तक्रार क्रमांक – 194/2009 तक्रार दाखल दिनांक – 20 /03/2009 निकालपञ दिनांक – 05/12/2009 कालावधी - 00 वर्ष 09 महिना 15 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्रीमती. दुर्गावती घरभरन दास रा. गुलमोहर ओबराय को. ऑप.हॉ. सो. प्लॉट नं. 89, सेक्टर 6, कोपरखैरने, नवी मुंबई, जिल्हा- ठाणे .. तक्रारदार विरूध्द दि डिव्हीजनल मॅनेजर मे. युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं. लि., कार्यालयाचा पत्ताः- शेलार बिल्डींग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे(प) 400 602. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य सौ. भावना पिसाळ - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल यु.एस.पांडे वि.प तर्फे वकिल किर्ती पाटिल आदेश (पारित दिः 05/12/2009) मा. सदस्य सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्रीमती.दुर्गावती दास यांनी डि.एम मे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि., यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी अपघातग्रस्त वहानाच्या क्लेमबद्दल काहीही कारवाई न केल्याबद्दल नुकसान भरपाई रु.2,50,000/- मानसिक त्रासासकट व दि. 15/12/2005 पासून 12% व्याजाची मागणी केली आहे. 2. तक्रारकर्ता यांचे पती श्री.घरभरन दार यांची विरुध्द पक्षकाराकडे 'package Policy' नं. 121300/31/05/00440 घेतलेली होती त्यांचा व्हॅलीड काळ दि.16/04/2005 ते 15/04/2006 होता व त्यांच्या बोलेरो जीपचा नं. MH-04-AY-3370 होता त्यांचा नीयमीतपणे ते प्रीमीयम रु.5,209/- भरत असत. सदर इन्शुरन्स coverage & risk .. 2 .. of the own damages साठी होता. जीपच्या एकंदर रु.2,00,000/- वर रु.3,677/- रक्कम वाशी DO येथे भरली जात होती. त्यात क्लेम बोनस 45% होता. 3. तक्रारकर्ता यांचे पती (policy holder) लखनौ येथे सदर जीप दि.15/12/2005 रोजी घेऊन जात असता, जगानपुर या गावाजवळ आले असता समोरुन भरधाव वेगाने येणा-या ट्रकने सदर जीपला जोरात धडक दिली. यामध्ये जीपचा ड्रायव्हर श्री. नियाझ खान व स्वतः जीप मालक तक्रारकर्ता यांचे पती श्री.धरभरन दास हे जागीच ठार झाले. जीप पुर्णपणे अपघातग्रस्त व नादुरूस्त (Total Loss) झाली, तेथील रुनाई पोलीस ठाण्याने F.I.R.घेऊन क्रिमिनल केस फाईल केली व नंतर विरुध्द पक्षकाराकडे मोटर क्लेम नं.289/2004 दाखल केला परंतु तदनंतर अनेकदा चौकशी करुनही त्याचे उत्तर किंवा नाकारण्याची कारणे असे काहीही विरुध्द पक्षकार यांनी कळवलेले नाही. 4. तक्रारकर्ता यांनी वाशी DO ला 27/02/2009 रोजी डिमांड नोटीसही पाठवली होती. वाशी DO यांनी वारस प्रमाणपत्र मागितले होते व त्यांनी त्यांच्या सर्व्हेअर, इनव्हेस्टीगेटर श्री.विजय अन्ड कंपनी ऑफ गोरखपुर नेमले होते. त्यांनी गाडीचे नुकसान व अपघाताचा सर्व्हे व त्यात मरण पावलेल्या माणसाची माहिती विरुध्द पक्षकार यांना सव्हेअरने देऊनसुध्दा तक्रारकर्ता यांचा क्लेम विरुध्द पक्षकार यांनी दिलेला नाही व क्लेम रु.2,00,000/- न देण्याची कारणेही तक्रारकर्ता यांना पत्राद्वारे अद्यापी कळविलेली नाहीत. 5. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.18/06/2009 रोजी निशाण 6 वर दाखल केली आहे. यामध्ये क्लेम फॉर्मच्या क्लॉज 2 ड्रायव्हरच्या माहीतीमध्ये ड्रायव्हरचे नाव नीयाज अहमद (Niyaz Ahmed)असुन अपघाताच्या पोलीस पेपर्स मध्ये त्यांचे नाव नीयाज खान लिहिले आहे. ड्रायव्हरच्या दोन्ही नावामध्ये फरक आढळल्यामुळे शिवाय R.T.O कल्याण येथील लायसन्स नंबर प्रमाणे लिहिलेले नाव 'Mayaj Ahmed Masocoa Ahmed Khan Pathan' असे असल्याचे विरुध्द पक्षकारच्या सव्हेअरला आढळले आहे त्यामुळे सदर अपघाताच्या वेळी 'Niyaz' कडे अधिकृत (valild) लायसन्स नव्हता व त्यांच्या मरणोत्तर त्यांच्या मुलाने नावात पुरक असला तरी ते त्यांच्याच वडिलांचे नाव आहे असे शपथपत्र व अर्ज दिलेला आहे. व .. 3 .. जरुरीची कागदपत्रे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकाराकडे दाखल केली नव्हती म्हणुन त्यांचा क्लेम नाकारल्याचे पत्रही विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांस दिले नाही. म्हणुन विरुध्द पक्षकार नुकसान भरपाईस जबाबदार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. 6. उभयपक्षकारांची शपथपत्रे, पुरावा कागदपत्रे, लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद पडताळुन पाहीला असता पुढील प्रश्न निदर्शनास येतो. प्र. विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांच्या क्लेमबाबत कोणताही निर्णय अद्यापी कळवला नाही व त्याबद्दल दिलेली कारणे योग्य व कायदेशीर आहेत का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच नकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा विरुध्द पक्षकार यांचेकडे तक्रारकर्ता यांनी त्यांचे वहान अपघातग्रस्त झाल्यावर 2005 मध्ये क्लेम दाखल केला. पोलीस F.I.R व पंचनामा प्रमाणे पॉलीसी होल्डर सदर अपघातात मरण पावला व त्यांच्या कायदेशीर वारस पत्नीने सदर पॉलीसी खाली वाहनाच्या नुकसान भरपाईचा क्लेम दाखल केला आहे. सदर अपघातग्रस्त वाहनाचा चालकही या अपघातात मरण पावला परंतु त्यांचे नाव Riyaz Khan लिहिले असुन प्रत्यक्षात R.T.O लायसन्स वर ते Maya Ahmed Masocia Ahmed Khan pathan आहे. क्लेम फॉर्ममधील नाव व ड्रायव्िहंग लायसन्सचे नाव वेगळे असल्यामुळे विरुध्द पक्षकार यांच्या मते ड्रायव्हरकडे वाहन चालवण्याचे ब्हॅलीड लायसन्स नव्हते. म्हणुन क्लेम ठरवलेला नाही. परंतु मंचाच्या मते सदर परिस्थितीत कोणताही पत्रव्यवहार विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता बरोबर केलेला नाही व माहीतीही दिलेली नाही. वहान चालकाच्या मुलाने त्यांच्या मरणोत्तर शपथपत्र व अर्ज देऊन लायसन्स नं.1287/K/THR वर त्यांच्या वडीलांचे नाव चुकुन चुकीचे लिहिले असल्याचे कबुल केले आहे खरे नाव Niyaz Ahmed Nisar Ahmed Khan आहे. दोन्ही लिहिलेल्या नावाचे एकच व्यक्ती म्हणजे त्याचे वडिल आहेत. त्यामुळे मंच ड्रायव्हरकडे अपघाताच्या वेळेस Valid लायसन्स होते हे मान्य करत आहे. तसेच विरुध्द पक्षकार यांच्या सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे दाखल बिलाप्रमाणे व पॉलीसीतील रक्कमेनुसार तक्रारकर्ता यांनी केलेला रु.2,00,000/- रकमेचा क्लेम मिळण्यास .. 4 .. तक्रारकर्ता पात्र आहेत. तसेच ते योग्य व कायदेशीर मानण्यात येत आहे. म्हणुन हे मंच पुढील अंतीम आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1.तक्रार क्र.194/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना द्यावी व स्वतःचा खर्च सवतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी पॉलीसी होल्डरच्या कायदेशीर वारसास, तक्रारदार पत्नीस अपघात ग्रस्त वहानाची नुकसान भरपाई रु.2,00,000/- (रु. दोन लाख फक्त) द्यावेत. या आदेशाचे पालन सदर आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत करावे अन्यथा तदनंतर वरील रकमेवर 12% व्याज द्यावे लागेल. 3.विरुध्द पक्षकार यांनी मानसिक त्रासाचे व नुकसान भरपाईचे रु.15,000/-(रु. पंधरा हजार फक्त) तकारकर्ता यांस द्यावेत. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यांकरिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 05/12/2009 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|