निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 30/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 06/06/2013
कालावधी 01 वर्ष.05 महिने. 02 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
केशव पिता जगन्नथ जावळे. अर्जदार
वय 34 वर्षे. धंदा.व्यापार. अड.जे.बी.गीरी.
रा.आसोला ता.जि.परभणी.
विरुध्द
युनायटेड इन्शु कंपनी लिमीटेड. गैरअर्जदार.
तर्फे,शाखा व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया.
दयावान कॉम्प्लेक्स स्टेशन रोड.परभणी.ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
अर्जदारास गैरअर्जदाराने इंडीका कार एम.एच./22/एच/1760 या कारचे अपघाता मध्ये झालेल्या नुकसानी बाबत नुकसान भरपाई गैरअर्जदाराने नाकारले व सेवेत त्रुटी दिली म्हणून सदरची तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रारी अशी आहे की, इंडीका कार क्रमांक एम.एच./22/एच/1760 चा अर्जदार हा मालक व ताबेदार आहे व सदरील वाहनाचा विमा अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 24/01/2011 रोजी उतरविला व सदरील विम्याची वैधता 23/01/2012 पर्यंत होती व सदर पॉलिसीचा क्रमांक 230601/31/10/01/00012953 असा होता व सदरील पॉलिसी अर्जदाराने गैरअर्जदाराच्या परभणी येथील कार्यालयातून घेतली होती अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, दिनांक 14/02/2011 रोजी वसमत परभणी रोडवरील नांदगांव शिवारा मध्ये 15.45 वाजता सदरच्या कारचा अपघात होवुन अर्जदाराच्या वाहनाचे रु.2,00,000/- चे नुकसान झाले.व सदरील अपघात नंतर पोलीस स्टेशन ताडकळस येथे अर्जदाराचा मित्र आगिया नर्सया साना याच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 10/2011 अन्वये दिनांक 15/02/2011 रोजी कलम 279, 338, 427 भा.द.वी.नुसान गुन्हा दाखल झाला व संबंधीत पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा व ईतर आवश्यक तो तपास करुन वाहन चालका विरुध्द आरोपपत्र न्यायालयात दाखल केला. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदरील अपघाता नंतर अर्जदाराने गैरअर्जदारास सदरच्या अपघाताची संपूर्ण माहिती देवुन योग्यत्या कागदपत्रांसह क्लेम दाखल केला व सदरील वाहनाच्या दुरुस्तीसाठी लागणा-या खर्चाचा आराखडा तयार केला व तो गैरअर्जदाराकडे दाखल केला, अर्जदाराने केलेल्या सुचने नुसार गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या वाहनाचा सर्व्हेअरव्दारे स्पॉट सर्व्हे व गॅरेज सर्व्हे पूर्ण केला व त्यानंतर अर्जदाराने त्याच्या सदरच्या कारची दुरुस्ती करुन घेतली व संपूर्ण वाहन दुरुस्ती नंतर सर्व्हेअरने वाहन या संदर्भातील सर्व्हे रिपोर्ट तयार करुन गैरअर्जदाराकडे पाठविला. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, वाहन दुरुस्ती नंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केलेल्या खर्चाची संपूर्ण बिले व पोलीस पेपर्स, वाहनाचे कागदपत्रे दाखल केली व त्यानंतर गैरअर्जदाराकडे अर्जदाराच्या सदरच्या कारच्या झालेल्या नुकसानी बद्दल नुकसान भरपाई देण्यासाठी विनंती केली,परंतु गैरअर्जदाराने वेगवेगळी कारणे सांगुन नुकसान भरपाई देण्याचे टाळले, शेवटी गैरअर्जदाराने दिनांक 24/08/2011 रोजी अर्जदारास नोटीस पाठवुन असे सुचित केले की, अर्जदाराने आवश्यक असलेली कागदपत्रे दाखल केलेली नसल्यामुळे अर्जदाराचा क्लेम नो क्लेम म्हणून बंद करण्यात आला आहे.त्यानंतर अर्जदाराने वकिला मार्फत 08/09/2011 रोजी गैरअर्जदारास नोटीस पाठविली व गैरअर्जदारास कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे, याबाबत माहिती विचारण्यात आली व तसेच 2,00,000/- अथवा सर्व्हेअरच्या रिपोर्ट नुसार नुकसान भरपाई देण्या बाबत विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने आवश्यक असलेल्या कागदपत्रा बद्दल कोणतीही यादी सुचित केली नाही.व नुकसान भरपाई दिली नाही,त्यामुळे अर्जदारास सदरचा तक्रारी अर्ज विद्यमान मंचासमोर दाखल करणेस भाग पडले, अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, आवश्यक असलेली संपूर्ण कागदपत्रे म्हणजे एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, आर.सी.बुक, इन्शुरंस पॉलिसी, ड्रायव्हींग लायसेन्स इस्टिमेट बिले इत्यादी कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला असून सर्व्हेअरने स्पॉट सर्व्हे गॅरेज सर्व्हे व काम पूर्ण झाल्या नंतर त्याबाबत रिपार्ट गैरअर्जदाराकडे सादर केले व सदरील अपघातात अर्जदाराचे 2,00,000/- चे नुकसान झाले आहे असे असताना गैरअर्जदाराने सदरचा क्लेम नो क्लेम म्हणून बंद केला जो की, संपूर्णतः चुकीचा आहे अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदरच्या कार अपघाताच्या घटने वेळी सदरची कार ही अर्जदाराचे मित्र आगिया नर्सया साना हा त्याच्या काही खाजगी कामा निमित्ताने नांदेड येथे जात असतांना त्रिधारा पाटी जवळ नांदगाव शिवारा मध्ये सदरील वाहनाचा अपघाता झाला.
म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदारा पासून इंडीका कार क्रमांक एम.एच./22/एच/1760 या अपघाता मध्ये झालेल्या नुकसानी बद्दल नुकसान भरपाई म्हणून 2,00,000/- किंवा सर्व्हेअर रिपोर्ट नुसार 18 टक्के वार्षीक व्याजाने अपघात झालेल्या दिनांका पासून नुकसान भरपाई देण्यात यावी,व तसेच गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्यामुळे मानसिकत्रास झाल्याबद्दल रु.5,000/- प्रकरणाच्या झालेल्या खर्चा बद्दल रु.5,000/- मंजूर करण्यात यावे अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपला शपथपत्र दाखल केला आहे.व तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 5 वर 13 कागदपत्रांच्या यादीसह झेरॉक्स प्रती दाखल केले आहेत. ज्यामध्ये नि.क्रमांक 5/2 वर अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेली नोटीस, 5/4 वर गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली नोटीसचे उत्तर, 5/5 वर गैरअर्जदाराने विमा दावा नाकारल्याचे पत्र, 5/6 वर एफ.आय.आर.ची कॉपी, 5/7 वर पोलीस तपास टिपण, 5/8 वर इंडीका कार क्रमांक एम.एच./22/एच/1760 चे आर.सी.बुक, 5/9 वर पॉलिसी पेपर्स इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या त्याप्रमाणे गैरअर्जदार मंचासमोर हजर, व आपले लेखी म्हणणे नि.क्रमांक 14 वर दाखल केला, त्यात गैरर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरच्या तक्रार अर्ज हा बेकायदेशिर व तसेच खोटा व बनावट असल्या कारणाने तो फेटाळण्यात यावा व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची चुकीची व त्रुटीची सेवा दिलेली नसल्याने तक्रार फेटाळण्यात यावी, असे म्हंटले आहे. गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदरची कार ही अपघाताच्या घटने दिवशी भाड्याने दिली होती व सदरची पॉलिसी घटनेच्या दिवशी वैध होती गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, पोलीस तपास कागदपत्रांवरुन व एफ.आय.आर. व पोलीस पंचनाम्यावरुन असे दिसते की, सदरची कार भाड्याने वापरण्यास दिली होती व म्हणून पॉलिसीत दिलेल्या लिमिटेशन क्लॉजचा भंग होतो व म्हणून सदरचा दावा फेटाळला आहे आणि ते बरोबर आहे.तसेच गैरअर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.
दोन्ही पक्षांच्या युक्तिवादा वरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदारानी अर्जदाराचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी
1 दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, अर्जदार हा इंडीका कार क्रमांक एम.एच./22/एच/1760 चा घटने दिवशी मालक होता व तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 5/9 च्या कागदपत्रावरुन हे सिध्द केले आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 24/01/2011 रोजी ते 23/01/2012 पर्यंत सदरच्या वाहानाचा विमा उतरवलेला होता व तसेच सदर वाहन अपघाता दिवशी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे काढलेली पॉलिसी वैध होती, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/9 या कागदपत्रावरुन सिध्द होते, परंतु अर्जदाराने सदरच्या विमा पॉलिसीच्या नियमांचा उल्लंघन केला ही बाब एफ.आय.आर. नं. 10/11 पोलीस स्टेशन ताडकळस वरुन सिध्द होते. एफ.आय.आर.पोलीस पंचनामा, ड्रायव्हरची जबानी ई.वरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने सदरची कार ही अपघाता दिवशी आगिया नर्सया साना यांस भाड्याने दिली होती. अर्जदाराने गैरर्जदाराकडे उतरविलेल्या सदरच्या कार विमा पॉलिसी मध्ये Limitation as to use : या क्लॉज मधील सब क्लॉज ए Hire or Reward या अटीचे उल्लंघन केले आहे.ही बाब सिध्द होते.म्हणून गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, विमा पॉलिसीच्या अटीतील उल्लंघन केल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारला व गैरअर्जदाराने सदरचा विमा प्रस्ताव नाकारुन कोणत्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही, ही बाब
सिध्द होते, व मंचास योग्य वाटते. अर्जदाराने सदरची कार ही अर्जदाराचा मित्र आगिया नर्सया साना यांचे शपथपत्र दाखल केले नाही, तसेच एफ.आय.आर, पोलीस पंचनामा व्यतिरिक्त ईतर कोणताही पुरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही.म्हणून मंच वरील मुद्दा क्रमांक एकचे उत्तर नकारार्थी देवुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष