जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –164/2011 तक्रार दाखल तारीख –02/11/2011
वच्छलाबाई भ्र.कुंडलिक धुमाळ
वय 45 वर्षे धंदा घरकाम .तक्रारदार
रा.तेलगांव ता.धारुर जि.बीड
विरुध्द
1. शाखा व्यवस्थापक
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
मंडळ कार्यालय क्रं.2, अबिका हाऊस
शंकर नगर चौक, नागपुर – 440 ..सामनेवाला
2. विभाग प्रमुख
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
शॉप नं.29, राज अपार्टमेंट, सिडको
औरंगाबाद.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.व्ही.बी.वडमारे
सामनेवाले क्र.1 व 2 तर्फे :- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदारांनी सदरची तक्रार दि.02.11.2011 रोजी दाखल केली. सदर तक्रारीत तक्रारदारांनी योग्य ते पक्षकार केले नाही त्यासाठी युक्तीवादासाठी म्हणून दि.29.11.2011 रोजी देण्यात आली.
तक्रारदाराची त्रकार ही शासनाने घेतलेल्या शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत आहे व या संदर्भात तक्रारीतील कागदपत्रे पाहता तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारदारांना दि.17/23.08.2011 रोजीच्या पत्रान्वये त्यांचा प्रस्ताव त्यांचे स्तरावरुन तक्रारदारांना परत पाठविला आहे. या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी पार्टी नाही.
तक्रारदाराचा वरील प्राथमिक मुददा बाबत युक्तीवाद नाही व त्या बाबत तक्रारदारांनी कोणतीही तजविज केलेली नाही. प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांचे स्तरावरुन परत करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरची तक्रार प्राथमिक मुददयावरच निकाली काढणे उचित होईल असे न्यायमचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार निकाली काढण्यात येते.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड.