निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/05/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 03/05/2012
तक्रार निकाल दिनांकः- 20/06/2013
कालावधी 01 वर्ष. 01 महिने. 17 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीधर माणिकराव गिराम. अर्जदार
वय 40 वर्षे. धंदा.व्यापार व वाहक. अड.एस.बी.चौधरी.
रा.बोरवंड (खु.) ता.जि.परभणी.
विरुध्द
युनायटेड इंडीया इन्श्युरेन्स कं.लि. गैरअर्जदार.
तर्फे,शाखा व्यवस्थापक. अड.आर.वाय.गायकवाड.
दयावान कॉम्प्लेक्स स्टेशन रोड.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदाराने वाहन अपघात नुकसान भरपाई रु. 30,503/- अर्जदारास देण्याचे नाकारले म्हणून सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार हा बोरवंड (खु.) ता.जि.परभणी येथील रहिवाशी असून तो व्यवसायाने वाहक आहे, व त्याने खाजगी वापरासाठी पॅजो अटो क्रमांक MH 22 H 1094 घेतला होता व सदरचा अटोचा वापर अर्जदार हा खाजगी कामासाठी करीत होता अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने वर उल्लेखलेल्या अटोची गैरअर्जदाराकडे विमा उतरविला ज्याचा पॉलिसी क्रमांक 230601/31/10/01/00001514 असा आहे सदरचा जोखीम कालावधी 19/06/2010 ते 18/06/2011 पर्यंत होता अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 14/11/2010 रोजी अर्जदार आपले काम पूर्ण करुन परभणी येथून बोरवंडकडे जात असतांना वाटेत गुलाब खॉं रोशन खॉं पठाण,शे.मुसा.शे.याकुब हे मित्रत्वाच्या नात्याने गावाकडे जाण्यासाठी अटोत बसले व पुढे गेल्यावर माणिक बन्सीधरराव गिराम हा पण अटोत गावाकडे येण्यासाठी मित्रत्वाच्या नात्याने बसला रात्री 10 च्या सुमारास अटो रेड्डी स्टोन क्रेशर जवळ गेल्यावर रस्त्यावरील खड्डा चुकवित असतांना सदरचा अटो पलटी झाला व अटोतील शे.मुसा शे.याकुब यास डोक्यात जबर मार लागला व इतरांना सुध्दा मार लागला व सदर अपघातामध्ये शे.मुसा शे.याकुब मरण पावला व अपघातात अटोचे प्रचंड नुकसान झाले सदर घटनेची फिर्याद रसुल महंमद खान याने दिली व पोलिसांनी तपास पूर्ण केले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदर अपघाता मध्ये अटोस प्रचंड नुकसान झाल्यामुळे वेगवेगळया ठिकाणी जावुन दुरुस्ती व बॉडीची कामे करावी लागली त्यास एकुण 30,503/- रुपये खर्च लागला त्यामुळे गैरेर्जदाराकडे 30,503/- रुपयेची मागणी केली अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्याने वेळोवेळी गैरअर्जदारांना सदर रक्कमेची तोंडी मागणी केल्यावर गैरअर्जदार यांनी दिनांक 29/09/2011 रोजी पत्र क्रमांक 1049/11-12 पाठवुन अर्जदाराचा दावा अर्ज फेटाळला व त्याचे कारण असे दाखविले की,पॉलिसी ही खाजगी वापरासाठी होती व त्यावेळी तो प्रवाशी वाहतुकासाठी वापरले असे कारण दाखवून मागणी फेटाळून त्रुटीची सेवा दिली अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरचा अटो हा अर्जदार स्वतःच्या खाजगी वापरासाठी वापर करीत होता व अपघाताच्या वेळी आपले परभणीतील काम अटोपून गावाकडे जात असतांना रस्त्यावरील खड्डा चुकवित असतांना पलटी झाला व सदर बाब जी अचानक घडणारी घटना आहे म्हणून प्रत्येक वाहनाचा विमा धारक विमा कंपनीकडे विमा हप्ता भरुन अटोची व इतर जोखमी विमा कंपनीवर टाकत असतो कारण कारण भविष्यात कोणतेही संकट कधी येईल हे सांगता येत नाही म्हणून विमा कंपनी कडून जोखीम विमा कंपनीवर टाकणे हे संमजस पणाचे काम अर्जदाराने केले. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदार यांना असा आदेश द्यावा की, 30,503/- रुपये नुकसान भरपाई अपघाता पासून 18 टक्के व्याजाने द्यावेत व मानसिकत्रासापोटी 25,000/- रुपये व तक्रार अर्जाच्या खर्चासाठी 5,000/- रुपये अर्जदारास द्यावे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे व तसेच नि.क्रमांक 5 वर 10 कागदपत्रांच्या यादीसह 10 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये 5/1 वर टॅक्स इनव्हाईस पावती, 5/2 वर यादव कुशन वर्क्सची पावती, 5/3 वर साई मोटर्सची पावती, 5/4 वर विदर्भ रोड लाईनची पावती, 5/5 वर सहारा अटो मोटर्सची पावती, 5/6 वर पॉलिसी कव्हर नोट 5/7 वर एफ.आय.आर. ची कॉपी, 5/8 वर घटना पंचनामा, 5/9 वर इन्शुरंस कंपनीचे दावा नाकारल्याचे पत्र, 5/10 वर अटोची आर.सी.बुक, कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारानां मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब सादर केलेला आहे. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरचा तक्रार अर्ज हे नियमबाह्य व घटनाबाह्य असून व कालमर्यादे नंतर दाखल केलेले आहे त्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही व तसेच त्याचे म्हणणे आहे की, सदरचा अटो हा अर्जदाराने खाजगी वापरासाठी विकत घेतला होता व त्याचा वापर खाजगी कामासाठी करीता होता हे म्हणणे चुकीचे आहे घटनेच्यावेळी अर्जदार हा सदरचा अटो खाजगी वापरासाठी न वापरता पैसे कमाईसाठी व्यवहारासाठी वापरला होता. व तसेच गैरअर्जदाराने त्याच्याकडे अर्जदाराने सदरची अटोचा विमा उतरवला होता हे मान्य केलेले आहे गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदरची घटना दिवशी अर्जदाराने परभणीकडून त्याच्या गावाकडे जात असतांना मित्रत्वाच्या नात्याने लोक बसविले हे म्हणणे खोटे आहे व त्याचे हे म्हणणे देखील खोटे आहे की, अटो पलटी होवुन लोकांना जबर मार लागला व अटोचे नुकसान झाले व तसेच गैरअर्जदाराने हे देखील अमान्य केले आहे की, अर्जदाराने अटोच्या दुरुस्तीसाठी झालेला 30,503/- खर्च आला हे म्हणणे खोटे आहे तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अपघात झाल्याबरोबर त्याची सुचना विमा कंपनीला द्यायची असते व विमा कंपनी सर्व्हेअर नेमून कशा पध्दतीने नुकसान झाले याचा अभ्यास करते व नंतर अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्तीसाठी गैरअर्जदाराकडून वाहन नेण्याची संमती अर्जदारास दिली जाते व अर्जदाराने सर्व घटना झाल्यानंतर तसेच काही केले नाही व व गैरअर्जदार कंपनीला सदर अपघाता बाबत कोणतीही माहिती दिली नाही जेव्हा उशिरा अर्जदार गैरअर्जदार कंपनीकडे आला तेव्हा गैरअर्जदाराने नेमलेले सर्व्हेअरने सदरील अटोचे पूर्ण देयक 10,250/- आहे असे तपासून नंतर नमुद केले व त्याचे असे म्हणणे आहे की, अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई देतांना टायर, ट्युब, काच, फायबर अशा वस्तुंचा नुकसानी बाबत विमा कंपनी 50 टक्के जबाबदार असते.तसेच वाहनाची वय पाहता सहा महिन्याच्या कालावधी पासून त्याची 5 टक्के किंमत कमी होते व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने पोलिस तपास टिपण मध्ये अटो नुकसानी बद्दल काहीही नमुद केलेले नाही व घटनास्थळ पंचनामामध्ये सुध्दा अटो नुकसानी बाबत काहीही नमुद केलेले नाही त्यामुळे अटो वाहन नुकसानी झाली याबद्दल शंका आहे.म्हणून सदरचा तक्रार अर्ज खोटा व बनावटी आहे व गैरअर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने आपले लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 9 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदारानी अर्जदाराचा पॅजो अटो क्रमांक MH 22 H 1094
च्या अपघाताची नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
नि.क्रमांक 5/10 वर दाखल केलेल्या आर.सी.बुक वरुन अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, तो MH 22 H 1094 या अटोचा मालक होता तसेच नि.क्रमांक 5/6 वर दाखल केलेल्या पॉलिसी शेड्युल वरुन हे सिध्द होते की, दिनांक 14/11/2010 रोजी म्हणजेच घटनेच्या दिवशी पॉलिसी वैध होती जीची वैधता 19/06/2010 ते 18/06/2011 अशी आहे. दिनांक 14/11/2010 रोजी अर्जदाराचा अटोचा (ज्याचा क्रमांक एम.एच.22 एच.1094 आहे) अपघात झाला हि बाब नि.क्रमाक 5/7 वरील दाखला तसेच गैरअर्जदाराने अर्जदारांचा अपघात विमा देण्याचे नाकारले हि बाब नि.क्रमांक 5/9 वर दाखल केलेल्या Repudiation पत्रावरुन सिध्द होते,त्यामये गैरअर्जदारने जे कारण दाखवले आहे ते पुढील प्रमाणे आहे.
II IS PRIVATE CAR POLICY AND AT THE MATERIAL TIME IT WAS USED AS PASSENGER CARRYING PURPOSE WHICH IS BREACH OF POLICY, HENCE CLAIN IS NOT ADMISSIBLE, SO WE CLOASE THE FILE AS NO CLAIM.
वरील नमुद कारण हे गैरअर्जदार सिध्द करु शकला नाही, व अटोत बसलेले व्यक्ती हे पैसे देवुन प्रवास करीत होते, हया बद्दलचा कोठलाही पुरावा मंचासमोर आणला नाही, म्हणून घटनेच्या वेळी अर्जदार हा सदरच्या अटोचा वापर खाजगी वापरासाठी करीत होता हे त्याचे म्हणणे मंचास योग्य वाटते.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्या अटोच्या दुरुस्तीचा खर्च 30,503/- रुपये आला हे मंचास योग्य वाटत नाही. गैरअर्जदाराने आपल्या लेखी जबाबांत असे मान्य केले आहे की, अटोचा खर्च हा सर्व्हेअरच्या म्हणणे नुसार 10,250/- रुपये होतो ते मंचास योग्य वाटते. म्हणून मंचास असे वाटते की, गैरअर्जदाराने सदरचे 10,250/- रुपये अर्जदारास देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे हे सिध्द होते.म्हणून मुद्दा क्रमाक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास
रु. 10,250/- फक्त ( अक्षरी रु. दहाहजार दोनशे पन्नास फक्त) द्यावे.
3 याखेरीज गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिकत्रासापोटी रु.2,000/- फक्त ( अक्षरी
रु.दोनहजार फक्त ) व दाव्याच्या खर्चापोटी रु.2,000/- फक्त ( अक्षरी
रु.दोनहाजर फक्त) द्यावे.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष