Maharashtra

Nanded

CC/09/137

Shrikant Vittalrao Medewar - Complainant(s)

Versus

Unitied India Insurance Com.Limited.Brance,Degloar - Opp.Party(s)

Adv.M.R.Yadav.

29 Sep 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/137
1. Shrikant Vittalrao Medewar R/o New Sarfa Bazar,Degloar.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Unitied India Insurance Com.Limited.Brance,Degloar Branch,Degloar Through Branch Officer.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 29 Sep 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/137
                    प्रकरण दाखल तारीख -   13/06/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    29/09/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर              -  सदस्‍या
                 मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
श्रीकांत पि.विठठलराव मेडेवार,
वय वर्षे 36, व्‍यवसाय व्‍यापार,                             अर्जदार.
रा.नविन सराफा बाजार देगलुर,
ता.देगलुर जि.नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
युनायटेड इंडिया इंन्‍शुरन्‍स कंपनी लि,
शाखा देगलुर मार्फत शाखाधिकारी,                         गैरअर्जदार.
 
 
अर्जदारा तर्फे वकील        - अड.एस.एस.चौधरी.
गैरअर्जदारा तर्फे वकील       - अड.श्रीनिवास मद्ये.
 
निकालपञ
(द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्‍या)
 
 
     अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार हे टाटा कंपनीचे एम.एच.26 एच 1665(एल.एम.व्‍ही) चा मालक असुन तो या वाहनाचा वापर व्‍यापा-याच्‍या दृष्‍टीने करतात, त्‍याला या वाहनाच्‍या भाडयातुन महिन्‍याला रु.15 ते 20 हजाराचा फायदा होतो. सदर वाहनाचा विमा अर्जदाराने गैरअर्जदार कंपनी तर्फे उतरविलेला आहे. त्‍याची विमा पॉलिसी क्र. 230602/31/07/01/323 असा असुन हा विमा दि.15/06/2007 ते दि.14/06/2008 या कलावधी करीता होता. अर्जदाराचे वाहन दि.10/05/2008 रोजी नांदेडहुन देगलुरकडे जात असतांना भोपाळा शिवराजवळ एक ट्रक क्र. एम.एच.06 के 504 चा चालक हा निष्‍काळजीपणाने व हायगईपणाने त्‍याचा ट्रक चालवित असल्‍यामुळे त्‍याने अर्जदाराच्‍या वाहनास जबरदस्‍त धडक देवून अपघात केला.  सदरील अपघात हा ट्रक चालकाच्‍या चुकीमुळे व निष्‍काळजीपणामुळै झाले असल्‍यमुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द पोलिसी स्‍टेशन रामतीर्थ यांनी गुन्‍हा नोंद क्र. 27/2008 नुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला. अर्जदाराने सदरील अपघातग्रस्‍त वाहन दुरुस्‍तीसाठी बाफना मोटर्स यांचेकडे दिले त्‍यांनी रु.1,00,583/- बिल दिले सदरील बिल अर्जदार यांनी भरणा करुन वाहन ताब्‍यात घेतले आहे. अपघाताच्‍या दिवशी अर्जदाराचे वाहन गैरअर्जदाराकडे इन्‍शुर्ड असल्‍यामुळे गैरअर्जदाराने जर अर्जदाराच्‍या वाहनास अपघातामुळे नुकसान होत असेल तर ती भरपाई करण्‍याची जबाबदारी घेतल्‍यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांना त्‍याला वाहन दुरुस्‍तीसाठ असलेला खर्च रक्‍कम रु.1,00,583/- ची मागणी करुनही दिली नाही. गैरअर्जदाराने त्‍यांच्‍याच दि.17/04/2009 च्‍या पत्रामध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे वाहन चालकास चालक परवाना दि.04/09/1998 रोजीच जारी करण्‍यात आला होता व तो दि.14/10/2007 पर्यंत वैध होता व तो दि.22/05/2011 पर्यंत वैध आहे. वस्‍तुतः कायदद्यान्‍वये वाहन चालकास जारी केलेला चालक परवाना हा वीस वर्षापर्यंत वैध असतो यावरुन अर्जदाराचा वाहन चालक हा अपघताच्‍या दिवशी सुध्‍दा वाहन चालविण्‍यास सक्षम होता. अपघतामध्‍ये अर्जदाराच्‍या वाहन चालकाचा कोणतीही चुक नाही सर्वस्‍वी चुक ही ट्रक चालकाचीच असल्‍यामुळे पोलिसांनी फक्‍त ट्रक चालका विरुध्‍दच गुन्‍हा नोंदविला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची मागणी योग्‍य व संयुक्‍तीक कारण नसतांना फेटाळणे चुकीचे व अयोग्‍य आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा क्‍लेम योग्‍य व संयुक्‍तीक कारण नसतांना फेटाळली म्‍हणुन त्‍यांच्‍या सेवेत कमतरता झाली म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, वाहन दुरुस्‍तीचा खर्च रु.1,00,583/- व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- आणि अर्जाचा खर्च रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत.
     गैरअर्जदार यांना नोटीस देण्‍यात आली त्‍यांनी हजर होऊन आपले लेखी म्‍हणणे दिले. त्‍यांचे म्‍हणणे असे की, हा अर्ज दाखल करण्‍यास अर्जदारास अधिकार नाही. सदरील अर्ज वास्‍तविक घटनेवर आधारीत नाही.म्‍हणुन अर्जदाराचा अर्ज फेटाळण्‍यात यावा. अर्जदाराने वाहन क्र.एम एच 26 एच 1665 चा पॉलिसी क्र.230602/31/07/01/323 चे नियम व अटी मोडल्‍या आहेत आणि पॉलिसी नियमाचे उल्‍लंघन केले आहे. त्‍यामुळे अर्जदारास हज अर्ज दाखल करण्‍याचा किंवा सदर गाडीचा अपघात नुकसान भरपाई मागण्‍याचा कोणताही अधिकार नाही आणि अधिकार नसतांना सुध्‍दा ही तक्रार न्‍यायमंचापुढे दाखल करुन मान्‍यवर न्‍यायमंचाचा व प्रतिवादीचा अमुल्‍य वेळेचे नुकसान करीत आहे.    वाहन क्र.एम.एच.26, 1665 ही गैरअर्जदाराकडे पॉलिसी क्र.230602/31/07/01/323 चे अंतर्गत विमा काढलेला होता. दि.10/05/2008 रोजीच्‍या अपघातात सदर वाहन चालक सुध्‍दा जिम्‍मेदार आहे. सदर अपघातामध्‍ये वाहनाचा किरकोळ स्‍वरुपाचे नुकसान झालेले आहे. परंतु सदर वाहनाचे नुकसान रु.1,00,583/- इतके झाले नाही. अर्जदाराने प्रतिवादीकडुन पैसे उकळण्‍याच्‍या उद्येशाने जास्‍तीची रक्‍कम नमुद करीत आहे. अर्जदाराने अपघाताची माहीती दोन दिवसांनी उशिरा प्रतिवादीकडे दिल्‍यावरुन प्रतिवादीने आपले सर्व्‍हेअर नेमुन अधिक तपासणी करुन घेतली व प्रत्‍यक्ष वाहनाचे नुकसान किती झाले याची पडताळणी करुन घेतली व सदर नुकसान झालेले रक्‍कमेतुन पॉलिसी नियमानुसार पॉलिसी एक्‍सेस व सॉलवेज वगैरे कपात केले. परंतु अर्जदारास प्रत्‍येक गोष्‍टी स्‍वतः कागदोपत्री पुराव्‍या आधारे सिध्‍द करावे. पंचनामामध्‍ये वाहन चालकाचे नांव गणेश व्‍यंकटराव पाटील अस नमुद करण्‍यात आले. परंतु मोटार ड्रायविंग चायसन्‍स क्र. एम.एच.26/4907/98 जे की प्रतिवादीकडे अर्जदाराने दाखल केली होती. सदर परवानामध्‍ये चालकाचे नांव गणपत पाटील व्‍यंकटराव असे लिहीलेले आहे. एफ.आय.आर. आणि घटनास्‍थळ पंचनामामध्‍ये अपघाताची तारीख दि.10/05/2008 असे लिहीलेले आहे आणि सदर वाहनाचे नुकसान रु.1,00,583/- असे दाखविण्‍यात आले म्‍हणुन प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये लिहीलेला सर्व मजकुर चुकीचे आहेत म्‍हणुन अर्जदाराच फेटाळण्‍यात यावा. दि.10/05/2008/11/05/2008 रोजी सदर गाडी चालकाकडे वाहन चालविण्‍याचे कायदेशिर वीधीग्राहय प्रभावी परवाना नव्‍हता म्‍हणुन अर्जदाराची मागणी क्‍लेम प्रतिवादीने फेटाळुन लावले आहे. सदरील वाहन क्र.एम.एच.26 एच 1665 च्‍या विमा पॉलिसीचे नियम व अटी अनुसार वाहन धारकाकडे मोटर वेहीकल अक्‍ट महाराष्‍ट्र मोटर वेहीकल रुल्‍स अण्‍ड सेंट्रल वेहीकल रुल्‍स 1989 च्‍या कलम 3 अनुसार आणि संबंधीत नियमानुसार गाडी चालविण्‍याचा परवाना असणे कायद्याने आवश्‍यक आणि गरजेचे आहे. केवळ वाहन चालविण्‍याचा परवाना असणे कायदद्याने पुरेसा नाही. परंतु अपघाताच्‍या दिवशी सदर परवाना वैध, वीधीग्राहय आणि प्रभावी असणे बंधनकारक आहे. या प्रकरणामध्‍ये सदर वाहन चालकाकडे अपघाताच्‍या दिवशी वैध वीधीग्राहय आणि प्रभावी वाहन चालविण्‍याचा परवाना नव्‍हते. तसे असतांना सुध्‍दा अर्जदाराचे सदर वाहन चालक सदर गाडी चालवून अपघातास कारणीभुत ठरले. त्‍यामुळे अर्जदारास गाडीची नुकसान भरपाई म्‍हणुन रु.1,00,583/- व त्‍या रक्‍कमेवर द.सा.द.शे. 12 टक्‍के प्रमाणे व्‍याज व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- अर्जाचा खर्च रु.5,000/- मागण्‍याचा अधिकार नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा क्‍लेम योग्‍य व संयुक्‍तीक कारणासह नाकारलेला आहे म्‍हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.
     अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र याचा विचार होता खालील मुद्ये उपस्थित होतात.
 
     मुद्ये.                                    उत्‍तर.
1.   अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?        होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्‍ये
कमतरता केली आहे काय?                            होय.
 
3.   कायआदेश ?                                                  अंतीम आदेशा प्रमाणे.
                        कारणे.
मुद्या क्र. 1
    अर्जदार यांनी त्‍यांचे वाहनाचे पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे उतरविलेली होती. अर्जदार यांच्‍या वाहनाचा अपघात झाल्‍यामुळे त्‍यांचे वाहनाचे नुकसान झाले. म्‍हणुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा क्‍लेमच्‍या रक्‍कमेची मागणी केलेली आहे व गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा क्‍लेम घटनेच्‍या दिवशी वाहन चालकाकडे चालक परवाना नाही या कारणास्‍तव नाकारलेले आहे. त्‍यामुळे अर्जदार यांनी सदरच्‍या विमा क्‍लेमची रक्‍कम मिळण्‍यासाठी प्रस्‍तुतचा अर्ज या मंचामध्‍ये दाखल केलेला आहे. अर्जदार यांचे वाहनाची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे दि.15/06/2007 ते 01/14/2008 या कालावधी करीता उतरविलेला होता. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, विमा पॉलिसी याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत , असे या मंचाचे मत आहे.
मुद्या क्र. 2
     अर्जदार यांचे टाटा कंपनीचे वाहन क्र. एम.एच.26 एच- 1665 (एल.एम.व्‍ही) या वाहनाचा विमा गैरअर्जदार कंपनीकडे दि.15/06/2007 ते 14/06/2008 या कालावधी करीता उतरविलेला होता. अर्जदार यांचे सदरच्‍या वाहनाचा दि.10/05/2008 रोजी ट्रक क्र. एम.एच.26 के 504 या ट्रक चालकाच्‍या निष्‍काळजीपणामुळे अर्जदार यांच्‍या वाहनास अपघात होऊन अर्जदार यांचा वाहनाचे नुकसान झालेले आहे. अर्जदार यांनी सदरचे वाहन दुरुस्‍त केली त्‍यासाठी अर्जदार यांना रु.1,00,583/- एवढा खर्च आलेला आहे. अर्जदार यांनी सदर अर्जासोबत पहीली खबर, घटनास्‍थळ पंचनामा, चालक परवाना, विमा पॉलिसी, गाडी दुरुस्‍तीचे बाफना मोटर्सचे बिल, गैरअर्जदार यांना वकीला मार्फत पाठविलेली नोटीस व गैरअर्जदार यांनी विमा क्‍लेम नाकारल्‍याचे दि.17/04/2009 रोजीचे पत्र इ. कागदपत्र या अर्जाचे कामी दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा क्‍लेम अपघाताच्‍या दिवशी सदर वाहन चालकाकडे वाहन चालविण्‍याचा कायदेशिर वीधीग्राहय आणि प्रभावी परवाना नव्‍हता म्‍हणुन अर्जदार यांचा विमा क्‍लेम नाकरलेला आहे. अपघाताच्‍या दिवशी वाहन चालकाकडे परवाना नाही याचा अर्थ चालकास वाहन वाहन चालविण्‍याचा अनुभव नाही असा होत नाही. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी 2003(6) सुप्रिम कोर्ट केसेस पान नं.420 जितेंद्रकुमार विरुध्‍द ओरीएंटल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि आणि इतर हे निकालपत्र दाखल केलेले आहे. Motor Vehicles Act,1988- S. 149 (2) (a) (ii)- Scope of –vehicle damaged due to accidental fire- Driver not holding a valid driving licence at time of incident- Liability of insurer- Vehicle (maruthi Van) was duly insured, caught fire during the drive due to mechanical and not due to any fault of the driver- Held, S.149 (2) (a) (ii) does empower the Insurance Company to repudiate a claim for damage incurred due to reasons other than the act of the driver- Therefore,on facts, Insurance Company could not have repudiated the claim of appellant owner solely on the ground that the driver did not have a vehicle licence at the time of the incident in question. सदर निकालपत्राप्रमाणे अपघाताच्‍या दिवशी वाहन चालकाकडे परवाना नुतणीकरण केलेले नाही म्‍हणजे त्‍याला वाहन चालविण्‍याचे कौशल्‍य नाही असे म्‍हणता येणार नाही. – Driver having valid licence that stood expired on date of accident—But later on licence renewed—Claim can not be defected merely on the ground that on date of accident licences expired—Complainants insured vehicle met with an accident- Claim repudiated on the ground that driver did not possess valid licence- Non-renewal of driving licence is not fatal, as there was no condition in insurance policy that driver should have valid during licence at the time of the accident- If the licence was renewed later on, that was not fatal for the acceptance of claim- Insurance to pay.  अपघाताच्‍या दिवशी वाहन चालकाकडे परवाना नाही हे क्‍लेम नाकारण्‍यास गैरअर्जदार यांचे योग्‍य व संयुक्‍तीक कारण नाही. गैरअर्जदार यांनी काणतेही योग्‍य व संयुक्‍तीक कारण नसतांना अर्जदार यांचा विमा क्‍लेम नाकारलेले आहे. वास्‍तविक पहाता गैरअर्जदार यांनी अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे केलेला आहे. त्‍यामुळे बिल चेक रिपोर्ट प्रमाणे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा क्‍लेमची रक्‍कम देणे आवश्‍यक असे होते परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विमा क्‍लेम नाकारुन अर्जदार यांना सेवा देणेमध्‍ये कमतरता केलेली आहे, असे या मंचाचे मत आहे.
     अर्जदार यांच्‍या वाहनास दुरुस्‍ती करण्‍यासाठी खर्च झालेला आहे . अर्जदार यांनी बाफना मोटर्स यांचे वाहन दुरुस्‍ती बाबतचे रक्‍कम रु.1,00,583/- एवढया रक्‍कमेचे बिल या अर्जाच्‍या कामी या अर्जासोबत दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी बिल चेक रिपोर्ट व सर्व्‍हे रिपोर्ट या अर्जाचे कामी या मंचात दाखल केलेले आहे. बिल चेक रिपोर्ट प्रमाणे अर्जदार यांना विमा क्‍लेमची रक्‍कम देणे योग्‍य व न्‍यायावह असे होणार आहे. अर्जदार यांचे बिल चेक रिपोर्ट प्रमाणे होणारी रक्‍कम रु.96,943/- एवढी रक्‍कम आज अखेर गैरअर्जदार यांनी न दिल्‍यामुळे अर्जदार यांना सदर रक्‍कमे पासुन वंचीत रहावे लागलेले आहे. त्‍यामुळे सदर रक्‍कमेवर क्‍लेम नाकारल्‍याचे तारीखपासुन म्‍हणजे दि.17/04/2009 पासुन द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज देणे योग्‍य व कायदेशिर असे ठरणार आहे, असे या मंचाचे मत आहे.
     अर्जदार यांनी विमा क्‍लेमची रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडे मागणी करुनही गैरअर्जदार यांनी कोणतीही योग्‍य व संयुक्‍तीक कारण नसतांना अर्जदार यांचा विमा क्‍लेम नाकारलेला आहे. सदरच्‍या विमा क्‍लेमची रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्जदार यांना या मंचामध्‍ये अर्ज करावा लागलेला आहे व त्‍या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे त्‍यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडुन मानसिक त्रासापोटी व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे.
     अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र, लेखी युक्‍तीवाद व वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे,शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र,युक्‍तीवाद, वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्र याचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश.
अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येते.
आज पासुन 30 दिवसांच्‍या आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्‍कमा द्यावेत.
1.   विमा क्‍लेमची रक्‍कम रु.96,643/- द्यावेत.
2.   सदर विमा क्‍लेमच्‍या रक्‍कमेवर दि.17/04/2009 पासुन प्रत्‍यक्ष
रक्‍कम पदरी पडेपर्यंत 9 टक्‍के दराने व्‍याज द्यावेत.
3.   मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च यरु.2,000/- द्यावेत.
4.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                               सदस्‍या                         सदस्‍य
 
 
गो.प.निलमवार.
लघूलेखक.