जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 189/2011 तक्रार दाखल तारीख –04/01/2012
मंदाबाई भ्र.शिवाजी कव्हळे
वय 40 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.कारखेल (बु.) ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.नागपुर
समन्स बजावणीचा पत्ता ः-
शाखा व्यवस्थापक, युनाटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
शाखा बीड, जालना रोड, बीड ता.जि.बीड सामनेवाला
2. शाखा व्यवस्थापक, कबाल इन्शुरन्स कंपनी लि.
शॉप नं.2,दिशा अलंकार कॉम्प्लेक्स,
टाऊन सेंटर, सिडको,औरंगाबाद.
3. तालुका कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय, जळगांव ता.आष्टी,जि. बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.डि.जी.भगत
सामनेवाला क्र.1 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकर्णी सामनेवाला क्र.2 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
(घोषित द्वारा ः- अजय भोसरेकर,सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराच्या मयत पतीचा अपघात दि.25.05.2010 रोजी झाला असून त्यांच्या घटनेची फिर्याद तक्रारदाराने अंभोरा पोलिस स्टेशन येथे दिली. त्यानुसार तक्रारदाराच्या मयत पतीचा पंचनामा,शवविच्छेदन इत्यादी करुन तक्रारदाराच्या मयत पतीचा मृतदेह अत्यंसस्कांरासाठी तक्रारदारास सोपविण्यात आला. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांच्या क्लेम फॉर्मच्या तरतूदीनुसार सर्व कागदपत्राची पुर्तता करुन सामनेवाला क्र.3 यांचेकडे दाखल केला.तक्रारदार हा सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडे वांरवार चौकशी करीत राहीला. त्यांस त्यांनी उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारदाराने सदर तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने शेतकरी वैयक्तीक अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- त्यावर द.सा.द.शे 18 टक्के व्याज, मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ एकूण 7 कागदपत्र दाखल केली आहेत.
सामनेवाला क्र.3 यांनी आपले लेखी म्हणणे दि.14.03.2012 रोजी दाखल केले असून सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारीतील त्रुटी बाबत दि.07.12.2010 रोजी पत्रान्वये कळविले ते पत्र दि.07.01.2011 रोजी प्राप्त झाले व त्यातील त्रुटी दि.29.01.2011 रोजी जावक क्र.246 अन्वये सामनेवाला क्र.2 यांचेकडे पुर्तता केली असे म्हटले आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यांत त्यांनी तक्रारदाराचा विमा दावा दि.04.11.2010 रोजी अपूर्ण मिळाला असल्याचे म्हटले असून त्यामध्ये ड्रायव्हींग लायसन्स नसल्याबददलचे म्हटले आहे. याबाबत पुर्तता करण्यासाठी दि.07.12.2010 रोजी सामनेवाला क्र.3 यांना लेखी पत्राद्वारे कळविले. याबाबतची पुर्तता प्राप्त न झाल्यामुळे अपुर्ण क्लेम असा शेरा देऊन दि.21.12.2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडे विमा प्रस्ताव पाठविण्यात आला. सदर विमा प्रस्ताव हा सामनेवाला क्र.1 यांनी दि.31.12.2010 रोजी अपुर्ण कागदपत्रे दि.14.11.2010 पर्यत पूर्तता न केल्यामुळे दि.31.12.2010 रोजी बंद करण्यात आल्याचे पत्र सामनेवाला क्र.1 यांनी दिले आहे असे म्हटले आहे..
सामनेवाले क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे दि.14.03.2012 रोजी दाखल केले असून त्यात त्यांनी तक्रारदाराचा विमा दावा हा पॉलिसी कालावधीच्या 90 दिवसांनंतर प्राप्त झाला असल्यामुळे तो न देऊन आम्ही कोणतीही सेवेत त्रुटी केली नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पृष्टयर्थ अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केली नाहीत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता,
तक्रारदारांने सामनेवाले यांचे नियमाप्रमाणे सर्व कागदपत्राची पुर्तता सामनेवाला क्र.3 यांचेकडे केलेली आहे. तक्रारदाराने मयत पतीचे ड्रायव्हींग लायसन्स या न्यायमंचात दाखल केले आहे. तक्रारदाराने मा.राज्य आयोग, मुंबई सीपीजे भाग 2 (2008) पान क्र.403 “(i) Consumer Protection Act, 1986 – Section (1)(g) – Insurance –Agriculturist Accident Insurance Policy –Claim rejected due to delayed submission of claim papers –All required documents except driving licence submitted to insurer—Driving licence not necessary to settle claim—Clause regarding time-limit for submission of claim not mandatory –Cannot be used to defeat genuine claim—Insurance Company rejected claim on highly technical ground—Rejection unreasonable –Insurer liable to pay sum assured under policy.”
या निकालाचा आधार घेतला असून या निकालाचे अवलोकन केले असता, सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांचा शेतकरी वैयक्तीक अपघात विमा रक्कम मुदतीत न देऊन सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होते.
त्यामुळे तक्रारदारास मयत पतीच्या शेतकरी वैयक्तीक अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- मिळण्यास पात्र आहेत असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत
शिवाजी गुलाबराव कव्हळे यांचे शेतकरी वैयक्तीक अपघात विम्याची
रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश
मिळाल्यापासून एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.04.01.2012 पासून देण्यास जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.3,000/-(अक्षरी रु.तिन हजार फक्त) आदेश
प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड