Complaint Case No. CC/23/72 | ( Date of Filing : 13 Mar 2023 ) |
| | 1. SMT. JAYASHREE PRAMOD KAKDE | SILLEWADA, KAMTHI, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. UNIVERSAL SOMPO GENERAL INSURANCE COM. LTD, THRU. MANAGING DIRECTOR/CEO, & OTHERS | 103, 1ST FLOOR, AKRUTI STAR, MIDC CENTRAL ROAD, ANDHERI (PURV), MUMBAI-400093 | MUMBAI | MAHARASHTRA | 2. UNIVERSAL SOMPO GENERAL INSURANCE COM. LTD, THRU. DIVISIONAL MANAGER, | 202, 2ND FLOOR, WINERS COURT, UPTO Z.K., LULLANAGAR, SAHANE SUJAN PARK, PUNE-411040 | PUNE | MAHARASHTRA | 3. TALUKA KRUSHI ADHIKARI, PARSHIVANI | NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | द्वारा - मा. सदस्या, श्रीमती शितल अ. पेटकर. - प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35(1)(a) प्रमाणे विरुध्द पक्ष यांनी दोषपूर्ण सेवा दिली असा आरोप करून तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे आहे:-
- तक्रारदार यांचा पतीचा,वाहन अपघाती मृत्यू दिनांक 16/05/2021 रोजी झाला तक्रारदार ह्या मयताच्या पत्नी होत्या व त्यांच्या नावावर शेती आहे.
- महाराष्ट्र शासनाने सन 2019 - 2020 या दरम्यान राज्यातील शेतकरी हितासाठी व कल्याणकारी योजना म्हणून शेतकरी कुटुंबातील व्यक्ती जखमी झाल्यास अथवा मरण पावल्यास त्यांना तात्काळ मदत म्हणून इन्शुरन्स पॉलिसी, क्लेम देणेबाबत जाहीर केले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामधील रेवेन्यू डीवीजन, कोकण मधील संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने प्रीमियमची रक्कम भरली.
- सदर माहिती तक्रारदारास मिळाल्यावर तक्रारदार यांनी विलेज रेवेन्यू ऑफिसर तलाठी यांच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये विमा क्लेम फॉर्म सोबत इतर महत्त्वाची कागदपत्रे जमा केलीत.
- परंतु विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांचा विमा दावा, मयत हे हे रस्ता अपघातात स्वताच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून दुसऱ्या ट्रकला धडक दिल्याने झाला, हे कारण नमूद करून दिनांक 02/12/2022 रोजी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर केला.
- याप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास दोषयुक्त सेवा दिलेली आहे. सबब तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार आयोगामध्ये दाखल करून विनंती कलमांमध्ये केलेली मागणी पूर्ण होऊन मिळण्यास विनंती केली आहे ती पुढील प्रमाणे :-
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा क्लेमची रक्कम रुपये 2,00,000/- द्यावे. सदर रक्कम तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना प्रस्ताव दिल्यापासून ३१/०५/२०२२ पासून संपूर्ण रक्कम फिटेपावेतो 18 टक्के व्याजाने तक्रारदार यास देण्यात यावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांना नुकसानभरपाईची रक्कम रुपये 50,000/- द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांना दाव्याचा खर्च रक्कम रु. 20,000/-देण्याचे आदेश पारीत करावेत.
- सदर इतर योग्यते न्यायोचित आदेश हे तक्रारदार यांचे बाजुने व्हावेत.
- तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्राची यादीप्रमाणे कागदपत्रांच्या सत्यप्रति दाखल केलेल्या आहेत.
- तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांना आयोगाची नोटीस पाठवण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक 1,2 व 3 हजर होऊन तक्रारदाराने केलेल्या आरोपाचे खंडन करून खालील प्रमाणे बचाव घेतला आहे.
- सदर प्रकरणामध्ये एका ट्रकची धडक दुसऱ्या ट्रकला झाल्याने जखमी होऊन मृत्यू झाला.
- तक्रारदार यांना सदर दावा दाखल करणेकरिता सदर आयोग योग्य नसून इतर कायद्याप्रमाणे रेमेडी उपलब्ध आहे.
- सदर तक्रारीमध्ये दाखल केलेल्या कागदपत्राप्रमाणे वादातील ट्रक हा स्वतः मयत चालवत होता व निष्काळजीने व वैध वाहन परवाना नसतानाही वाहन चालवत होता व त्यामुळे टाटा कंपनीच्या ट्रकला धडक दिली व त्यांचा मृत्यू झाला.
- मयत व्यक्तीचा मृत्यू हा अपघात नसून त्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला अपघाती मृत्यू आहे. सबब विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर केला. सदर दावा हा योग्य कारणामुळे नामंजूर केला असल्याकारणाने तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 3 यांच्या लेखी म्हणणे नुसार सदरच्या अपघातग्रस्त विमा धारक व्यक्तीचा मृत्यू रस्ता अपघातामध्ये स्वतःच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने निष्काळजीपणाने चालवून दुस-या ट्रकला धडक दिल्याने झाल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी प्रा.ली. यांनी विमा दावा प्रस्ताव नाकारला.
- विरुध्द पक्ष क्र.3 तालुका कृषी अधिकारी यांची जबाबदारी म्हणजे आलेल्या विमा दावा प्रस्तावाची छाननी करुन मंजूरीस्तव मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना त्वरीत सादर केले जातात. व मा. जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारीमार्फत विमा कंपनीस सादर केले जातात. जर विमा कंपनीकडून त्रुटीच्या कागदपत्राची मागणी केल्यास त्रुटीची कागदपत्रे अपघातग्रस्त शेतक-याच्या वारसदाराकडून त्वरीत मागवूर मा. जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांना सादर करणे हि जबाबदारी असते. ती जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.3 यांनी योग्य प्रकारे पार पाडली आहे. सबब त्यांना सदर प्रकरणात अनावश्यक विरुध्द पक्ष करण्यांत आलेले आहे.
- तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.1 यांनी पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला. विरुध्द पक्ष क्रमांक 1 व तक्रारदारांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला.
- तक्रारीचा गुणवत्तेवर निकाल होणेकामी तक्रारीचा निवारणार्थ खालील प्रमाणे मुद्दे या आयोगाच्या विचारार्थ उद्भवल्याने त्यावर खालील प्रमाणे कारणमीमांसा व निष्कर्ष देण्यात आले.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष | 1. | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कमतरता केली हे तक्रारदाराने सिद्ध केले आहे काय ? | ...होय.... | 2. | तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा दाव्याचे रक्कम मिळण्यास पात्र ठरतात काय ? | .. होय.. | 3. | मागितलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र ठरतात काय ? | अंशत होय. | 4. | आदेशबाबत काय? | अंतिम. आदेशाप्रमाणे | | | | |
कारणमिमांसा व निष्कर्ष मुद्दा क्रमांक -1 व 2 - तक्रारदाराच्या युक्तिवादाप्रमाणे तक्रारदार ह्या स्वतः व त्यांचे पती हे शेतकरी आहेत. त्यांच्या पतीचा मृत्यू दिनांक 16/05/2021रोजी झालेला आहे. सरकारने शेतकऱ्यास मदत म्हणून काढलेल्या गोपीनाथ मुंडे, शेतकरी अपघात विमा योजना दिनांक 24/03/2021 प्रमाणे तक्रारदाराने दावा दाखल केला आहे. विरुध्द पक्ष यांनी बचाव घेतला आहे की, मयत प्रमोद हेमराज काकडे हे निष्काळजीपणाने तसेच वैध वाहन परवाना नसताना वाहन चालवत होते. त्यामुळे सदर दावा नामंजूर करून सामनेवाल्याने कोणतीही दोषयुक्त सेवा तक्रारदारास दिली नाही या कारणास्तव तक्रार फेटाळण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी नाकारलेल्या दावा हा योग्य कारणामुळे नाकारला अथवा कसे हे बघण्यासाठी दाखल कागदपत्राचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तऐवज क्रमांक 4 वर गाव नमुना 7 /12, तसेच फेरफार उतारा पत्रक यावर मयत प्रमोद हेमराज काकडे हे गाव-भागीमाहिरी,तहसील-पारशिवनी,जिल्हा-नागपूर येथे असलेल्या शेतजमिनीवर भोगवटादार असे नाव आहे. यावरून तक्रारदार यांचे पती हे मृत्यू पूर्वीपासून शेतकरी होते हे सिद्ध होते.
- दिनांक 16/05/2021 रोजी यशवंत उदाराम चौरे, यांनी घडलेल्या घटनेबाबत एफ आय आर नोंदवला, तो व घटनास्थळ पंचनामा मधील स्टेटमेंट अभिलेखावर दाखल आहे. त्यावरून मयताचा मृत्यू हा वाहन चालवताना वाहन अपघातामध्ये झाला होता असे दिसून येते, परंतु सदर वाहन/ ट्रक ते भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवत असल्याचे सिद्ध होत नाही, तर एफ आय आर नोंदवणारा व्यक्ती हा सदर अपघाताशी संबंधित असल्याने त्याने दिलेल्या माहितीवर पूर्णपणे विसंबून राहणे शक्य नाही. तसेच पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये Death due to injuries sustained या कारणास्तव मृत्यू झाल्याबाबत कारण नमूद केले आहे. याव्यतिरिक्त इतर चौकशी अहवाल अथवा पुरावा विरुध्द पक्ष यांनी त्यांचा आक्षेप सिद्ध करण्यास दाखल केला नाही. सबब विरुध्द पक्ष यांनी घेतलेल्या आक्षेपाप्रमाणे पुराव्यानिशी सिद्ध करण्यास ते असमर्थ ठरले. तसेच अभिलेखावर दस्त क्रमांक 8 वर मयत प्रमोद काकडे यांचा वाहन परवाना दाखल केला आहे, सदर वाहन परवान्याची वैधता दिनांक 19/11/2026 पर्यंत आहे व तक्रारदार यांच्या पतीचा मृत्यू हा दिनांक 16/05/2021 रोजी झाला. सबब विरुध्द पक्ष यांनी घेतलेला आक्षेप हा योग्य व संयुक्तिक नाही.
- सबब दाखल कागदपत्रावरून व वरीलप्रमाणे पुराव्याच्या विवेचनावरून तक्रारदार यांचे पती यांचा वाहन अपघातामुळे Death due to injuries sustained मुळे मृत्यू झाला, तक्रारदाराच्या मयत पती यांच्याकडे अपघाती मृत्युच्या वेळेस वैध वाहन परवाना होता. व तक्रारदाराकडे आवशक्य ते संपूर्ण कागदपत्र उपलब्ध आहेत व विमा दावा सोबत ते दाखल केले होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी विमा दावा दाखल केला आहे.
- सबब वरीलप्रमाणे पुराव्याचे विवेचनावरून व शासनाच्या निर्देशानुसार, तक्रारदार यांचा पतीचा मृत्यू व विमा दावा हा शासन निर्णय जीआरच्या कालावधीत येत असल्याने तसेच मयत हे निष्काळजीपणाने वाहन चालवत नसल्याचे सिद्ध झाल्याने तक्रारदार यांना त्यांच्या पतीच्या विमा दाव्याप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार हे लाभार्थी आहेत हे सिद्ध झाल्याने विरुध्द पक्ष क्रमांक 1व 2 यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारून दोषयुक्त सेवा दिली. या निष्कर्षावर आम्ही आलेले आहोत. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक -3 ते 4 - मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्कर्ष होकारार्थी आल्याने तक्रारदाराने मागितलेली दाद मिळण्यास ते पात्र ठरतात. सबब तक्रारदाराने केलेल्या विनंती मागणीप्रमाणे सामनेवाला क्रमांक 1 व 2 विमा कंपनी यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- व त्यावर द.सा.द.शे. 9% दराने विमा दावा नाकारलेल्या दिनांक 02/12/2022 पासून होणारी संपूर्ण रक्कम तक्रारदारास 45 दिवसात अदा करणेची आहे. तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला व त्यांची मागणी मंजूर होण्याकरीता सदर तक्रार दाखल करावी लागली. सबब मानसिक त्रासाकरता रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 5,000/- विरुध्द पक्षांनी तक्रारदारांना अदा करणे बाबतचा आदेश देणे योग्य व न्यायाचीत ठरेल. विरुध्द पक्ष क्र. 3 हे केवळ औपचारिक पक्षकार असल्याने तसेच त्यांच्यात व तक्रारदार यांच्यात सेवा पुरविणारे व ग्राहक हे नाते प्रस्थापित होत नसल्याने व तक्रारदाराची मुख्य तक्रार विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्याविरुध्द असल्याने विरुध्द पक्ष क्र. 3 यांचेविरुध्द काही आदेश नाहीत. सबब मुद्दा क्रमांक 3 व 4 चे उत्तर होकारर्थी देण्यात येते. वरील विवेचनावरून पुढील प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात आला.
अंतिम आदेश - ग्राहक तक्रार क्रमांक 72/2023 अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 विमा कंपनी यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- व त्यावर द.सा.द.शे. 9% दराने विमा दावा नाकारलेल्या दिनांक 02/12/2022 पासून होणारी संपूर्ण रक्कम तक्रारदारास 45 दिवसात अदा करावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी वर नमूद आदेश क्र2 मधील पूर्तता विहित कालावधीत न केल्यास रक्कम रु.2,00,000/- तसेच दिनांक 02/12/2022 पासून ते आदेश पारित झालेल्या तारखे पर्यंत 9% दराने व त्यानंतर द.सा.द.शे. 12% दराने सदरचा आदेश पारित झालेपासून होणारी संपूर्ण रक्कम तक्रारदारास अदा करावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाईची रक्कम रु.10,000/- व न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.5,000/- दयावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी प्रस्तूत आदेशाची प्रत त्यांना प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाच्या कालावधीत वरील आदेशाचे पालन करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 3 यांच्या विरुद्ध कोणताही आदेश नाही.
- आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क पुरविण्यात याव्यात.
| |