Maharashtra

Chandrapur

CC/22/143

Shri.Ayush Kalidas Tikale - Complainant(s)

Versus

Universal Sampo General Insurance Co.Ltd Through Divisional Manager - Opp.Party(s)

U.P.Kshirsagar

11 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/22/143
( Date of Filing : 18 May 2022 )
 
1. Shri.Ayush Kalidas Tikale
103,Vithal nagar,Hundkeshwar road,police station mage,Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Universal Sampo General Insurance Co.Ltd Through Divisional Manager
Plot no.EAL 994/KLC tower M.I.D.C.Mahapay,Navi Mumbai
Mumbai
MAHARASHTRA
2. Taluka Krushi Adhikari,Bramhapuri
Bramhapuri,T.Bramhapuri,Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 11 Apr 2023
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

             (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)

                  (पारित दिनांक ११/०४/२०२३)

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ चे कलम ३५(१) अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हुडकेश्‍वर रोड नागपूर येथे राहत असून तक्रारकर्त्‍याचे वडील श्री कालीदास श्रीराम टिकले यांच्‍या मालकीची मौजा पिंपळगाव, तहसील ब्रम्‍हपूरी, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक ५५८ ही शेतजमीन आहे व त्‍यावर ते कुटुंबाचे पालनपोषण करतात. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही विमा कंपनी असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे शेतकरी अपघात विमा अंतर्गत दावे स्‍वीकारतात. तक्रारकर्त्‍याच्‍या वडीलांचा व त्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तीचा रुपये २,००,०००/- चा विमा शासनाच्‍या वतीने उतरविला. तक्रारकर्त्‍याच्‍या वडीलांचा मृत्‍यु दिनांक २७/२/२०२० रोजी त्‍यांची पत्‍नी श्रीमती विद्या कालीदास टिकले  यांच्‍या सोबत जात असतांना त्‍यांची चारचाकी गाडी झाडावर आदळल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या आई वडीलांचा मृत्‍यु झाला. त्‍यामुळे तक्रारकर्ता हे एकमेव वारस असल्‍याने त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडे दिनांक २४/०३/२०२१ रोजी रितसर अर्ज केला तसेच वेळोवेळी नंतर विरुध्‍द पक्ष यांनी मागितलेल्‍या दस्‍तऐवजांची पूर्तता केली परंतु त्‍यानंतर एक वर्ष उलटून गेल्‍यावरही दावा मंजूर वा नामंजूर न कळविल्‍याने सदर तक्रार तक्रारकर्त्‍याने दाखल केली. विरुध्‍द पक्ष यांनी दावा रक्‍कम न दिल्‍यामुळे रकमेवरील व्‍याजालाही तक्रारकर्त्‍याला  मुकावे लागले. ज्‍या उद्देशाने शासनाने सदर योजना चालू केली त्‍या उद्देशालाच विरुध्‍द पक्ष यांनी तडा दिला. तक्रारकर्त्‍यास सदर रक्‍कम न मिळाल्‍यामुळे त्‍याला मानसिक ञास झाला असल्‍यामुळे सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मागणी केली की, तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये २,००,०००/- प्रस्‍ताव दिल्‍यापासून दिनांक २४/३/२०२१ पासून द.सा.द.शे. १८ टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावे तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये २०,०००/- देण्‍यात यावे.
  4. आयोगामार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस तामिल होऊनसुध्‍दा  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ आयोगासमक्ष उपस्थित होऊन त्‍यांचे विरुध्‍द  तक्रारीतील कथन खोडून न काढल्‍यामुळे दिनांक १/११/२०२२ रोजी प्रकरण विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍याचा आदेश करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्‍याची तक्रार व शपथपञाबद्दल पुरसीस तसेच तोंडी युक्तिवादावरुन तक्रारीच्‍या निकालीकामी खालील निष्‍कर्षे आणि कारणमीमांसा खालीलप्रमाणे आहे.

कारणमीमांसा

 

  1. तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या अभिलेखावरुन दाखल केलेल्‍या सातबारा वरुन तक्रारकर्त्‍याचे वडील श्री कालीदास श्रीराम टिकले हे शेतकरी होते, हे सिध्‍द होत आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने राज्‍यातील सर्व शेतक-याचा शेतकरी अपघात विमा अंतर्गत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडून विमा काढण्‍यात आलेला असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ त्‍याकरिता सहकार्य व आवश्‍यक ती सेवा देण्‍यासाठी नियुक्‍त केलेले आहे. तक्रारकर्ता त्‍याच्‍या वडीलाच्‍या मृत्‍युपश्‍चात विमा दावा मिळण्‍यास लाभार्थी असल्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चा ग्राहक ठरतो. तक्रारकर्त्‍याच्‍या वडीलाचा मृत्‍यु दिनांक २७/२/२०२० रोजी अपघातात झाला व तक्रारकर्त्‍याने विमा अर्ज दिनांक २३/२/२०२१ रोजी अर्ज विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडे सादर केला व त्‍याबाबतचे दस्‍त अभिलेखावर निशानी क्रमांक २ सह  दस्‍त क्रमांक २ वर दाखल आहे. तक्रारकर्त्‍याचे आई व वडील हे त्‍याच्‍या चारचाकीने जात असतांना चारचाकी झाडावर आदळून त्‍याच्‍या आई व वडीलांचा मृत्‍यु  झाला, ही बाब तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या पोलीस दस्‍तऐवज तसेच पी.एम. रिपोर्ट वरुन स्‍पष्‍ट होत आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या वडीलाचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा रुपये २,००,०००/- चा काढलेला असल्‍याने व तक्रारकर्त्‍याच्‍या वडीलाचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याने एकमेव वारस म्‍हणून दिनांक २४/३/२०२१ रोजी रितसर अर्ज विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडे केला परंतु त्‍यानंतर एक वर्ष उलटून गेल्‍यावरही व सर्व दस्‍तऐवजाची पूर्तता करुनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ ह्यांनी तक्रारकर्त्‍याला काहीही दाव्‍यासंदर्भात माहिती दिली नाहीच परंतु तक्रारकर्ता यांनी त्‍यासंबंधात आयोगाकडे दाद मागितल्‍यावरही आयोगातर्फे नोटीस प्राप्‍त झाल्‍यावरही विरुध्‍द पक्ष क्रमांक १  यांनी आयोगासमोर येऊन तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोडून काढीत त्‍याचे उत्‍तर दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना देखील सदर प्रकरणात नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांनी देखील आयोगात त्‍याचे म्‍हणणे दाखल केलेले नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांच्‍या विरुध्‍द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचे आदेश दिनांक १/११/२०२२ रोजी करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल केलेल्‍या दस्‍त क्रमांक २ वरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मयत वडीलाचा शेतकरी अपघात विमा अंतर्गत नुकसान भरपाई दावा प्रपञ दस्‍ताऐवजासह विरुध्‍द पक्ष क्रमांक २यांना दिनांक २४/३/२०२१ रोजी प्राप्‍त झाले असे संपूर्ण दस्‍तऐवजाची पूर्तता करुनसुध्‍दा तक्रारकर्त्‍याचा विमा दावा अर्ज मंजूर वा नामंजूर न कळविता मंजूर करण्‍यायोग्‍य असलेला विमा दाव्‍याबद्दल काहीही न कळवून तक्रारकर्त्‍याप्रती सेवेत न्‍युनता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ ने केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येत आहे. तक्रारकर्त्‍याला आयोगासमोर सदर तक्रार दाखल करावी लागली व त्‍यामुळे त्‍याला मानसिक व आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागले असून मिळणा-या रकमेच्‍या व्‍याजालाही मुकावे लागले. करिता सदर प्रकरणी मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता व तक्रारीचा खर्च मिळण्‍याकरिता तक्रारकर्ता पाञ आहे.
  2. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन आणि दाखल दस्‍तऐवजावरुन आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्रमांक CC/१४३/२०२२ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या मृतक वडीलांच्‍या अपघाती विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये २,००,०००/- तक्रारीचा आदेश तारखेपासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्‍के व्‍याजासह द्यावी.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये १०,०००/- व  तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे. 
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ विरुध्‍द कोणताही आदेश नाही.
  5. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  6. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.