निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 23.04.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 05.05.2010 तक्रार निकाल दिनांकः- 20.08.2010 कालावधी 3 महिने 11दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. राम पिता माणिकराव बचाटे अर्जदार वय 30 वर्षे धंदा ड्रायव्हर रा.वडगांव स्टेशन, ( अड डि.यू.दराडे ) ता.सोनपेठ जि.परभणी. विरुध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमीटेड गैरअर्जदार मार्फत ब्रॅच मॅनेजर दयावान कॉम्पलेक्स, ( अड गोपाल दोडीया ) स्टेशन रोड, परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या ) अर्जदाराच्या क्षतीग्रस्त वाहनाचा विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिल्याबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या मालकीची APC Auto क्रमांक MH 22 F 2188 असून गैरअर्जदाराकडून वाहनाचा विमा घेतलेला आहे. ज्याचा पॉलीसी क्रमांक 230601/31/07/01/00013264 असून दिनांक 09.02.2008 ते 08.02.2009 या कालावधीसाठी रुपये 100000/- किंमतीचा आहे. दिनांक 27.12.2008 रोजी अर्जदार हा त्याच्या नातेवाइकांना भेटायला पानगांव येथे त्याच्या अपे आटो ने गेला होता त्या दिवशी दु. 4.30 वाजता पानगांव येथे दोन विरुध्द पक्षात दंगल उदभवली व त्यातील एका पक्षाच्या युवकांनी दगडफेक करत दुकानाना व वाहनाना आगी लावयला सुरुवात केली तेंव्हा अर्जदाराची रिक्षा त्याच्या मित्राच्या घराबाहेर उभी होती तिचेही आगीत नुकसान झाले. याबाबत रेणापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोदवण्यात आला. अर्जदाराने या घटनेची माहिती गैरअर्जदाराना दिली तेंव्हा गैरअर्जदाराने सर्व्हेव्दारे वाहनाची पाहणी केली नंतर सहारा मोटार्स परभणी येथे वाहन दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले व अर्जदाराने रुपये 59110/- देवून वाहन दुरुस्त करुन घेतले व गैरअर्जदारांकडे दुरुस्तीची व स्पेअर पार्टसची बीले अर्जदाराने पाठवली. दिनांक 08.10.2009 रोजी अर्जदाराला गैरअर्जदाराकडून विमा दावा फेटाळल्याचे पत्र आले. अर्जदार हा घटना घडली तेंव्हा वाहन स्वतःसाठी वापरत होता कोणीही प्रवासी घेवून तो चाललेला नव्हता. त्यामुळे रोड ट्रान्सपोर्ट अथॉरीटी ने दिलेल्या परवान्याचे त्याने उल्लघन केले नव्हते. गैरअर्जदाराने बेकायदेशीरीरत्या अर्जदाराचा विमा दावा फेटाळून अर्जदाराला मानसिक त्रास दिला आहे म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन विमा दाव्याचे रुपये 59110/- द.सा.द.शे. 12 % व्याजाने दिनांक 03.01.2009 पासून मिळावेत व मानसिक त्रासापोटी रुपये 10000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 3000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, एफ.आय.आर कॉपी, घटनास्थळ पंचनामा, विमा दावा फेटाळल्याचे पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केली आहे. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबासाबत त्यानी अर्जदाराच्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले व त्यावरुन अर्जाराने आर.टी.ओ. ने दिलेल्या परमिटप्रमाणे गंगाखेड व सोनपेठ तालुकयातच वाहन वापरावयास पाहीजे होते परंतू त्याने पानगांव ता. रेणापूर जि. लातूर येथे वाहन नेवून पॉलीसीचा फंडामेंडल ब्रीच केलेला आहे म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा फेटाळलेला आहे व अर्जदाराला कोणतीही त्रूटीची सेवा दिलेली नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्यात यावी अशी गैरअर्जदाराने विनंती केली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, पॉलीसीची प्रत, आर.टी.ओ. चे परमिटची प्रत., सर्व्हे रिपोर्ट इत्यादी कागदपत्र दाखल केले आहेत. तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रे अर्जदार व गैरअर्जदारांच्या वकीलांच्या युक्तिवादानंतर तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराच्या क्षतीग्रस्त वाहनाचा विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने अर्जदारास त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने त्याच्या मालकीच्या अपे अटो क्रमांक एम.एच.22 एफ 2188 चा गैरअर्जदाराकडून दिनांक 09.02.2008 ते दिनांक 08.02.2009 या कालावधीसाठी रुपये 100000/- ची पॉलीसी क्रमांक 230601/31/07/01/00013264 घेतलेली होती ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराच्या वाहनाचे पानगांव ता.रेणापूर जि.लातूर येथे दंगलीच्या दरम्यान नुकसान झाले हे नि. 4/2 वरील पहिली खबर व नि.4/3 वरील घटनास्थळ पंचनामा यावरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा फेटाळल्याचे नि. 4/4 वरील पत्रात अर्जदाराला विमा दावा फेटाळल्याचे कारण अर्जदाराला आर.टी.ओ ने दिलेले परमिट हे गंगाखेड आणि सोनपेठ येथे प्रवासी वाहतुकीसाठीचे आहे व अर्जदाराच्या वाहनाचा अपघात पानगांव येथे झालेला आहे. गैरअर्जदारानी नि. 14/2 वर दाखल केलेले आर.टी.ओ ने दिलेलेपरमिट पाहता हे 3 + 1 प्रवासी वाहतुकीचे गंगाखेड आणि सोनपेठ करता आहे. अर्जदाराने अपघातग्रस्त वाहन स्वतःच्या उपयोगासाठी पानगांव येथे नेले होते असे त्याने शपथेवर सांगितले आहे. अर्जदाराच्या रिक्षामध्ये प्रवासी वाहतूक करत होते व त्यासाठी ती रीक्षा पानगांव येथे गेली होती याबाबत कोणताही पुरावा तक्रारीत नाही पुराव्यात दाखल एफ.आय.आर व घटनास्थळ पंचनामा यामध्येही रीक्षात प्रवासी होते असा उल्लेख नाही तसेच त्या रीक्षात जर प्रवासी असतील तर त्या प्रवाशांचे शपथपत्र तक्रारीत दाखल नाही त्यामुळे अर्जदाराने प्रवासी वाहतूकीसाठी सोनपेठ आणि गंगाखेड या विभागासाठी असलेल्या आर.टी.ओ. च्या परवान्यातील अटीचा भंग केला असे म्हणता येणार नाही त्यामुळे अर्जदाराचा विमा दावा विनाकारण फेटाळून गैरअर्जदाराने त्याला त्रूटीची सेवा दिली आहे असे आम्हास वाटते. अर्जदाराच्या क्षतिग्रस्त वाहनाचा गैरअर्जदारांच्या सर्व्हेरिपोर्टर श्री.एस.पी. परळीकर यानी फायनल सर्व्हे रिपोर्ट दिलेला आहे ( नि.14/4) तक्रार अर्जातून अर्जदाराने वाहनाच्या दुरुस्तीचे रुपये 59110/- दिनांक 03.01.2009 पासून द.सा.द.शे 12 % व्याजाने मिळावेत अशी मागणी केली असली तरी श्री.एस.पी.परळीकर यानी त्यांच्या फायनल सर्व्हे रिपोर्ट ( नि.14/4) मध्ये रुपये 9990/- चे मुल्याकन केले आहे त्यानी त्यांच्या सर्व्हे रिपोर्ट दिनांक 23.03.2009 रोजी दिलेला आहे म्हणजे एप्रील 2009 पर्यंत अर्जदारास नुकसान भरपाई मिळायला हवी होती त्यामुळे त्यापुढील विलांबाचे व्याज ही मिळणेस अर्जदार पात्र ठरतो. म्हणून मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार विमा कंपनीनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत अर्जदारास त्याच्या वाहनाची नुकसान भरपाई रुपये 9990/- द.सा.द.शे 9 % व्याज दराने 1 एप्रील 2009 पासून संपूर्ण रक्कम देइपर्यंतच्या तारखेपर्यंत व्याजासह दयावेत. . 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत दयावेत. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |