कच्चे रजि.नं.159/2008 ग्राहक तक्रार क्रमांकः-449/2008 तक्रार दाखल दिनांकः-12/09/2008 (अडमशिन स्टेज) निकाल तारीखः-24/10/2008 कालावधीः-0वर्ष01महिना12दिवस
समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे. श्री.इंद्र सिंह जी. देवडा राहणार-ए,ओन हाऊस,साईकृपा हॉटेल जवळ, घोडबंदर रोड,ठाणे ....तक्रारकर्ता विरुध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., 17,स्टार ट्रेड सेंटर,सोडावाला लेन, मांडपेश्वर रोड,बोरीवली (प), मुंबई 400 092 ...विरुध्दपक्ष गणपुर्तीः-1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य 3.सौ.भावना पिसाळ, मा.सदस्या निकालपत्र (पारित दिनांकः-24/10/2008) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेव्दारे आदेशः- सदर तक्रार तक्रारदार यांनी कलम 12नुसार दाखल केली आहे. त्याचे कथन पुढील प्रमाणेः- 1)तक्रारदार हे ट्रक रजिस्टर नं.एमएच-04/एफ-9857, टाटा 1312 मेक,1996 मॉडेल या ट्रकवर विरुध्दपक्ष यांचेकडून विमा उतरविला होता. दि.04/09/2003 रोजी 7.30 वाजता 2/- चोरीला गेला. म्हणून दि.21/09/003 रोजी एफ. आय.आर.I-116/2003 ने दाखल केले होते. काशिमिरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिष्टर होऊन चार्जशीट नं.140/2003 हे दाखल झाले होते. व दि.13/08/2004 रोजी ठाणे ज्युडीशिअल मॅजीस्ट्रेट यांचेपुढे फिर्याद केली आहे. तक्रारदार यांनी या समरी केस मधील दि.04/07/2008 रोजी फौजदारी न्यायालयाची नोटीस आल्याने सदरची तक्रार नुकसान भरपाई मिळण्याकरीता दाखल केली आहे. म्हणून सदरची तक्रार नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दि.16/01/2008 रोजी अर्जास कारण घडल्याने दाखल केली आहे. 2)तक्रारदार यांनी तक्रार दाखल करतांना तक्रारीसह नि.2 वर अफिडेव्हीट व नि.3 वर कागदपत्रांचे यादीसह कागदपत्रे दाखल केली आहेत. परंतु तक्रारदार यांचा ट्रक हा दि.4/9/2003 रोजी चोरीस गेल्याबाबत त्या ट्रकवरील विमा पॉलीसीप्रमाणे दावा रक्कम रुपये 3,00,000/- मिळण्याकरता सदरची तक्रार दाखल केली आहे व त्यामध्ये तक्रारदार यांनी 4/7/2008 रोजी फौजदारी न्यायालयाकडून नोटीस मिळाल्याची माहिती झाली. हा मुद्दा गृहीत धरुन अर्जास कारण ज्या रोजी घडले असे नमूद केले आहे. परंतु प्रत्यक्षात मुळ तक्रार घटना 4/9/2003 रोजी घडलेली आहे. ट्रक चोरीस गेल्यानंतर दोन दिवसांचे आत विरुध्दपक्षकार यांचेकडून विमा रक्कम मिळण्याकरीता मंचात दावा दाखल करणे आवश्यक होते. परंतु मुदतीत तक्रार दाखल न केल्याने सदर तक्रार दाखल करुन मागणी न्यायोचित,विधीयुक्त व संयुक्तीक नाही. तक्रारदार यांना फौजदारी न्यायालयाकडे 16/01/2008 रोजी समजले व 4/7/2008 रोजी नोटीस 3/- पोहचली ते अर्जास कारण गृहीत धरता येणार नाही. म्हणून सदरची तक्रार मुदत बाहय आहे म्हणून पुढील आदेश करण्यात येत आहे. आदेश 1)तक्रारदार यांची तक्रार मंचापुढे चालण्यास पात्र नसल्याने सदरची तक्रार प्राथमिक मुद्दयावरच अडमिशन स्टेजला दाखल करुन घेण्यास नामंजूर केली आहे. 2)तक्रारकर्ता यांनी तक्रार दाखल करतेवेळी तक्रारीसोबत मंचाचे नियमानुसार डी.डी.व्दारे भरणा केलेले शुल्क हे शासनाकडे जमा करण्यात येत आहे. 3)सदर आदेशाची प्रत तक्रारदार यांना निःशुल्क देण्यात यावी. 4)तक्रारदार यांनी मा.सदस्य तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात. दिनांकः-24/10/2008 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे. |