Maharashtra

Chandrapur

CC/21/123

Smt.Asha Kishorrao Malode - Complainant(s)

Versus

Universal Sompo General Insurance Company Ltd Through Manager - Opp.Party(s)

Lalit Limaye

26 Apr 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/123
( Date of Filing : 09 Aug 2021 )
 
1. Smt.Asha Kishorrao Malode
Dehankar layout,sindhi meghe,Dist.Wardha
Wardha
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Universal Sompo General Insurance Company Ltd Through Manager
K.L.S.Tower,plot no.EL 94,M.I.D.C.,Mahapay,Navi Mumbai
Mumbai
Maharashtra
2. Jayaka Insurance brokerage Pvt.Ltd. Through Manager
Second Floor,Jayka building,Commercial road, Civil lines Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Taluka Krushi Adhikari,Warora
Warora,Tah.Warora,Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Vaishali R. Gawande PRESIDENT
 HON'BLE MR. Sachin Vinodkumar Jaiswal MEMBER
 HON'BLE MRS. Swati A.Deshpande MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 26 Apr 2024
Final Order / Judgement

Final Order / Judgement

(पारित दिनांक 26/04/2024)

आयोगाचे आदेशान्‍वये श्रीमती स्‍वाती देशपांडे,मा.सदस्‍य

 

 
  1. तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ अन्‍वये दाखल केलेली आहे. प्रकरणाची थोडक्यात हकीगत खालील प्रमाणे.
  2. तक्रारदार ही मयत श्री अक्षय किशोरराव माळोदे यांची आई  आहेत.मयत अक्षय हे शेतकरी होते . त्यांची शेती तक्रारदाराच्या नावे असून शेतीचा भूमापन क्रमांक ६७ आहे आणि सदर शेती मौजा वालधूर रिठतालुका वरोरा येथे होती .तक्रारदार ही मयत अक्षय याची आई असल्यामुळे त्यांची कायदेशीर वारस आहेत.
  3. गैरअर्जदार क्रमांक १ ही विमा कंपनी आणि २ हे विमा सल्लागार कंपनी आहे. गैरहजर क्रमांक ३ हे कृषी अधिकारी आहेत.
  4. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित केली या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचा आणि कुटुंबातील एkaaका सदस्यांचा विमा विरुद्ध पक्ष क्रमांक १ यांच्याकडे उतरवण्यात आला. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याला रुपये २,००,०००/-  इतकी विम्याची रक्कम रक्कम देण्याचे निश्चित झाले होते.यासाठी  विरुद्ध पक्ष क्रमांक ३ हे सर्व कागदपत्रांची शहानिशा करून दावे स्‍वीकार  करतात आणि ते पुढे विमा सल्लागार गैरअर्जदार क्रमांक २ यांच्याकडे पाठवतात आणि विमा सल्लागार सदर दावा गैर अर्जदार क्रमांक १ यांच्याकडे पाठवतात आणि विरुद्ध पक्ष क्रमांक १ या सगळ्याची पडताळणी करून प्रत्यक्ष विमा रक्कम अर्जदारास देऊ करतात.
  5. तक्रारदाराच्या मुलाचा दिनांक २५/११/२०२० रोजी रोड अपघातात मृत्यू झाला.यानंतर तक्रारदाराने तिचा मुलगा शेतकरी होता आणि तो अपघातात मृत्यू पावला म्हणून विरुद्ध पक्ष क्रमांक १ आणि २ यांच्याकडे सगळे कागदपत्रे सादर करून विम्याच्या रकमेची मागणी केली,परंतु विमा कंपनीने सदर दाव्याचे भुगतान न करता अकारण तो प्रलंबित ठेवला आणि तक्रारदाराची फसवणूक केली म्हणून तक्रारदारास प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली.
  6. तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करून त्याद्वारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत रुपये २०००००/- मिळावे तसेच शारीरिक  मानसिक त्रासासाठी रुपये ४०,०००/- तक्रारीच्‍या खर्चासाठी रुपये २००००/- द्यावे अशी मागणी केली आहे.
  7. विरुद्ध पक्ष क्रमांक १ आयोगासमोर हजर होवून त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले आणि त्यात असे कथन केले की, तक्रारदाराच्या मुलाने हेल्मेट घातले नव्हते आणि तो बाईकवर ट्रिपल सीट जात होता आणि बाईक चालवणारा भरधाव वेगाने वाहन चालवत होता आणि त्यामुळे त्याने हा अपघात स्वतः ओढवून घेतलेला अपघात आहे म्हणून तक्रार खारीज करण्यात यावी,  अशी त्यांनी विनंती केली.
  8. विरुद्ध पक्ष क्रमांक २ आयोगासमोर हजर झाले नाहीत आणि त्यांनी कोणतेही उत्तर किंवा पुरावा दाखल केला नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध  निशाणी क्रमांक १ वर एकतर्फा केस चालवण्याचा आदेश दिनांक १६/०३/२०२३ रोजी पारित करण्यात आला.
  9. विरुद्ध पक्ष क्रमांक ३ हे कृषी अधिकारी असून त्‍यांनी आपले लेखी उत्तर पोस्टाव्‍दारे पाठवले आहे व ते या तक्रारीतील फॉर्मल पार्टी आहेत.
  10. तक्रारदाराने आपल्या अर्जा सोबत महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक २०१९ प्रकरण क्रमांक १९८/११-ए,क्लेम फॉर्म, स्वयंघोषणापत्र, सातबाराचा उतारा, 6ड आणि 6क,मर्ग रिपोर्ट,मुलाचे मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड, एफ आय आर रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विरुद्ध पक्षांना पाठवलेले नोटीस,  इत्यादी कागदपत्र दाखल केले.
  11. विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी लेखी उत्तरा व्यतिरिक्त कोणतेही दस्तऐवज आणि पुरावा दाखल केला नाही. आणि लेखी उत्तरास लेखी युक्तिवाद समजण्यात यावी या आशयाची पूरसिस दाखल केली.
  12. तक्रारदाराने तक्रारी सोबत पुराव्याचे शपथपत्र,लेखी युक्तिवाद दाखल केला.
  13. उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला.
  14. तक्रारदाराचा तक्रार अर्ज,त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज,विरुद्ध पक्ष क्रमांक १ यांचे लेखी उत्तर यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे आयोगासमोर विचारार्थ आणि त्यावरील कारणमीमांसा खालील प्रमाणे आहे.

      मुद्दे                                                                                                      उत्तर

 

  1. विरुद्ध पक्ष विमा कंपनीने तक्रारदाराचा क्‍लेम प्रलंबित                          होय     

     ठेवून सेवेत त्रुटीपूर्ण व्यवहार केला आहे काय?        

  1. तक्रारदार तक्रारीतील मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय?    होय                                                                                                                                                                            
  2. आदेश काय?                                                                                                                      

                                                                                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

मुद्दा क्रमांक १ आणि २ बाबतः-

  1. तक्रारदाराने तक्रारीसोबत सातबाराचा उतारा, मुलाचे मृत्यू प्रमाणपत्र,एफ आय आर रिपोर्ट,घटनास्थळ पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि मर्ग समरी हे दस्तऐवज दाखल केलेले आहेत. मयत अक्षय माळोदे हे शेतकरी होते आणि तक्रारदार ही त्यांची आई असल्यामुळे कायदेशीर वारस आहे यात कोणताही वाद नाही.
  2. तक्रारदाराच्या मुलाचा मृत्यू अपघातामध्ये झाला ही बाब सुद्धा विरुद्ध पक्ष क्रमांक १ यांनी त्यांच्या लेखी उत्तरांमध्ये अमान्य केलेली नाही.पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये मृत्यूचे कारण डोक्याला दुखापत (Head injury )असे नमूद केले आहे. इनक्‍वेस्‍ट पंचनामा आणि घटनास्थळ पंचनामा पाहिले असता या गोष्टीची पुष्टी होते.
  3. विरुद्ध पक्ष यांनी लेखी उत्तरात विमाधारक यांचा मृत्यू रस्ता अपघातात दुचाकी वाहनावर ट्रिपल सीट, भरगाव वेगाने तसेच निष्काळजीपणे चालवून, हेल्मेट न घातल्याने झाला असे नमूद केले आहे. या कथनाच्या पुष्‍ठर्थ त्यांनी कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा सादर केलेला नाही.

Indian evidence Act च्या कलम 103 नुसार burden of proof as to a particular fact-

      ‘The burden of proof as to any particular fact lies on the person who wishes the court to believe in its existence unless it is provided by any law that the proof of that fact shall lie on any particular person.’

या तत्त्वानुसार विरुद्ध पक्ष क्रमांक १ यांनी आयोगासमोर हजर राहून कोणताही पुरावा सादर केलेला नाही. घटनास्थळ पंचनामा आणि एफ आय आर या दोन्हींमध्येही विमाधारकाबद्दल कोणताही गुन्हा दिसून येत नाही. याउलट यवतमाळकडे जाणाऱ्या ट्रकने मयताच्या मोटरसायकलला मागून जोरात धडक दिल्यामुळे तो अपघातात मरण पावला, असे नमूद केले आहे. या अपघातामध्ये मृतकाची कोणतीही चूक नव्हती. म्हणूनच विमाधारक हा निष्काळजीपणाने आणि वेगाने वाहन चालवत होता असा निष्कर्ष काढणे हे अत्यंत चुकीचे आहे.  अपघात ही एक अनपेक्षित अशी निर्हेतुक घटना असते. कोणीही अपघात स्वतः ओढवून घेत नाही. शिवाय शासन निर्णयाच्या वर्जीत अटींमध्ये असे कोठेही नमूद केलेले नाही की वाहनावर तीन जण बसले असल्यास दावा निकाली निघू शकत नाही. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या कल्याणसाठी आणि हितासाठी आहे. त्यामुळे दावा नामंजूर करण्याची कृती ही चुकीची आहे.

17.तक्रारदराने खालील न्यायनिवाड्यांचा आधार घेतला आहे.

  1. Terms and Conditions of GR.
  2. WP No. 2420/2018, Bhagubai Vs. The State of Maharashtra
  3. WP No. 10185/2015, LatabaiVs. State of Maharashtra.
  4.  

     लताबाई रावसाहेब देशमुख विरुध्द स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र रिट   पिटीशन क्र. १०१८५/२०१५ दि.6.3.19 मध्ये म्हटले आहे कि मयताला चारचाकीने धडक दिली.त्यामुळे त्याचा मृत्यु झाला.तो निष्काळजी नव्हता म्हणून त्याला नुकसान भरपाई दयायला हवी.

          तक्रारदाराने दाखल केलेले निवाडे प्रस्‍तुत तक्रारीतील तथ्‍यांशी सुसंगत आहे. म्‍हणूनच वरील सर्व विवेचनावरुन आयोग खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारदारास  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत त्‍यांच्‍या मुलाच्या अपघाती  मृत्युसाठी दाव्याची रक्कम रुपये पासून २,००,०००/- (रुपये दोन लाख फकत) तक्रार अर्ज केल्यापासून म्हणजे दिनांक १०.८.२०२१  पासून ते रक्‍कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे ९% व्याजासह दयावी.
  3.    विरुध्‍द पक्ष क्रमांक १  यांनी तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये ५,०००/- तक्रारीचा खर्च रु.१०,०००/-(दहा हजार फकत) अदा करावे.
  4.    निकालपञाच्‍या प्रती सर्व संबंधित पक्षांना माहितीस्‍तव आणि उचित कार्यवाहीसाठी विनामुल्‍य देण्‍यात याव्‍यात.

 

 

  ( स्‍वाती देशपांडे)                         (वैशाली आर. गावंडे)                      (सचिन विनोदकुमार जैयस्‍वाल)   

       सदस्‍य                                              अध्‍यक्ष                                            सदस्‍य

 

 

 
 
[HON'BLE MRS. Vaishali R. Gawande]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Sachin Vinodkumar Jaiswal]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Swati A.Deshpande]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.