(द्वारा- श्री.डी.एस.देशमुख, अध्यक्ष) विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे आहे की, त्याने त्याचे दुकान गीता सायकल मार्टचा गैरअर्जदार युनायटेड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (यापुढे “विमा कंपनी” असा उल्लेख करण्यात येईल) यांच्याकडे दि.03.10.2005 ते 02.10.2006 या कालावधीसाठी विमा उतरविलेला होता. दि.11.08.2006 रोजी अतिवृष्टी झाल्याने पुराचे (2) त.क्र.188/10 पाणी त्याच्या दुकानात शिरले आणि दुकानातील माल म्हणजे सायकल, टायर, टयूब, फर्निचर इत्यादी पुर्णतः खराब झाले व त्याचे रु.1,90,000/- चे नुकसान झाले. सदर घटनेची माहिती त्याने गैरअर्जदार विमा कंपनीला दिली आणि विमा कंपनीच्या सर्व्हेअरने त्याच्या दुकानाची पाहणी केली. त्यानंतर त्याने आवश्यक कागदपत्रांसह गैरअर्जदार विमा कंपनीकडे दि.12.09.2006 रोजी विमा दावा दाखल केला. परंतु त्यानंतर वारंवार मागणी करुनही विमा कंपनीने त्यास विमा रक्कम दिली नाही, अथवा त्याच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. अशाप्रकारे विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिली. म्हणून त्याने अशी मागणी केली आहे की, त्यास विमा कंपनीकडून रु.1,90,000/- व्याजासह मिळावेत. गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्याच्या दुकानाचा विमा उतरविलेला होता. परंतु विमा कालावधीमध्ये पुराचे पाणी दुकानात शिरल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाल्याचे म्हणणे महितीअभावी अमान्य आहे. तक्रारदाराने त्याच्या दुकानाचा फायर पॉलीसीनुसार विमा उतरविलेला असून, सदर पॉलीसीअंतर्गत पुरांमुळे झालेल्या नुकसानीला विमा संरक्षण नाही. सदर बाब तक्रारदाराला कळविण्यात आली होती, परंतु त्याने सदर बाब लपवून ठेवली आहे. तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण दि.11.08.2006 रोजी घडलेले असुन त्याने ही तक्रार दि.14.02.2010 रोजी दाखल केली. म्हणून कलम 24-अ ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदाराला त्रुटीची सेवा दिलेली नाही, म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुददे उपस्थित होतात. मुददे उत्तर 1) गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही. 2) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुददा क्रमांकः- 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आनंद मामीडवार आणि विमा कंपनीच्या वतीने अड ए.पी.बागुल यांनी युक्तीवाद केला. (3) त.क्र.188/10 तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे आग व इतर जोखमीसाठी विमा उतरविलेला होता. तक्रारदाराच्या दुकानात दि.11.08.2006 रोजी पुराचे पाणी शिरल्यामुळे त्याच्या दुकानातील मालाचे नुकसान झाले, असे तक्रारदाराचे म्हणणे असुन त्याने विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केल्यानंतर विमा कंपनीने त्यास विमा रक्कम दिली नाही असे त्याचे म्हणणे आहे. याबाबत विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराच्या दुकानाचा ज्या पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेला होता, त्यामध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण नव्हते. तक्रारदाराने आमच्यासमोर पॉलीसी दाखल केली परंतु पॉलीसीच्या अटी व शर्ती दाखल केल्या नाहीत. त्याने ज्या पॉलीसी अंतर्गत दुकानाचा विमा उरविला होता त्यामध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण होते, हे सिध्द करण्यासाठी त्याने पॉलीसीतील अटी व शर्ती दाखल करणे अत्यंत आवश्यक होते. परंतु तक्रारदाराने पॉलीसीतील अटी व शर्ती दाखल केल्या नाहीत व त्या दाखल न करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे त्याच्या दुकानातील मालाचे पुरामुळे नुकसान झाले तर त्यासाठी गैरअर्जदार विमा कंपनीने विमा संरक्षण दिलेले होते, हे सिध्द होत नाही. म्हणून तक्रारदारास गैरअर्जदार विमा कंपनीने त्याच्या दुकानातील मालाचे पुरामुळे नुकसान झाल्यानंतर विमा रक्कम न देऊन त्रुटीची सेवा दिली, असे म्हणता येणार नाही. म्हणून मुददा क्र.1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा. 3) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |