृष्ठ क्र. 17 वर दाखल केले असून तक्रारकर्त्याच्या वाहनाच्या इंजिनमधील आवाजाबद्दलची तक्रार पृष्ठ क्र. 19 वर दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना पाठविलेल्या ई-मेल चा data पृष्ठ क्र. 21 व 22 वर दाखल केला असून तक्रारकर्त्याने वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पृष्ठ क्र. 23 वर दाखल केली आहे.
8. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. एस. व्ही. खान्तेड यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने दिनांक 20/08/2013 रोजी विरूध्द पक्ष यांचेकडून वाहन विकत घेतले असून त्याचे बिल पृष्ठ क्र. 17 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याचे वाहन 70 ते 80 कि.मी. प्रति तास वेगाने चालविले असता इंजिनमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे वाहन दुरूस्तीकरिता दिले. तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करून सुध्दा तक्रारकर्त्याच्या वाहनामधील engine noise दूर झालेले नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 30/12/2013 रोजी ई-मेल द्वारे विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे वाहनाबद्दलची तक्रार नोंदविली होती. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची विनंती मान्य न केल्यामुळे वाहन बदलून देण्यात यावे व नुकसानभरपाई देण्यात यावी याकरिता तक्रारकर्त्याने दिनांक 27/01/2014 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. दिनांक 30/12/2013 रोजी तक्रारकर्त्याच्या मुलाने विरूध्द पक्ष यांना वाहन दुरूस्त करून देण्याबद्दल ई-मेल पाठविला होता. तक्रारकर्त्याने दिनांक 20/08/2013 रोजी वाहन विकत घेतले व तक्रारकर्त्याच्या वाहनाला दिनांक 25/09/2013 रोजी अपघात झाला. त्यानंतर तक्रारकर्त्याला दिनांक 27/10/2013 रोजी वाहन दुरूस्त करून दिले. परंतु इंजिनमध्ये आवाज येत असल्याने तक्रारकर्त्याने पुन्हा वाहन विरूध्द पक्ष यांच्याकडे दुरूस्ती करिता दिले. तक्रारकर्त्याच्या वाहनाला अपघात झाल्यामुळे तक्रारकर्त्याने त्याच्या वाहनाचा इंजिन बेल्ट हा emergency या कारणाकरिता स्थानिक मेकॅनिक कडून बसवून घेतला होता. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या वाहनाला 2 वर्षाची वॉरन्टी व 50000 कि.मी. जे आधी होईल त्याप्रमाणे वॉरन्टी दिलेली होती. विरूध्द पक्ष यांनी वाहन हे वॉरन्टी कालावधीमध्ये दुरूस्त करून न दिल्यामुळे तसेच वाहनामधील दोष हा उत्पादन दोष असल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास नवीन वाहन द्यावे अथवा तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रू. 2,00,000/- नुकसानभरपाई व्याजासह द्यावी असा आदेश देण्यात यावा असा युक्तिवाद केला.
9. विरूध्द पक्ष 1, 2 यांचे वकील ऍड. एम. के. गुप्ता यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने वाहनाचा अपघात झाल्यावर वाहनाची दुरूस्ती ही विरूध्द पक्ष यांच्या Authorized Workshop मधून न करता Local Mechanic कडून केली. विरूध्द पक्ष यांच्याकडे काम करणारे Motor तज्ञ यांनी ‘तक्रारकर्त्याचे वाहन तपासले असता त्यांना वाहनाचा इंजिन बेल्ट हा कमी प्रतीचा असून तो व्यवस्थितपणे न लावल्यामुळे इंजिनमध्ये defect निर्माण होऊन तक्रारकर्त्याच्या वाहनामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आवाज येत होता’ असे सांगितले. विरूध्द पक्ष यांनी सदरहू तज्ञाचा प्रतिज्ञापत्राद्वारे पुरावा देखील सदरहू प्रकरणात दाखल केलेला आहे. तक्रारकर्त्याने वाहन प्रथम सर्व्हीसींगला आणले असता त्याला वाहन व्यवस्थित दुरूस्त करून दिले होते व त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारे इंजिनमधील आवाजाबद्दल दोष नव्हता. विरूध्द पक्ष यांच्या वॉरन्टीच्या Terms & conditions नुसार तक्रारकर्त्याने Clause 3.1 चे उल्लंघन केले आहे, कारण तक्रारकर्त्याने वाहन अनधिकृत वर्कशॉपमध्ये दुरूस्त केल्यामुळे तक्रारकर्ता वॉरन्टीचे लाभ घेण्यास पात्र नाही. तक्रारकर्त्याने वॉरन्टी कालावधीत वाहनाला अपघात झाल्यास वॉरन्टी clause 6 च्या Terms & conditions नुसार विरूध्द पक्ष यांच्याकडून पुरविण्यात आलेल्या टोल फ्री नंबर वर मदत मागून वाहनाच्या दुरूस्ती संबंधाने विरूध्द पक्ष यांचे तज्ञ किंवा वाहन वर्कशॉपमध्ये आणण्याकरिता विरूध्द पक्ष सेवा देण्यास बाध्य असतांना सुध्दा तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना कुठलीही माहिती दिली नाही. तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरणामध्ये वाहनाच्या उत्पादन दोषासंबंधी कुठलाही Expert evidence दाखल न केल्यामुळे तसेच तक्रारकर्त्याने वाहन 2000 ते 2500 कि.मी. चालल्यानंतर वाहनाच्या इंजिन संबंधी तक्रार दाखल केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वाहनामध्ये कुठल्याही प्रकारे उत्पादन दोष नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असा युक्तिवाद केला.
विरूध्द पक्ष 3 यांचे वकील मौखिक युक्तिवादाच्या वेळेस गैरहजर.
10. तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय? | नाही |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
11. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडून दिनांक 20/08/2013 रोजी रू. 6,14,252/- इतक्या किमतीचे वाहन विकत घेतले होते हे तक्रारकर्त्याने पृष्ठ क्र. 17 वर दाखल केलेल्या Sale Memo नुसार सिध्द होते. तक्रारकर्त्याने वाहन प्रथम सर्व्हीसींगला दिनांक 21/09/2013 रोजी विरूध्द पक्ष क्र. 1 कडे आणले तेव्हा Engine मध्ये Jerk किंवा Jolting बद्दल तक्रार केलेली नाही. तसेच तक्रारकर्त्याने वाहन दुरूस्तीकरिता विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्याकडे दिनांक 08/10/2013 रोजी आणले. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना वाहन दुरूस्तीकरिता, Repair Order No. ROAB 13002268 दिनांक 08/10/2013 चे Repair Order नुसार जे विरूध्द पक्ष 3 यांनी Annexure – A म्हणून दाखल केलेले आहे, त्यामध्ये तक्रारकर्त्याचे वाहन हे 70 ते 80 कि.मी. प्रति तास वेगाने चालविल्यास इंजिनमध्ये Jerking or Jolting बद्दलची कुठलीही तक्रार दिनांक 08/10/2013 ला केलेली नव्हती. याउलट तक्रारकर्त्याने दनांक 24/12/2013 रोजी जेव्हा वाहन विरूध्द पक्ष यांच्या वर्कशॉपमध्ये आणले त्या वेळेस प्रथम Jerking and Jolting बद्दल तक्रार नोंदविली. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे वाहन प्रथम सर्व्हीसींगला म्हणजेच दिनांक 21/09/2013 रोजी आणले होते तेव्हा तक्रारकर्त्याने वाहनाच्या इंजिनमध्ये वाहन 70 ते 80 कि.मी. प्रति तास वेगाने चालविल्यास इंजिनमध्ये Jerking and Jolting होत होता याबद्दल कुठलीही तक्रार केली नाही व तक्रारकर्त्याने त्याचे वाहन दिनांक 19/10/2013 रोजी satisfied म्हणून सही करून त्याच्या ताब्यात घेतलेले होते. तक्रारकर्त्याचे वाहन हे विकत घेतल्यापासून 2000 ते 2500 कि.मी. चालल्यानंतर इंजिन बद्दल तक्रार दाखल करणे म्हणजे तक्रारकर्त्याच्या वाहनाच्या इंजिनमधील दोष हा cronic दोष नसून व तो continuous unremovable दोष नाही हे सिध्द होते.
12. तक्रारकर्त्याने वाहनामधील दोष हा उत्पादन दोष असल्याबद्दलचा Expert evidence सदरहू प्रकरणात दाखल केलेला नसल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वाहनामधील दोष हा उत्पादन दोष आहे हे सिध्द होत नाही. उत्पादन दोष सिध्द होण्यासाठी तो old, continuous and unremovable defect आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची आहे. परंतु तक्रारकर्त्याच्या वाहनामधील दोष हा उत्पादन दोष आहे हे Expert evidence द्वारे तक्रारकर्ता सिध्द करू शकला नाही.
13. विरूध्द पक्ष 3 यांच्या वॉरन्टी clause 5.2 च्या Terms & conditions नुसार “The RENAULT New Vehicle Warranty does not apply, and RIPL and RENAULT authorized workshop members are exempt from all liabilities, if:
5.2.1 The vehicle has been driven under conditions not in accordance with those stated in Driver’s Hand book, the warrantee and maintenance sheet (Example:- vehicle overloaded or taking part in any type of sports competition, etc.)
5.2.2 The defect observed is due to the Customer having had the vehicle repaired of serviced in a workshop outside the RENAULT authorized network and not observing the manuacturer’s recommendations on the subject”.
तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने इंजिनमधील इंजिन बेल्ट हा विरूध्द पक्ष यांच्या अधिकृत वर्कशॉप मधून दुरूस्त करून न घेता local mechanic कडून दुरूस्त करून घेतलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्या वॉरन्टीच्या Terms & conditions चे उल्लंघन केल्यामुळे तसेच बाहेरच्या मेकॅनिकद्वारे तो व्यवस्थितपणे, काळजीपूर्वक न बसविला गेल्यामुळे व उच्च प्रतीचा इंजिन बेल्ट न वापरल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वाहनामधील इंजिनमध्ये jerking and jolting चा त्रास निर्माण झाला होता ही बाब विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या Technical Co-ordinator श्री. अमित कोलचर्लवार यांच्या पुराव्यावरून तसेच विरूध्द पक्ष 1 यांच्या वर्कशॉपमध्ये काम करणारे श्री. सोनू भाटी यांच्या पुराव्यानुसार सिध्द होते तसेच तक्रारकर्त्याने अप्रशिक्षित व अकुशल बाहेरील मेकॅनिककडून वाहन दुरूस्त करून घेतल्यामुळे व वाहन दुरूस्ती ही कंपनीच्या मापदंडानुसार न झाल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वाहनामध्ये येणारा आवाज यासाठी तक्रारकर्ता स्वतः जबाबदार असल्यामुळे विरूध्द पक्ष यांच्या सेवेमधील त्रुटी नाही हे विरूध्द पक्षाचे म्हणणे सिध्द होते.
14. तक्रारकर्त्याने वाहनाच्या इंजिन दुरूस्तीचे काम विरूध्द पक्ष यांना कुठलीही माहिती न देता बाहेरील वर्कशॉप मधून केल्यामुळे तक्रारकर्त्याने The RENAULT New Vehicle Warranty च्या Terms & conditions च्या clause 3.1 ज्यामध्ये असे म्हटले आहे की, The customer is covered free repair of any material or assembly defect in the vehicle. It is the Renault authorized workshop’s discretion to decide whether it is appropriate repair of replace the defective part, whilst keeping the customer informed चे उल्लंघन केलेले आहे. तसेच Terms & conditions क्र. 4.6 नुसार अपघातामध्ये damage झालेले पार्टस् वॉरन्टीमध्ये समाविष्ट होत नसल्यामुळे विरूध्द पक्ष तक्रारकर्त्यास वाहन विनाशुल्क दुरूस्त करून देण्यास जबाबदार नाहीत. तक्रारकर्त्याला Owner’s Manual यामध्ये टोल फ्री नंबर हा विरूध्द पक्ष यांच्याकडून वाहनासंबंधी कुठल्याही मदतीकरिता दिलेला असतांनाही तक्रारकर्त्याने त्याचा उपयोग न करणे म्हणजे हा तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा असून त्यासाठी तो स्वतः जबाबदार आहे.
15. विरूध्द पक्ष यांनी पृष्ठ क्र. 93 वर वाहनासंबंधी दाखल केलेल्या दिनांक 17.12.2013 च्या Progress Report मध्ये विरूध्द पक्ष यांचे Technical Expert श्री. कोलचर्लवार यांनी detail of CIR यामध्ये असे observation केले आहे की, “There was noise in the engine and the accessories belt was also broken and then installed an accessories belt locally. The belt was mismatch with timing gear and this is a reason for jerking and jolting and that is the root cause for damage in engine of the vehicle”. त्यामुळे विरूध्द पक्ष यांची कृती ही सेवेतील त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.