जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/31 प्रकरण दाखल तारीख - 27/01/2009 प्रकरण निकाल तारीख – 04/05/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य रुक्मीनबाई भ्र.नरसिंगराव जेठेवाड, अर्जदार. वय वर्षे 55, व्यवसाय मे.जेठेवाड बायोकोल इंड.मालक. रा.नाईक नगर,मयुर टॉकीज समोर, नांदेड. विरुध्द. युनाटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, गैरअर्जदार. विभागीय कार्यालय,जी.जी.रोड,नांदेड. द्वारा- विभागीय व्यवस्थापक. अर्जदारा तर्फे वकील - अड.दिपाली कातनेश्वरकर. गैरअर्जदारा तर्फे - अड.व्ही.एम.देशमुख. निकालपञ (द्वारा-मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार युनाटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि, यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविलेली आहे. अर्जदार हे मे.जेठेवाड बायोकोल इंडस्ट्रीज एम.आय.डीय.सी.प्लॉट नं.बी.2 कृष्णुर जि.नांदेड चे मालक आहेत. अर्जदार हे बगॅस व सोयाबीनगुळी या पासुन बायोकोलचे उत्पादन काढतात. गैरअर्जदार यांचेकडुन कारखान्याची इमारत,यंत्रसामुग्री व कच्चा माल, बगॅस व सोयाबीन गुळी याचा विमा काढलेला आहे. दि. 5 एप्रिल 2008 ते 4 एप्रिल 2009 या कालावधीसाठी व कारखान्याचे अंतर्गत व परिसरात असलेल्या कच्या मालाचा रु.9,70,000/- चा विमा काढलेला होता. दि.1 मे 2008 रोजी कारखान्यातील कच्चा माल बॅगसला व सोयाबीन गुळीला अचानक आग लागली व कारखान्याचे रु.40,00,000/- चे नुकसान झाले व कारखान्यात असलेला संपुर्ण कच्चा माल जळुन गेला तेव्हा यासंबंधीची माहीती पोलिस स्टेशन नायगांव यांना देण्यात आली. विम्याची रक्कम रु.9,70,000/- मागणी गैरअर्जदार यांचेकडे केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराला यापैकी फक्त रु.2,95,327/- देण्याचे मान्य केले. अर्जदाराला ही रक्कम मान्य नसल्यामुळे ती रक्कम न स्विकारता त्यांनी दि.05/12/2008 रोजी तक्रार करुन पुर्ण रक्कमेची मागणी केली. परंतु गैरअर्जदार यांनी त्यास नकार दिला. अर्जदाराचा पुर्ण माल नष्ट झाल्यामुळे रु.35,00,000/- चे नुकसान झाले आहे. यात विमा पॉलिसीप्रमाणे कच्चा मालासंबंधी काढलेली विम्याची रक्कम रु.9,70,000/- पुर्ण मिळण्यास अर्जदार हे हक्कदार आहे. दि.02/01/2009 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवुनही रक्कमेची मागणी केली परंतु गैरअर्जदार यांनी त्यास नकार दिल्यामुळे अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदाराकडुन विमा रक्कम रु. 9,70,000/- व त्यावर 12 टक्के व्याज अधिक नोटीसचा खर्च रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.7,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदारहेवकीलामार्फतहजरझाले,त्यांनीआपलेलेखीम्हणणेदाखलकेलेलेआहे. गैरअर्जदारांनीमे. जेठेवाडबायोकोलइंडस्ट्रीजकरीतास्टँडर्डफायरआणिस्पेशलपेरीलपॉलिसीक्र. 230600/11/08/11/00000112 याप्रमाणेपॉलिसीदिलीहोती. ज्यामध्येकारखानावपरिसरातीलमाल, कच्च्यामालाचीकिंमतरु.9,70,000/- चाविमाअंतर्भुतआहे. इन्शुरअर्डकारखान्यामधीलआगीच्याघटनेसंबंधीगैरअर्जदारासमाहीतीमिळाल्याबरोबरविमाकंपनीनेसर्व्हेअरवलॉसअसेसरश्री. मनोहररामनारायणजीतोतलावजी.आर. उत्तरवारयांनाप्रत्यक्षजाऊनक्लेमबघुनअहवालदेण्याससांगितलेआहे, त्यांनीत्याचदिवशीम्हणजेदि.01/05/2008 रोजीघटनास्थळासभेटदेऊनप्रत्यक्षपाहणीकेली, विमाधारकासवारंवारसांगुननुकसानभरपाईचीरक्कमठरविण्यासाठीकच्चामालखरेदीचीबीले, खातेपुस्तिकेचेउतारेहस्तगतकेली. विमाधारकानेपुरविलेल्यामाहितीवकागदपत्रांवरुनइन्शुअर्डकारखान्यामध्येघटनेच्यादिवशीरु.33,51,454/- चामालआढळुनआलातसेचविमाधारकाने दिलेल्याट्रेडिंगअकाऊंटच्याउता-याप्रमाणेकारखान्यामधीलसंपुर्णकच्चामालहाएकुणकिंमतरु.10,96,884/- चाहोता. त्यापैकीविमाधारकानेफक्तरु.9,70,000/- चाविमाघेतलेलाआहे. म्हणुनसर्व्हेअरवलॉसअसेसरयांनीविमापॉलिसीचेसर्वसाधारणकंडीशनक्र.10 मधीलतरतुदीप्रमाणेलॉऑफअव्हरेज(रेटेबल प्रपोर्शन) चा कायदा वापरुन रु.2,95,327/-ची नुकसान भरपाई ठरवली, याचा अहवाल दि.18/11/2008 रोजी दिला व सर्व कागदपत्राची व सर्व्हे रिपोर्टचे अवलोकन करुन विमाधारकास दि.05/12/2008 रोजीच्या पत्रान्वये रु.2,95,327/- चे वॉव्हचर विमा कंपनीच्या हक्कात नोंदवुन रक्कम स्विकारावी असे सांगितले परंतु विमाधारकाने बेकादेशिरपणे चुकीने त्याचे पत्र दि.05/12/2008 अन्वये क्लेम सेटलमेंट वॉऊचर करुन देऊन रक्कम स्विकारण्यास नकार दिला व जास्तीच्या रक्कमेची मागणी केली, यात गैरअर्जदारांची काही जबाबदारी नाही व त्यांनी सेवेत त्रुटी केली नाही. म्हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 पॉलिसी क्र. 230600/11/08/11/00000112 ही कच्चा मालासंबंधी STOCK KEPT IN UNIT AND CAMPUS OF FACTORY याबद्यलची रु.9,70,000/- चा विमा दिलेला आहे व तो त्यांना मान्य आहे.दि.01/05/2008 रोजी कारखान्यामध्ये दुपारच्या सुमारास आग लागली व त्या कच्चा माल बगॅस व सोयाबीन गुळी असे एकुण माल जळुन खाक झाला यासाठी पुरावा म्हणुन दि.01/05/2008 रोजीचा घटनास्थळ पंचनामा अर्जदाराने दाखल केले आहे. यात कचा व पक्का मालाचा प्रचंड नुकसान झाल्याचा उल्लेख आहे. याप्रमाणे मंडळ अधिकारी,बरबडा यांनी पंचनामा करुन जवळपास पंचविस लाखचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. आग लागल्यासंबंधी व नुकसान झाल्याबद्यल गैरअर्जदाराचा वाद नाही. विम्याची रक्कम न दिल्या कारणांने दि.02/01/2009 रोजी गैरअर्जदारास कायदेशिर नोटीस पाठविली. गैरअर्जदाराचे म्हणणे परिच्छेद क्र. 2 मध्ये अर्जदाराने दाखविलेली कॅशबुक व बिल यावरुन ट्रेडिंग अकाऊंट प्रमाणे कारखान्यात सुंपर्ण कच्चा माल रु.10,96,884/- चा होता असे म्हटले आहे.परंतु स्टॉक याचा अर्जदाराने रक्कम किंमत रु.9,70,000/- चा विमा उतरविलेला आहे व पॉलिसीच्या सर्वसाधारण कलम 10 प्रमाणे लॉ ऑफ एव्हरेज (रेटेबल प्रपोर्शन) कायदा वापरुन रु.2,95,327/- एकुण नुकसान भरपाई ठरविलेली आहे. अर्थातच एवढी कमी रक्कम अर्जदाराने घेतलेली नाही. अर्जदाराचे जवळपास रु.11,00,000/- लाखाचे स्टॉक त्याचेकडे होता व बगॅस सोयाबीन गुळी हे बगॅस वाढत जातात त्यामुळे नक्की घटनेच्या दिवशी जो स्टॉक होता तो विमा उतरवितांना कमी असेल त्यामुळे अर्जदारांनी कमी रक्कमेचा विमा उतरविला, यात फार फरक नाही रु.1,00,000/- चा फरक आहे. अर्जदाराचे आधीच नुकसान झाले आहे व पॉलिसीतील नियम क्र. 10 प्रमाणे 10. If the property hereby insured shall at the breaking out of any fire or at the commencement of any destruction of or damage to the property by any other peril hereby insured against be collectively of greater value than the sum insured thereon, then the insured shall be considered as being his own insurer for the difference and shall bear a rateable proportion of the loss accordingly. Every item, if more than one, of the policy shall be separately subject to this condition. हे असे जरी असले तरी हे नियम बंधनकारक नाही कारण स्टॉक जास्त असल्यास मुद्याम कोणीही कमी स्टॉक दाखवीणार नाही व ज्याचा आधीच आग लागुन जळुन नुकसान झाले आहे त्याला हे नियम लावुन फक्त 25 टक्के रक्कम देणे म्हणजे याचेवर अन्याय करणे सारखे होईल. त्यामुळे गैरअर्जदारांनी विमा द्वारे नुकसानीची हमी घेतली असल्याने पुर्ण नुकसान भरपाई देण्यास ते जबाबदार आहेत. अर्जदाराकडे जास्त रक्कमेचा स्टॉक असला असता व सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे नुकसान कमी असले असते तर सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे जेवढे नुकसान झाले तेवढीच रक्कम गैरअर्जदाराने दिले असते. या वेळेस विमा उतरविल्याचे पेक्षा कमी स्टॉक आहे, असे म्हणुन त्याला जास्तीची रक्कम गैरअर्जदाराने नक्कीच दिले नसते. त्यामुळे येथे अर्जदाराच्या मालाचा स्टॉक जास्त आहे व विम्याची रक्कम कमी व त्यातुन अजुन रक्कम कमी न करता विम्याची पुर्ण रक्कम गैरअर्जदार देण्यास जबाबदार आहेत. यात गैरअर्जदारांनी मान्य केलेला स्टॉक हे रु.10,96,884/- चा आहे व विम्याची रक्कम ही रु.9,70,000/- ची आहे, तेंव्हा सहाजीकच अर्जदाराना ही रक्कम मान्य नसल्यामुळे ती घेतली नाही. तेंव्हा सर्व्हेअर रिपोर्टप्रमाणे सर्व्हेअर यांनी HENCE SUM INSURED IS INADEQUATELY COVERED असा उल्लेख केले आहे. परंतु याप्रमाणे पुर्ण कारखान्याचा विमा न पहाता फक्त स्टॉक विषयी विम्याची रक्कम पाहील्यास माल व विमा रक्कम यात रु.1,00,000/- चा फरक आहे व तो असणे शक्य आहे म्हणजे रु.2,00,000/- काढुन रु.10,00,000/- चा विमा केला, असा प्रकार शक्य नाही, ही रक्कम देण्याची गैरअर्जदारानी जाणीवपुर्वक टाळले. शिवाय सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे देखील गैरअर्जदाराने सॉलवेज रु.10,000/- पॉलिसी एक्सेस रु.10,000/- अशा दोन रक्कमा कमी केलेले आहे. यात आगीत सर्व बगॅज सोयाबीन गुळी जळुन खाक झाल्यामुळे राख सॉलवेज रु.10,000/- घेण्याचे काहीही कारण नाही, ती रक्कम गैरअर्जदारांना कमी करता येत नाही. पॉलिसी एक्सेस रु.10,000/- गैरअर्जदार कमी करु शकतो, प्रचंड नुकसान झाल्याच्या कारणांने व पॉलिसी एक्सेस कमी देखील करता येत नाही असे उच्च न्यायालयाचे संकेत आहेत. म्हणुन विम्याची पुर्ण रक्कम गैरअर्जदारांनी अर्जदारास न देऊन सेवेत त्रुटी केली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत अर्जदारास विम्याची रक्कम रु.9,70,000/- व त्यावर दि.05/12/2008 पासुन 9 टक्के व्याजासह पुर्ण रक्कम मिळेपर्यंत द्यावे. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्चा पोटी रु.2,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |