Maharashtra

Nagpur

CC/10/421

Shri Pratik Kamlakar Chambhare - Complainant(s)

Versus

Universal Consultants Through Shri Kishore Namdevrao Saste - Opp.Party(s)

Adv. Kkullarwar

28 Feb 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/421
1. Shri Pratik Kamlakar ChambhareNagpurNagpurMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. Universal Consultants Through Shri Kishore Namdevrao SasteNagpurNagpurMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :Adv. Kkullarwar, Advocate for Complainant
ADV.P.B.PATIL, Advocate for Opp.Party

Dated : 28 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

   मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 28/02/2011)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारीचा आशय असा आहे की, त्‍याने गैरअर्जदाराशी संपर्क साधून मास्‍को येथील कझान स्‍टेट मेडीकल युनिर्वसिटी येथे दाखल घेण्‍याकरीता दि.30.06.2008 रोजी अर्ज भरुन घेतला व गैरअर्जदारास रु.25,000/- नगदी दिले. तसेच 09.07.2008 रोजी गैरअर्जदाराच्‍या मागणीप्रमाणे रोख स्‍वरुपात रु.25,000/- दिले. गैरअर्जदाराने त्‍याची पावती दिली. पुढे रु.45,000/- गैरअर्जदाराला तक्रारकर्त्‍याने दिले. दि.20.11.2008 रोजी गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला विमानाची तिकिट काढून ठेवण्‍याची सूचना दिली. परंतू तक्रारकर्ता हा ग्रामिण भागात राहत असल्‍याने व त्‍याला याची कल्‍पना नसल्‍याने त्‍याने गैरअर्जदारास रु.20,000/- देऊन तिकिटे काढण्‍यास दिले असता गैरअर्जदाराने नागपूर ते मास्‍को व्‍हाया दोहा असे कतार एअरवेजचे तिकिट त्‍याला दिले. खर्चाकरीता रु.2,00,000/- गैरअर्जदारास देऊन कॉक्‍स अँड किंगचे कार्यालयात जाऊन अमेरीकन डॉलर खरेदी करण्‍यात आले. रशियाला जाण्‍याकरीता पासपोर्ट तयार करण्‍यात आला. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला त्‍याचा कझान स्‍टेट मेडीकल युनिर्वसिटी कझान रशिया येथे 2008-09 पासून 6 वर्षाचे एमडी फिजिशिएन कोर्सकरीता प्रवेश झाला आहे असे सांगून प्रवेशपत्र दि.04.07.2008 रोजी दिले. पुढे कझान युनिर्वसिटीपेक्षा रोस्‍तव युनिर्वसिटी चांगली आहे व तेथे प्रवेश मिळत आहे आणि खर्चही कमी आहे असे तक्रारकर्त्‍याला सांगितले. तसेच रोख स्‍वरुपात फि स्विकारण्‍यात येईल असे पत्राद्वारे कळविले.
      तक्रारकर्त्‍याला सदर शिक्षणाचा खर्च हा रु.10,00,000/- येणार होता, म्‍हणून त्‍याच्‍या आईने बँकेकडून शेती गहाण ठेवून कर्ज काढले. मास्‍को येथे जाण्‍याकरीता तक्रारकर्त्‍याला अतिरिक्‍त रु.25,000/- खर्च आला. तक्रारकर्ता नागपूर येथून कतार एअरवेजने दोहा मार्गे मास्‍को येथे गेला व तेथून रोस्‍तव येथे जाण्‍याकरीता 300 डॉलर त्‍याला खर्च करावे लागले. तक्रारकर्ता रोस्‍तव युनिर्वसिटीला गेला असता त्‍याला तेथे प्रवेश झालेला नसल्‍याचे कळविण्‍यात आल्‍याने त्‍याने वडिलांना ही बाब कळविली. तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी गैरअर्जदाराशी याबाबत संपर्क साधला असता त्‍यांनी उडवाउडवीची उत्‍तरे दिली व मुलाला रशियन भाषेत प्रवेश करुन देतो आणि त्‍या भाषेत त्‍याला शिकण्‍यास तयार करा असे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलास सांगितले. परंतू गैरअर्जदारास तक्रारकर्त्‍याचे वडिलांनी मुलाला परत आणण्‍याबाबत विनंती केल्‍यामुळे व तक्रारकर्त्‍याजवळ तेथे परत येण्‍याकरीता पैसे नसल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी गैरअर्जदाराला रु.40,000/- दिले व ई-मेलद्वारे विमानाचे तिकिट काढून दिले व तक्रारकर्ता अशाप्रकारे मुंबईपर्यंत पोहोचला.
 
      तक्रारकर्त्‍याचे वडिलांनी गैरअर्जदाराला दिलेल्‍या रकमेची मागणी केली असता त्‍यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली, म्‍हणून त्‍यांनी पोलीस स्‍टेशन, धंतोली येथे तक्रार नोंदविली. तक्रारकर्त्‍याच्‍या मते गैरअर्जदाराने खोटे प्रवेशपत्र देऊन त्‍यांची फसवणूक केलेली आहे आणि त्‍यामुळे त्‍याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. त्‍याकरीता त्‍याने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराला दिलेली रक्‍कम रु.3,50,000/- ही 24 टक्‍के व्‍याजासह परत मिळावी, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.5,00,000/- आणि प्रकरणाच्‍या खर्चापोटी रु.10,000/- मिळावे अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने 13 दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.
2.    सदर प्रकरणाचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्‍यात आला असता त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर व दस्‍तऐवज दाखल केले.
 
3.    गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याचे वतीने त्‍याच्‍या वडिलांनी अर्जातील नियम व अटी वाचून सह्या केलेल्‍या आहेत. तसेच सदर करार हा वैयक्‍तीक स्‍वरुपाचा करार असल्‍याने तो मंचासमोर चालण्‍यायोग्‍य नाही आणि या मुद्यावर सदर तक्रार खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.
      तसेच तक्रारकर्त्‍याला रोस्‍तव स्‍टेट मेडिकल युनिर्वसिटी येथे प्रवेश मिळाल्‍याचे पत्र प्राप्‍त झाल्‍याचे तक्रारकर्त्‍याने नमूद केलेले आहे. रोस्‍तव स्‍टेट मेडिकल युनिर्वसिटीचे व्‍हाईस चांसलर यांनी दि.15.10.2010 ला दिलेले प्रमाणपत्र व रजिस्‍ट्रेशन डॉक्‍युमेंटची प्रत सोबत दाखल केलेली आहे. सदर दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता त्‍याला नोव्‍हेंबर 2008 मध्‍ये रोस्‍तव स्‍टेट मेडिकल युनिर्वसिटी येथे वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्रजी माध्‍यमाच्‍या अभ्‍यासक्रमात प्रवेश देण्‍यात आल होता व विद्यापीठामध्‍ये वसतीगृह क्र.4 मध्‍ये राहण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. परंतू तक्रारकर्त्‍याने स्‍वतः दि.09.12.2008 रोजी प्रवेश रद्द करण्‍याबाबत विनंती केली होती आणि विद्यापीठाने त्‍याला U S Rouble 1000 म्‍हणजेच भारतीय चलनानुसार रु.45,000/- परत केले. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत शपथपत्रावर दाखल केलेले विधान की, त्‍याला रोस्‍तव स्‍टेट मेडिकल युनिर्वसिटीमध्‍ये प्रवेश मिळाला नव्‍हते हे धादांत खोटे असून सदर तक्रार दाखल करण्‍यास कारण घडलेच नसल्‍याने सदर तक्रार ही खोटी व मंचाची दिशाभूल करणारी आहे. म्‍हणून सदर तक्रार ही दंडात्‍मक खर्चासह खारीज करण्‍यात यावी.
      आपल्‍या परिच्‍छेदनिहाय उत्‍तरात गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याची विरोधात्‍मक सर्व कथने नाकारलेली आहेत.
 
4.    सदर प्रकरण मंचासमोर दि.18.02.2011 रोजी युक्‍तीवादाकरीता मंचासमोर आले असता मंचाने तक्रारकर्त्‍याचा युक्‍तीवाद ऐकला. गैरअर्जदाराने पुरसिस दाखल करुन त्‍यांचे लेखी उत्‍तर हाच युक्‍तीवाद समजण्‍यात यावा असे नमूद केले व नंतर काही दस्‍तऐवज दाखल केले. मंचाने उभय पक्षांनी दाखल केलेली कथने, दस्‍तऐवज व शपथपत्रे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
5.    गैरअर्जदाराने आक्षेप घेतला आहे की, त्‍याच्‍या व तक्रारकर्त्‍याच्‍या मधील करार हा वैयक्‍तीक स्‍वरुपाचा करार आहे व सदर तक्रार मंचासमोर चालण्‍यायोग्‍य नाही. परंतू गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला सेवा पुरविलेली असल्‍याने व त्‍याने तक्रारकर्त्‍याला रशिया येथील रोस्‍तव स्‍टेट मेडिकल युनिर्वसिटी मध्‍ये प्रवेश मिळवून दिलेला असल्‍याने आणि गैरअर्जदार हे युनिव्‍हर्सल कंसलटंटचे मालक आहेत आणि ते परदेशामध्‍ये विद्यार्थ्‍यांना अभ्‍यासक्रमाकरीता किंवा शिक्षणाकरीता प्रवेश मिळवून देण्‍याची सेवा देतात ही बाब दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होत असल्‍याने तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा सेवाधारक ठरतो व त्‍यामुळे सदर तक्रार ही मंचाचे कार्यक्षेत्रात येत असल्‍याचे मंचासमोर ती चालविण्‍यायोग्‍य असल्‍याचे मंचाचे मत आहे.
6.    तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मुख्‍यत्‍वे आक्षेप घेतला आहे की, गैरअर्जदाराने त्‍याचेकडून रक्‍कम घेतली व त्‍याला रोस्‍तव स्‍टेट मेडिकल युनिर्वसिटी मध्‍ये 2008-09 या वर्षाकरीता प्रवेश मिळवून देण्‍यासंबंधी पत्र 09.10.2008 चे दिले. सदर दस्‍तऐवज तक्रारकर्त्‍याने अ-11 वर दाखल केलेला आहे. परंतू प्रत्‍यक्षात तक्रारकर्ता रोस्‍तोव येथे गेला असता तेथे त्‍याचा प्रवेश झाला नाही असे त्‍याला समजले व ही गैरअर्जदाराने त्‍याची फसवणूक केल्‍याचे त्‍याचे म्‍हणणे आहे. याउलट, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला सदर संस्‍थेमध्‍ये प्रवेश मिळाला होता व तेथील विद्यापीठाने त्‍याची वसतीगृह क्र. 4 मध्‍ये राहण्‍याची व्‍यवस्‍था केली होती असे आपल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले आहे. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराचे विरुध्‍द धंतोली पोलीस स्‍टेशन येथे गुन्‍हा नोंदविल्‍या कारणाने तेथील पोलीस स्‍टेशनने रोस्‍तव स्‍टेट मेडिकल युनिर्वसिटीला पत्र लिहून वस्‍तूस्थिती जाणून घेण्‍याकरीता माहिती मागविली असता वाईस चांसलर, रोस्‍तव स्‍टेट मेडिकल युनिर्वसिटी यांनी धंतोली पोलीस स्‍टेशनला ही बाब कळविली की, तक्रारकर्त्‍याला त्‍यांचे येथील मेडीकल फॅकल्‍टीच्‍या इंग्रजी माध्‍यमातून अभ्‍यासक्रम 2008-09 करीता प्रवेश दिला होता. परंतू तक्रारकर्ता हा स्‍वतःच्‍या इच्‍छेने सदर विद्यापीठ सोडून निघून गेला ही बाब पृष्‍ठ क्र.68 वरील दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याकडून घेतलेल्‍या पैश्‍याच्‍या संदर्भात त्‍याला रोस्‍तव स्‍टेट मेडिकल युनिर्वसिटी मध्‍ये प्रवेश मिळवून दिला होता व त्‍यांनी कोणतीच तक्रारकर्त्‍याची फसवणूक केली नसल्‍यामुळे, तक्रारकर्त्‍याने तक्रारीत घेतलेले आक्षेप कोणत्‍याही प्रकारे सिध्‍द होत नाही, म्‍हणून सदर तक्रार खारीज करण्‍यात येते.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2)    उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा.
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT