जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/194 प्रकरण दाखल तारीख - 11/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 25/11/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. शेषराव पि. रंगनाथ गारकर वय 33 वर्षे, धंदा व्यापार व ड्रायव्हर अर्जदार रा. अनखळी पोटा ता.औंढा जि.हिगोली ह.मु. हनुमानगढ, नांदेड विरुध्द. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार शाखा तारासिंग मार्केट, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भुरे गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.जी.मददे. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञुटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार हा अनखळी पोटा ता.औढा जि.हिंगोली येथील रहीवासी असून हल्ली मूक्काम हनुमानगढ नांदेड येथे राहत असून तो स्वतःचे वाहन चालवून स्वतःचा व कूटूंबाचा उदरनीर्वाळ करतो. गैरअर्जदार इन्शुरन्स कंपनी यांचेकडे अर्जदाराने स्वतःचे वाहन ट्रक क्र.एम.एच.-38/डि-0038 हा टाटा कंपनीचा ट्रक आरटीओ कार्यालय हिंगोली येथे रजिस्ट्रर आहे. दि.18.5.2006 रोजी अनखळी पोटा हून वसमत येथे स्वतःच्या ट्रक मध्ये कडबा घेऊन जात असताना ते कोठा रोडवरील इलेक्ट्रीकल विद्यूत खांबाच्या तारेचा स्पर्श झाला व शॉर्टसर्किट झाल्यामुळै थीणग्या अर्जदाराच्या ट्रकवर पडून ट्रक संपूर्णतः जळाला. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून विमा उतरविलेला असल्यामुळे त्यांचा पाठपूरावा आजपर्यत केला तरी अर्जदारास गैरअर्जदार यांचेकडून कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार मंचात दाखल केली. अर्जदाराचा ट्रक जळाला तेव्हा पोलिस स्टेशन वसमत येथे अर्जदाराने अपघात जळीत नंबर 5/2006 प्रमाणे घटनास्थळ पंचनामा केला व तक्रार नोंदविली. दि.13.9.2005 ते 12.9.2006 या कालावधीसाठी गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून फिस भरुन घेऊन अर्जदाराच्या हक्कात त्यांचे वाहनाची पॉलिसी उतरविलेली होती. घडलेल्या घटनेची माहीती अर्जदाराने गैरअर्जदार यांना दिली. त्यानंतर गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर व लॉस असेसर यांची नेमणूक केली. त्यांनी वाहनाची तपासणी केली तसेच घटनास्थळी येऊन पाहणी केली. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे वाहनाच्या दूरुस्तीसाठी लागणारे इस्टीमेंट, क्लेम फॉर्म, पोलिस पेपर्स, आर सी बूक, इन्शुरन्स कव्हर नोट, हे सर्वर कागदपञ सत्यप्रतीमध्ये दाखल केले. अर्जदाराने सर्वर कागदपञ दिल्यानंतर गैरअर्जदार यांचेकडे अपघात विमा दाव्याची रक्कम मागणी केली परंतु गैरअर्जदार यांनी कोणताही विमा दावा आजपर्यत मजूर केला नाही. 2006 पासून गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास चकरा मारावयास लावल्या परंतु आजपर्यत दावा मंजूर केला नाही म्हणून अर्जदाराने दि.14.07.2010 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली. या नोटीसचे उत्तर म्हणून गैरअर्जदार यांनी त्यांना कोणतीही कागदपञ मिळाले नाही असे उत्तर दिले. सर्व सत्य प्रती देऊनही कोणतीही कारवाठ्र केली नाही. अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदार यांनी मूदतीत मंजूर न केल्यामूळे अपघात झाल्यापासून आजपर्यत अर्जदाराचे जवळपास रु.2,50,000/- चे उत्पन्न बूडाले त्यामूळे अर्जदाराला नूकसान भरर्पा रक्कमेवर 18 टकके व्याजाने रु.2,50,000/- रक्कम मागितली आहे तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.10,000/- व विमा अपघात रक्कम रु.,2,00,000/- ही मागणी केली आहे, अर्जदाराने आपल्या तक्रारी सोबत शपथपञ दाखल केले, तसेच पोलिसांना दिलेली फीर्याद घटनास्थळ पंचनामा आर सी बूक, टॅक्स पावती, विटनेश प्रमाणपञ, इन्शूरन्स कव्हर नोट, तसेच वाहन चालविण्याचा परवाना, अग्नीशामक दलाचे प्रमाणपञ, तसेच कायदेशीर नोटीस, हे सर्व कागदपञ दाखल केले. गैरअर्जदार हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार हे कडबा घेऊन कोठा येथे जात नव्हते, व कोठा रोडवर इलेक्ट्रीक विद्यूत खांबाला अचानकपणे शॉर्टसर्किट झाला नव्हता व शॉर्ट सर्किटच्या ठीणग्या अर्जदाराच्या ट्रकवर पडल्या नव्हत्या व ट्रकही जळून खाक झालेला नव्हता. सदर घटनेची नोंद पोलिसांनी केलेली नव्हती व कोणत्याही प्रकारचा पंचनामा झालेला नव्हता. उलटपक्षी दि.18.5.2006 रोजी नगर परीषद,वसमत यांचे प्रमाणपञ, गाडीला लागलेली आग विझविण्यासाठी लागणारे पाणी हे ही कागदपञ त्यांनी दाखल केलेले नाहीत. तसेच सदर विमा क्लेम सेंटलमेंट करण्यासाठी जो विलंब झाला त्यासाठी अर्जदार स्वतः जबाबदार आहेत. त्यांनी स्वतः कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार यांचे विरुध्द खर्चासह फेटाळण्यात यावा. गैरअर्जदार यांनी शपथपञ दाखल केले व आपला यूक्तीवाद दाखल केला आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ तपासले असता खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारास नूकसान भरपाई देण्यास बांधील आहेत काय होय. 3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 व 2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे काढलेल्या पॉलिसी संदर्भात उभयपक्षांना कोणताही वाद नाही म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. अर्जदाराच्या गाडीचा अपघात दि.18.05.2006 रोजी कडबा घेऊन जात असताना वसमत ते कोठा रोडवर इलेक्ट्रीकल खांबाच्या तारेस शॉटसर्कीट झाल्यामूळे ठिणग्या ट्रकवर पडून ट्रक संपूर्णतः जळून खाक झाला. अर्जदाराने वसमत पोलिस स्टेशनला 5/2006 जळीत नंबर असलेली तक्रार नोंदवून घटनास्थळ पंचनामा केलेला होता. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या हक्कात वाहनाची अपघात पॉलिसी करुन दिलेला दिनांक ही दि.13.9.2005 ते ते 12.09.2006 या कालावधीची असल्यामुळे सदरचा अपघात हा विमा कालावधीमध्येच आहे हे सिध्द होते. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे सदरचा अपघात हा शॉर्टसर्कीट मूळे झालेला नव्हता आणि सदरचा ट्रक पूर्णतः जळून खाक झाला नव्हता. तसेच त्यांचे म्हणण्याप्रमाणे दि.18.5.2006 रोजी नगर परीषद वसमत यांचे गाडीला आग विझविण्यासाठी भरणा केलेली पाणी कर पावती दाखल केलेली आहे. म्हणून गैरअर्जदार यांचे अर्जदाराचे नूकसान भरपाई देण्याची जिम्मेदारी नाही हे म्हणणे तितकेसे योग्य वाटत नाही. अर्जदाराचा ट्रक जरी शॉर्ट सर्कीट मूळे जळाला नाही असे जरी गृहीत धरले तरी कोणत्या तरी घटनेने अर्जदाराच्या ट्रकला आग लागली होती व ती विझविण्यासाठी नगर परीषद वसमत यांचेकडून पाणी कर भरणा केलेली पावती असू शकते. अर्जदाराच्या ट्रकचा जेव्हा विमा पॉलिसी काढलेली आहे व सदरचा अपघात त्यांच कालावधीतील आहे असे असल्यानंतर अर्जदाराच्या कोणत्याही कारणामूळे अपघात झाला यांला फारसे महत्व राहत नाही. उलटपक्षी गैरअर्जदार यांनी जळीत विमा दावा रक्कम देणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर यांची नेमणूक केली होती. तसेच दि.20.1.2006 रोजी श्री.पी.के.राठी यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. तो पाहता अर्जदाराच्या गाडीचे नूकसान हे त्यांनी जवळपास रु.1,77,398/- नेट असेंसड लॉस असे काढलेले आहे. त्यानंतर श्री.एम.आर. तोतला यांचा व्हॅल्यूयेशन रिपोर्ट दि.31.10.2006 रोजीचे पाहिले असता त्यांनी नेट लॉस बेसिस वीथ आर सी अलाऊ रु.1,14,000/- व नेट लायबलिटी वीदाऊट आर सी टू बी कॅन्संल्ड अशा अवस्थेत रु.1,34,000/-व्हॅल्यूऐशन काढलेले आहे. गैरअर्जदार यांनी नियूक्त केलेले सर्व्हेअरने सर्व्हे केल्यानंतर काढून दिलेल्या रक्कमेवर गैरअर्जदार यांनी विश्वास ठेऊ नये हे योग्य वाटत नाही. तसेच गैरअर्जदार यांनी दिलेल्या लेखी यूक्तीवादामध्ये मूददा क्र.4 मध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की, सर्व्हेअरच्या व व्हॅल्यूऐशन रिपोर्ट प्रमाणे सदर गाडीचे एकूण रु.1,14,000/- इतकेच नूकसान झालेले होते. त्या सोबत अर्जदाराने सदर रक्कम रु.1,14,000/- स्विकारण्याची तयारी सूध्दा पञाद्वारे दर्शविली होती सदरचे पञ दि.13.11.2006 रोजी दिलेले होते. परंतु अर्जदाराने सर्व कागदपञ दाखल न केल्यामूळे गैरअर्जदार यांनी सदरचा क्लेम रदद केला. अर्जदाराचा क्लेम रदद करुन गैरअर्जदार यांनी कोणतीही चूक केलेली नाही व सेवेत ञूटी केली नाही असे गैरअर्जदार म्हणतात. नियूक्ती नंतर सर्व्हेअरनी दिलेला रिपोर्ट हे ग्राहय धरणे हे आवश्यक असते त्यानंतर कोणते कागदपञ दाखल करण्याची आवश्यकता होती अशा प्रकारचे कोणतेही पञ गैरअर्जदार यांनी मंचासमोर दाखल केलेले नाही. त्यामूळै कशाचे आधारावर अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदार यांनी रदद केला हे कारण समजू शकले नाही. दि.18.5.2006 रोजी घडलेल्या अपघाताची विमा पॉलिसी काढूनही आजपर्यत अर्जदारास कोणतीही रक्कम मिळाली नाही ही सेवेतील ञूटीच म्हणता येईल. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे रु.2,00,000/- पर्यतची जिम्मेदारी पॉलिसी अंतर्गत घेतली होती. रु.1,77,398/- हया असेंस केलेल्या रक्कमेनंतर व्हॅल्यूऐशन रिपोर्ट वेगळा काय होता आणि त्यामध्ये काढलेली रक्कम रु.1,14,000/- वीथ आर सी अलाऊ, रु.,1,34,000/- वीथ आर सी कॅन्सल या बददल कूठे ऊहापोह केलेला नाही. अर्जदाराने दि.13.11.2006 रोजी गैरअर्जदार यांना दिलेले पञ मंचासमोर दाखल केलेले आहे. त्यानंतर तरी गैरअर्जदारयांनी अर्जदारास कमीत कमी रु.1,14,000/- अपघात विमा रक्कम म्हणून देणे आवश्यक होते. म्हणून रु.1,14,000/- वर दि.15.8.2006 पासून 9 टक्के व्याज दराने एक महिन्याचे आंत अर्जदारास दयावेत तसेच नूकसान भरपाई व मानसिक ञासाबददल रु.20,000/- व दावा खर्च म्हणून रु,5,000/- एक महिन्याचे आंत दयावेत असे आदेश हे मंच पारीत करीत आहे. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून एक महिन्याचे आंत अर्जदार यांना रु.1,14,000/- व त्यावर दि.15.8.2006 पासून 9 टक्के व्याजासहीत पूर्ण रक्कम दयावी. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना एक महिन्याचे आंत नूकसान भरपाई व मानसिक ञासाबददल रु.20,000/- व दावा खर्च म्हणून रु,5,000/-दयावेत. 4. वरील रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास संपूर्ण रक्कमेवर 10 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत दयावेत लागेल. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. 5. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |