Maharashtra

Gondia

CC/22/127

SHRI KHEMRAJ RUPCHAN DHURVE - Complainant(s)

Versus

UNIVERSAL SOMPO GENERAL INSURANCE COMPANY LIMITED THROUGH MANAGING DIRECTOR C.E.O. - Opp.Party(s)

MR.U.P.KSHIRSAGAR

04 May 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, GONDIA
ROOM NO. 24, SECOND FLOOR, NEW ADMINISTRATIVE BUILDING,
JAYSTAMBH CHOWK, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/22/127
( Date of Filing : 03 Aug 2022 )
 
1. SHRI KHEMRAJ RUPCHAN DHURVE
HIRAPUR TAH GOREGAON
GONDIA
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. UNIVERSAL SOMPO GENERAL INSURANCE COMPANY LIMITED THROUGH MANAGING DIRECTOR C.E.O.
MIDC CENTAL ROAD ANDHERI EAST MUMBAI
MUMBAI
Maharashtra
2. UNIVERSAL SOMPO GENERAL INSURANCE COMPANY LIMITED THROUGH DIVISIONAL MANAGER
DIVISIONAL OFFICE UNIT NO 601 A VING 6 TH FLOR RELIBAL TAKE PARK CLOUD CITY EROLI MUMBAI
MUMBAI
Maharashtra
3. OXILIUM INSURENCE COMPANY LIMITED THROUGH MANAGER
PLOTNO 61 SECTOR 28 WASHI NEW MUMBAI
MUMBAI
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SARITA B. RAIPURE MEMBER
 
PRESENT:MR.U.P.KSHIRSAGAR, Advocate for the Complainant 1
 MR. M. B. RAMTEKE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 04 May 2023
Final Order / Judgement

गणपूर्तीः                          मा. भास्‍कर बी. योगी, अध्‍यक्ष,  

                                         मा. सरिता बी. रायपुरे, सदस्‍या

   उपस्थितीः-         तक्रारकर्ता तर्फे अधिवक्‍ता:- उदय क्षीरसागर

    विरूध्‍द पक्ष  क्र.1 व 2 तर्फे अधिवक्‍ता:- एम.बी. रामटेके

विरूध्‍द पक्ष क्र. 3 तर्फे:- एकतर्फो आदेश

 

पारित द्वारा- मा. सरिता. बी. रायपुरे  सदस्‍या,

                                              अंतिम आदेश

                                    ( पारित दिनांक 04/05/2023)

1.       तक्रारकर्त्‍याने मुलाच्‍या अपघाती मृत्‍युमुळे “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा” योजनेनूसार नुकसान भरपाई मिळण्‍याबाबत विमा दावा अर्ज विरूध्‍द पक्ष क्रमांक 3 कडे सादर केला. पंरतु विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास विमा दावा मंजूर अथवा नामंजूर काहीही न कळवल्‍याने तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा  2019  चे कलम 35 अन्‍वये  दाखल केलेली आहे.

तक्रारकर्त्‍याच्‍या  तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.       तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांच्‍या मालकीची मौजा-हिरापुर, तालुका-गोरेगाव, जिल्‍हा- गोंदिया येथे भूमापन क्रमांक 161 या वर्णनाची शेतीजमीन आहे.

3.       विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 विमा कंपनी असून शासनातर्फे राबविण्‍यात येणा-या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे मंजूर करण्‍याचे काम करतात.  विरूध्‍द पक्ष क्रमांक 3 ही विमा सल्‍लागार कंपनी आहे.

4.       तक्रारकर्त्‍याचा मुलगा श्री. सागर खेमराज धुर्वे याचा मृत्‍यु दिनांक 21/06/2021 रोजी तलावात पाय घसरून पडल्‍याने पाण्‍यात बुडून        झाला.  तक्रारकर्त्‍याचा व त्‍यांच्‍या कुटुंबातील एका व्‍यक्‍तीचा शेतकरी व्यक्‍तीगत  अपघात विमा काढला असल्‍याने तक्रारकर्त्‍याने मुलाच्‍या अपघाती मृत्‍युनंतर  विम्याची रक्कम मिळण्‍याकरीता विरूध्‍द पक्ष क्रमांक 3 विमा कंपनी कडे दिनांक 13/04/2022 रोजी अर्ज सादर केला. तक्रारकर्त्‍याने विमा अर्ज व आवश्‍यक दस्‍तऐवज सादर केल्‍यानंतर विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास     मुलाच्‍या  दाव्‍याबाबत मंजूर अथवा नामंजूर काहीही न कळविल्‍याने  विरूध्द पक्षाची सदर कृती ही विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रृटी असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  विद्यमान न्‍याय आयोगाच्‍या अधिकार क्षेत्रात विमा दाव्‍याची नुकसान भरपाई रक्‍कम रू. 2,00,000/- व्‍याजासह मिळावे तसेच दाव्‍याची रक्‍कम न दिल्‍याने तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक, शारिरिक व आर्थिक  त्रासापोटी रू 50,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रू 20,000/- मिळण्‍यासाठी सदर तक्रार दाखल केली  आहे.   

5.       तक्रारकर्त्‍याची तक्रार विद्यमान आयोगाने दिनांक 03/08/2022 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्‍द पक्षाला  आयोगामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या. विरूध्‍द पक्षांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला.   

6.      विरूध्‍द  पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आयोगातर्फे पाठविण्‍यात आलेली नोटिस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्षातर्फे अधिवक्‍ता श्री. एम. बी. रामटेके यांनी  दिनांक 19/10/2022 रोजी आपला लेखी जबाब दाखल केला. विरूध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमुद केले आहे की, तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचा तलावात पाय घसरून पडल्‍याने बुडुन मृत्‍यु झाला पंरतु त्‍यासंबधीत कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. तक्रारीत सादर पोलीस दस्‍तऐवजावरून असे दिसते की, तक्रारकर्त्‍याची पत्‍नी श्रीमती वच्‍छलाबाई खेमराज धुर्वे ही त्‍याच दिवशी मृत्‍यु पावली होती तक्रारीत शवविच्‍छेदन अहवाल दाखल केलेला आहे त्‍यामध्‍ये मृत्‍युचे कारण सारखेच दिलेले आहे तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचे मृत्‍युचे निश्चित कारण काय आहे हे सपष्‍ट झालेले नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीने घरघुती भांडणामुळे मुलासोबत तलावाच्‍या पाण्‍यात उडी घेउन आत्‍महत्या केली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा खरी घटना लपवित आहे.

त्रिपक्षीय करारातील clause no. 1 sub clause H of the part III Exclusion अनुसार आत्‍महत्‍या किंवा आत्‍महत्‍येसाठी केलेला प्रयत्‍न सदर पॉलिसीच्‍या अटी व शर्ती विरूध्‍द आहे. तक्रारकर्त्‍याची सदर तक्रार खोटी, बनावटी आहे. तक्रारकर्त्‍याचा क्‍लेम फार्म विरूध्‍द पक्षाने स्विकारल्‍या नंतर विरूध्‍द पक्षाने दिनांक 19.07.2022 रोजी तक्रारकर्त्‍यास पत्र पाठवुन मृतकाचा जन्‍म दाखला,  सातबारा उतारा, गाव नमुना सातबारा, गाव नमुना सहा-क, गाव नमुना सहा-ड, शवविच्‍छेदन अहवाल इत्‍यादी कागदपत्राची मागणी केली पंरतु वरील कागदपत्राची पुर्तता तक्रारकर्त्‍याने केली नाही. करीता तक्रारकर्त्‍याची सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरूध्‍द पक्षाने केली आहे.

7        विरूध्‍द  पक्ष क्रमांक 3 यांना आयोगातर्फे नोटीस प्राप्‍त झाली पंरतु विरूघ्‍द पक्ष क्रमांक 3 ने आपला लेखी जबाब दाखल केला नाही. करिता न्‍यायाच्‍या दुष्‍टीने विरूध्‍द पक्ष क्रमांक 3  विरूध्‍द लेखी जबाबाविना प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश निशाणी क्रमांक 1 वरती दिनांक 04/05/2023 रोजी पारित करण्‍यात आला आहे. 

8.       तक्रारकर्त्‍याचा तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांचे लेखी जबाब तसेच उभय पक्षाच्‍या अधिवक्‍त्‍यांनी केलेला लेखी / मौखीक युक्‍तीवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

. क्र.  

                          मुद्दा

           निःष्‍कर्ष

1.

विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2  ने तक्रारकर्त्‍यास सेवा देण्‍यात त्रृटी केली आहे का?

             होय.  

2.

तक्रारकर्त्‍याची  तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे का?

             होय.

3.

 

तक्रारीचा  अंतिम आदेश काय?

कारणमिमांसे प्रमाणे

 

कारणमिमांसा

मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत :-

9.      तक्रारकर्त्‍याने  तक्रारीसोबत  दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाच्‍या यादीनुसार  गांव नमुना सात बारा, गाव नमुना आठ-अ यावरून तक्रारकर्त्‍याच्‍या  मालकीची मौजा-हिरापुर, तालुका-गोरेगांव, जिल्‍हा- गोदिया येथे भूमापन क्रमांक 161 या वर्णनाची शेतजमीन आहे. यावरून तक्रारकर्ता शेतकरी या व्‍याखेमध्‍ये समाविष्‍ठ होतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ता व त्‍याच्‍या कुटुंबातील एका व्‍यक्तिचा दोन लाखाचा विमा शासनाच्‍या मार्फत उतरविला होता त्‍यामुळे तक्रारकर्ता व त्‍याच्‍या कुटुंबातील एक व्‍यक्ति सदर विम्‍याचा लाभधारक आहे.

सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याने तक्रारीत दाखल पोलीस दस्‍तऐवज मर्ग खबरी, घटनास्‍थळ पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, ईत्‍यादी दस्‍तऐवजाचे बारकाईने अवलोकन  केले  असता  असे निदर्शनास येते की तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचा मृत्‍यु दिनांक 21/06/2021 रोजी गावातील तलावाकडे घरचे म्‍हशी व रेडे नेहमी प्रमाणे चारण्‍यास नेले असता तलावाच्‍या पाण्‍यात पाय घसरून पडल्‍याने पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला तसेच शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये वैद्यकीय अधिकारी यांनी आपले मत नमुद केलेले आहे त्‍यात मृत्‍युचे कारण हे “Death due to drowning in water” दिलेले आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचा मृत्‍यु अपघाताने झाला हे वरिल  दाखल  कागदोपत्री पुराव्‍यावरून हे सिध्‍द होते. सदर  मृत्‍यु अपघातामध्‍ये समाविष्‍ट आहे आणि अशा अपघातग्रस्‍त शेतकरी व शेतक-याच्‍या कुटुबातील खातेदार म्‍हणून नोंद नसलेले कोणतेही एक सदस्‍य ( आई-वडील, पती –पत्‍नी  मुलगा व अविवाहीत मुलगी यापेकी कोणतेही एक व्‍यक्‍ती ) असे 10 ते 75  वयोगटातील एकुन 2 जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा  लाभ मिळतो त्‍यांमुळे  तक्रारकर्ता वडील या नात्‍याने “लाभार्थी” म्‍हणुन विम्‍याचा लाभ  मिळविण्‍यास पात्र आहे. विरूध्‍द  पक्षाने मृत्‍युबाबत आक्षेप घेतला असला तरी तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचा मृत्‍यु अपघाताने झालेला नाही हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी विमा कंपनीची आहे पंरतु विमा कंपनीने कोणताही प्रत्‍यक्षदर्शी साक्ष पुरावा सादर केलेला नाही त्‍यांमुळे विमा कंपनीने घेतलेला आक्षेप ग्राहय धरण्‍यात येत नाही. तक्रारकर्त्‍याने दिनांक 13/04/2022 रोजी विरूध्‍द पक्ष क्र 3 कडे विमा दावा  सादर केला  विरूध्‍द  पक्षाने  तक्रारकर्त्‍याचा विमा दावा प्रंलबित  ठेवला.  महाराष्‍ट्र  शासन परिपत्रकानूसार विमा दावा प्रस्‍ताव विमा कंपनीला प्राप्‍त झाल्‍यापासुन  21 दिवसात दावा निकाली काढावा असे नमूद आहे परंतू विरूध्‍द पक्षाने आपली जबाबदारी योग्‍यरित्‍या न बजावून तक्रारकर्त्‍यास सेवा देण्‍यात त्रुटी केली आहे. करिता मुद्दा क्र. 12 चे उत्‍तर होकारार्थी   नोंदविण्‍यात येत आहे.

10.   वरील चर्चेनुरूप व निःष्कर्षावरून मा. आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

                                        :: अंतिम आदेश ::

1.     तक्रारकर्त्‍याची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.       विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2  विमा कंपनीला आदेश देण्‍यात येते की, त्‍यांनी  तक्रारकर्त्‍यास   मृतक मुलाच्‍या शेतकरी अपघात विम्‍याची रक्‍कम      रू. 2,00,000/ (अक्षरी रूपये दोन लाख फक्‍त) दयावे आणि या रक्‍कमेवर विमा प्रस्‍ताव   दिनांकापासुन 60 दिवस सोडुन म्‍हणजेच  13/06/2022 पासुन ते संपूर्ण रक्‍कम तक्रारकर्त्‍यास अदा करेपर्यंत द. सा. द. शे 15 % व्‍याजदराने व्‍याज दयावे.

3.       विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 विमा कंपनीला आदेश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रू.10,000/- (अक्षरी रूपये दहा हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रू. 5,000/- (अक्षरी रूपये पाच हजार फक्‍त)   दयावे.

4.       विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2  विमा कंपनी यांना असेही आदेशित करण्‍यात येते की,  त्‍यांनी  अंतिम  आदेशामध्ये  नमूद  आदेशित  रकमा  शेतक-याच्या /वारसदाराच्‍या आधार लिंकड बॅंक खात्‍यात डी.बी.टी. / ईसीएसने /आर टी जी एस दवारे डायरेक्‍ट जमा कराव्‍यात.

5.       विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 विमा कंपनी यांनी सदर आदेशाचे अनुपालन त्यांना निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र. 2 व 3 चे पालन 30 दिवसांत न केल्‍यास द. सा. द. शे 18 टक्‍के व्‍याज देय राहिल.

6.       विरूध्‍द पक्ष क्रमांक 3 विरूध्‍द तक्रार खारीज करण्‍यात येते.

7.       निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्‍ध करुन  देण्यांत याव्यात.

8.       प्रकरणाच्या “ब” व “क” फाईल्स तक्रारकर्ताला परत करण्यांत याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SARITA B. RAIPURE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.