// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 193/2014
दाखल दिनांक : 29/09/2014
निर्णय दिनांक : 01/04/2015
सौ. माधुरी सुरेशसिंह मोरे
वय 60 वर्षे, व्यवसाय – घरकाम
रा. गांधी नगर, बनोसा, ता. दर्यापुर
जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- उत्पादक, युनिट्रॉन हिअरींग इंडिया प्रा.लि.
- शरद डी. बेलसरे,
प्रोप्रा. एस.डी. इलेक्ट्रॉनिक्स,
अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. पर्वतकर
विरुध्दपक्ष क्र. 1 : एकतर्फा आदेश
विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे : अॅड. बाळापुरे
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 01/04/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 193/2014
..2..
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे तिला निट ऐकु येत नसल्याने डॉ. बेलसरे यांच्याकडून तपासणी करुन घेतले व त्यांच्या सल्लानुसार तिने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून युनिट्रॉन नेक्सट् हे श्रवणयंत्र दि. २९.१०.२०१२ रोजी रु. १७,०००/- ला खरेदी केले. विरुध्दपक्ष क्र. 1 हे या श्रवणयंत्राचे उत्पादन करीत असून विरुध्दपक्ष क्र. 2 हे त्याचे अधिकृत विक्रेते आहे.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे श्रवणयंत्राची 2 वर्षाची वारंटी होती. सदर श्रवणयंत्र खरेदी केल्यानंतर त्यात सुरवाती पासुन दोष असल्याचे तक्रारकर्तीच्या लक्षात आले. त्याबद्दल तिने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्र. 2 यांना त्याबद्दल सांगुन ते यंत्र बदलवून देण्याची मागणी केली. तिने दि. ३.१.२०१३ रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांना त्याबद्दल लेखी विनंती सुध्दा केली परंतु तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. यानंतर तिने वकीला मार्फत दि. २३.८.२०१४ रोजी नोटीस पाठविली परंतु विरुध्दपक्षाने कोणतेही समाधानकारक कारवाई केलेली नाही. ज्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी केली आहे. यासाठी श्रवणयंत्र बदलवून मिळणे व
ग्राहक तक्रार क्रमांकः 193/2014
..3..
नुकसान भरपाई रु. २०,०००/- या मागणीसह हा तक्रार अर्ज दाखल केला.
4. सुरवातीला तक्रारदार हिने विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द कारवाई न केल्याने विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द ही तक्रार दि. २५.११.२०१४ च्या आदेशाप्रमाणे रद्द करण्यात आली. परंतु निशाणी 15 वरील आदेशानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 यांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र. 1 यांना नोटीस मिळूनही ते हजर न झाल्याने हा तक्रार अर्ज त्यांच्या विरुध्द दि. २०.२.२०१५ च्या आदेशा प्रमाणे एकतर्फा चालविण्यात आला.
5. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी निशाणी 14 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला ज्यात त्यांनी हे कबुल केले की, त्यांनी श्रवणयंत्र तक्रारकर्तीला विकले होते व या श्रवणयंत्राचे उत्पादक विरुध्दपक्ष क्र. 1 आहे. त्यांनी हे नाकारले की, त्यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली आहे. त्यांच्या कथन असे आहे की, श्रवणयंत्र बदलवून देण्यास विरुध्दपक्ष क्र. 1 हे तयार होते व त्याबद्दलची सूचना तक्रारकर्तीला देण्यात आली होती. परंतु तिने त्या सूचनांचे पालन केले नाही व पैसे उकळण्याच्या उद्देशाने तक्रार अर्ज दाखल केला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 193/2014
..4..
6. तक्रारदाराने लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे युक्तीवाद करण्यात आला नाही.
7. तक्रार अर्ज, विरुध्दपक्ष क्र. 2 चा लेखी जबाब व तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद त्यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी
केली का ? .... होय
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा ः-
8. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात हे कबुल केले की, त्याने तक्रारकर्तीला रु. १७,०००/- ला विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी उत्पादीत केलेला युनिट्रॉन हे श्रवणयंत्र विक्री केले होते. त्यांनी असे नमूद केले की, विरुध्दपक्ष क्र. 1 हे ते श्रवणयंत्र बदलवून देण्यास तयार होते परंतु तक्रारदार हिने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. यावरुन हे शाबीत होते की, जे श्रवणयंत्र तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून खरेदी केले होते त्यात दोष होता व त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 हे ते श्रवणयंत्र बदलवून देण्यास तयार होते. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 2 ला दि. ३.१.२०१३ रोजी
ग्राहक तक्रार क्रमांकः 193/2014
..5..
पत्र दिले त्यावरुन असे दिसते की, तिने या पत्राव्दारे श्रवणयंत्रात दोषाबद्दल सूचित केले होते. सदरचे श्रवणयंत्र तिने दि. २९.१०.२०१२ रोजी खरेदी केले. त्यानंतर लगेच 3 महिन्याच्या आत त्यात दोष निर्माण झाला होता हे यावरुन शाबीत होते. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तावरुन असे दिसते की, श्रवणयंत्रावर 2 वर्षाची वारंटी दिलेली होती. विरुध्दपक्ष क्र. 2 ने योग्य कारवाई न केल्याने शेवटी तक्रारकर्तीने दि. २३.८.२०१४ वकीला मार्फत नोटीस पाठविली, परंतु त्यानंतर विरुध्दपक्षा तर्फे कोणतीही योग्य ती कारवाई केल्याचे दिसत नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी जरी लेखी जबाबात नमूद केले असले की, तक्रारकर्तीला ते श्रवणयंत्र बदलवून देण्याबाबत सूचित केले होते. परंतु त्यासाठी त्यांनी कोणतेही दस्त दाखल केले नाही. दि. ३.१.२०१३ रोजी तक्रारकर्तीचे पत्र व दि. २३.८.२०१४ ची नोटीस नंतर विरुध्दपक्षाने श्रवणयंत्र बदलवून देण्याबाबत किंवा ते दुरुस्त करुन देण्याबाबत कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही. ग्राहकाला वस्तु विकल्या नंतर वारंटी कालावधीत त्यात काही दोष निर्माण झाल्यास तो दोष दूर करुन देण्याची जबाबदारी ही उत्पादक तसेच विक्रेता यांची आहे. या प्रकरणात ही जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी पुर्ण केली नाही त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्रमांकः 193/2014
..6..
9. तक्रारदार हिने दि. २९.१०.२०१२ रोजी श्रवणयंत्र खरेदी केल्यावर त्यात काही महिन्यातच दोष निर्माण झाला व तो दोष दूर करण्याबाबत किंवा केलेल्या विनंतीला विरुध्दपक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. ज्या कारणासाठी श्रवणयंत्र खरेदी केले होते ते पूर्ण झालेले नाही व श्रवणयंत्राचा उपयोग तक्रारकर्ती घेवू शकली नसल्याने तिला खचितच मानसिक त्रास झालेला आहे तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी केल्यामुळे तिला जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल ती नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरते. यावरुन मुद्दा क्र.1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते व तक्रार अर्ज हा खालील आदेशा प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- तक्रारदार हिने निकालाच्या तारखे पासुन 1 महिन्याच्या आत तिने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून खरेदी केलेले श्रवणयंत्र विरुध्दपक्ष क्र. 2 कडे नेवून द्यावे व त्यानंतर पुढील 1 महिन्यात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्या श्रवणयंत्राच्या बदल्यात नविन श्रवणयंत्र द्यावे.
ग्राहक तक्रार क्रमांकः 193/2014
..7..
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदार हिला रु. ५,०००/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु. २,०००/- द्यावे. व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 01/04/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष