Maharashtra

Kolhapur

CC/21/592

Tanubai Maruti Chokekar - Complainant(s)

Versus

Universal Sompo General Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

R.A.Shelake

30 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/21/592
( Date of Filing : 22 Dec 2021 )
 
1. Tanubai Maruti Chokekar
At.Padsali, Tal.Radhanagri
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Universal Sompo General Insurance Co.Ltd
Suhani Park,Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Jan 2023
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदयाचे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

       तक्रारदार यांचा शेती व्‍यवसाय असून शेती हेच एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे.  तक्रारदार यांचा गोपीनाथ शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता.  सदर योजनेअंतर्गत अपघातग्रस्‍त शेतक-यांना रक्‍कम रु. 1,00,000/- एवढया रकमेचा विमा आहे.  तक्रारदार या त्‍यांचे शेतामध्‍ये काम करताना ता. 31/01/2020 रोजी फांदीचे लाकूड लागून त्‍यांचे डाव्‍या डोळयास गंभीर दुखापत झाली होती. त्‍याकरिता त्‍यांनी कोल्‍हापूर येथील नेत्रतज्ञ डॉ पी.जी.पाटील यांचेकडे उपचार घेतले.  मात्र तरीदेखील त्‍यांचे डाव्‍या डोळयास अंधत्‍व आले आहे. तसेच प्रमाणपत्र डॉ पी.जी.पाटील यांनी दिले आहे.  तसेच तक्रारदार यांना भविष्‍यातसुध्‍दा डाव्‍या डोळयाने दिसणार नाही असे सांगितले.  तक्रारदार यांना दि. 4/04/2020 रोजी वैद्यकीय विभाग, कोल्‍हापूर यांनी अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र दिलेले आहे.  तसेच सरपंच, ग्रामपंचाचत, मानबेट यांनीही तक्रारदारांना दाखला दिला असून तसा पंचनामा दि. 15/2/2020 रोजी दिला आहे. तक्रारदार हे शेतकरी असलेने त्‍यांनी वर नमूद योजनेअंतर्गत वि.प. यांचेकडे विमाप्रस्‍ताव सादर केला.  परंतु वि.प. कंपनीने त्‍यास आजपर्यंत उत्‍तर दिलेले नाही. तक्रारदार यांचा डोळा बरा न झाल्‍याने त्‍यांची मानसिक व शारिरिक स्थिती बिघडलेली होती.  तसेच तक्रारदार हे अशिक्षित गरीब शेतकरी आहेत.  कोरोना महामारीमुळे बराच काळ लॉकडाउन असल्‍याने सर्व व्‍यवहार बंद होते.  त्‍यामुळे  विमा  प्रस्‍तावासाठी लागणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत करता आलेली नव्‍हती.  तक्रारदार यांनी जाणीवपूर्वक विमा प्रस्‍ताव मुदतीत देणेस टाळाटाळ केलेली नाही.  त्‍यामुळे विहीत मुदतीत तक्रारदारांना प्रस्‍ताव देता आलेला नाही असे तक्रारदार यांचे कथन आहे. परंतु वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्‍कम मंजूर न करुन सेवात्रुटी केली आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम रु. 1,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याज,  मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 व 2 कडे अनुक्रमे विमा प्रस्‍तावासोबत दिलेले पत्र, विमाप्रस्‍तावासोबत दिलेली कागदपत्रे वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

4.    वि.प. यांनी सदरकामी म्‍हणणे/कैफियत व अॅफिडेव्‍हीट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.  वि.प. ने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.

 

iii)    तक्रारदारांनी दाखल केलेले कागदपत्रे पाहता सदरचा अपघात हा दि. 31/1/2020 रोजी झालेचे दिसून येते.  तथापि तक्रारदार यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी दि. 5/2/2021 रोजी प्रस्‍ताव सादर केला आहे म्‍हणजेच जवळजवळ 393 दिवसांपेक्षा जास्‍त दिवसांचा उशिर झाला आहे.  पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तसेच त्रिपक्षीय करारानुसार विमा प्रस्‍ताव हा 30 दिवसांचे आत पाठविणे बंधनकारक आहे.  तक्रारदारांनी केलेला उशिर हा मोठा असलेने तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

      अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

5.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचा शेती हाच व्‍यवसाय असून त्‍यांनी याकामी शेतजमीनीचे 7/12 व 8अ उतारे दाखल केले आहेत.  वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

7.    प्रस्‍तुतकामी वि.प. यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये, सदरचा अपघात हा दि. 31/1/2020 रोजी झालेचे दिसून येते.  तथापि तक्रारदार यांनी दि. 5/2/2021 रोजी प्रस्‍ताव सादर केला आहे म्‍हणजेच जवळजवळ 393 दिवसांपेक्षा जास्‍त दिवसांचा उशिर झाला आहे.  पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तसेच त्रिपक्षीय करारानुसार विमा प्रस्‍ताव हा 30 दिवसांचे आत पाठविणे बंधनकारक आहे.  सबब वि.प. हे विमा रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाही असे कथन केले आहे. 

 

8.    तक्रारदारांचे कथनानुसार, तक्रारदार या त्‍यांचे शेतामध्‍ये काम करताना ता. 31/01/2020 रोजी फांदीचे लाकूड लागून त्‍यांचे डाव्‍या डोळयास गंभीर दुखापत झाली होती. त्‍याकरिता त्‍यांनी कोल्‍हापूर येथील नेत्रतज्ञ डॉ पी.जी.पाटील यांचेकडे उपचार घेतले.  मात्र तरीदेखील त्‍यांचे डाव्‍या डोळयास अंधत्‍व आले आहे. तसेच प्रमाणपत्र डॉ पी.जी.पाटील यांनी दिले आहे.  तसेच तक्रारदार यांना भविष्‍यातसुध्‍दा डाव्‍या डोळयाने दिसणार नाही असे सांगितले.  तक्रारदार यांना दि. 4/04/2020 रोजी वैद्यकीय विभाग, कोल्‍हापूर यांनी अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र दिलेले आहे.  तसेच सरपंच, ग्रामपंचाचत, मानबेट यांनीही तक्रारदारांना दाखला दिला असून तसा पंचनामा दि. 15/2/2020 रोजी दिला आहे.  सदर कथनांचे पुष्‍ठयर्थ तक्रारदारांनी डॉ पी.जी.पाटील यांचे प्रमाणपत्र दाखल केले आहे.  तसेच सक्षम वैद्यकीय अधिका-यांचे अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र दाखल केले आहे.  सदर प्रमाणपत्रामध्‍ये तक्रारदाराचे डाव्‍या डोळयास 30 टक्‍के अपंगत्‍व आलेचे स्‍पष्‍टपणे नमूद आहे.  तसेच तक्रारदारांनी घटनेचा पंचनामा, तसेच सरपंच, ग्रामपंचायत, मानबेट यांनी दिलेला दाखला दाखल केला आहे.  सदरच्‍या सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांचे डाव्‍या डोळयास अपंगत्‍व आलेची बाब स्‍पष्‍टपणे दिसून येते.  तक्रारदारांनी याकामी तक्रारदारांनी याकामी पुरावा शपथपत्र दाखल केले असून सदरचे शपथपत्रात तक्रारदार यांनी, तक्रारदार यांचा डोळा पूर्णपणे बरा न झालने त्‍यांची मानसिक व शारिरिक स्थिती बिघडलेली होती.  तसेच तक्रारदार हे अशिक्षित गरीब शेतकरी आहेत.  त्‍यामुळे त्‍यांना विमा प्रस्‍तावासाठी लागणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत करता आलेली नव्‍हती.  तक्रारदार यांनी जाणीवपूर्वक विमा प्रस्‍ताव मुदतीत देणेस टाळाटाळ केलेली नाही.  त्‍यामुळे विहीत मुदतीत तक्रारदारांना प्रस्‍ताव देता आलेला नाही असे शपथेवर कथन केले आहे.  सदरचे तक्रारदाराचे शपथेवरील कथन विचारात घेता तक्रारदारांनी जाणीवपूर्वक विमाप्रस्‍ताव सादर करण्‍यास उशिर केलेला नाही हे दिसून येते.  तसेच मा. वरिष्‍ठ न्‍यायालय व मा. सर्वोच्‍च न्‍यायालयांनी, उशिराचे कारण देवून विमा क्‍लेम नाकारणे चुकीचे आहे, त्‍यामुळे पॉलिसीच्‍या मूळ हेतूला बाधा पोहोचते असे निर्वाळे वेगवेगळया न्‍यायनिवाडयात दिलेले आहे.  सबब, वि.प. यांनी चुकीच्‍या कारणास्‍तव तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारल्‍याची बाब याकामी स्‍पष्‍टपणे शाबीत झालेली आहे असे या आयोगाचे मत आहे.   या बाबीचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमाक्‍लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

9.    सबब, तक्रारदार हे नमूद विमा योजनेअंतर्गत विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/- इतकी रक्‍कम वि.प. यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

      सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

 

आदेश

 

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु. 1,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.