गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. उपाध्ये
विरुध्दपक्ष 1 तर्फे : अॅड. मोहता
विरुध्दपक्ष 2 तर्फे : अॅड. रिहाल
ग्राहक तक्रार क्रमांक : 180/2014
: : न्यायनिणर्य : :
(पारित दिनांक 26/05/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्य ः
1. तक्रारदाराने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे विरुध्दपक्षा विरुध्द दाखल केली आहे.
2. तक्रारदाराचे थोडक्यात म्हणणे आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 ने निर्मीत केलेला महिन्द्रा बुलेरो मॅक्स ट्रॉली गाडी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून दि. १३.३.२०१४ रोजी किंमत रु. ५,३४,०००/- मध्ये विकत घेतली. त्यासाठी तक्रारदाराने आर्या नांदी बॅंक वाडोना (आर) शाखेकडून कर्ज घेतले. सदर गाडी तक्रारदाराने त्यांच्या कुटुंबाच्या व स्वतःच्या उदरनिर्वाहा करीता विकत घेतली. सदर गाडीमध्ये विकत घेतल्याच्या 15 दिवसांनी रु. ४०,०००/- खर्च करुन ट्रॉली बांधुन घेतली. त्यानंतर 2-3 दिवसांनीच असे आढळून आले की, ड्रायव्हरच्या मागील बाजुच्या चाकामध्ये उष्णता निर्माण होऊन गाडीमध्ये दोष निर्माण झाला. त्यानंतर सदर गाडी विरुध्दपक्ष क्र. 2 ला दाखविल्या नंतर त्यांनी प्रथम सर्व्हीसींग वेळी दोष काढुन देण्याची हमी दिली. नंतर पुढे सदर गाडी तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे दि. २.४.२०१४, २२.४.२०१४,
ग्राहक तक्रार क्रमांक : 180/2014
..3..
३.५.२०१४ रोजी त्याच त्याच दोषाकरीता नेऊन सुध्दा तो दोष विरुध्दपक्ष क्र. 1 ने काढून दिला नाही, उलट तक्रारदारा कडून रु. १,६८९/- दुरुस्ती पोटी वसुल करण्यात आले.
3. त्यानंतर पुन्हा दि. २४.५.२०१४, १७.६.२०१४ सदर गाडी दाखविली असता विरुध्दपक्ष क्र. 1 ने सांगितले की, त्या गाडीचे फोटोग्राफ विरुध्दपक्ष क्र. 2 कडे पाठविण्यात आले असून व गाडी निर्मीती दोष असल्यास तपासणी करण्याचे सांगितले. कंपनी कडून अहवाल येताच सदर गाडी बदलवुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सदर गाडीचा दि. ११.८.२०१४ रोजी शिंगणा फाटा येथे गाडीचे मागचे टायर ब्रस्ट होऊन अपघात झाला. त्यानंतर नांदगांव खंडेश्वर पोलिसांनी दि. १२.८.२०१४ रोजी स्थळ पंचनामा केला.
4. अशा प्रकारे गाडीमध्ये असलेल्या निर्मीती दोषामुळे, तिचा अपघात होऊन तक्रारदाराचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले व हयाला विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवेत केलेल्या त्रुटीमुळे तक्रारदाराला शारिरीक व मानसिक तसेच आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रार वि. मंचात दाखल करुन प्रार्थना केली की, सदर गाडीच्या बदल्यात दुसरी नविन गाडी देऊन, तक्रारदाराला नुकसान भरपाई रु. १,८५,०००/- विरुध्दपक्षाकडून
ग्राहक तक्रार क्रमांक : 180/2014
..4..
मिळण्यात यावी. तक्रारकर्ताने तक्रारीसोबत निशाणी 2 प्रमाणे दस्तऐवज 1 ते 11 दाखल केले.
5. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी निशाणी 16 प्रमाणे लेखी जबाब सादर करुन प्राथमिक आक्षेप नोंदविला व त्यात नमुद केले की, तक्रारदाराने सदर गाडीमध्ये Unauthorized Modification केल्यामुळे त्या गाडीची वाहन क्षमतेवर व अस्तित्वावर विपरीत परिणाम झाल्यामुळे वारंटी व गॅरंटीच्या अटी शर्तीचा भंग झाला. तसेच सदर गाडीच्या टायर वर प्रतिकुल परिणाम होऊन गाडीचे अपघात होण्याचा धोका वाढला म्हणून सदर गाडीचे एखाद्या तज्ञांमार्फत निरीक्षण करणे आवश्यक आहे.
6. तक्रारदाराच्या परिच्छेद 1 मधील म्हणणे मान्य करुन इतर सर्व परिच्छेद व विनंती प्रार्थनेमधील म्हणणे नाकबुल करुन, म्हटले की, तक्रारदाराने सदर गाडी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे आणली असता त्याचे मागील चाकात उष्णता निर्माण होणा-या दोषाची पडताळणी केली असता असा कोणताही दोष आढळून आला नाही. तसेच तक्रारदाराने वेळोवेळी सदर गाडी दुरुस्तीकरीता आणली असता त्यात वेगवेगळे दोष आढळून आले व सदर दोष त्याच वेळी काढण्यात आले. तसेच दि. १६.६.२०१४ च्या दुरुस्तीच्या वेळी सदर गाडी ही १७८६५ कि.मी. चालली होती. अशा
ग्राहक तक्रार क्रमांक : 180/2014
..5..
प्रकारे तक्रारदाराची तक्रार ही आधारहीन असून खोटी व फसवेगिरी करणारी आहे व ती खर्चासह रद्द होण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 ने निशाणी 17 प्रमाणे दस्त 1 ते 14 दाखल केले आहे.
7. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी निशाणी 18 प्रमाणे लेखी जबाब सादर करुन नमूद केले की, कोणतीही गाडी तयार करतांना ARAI तर्फे त्या गाडीचे रोड ट्रायल व क्वालिटीचे निरीक्षण केल्या जाते. तक्रारदाराच्या गाडीचे पण तसे निरीक्षण करण्यात आले होते. तसेच प्राथमिक आक्षेप नोंदवून नमुद केले की, सदर गाडीमध्ये निर्मीती दोष असल्याचा पुरावा तक्रारदाराने दिला नसुन सेवेत त्रुटी झाल्याचे पण सिध्द झाले नाही म्हणून सदर तक्रार रद्द होणेस पात्र आहे.
8. तक्रारदाराच्या परिच्छेद 1 मधील म्हणणे मान्य करुन इतर सर्व परिच्छेद मधील तक्रारी हया आधार हीन व पुराव्याशिवाय निर्मीती दोष असल्याचे तक्रारदाराने सिध्द न केल्यामुळे अमान्य करण्यात येतात. म्हणून तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह रद्द करण्याची विनंती केली. विरुध्दपक्ष क्र. 2 ने त्यांच्या लेखी जबाबात वेगवेगळया न्यायनिर्णयाचा आधार घेऊन तक्रार ही रद्द होणेस पात्र असल्याचे विशद केले. सदर गाडीचे तज्ञ व्यक्तीकडून निरीक्षण करुन अहवाल प्राप्त करण्यासाठी विरुध्दपक्ष
ग्राहक तक्रार क्रमांक : 180/2014
..6..
क्र. 2 मार्फत निशाणी 21 प्रमाणे अर्ज सादर केला वि. मंचाने दि. २७.२.२०१५ रोजी त्यावर आदेश पारीत करुन जयका मोटर्स अमरावती यांची तज्ञ म्हणून नेमणुक केली होती. निशाणी 24 वरील जयका मोटर्स यांचे पत्रा प्रमाणे तक्रारदार यांनी त्याचे वाहन त्यांचेकडे दिलेल्या मुदतीत उपलब्ध करुन न दिल्यामुळे सदर गाडीचे तज्ञांमार्फत निरीक्षण होऊ शकले नाही.
9. विरुध्दपक्ष क्र. 2 ने निशाणी 26 प्रमाणे दस्त 1 ते 2 दाखल केले.
10. तक्रारकर्ताची तक्रार व दाखल केलेले दस्ताऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा लेखी जबाब, दाखल असलेले कागदपत्र तसेच तक्रारदाराच्या वकीलांचा व विरुध्दपक्षाच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद, यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आली.
मुद्दे उत्तर
- तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून विकत घेतलेल्या
गाडीमध्ये निर्मीती दोष होता
हे तक्रारदाराने सिध्द केले का ? ... नाही
- तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहे का ? ... नाही
- आदेश .. अंतीम आदेशा प्रमाणे
ग्राहक तक्रार क्रमांक : 180/2014 ..7..
कारणे व निष्कर्ष ः-
11. तक्रारदारा तर्फे अॅड. उपाध्ये यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात त्यांच्या मुळ तक्रारीतील मुद्दे पुन्हा विस्तुतपणे मांडून विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराच्या गाडीमध्ये असलेला निर्मीती दोष हा वारंवार विनंती करुन सुध्दा काढुन दिला नाही व उलट वेळोवेळी वारंटी कालावधीमध्ये तक्रारदाराकडून पैसे घेतले. वेळेवर दोष न काढल्यामुळे सदर गाडीचा अपघात झाला त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक व मानसिक शारिरीक नुकसान होऊन विरुध्दपक्षाने सेवेत केलेल्या त्रुटीमुळे सर्व घडून आले म्हणून विनंती प्रमाणे प्रार्थना मंजूर करण्याची विनंती केली.
12. विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे अॅड. मोहता यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात त्यांच्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नरुच्चार करुन, कथन केले की, तक्रारदाराकडे कोणतेही ड्रायव्हींग लायसन्स नव्हते व त्यांची गाडी प्रतीदिन 200 कि.मी. चालत होती. तसेच तक्रारदाराने त्या गाडीमध्ये Unauthorized Modification करुन, वास्तव भार वाहन क्षमते पेक्षा जास्त वजनाच्या मापाची वाहतुक केली. तसेच सर्व्हीस रेकॉर्ड प्रमाणे दि. १६.८.२०१४ पर्यंत, १९३४१ कि.मी. पर्यंत वाहन चालले. तसेच तक्रारदाराने सदर गाडीचा तज्ञ अहवालासाठी कोणतेही सहकार्य केले
ग्राहक तक्रार क्रमांक : 180/2014
..8..
नाही. तक्रारदाराच्या निष्काळजीपणा मुळेच सदर गाडीचा अपघात घडून आला. विरुध्दपक्षातर्फे वेळोवेळी गाडीची पाहणी करुन दोष काढुन दिले व अशाप्रकारे विरुध्दपक्षातर्फे सेवेत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी केल्या नाहीत. तसेच तक्रारदारातर्फेत्या गाडीत निर्मीती दोष होता हे पुराव्यासह सिध्द करु शकले नाही. म्हणून सदर तक्रार खर्चासह रद्द होणेस पात्र आहे.
13. विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे अॅड. रिहाल यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात त्यांच्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नरुच्चार करुन म्हटले की, सदर गाडीमध्ये निर्मीती दोष असल्याचे तक्रारदारातर्फे सिध्द होऊ न शकल्यामुळे तक्रार रद्द करण्याची विनंती केली.
14. मुद्दा क्र. 1 चा विचार करता, तक्रारदाराने दाखल केलेले दस्ता प्रमाणे तक्रारदाराने सदर गाडी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विरुध्दपक्ष क्र. 2 ने निर्मीती केलेली गाडी विकत घेतल्याचे दिसुन येते. दस्त 2/8 प्रमाणे Rear Wheel Heating चा दोष असल्याचे नमुद आहे. व विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दस्त 11/5 प्रमाणे सदर दोष काढल्याचे Vehicle Histry मध्ये नोंद आहे. हया व्यतिरिक्त तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे गाडी वेळोवेळी
ग्राहक तक्रार क्रमांक : 180/2014
..9..
दुरुस्तीसाठी आणली त्यावेळी वेगवेगळे दोष नमुद केल्याचे दिसुन येतात. परंतु Rear Wheel Heating दोषा विषयी तक्रार नोंद नाही.
तसेच गाडीच्या सर्व्हीस कार्ड वरुन दि. १६.८.२०१४ पर्यंत गाडी १९३४१ कि.मी. वापरल्याचे दिसुन येते. याचा अर्थ गाडी घेतल्यापासुन 5 महिन्यामध्ये १९००० कि.मी. गाडीचा वापर झाला. सदर गाडी मध्ये जर निर्मीती दोष असता तर एवढया मोठया प्रमाणात गाडीचा वापर होणे शक्यच नव्हते. तसेच तक्रारदाराने सादर केलेल्या दस्ताऐवजामध्ये असा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने सादर केला नाही की, ज्याव्दारे निर्मीती दोष आहे हे सिध्द होऊ शकते.
15. तक्रारदाराने त्याच्या गाडीत जास्तीचे Unauthorized Modification केल्याचे विरुध्दपक्षाचे म्हणणे असून क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतुक करण्यात येते. हे विरुध्दपक्षाचे म्हणणे तक्रारदाराने नाकारले नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 च्या अर्जाप्रमाणे सदर गाडीचे तज्ञांमार्फत निरीक्षण करण्यासाठी वि. मंचाने आदेश देऊन सुध्दा तक्रारदाराने आदेशाचे पालन केले नाही.
वरील सर्व विवेचनावरुन व खालील न्यायनिर्णयाचा आधार घेणे उचित राहील.
Jai Malhotra //Vs// M/s Maruti Udyog Ltd. & Ors.
2002 CPJ 95 (NC)
ग्राहक तक्रार क्रमांक : 180/2014
..10..
वरील सर्व विवेचन व विरुध्दपक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरण्यात येऊन मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
16. मुद्दा क्र. 2 व 3 चा विचार करता, विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराच्या गाडीच्या वेळोवेळी नियमाप्रमाणे सर्व्हीसिंग करुन देऊन व जॉब कार्ड वर असलेले दोष काढुन देऊन तक्रारदाराला योग्य सेवा दिल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असून मुद्दा क्र. 2 व 3 ला पण नकारार्थी उत्तर देण्यात येते. व खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो.
- खर्चाबाबत काहीही आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 26/05/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष