Maharashtra

Nagpur

CC/182/2019

DILIP KANHOBAJI KAREKAR - Complainant(s)

Versus

UNITED INDIA INSURANCE COMPANY LTD. THROUGH MANAGER - Opp.Party(s)

ADV D. N. MATHUR

21 Jan 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/182/2019
( Date of Filing : 14 Mar 2019 )
 
1. DILIP KANHOBAJI KAREKAR
16/3, UJJWAL NAGAR, WARDHA ROAD, NAGPUR 440025
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. UNITED INDIA INSURANCE COMPANY LTD. THROUGH MANAGER
AMBIKA HOUSE, PLOT NO 19, DHARAMPETH EXTENTION, SHANKAR NAGAR, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV D. N. MATHUR, Advocate for the Complainant 1
 ADV. AMAL ROHILLA, Advocate for the Opp. Party 1
Dated : 21 Jan 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,   तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन  क्रं. MH 34, AM 3600 चा विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून पॉलिसी क्रं. 2302083998P103927376 अन्‍वये विमाकृत केले होते. तक्रारकर्त्‍याजवळ वाहन चालविण्‍याचा अधिकृत परवाना असून त्‍याचा क्रं.  MH312010092485 असा आहे. सदरचा परवाना दि. 18.09.2015 पासून ते 17.09.2020 पर्यंत वैध आहे. तक्रारकर्ता स्‍वतःच्‍या वाहनाने दि. 03.12.2018 रोजी कुटुंबासह नागपूर वरुन चंद्रपूरला जात असतांना त्‍याच्‍या वाहनाचे बुटीबोरीजवळ मोठा अपघात झाला असून त्‍यात त्‍याच्‍या वाहनाचे नुकसान झाले. तक्रारकर्त्‍याला वाहन दुरुस्‍तीकरिता रुपये 62,003/- इतका खर्च आला. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन सिकवेल मोटर्स प्रा. लि. यांच्‍याकडे दुरुस्‍त केले. त्‍यांनतर तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या वाहनाचा विमा दावा आवश्‍यक दस्‍तावेजासह विरुध्‍द पक्षाकडे दि. 04.12.2018 रोजी सादर केला. विरुध्‍द पक्षाने दि. 18.12.2018 ला त.क.ला पत्र पाठवून वाहन परवान्‍याची मागणी केली असता त्‍यानुसार त.क.ने वाहन परवानाची पाठविली. विरुध्‍द पक्षाने संदर्भ पत्र क्रं. 2302083118 C050094001 दि. 14.01.2019 अन्‍वये तक्रारकर्त्‍याला पत्र पाठवून खालील कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍यात येत असल्‍याचे कळविले.
    1. आपल्‍याला पत्र / पुनः पत्र पाठवून देखील आपण आवश्‍यक ती कागदपत्र सादर केली नाही.
    2. आपण आपला अर्ज मागे घेत आहोत असे तारीख नसलेले पत्र अर्जदाराने पाठविलेले आहे.
    3. आपली नस्‍ती आपले वाहन परवाना ट्रान्‍स्‍पोर्ट या श्रेणीतील दि. 30.08.2018 ला कालबाहय झाले असल्‍यामुळे आपली नस्‍ती बंद करण्‍यात येत आहे असे कळविले आहे.

तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष तक्रार दाखल केली आहे. 

  1.        तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली की, तक्रारकर्त्‍याने वाहन दुरुस्‍ती पोटी अदा केलेली रक्‍कम रुपये 62,003/- विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला देण्‍याचा आदेश द्यावा.  तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश व्‍हावा.
  2.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाब नमूद केले की, त्‍याने तक्रारकर्त्‍याचे कडून वाहन क्रं. MH 34, AM 3600.याचा दिनांक 30.06.2018 ते 29.06.2019 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 2302083998P103927376 अन्‍वये विमाकृत करुन दिले होते. तक्रारकर्ता दि.03.12.2018 रोजी त्‍याच्‍या वाहनाने नागपूर वरुन चंद्रपूरला जात असतांना बुटीबोरीजवळ अपघात झाल्‍याने त्‍याच्‍या वाहनाचे नुकसान झाले. सिकवेल मोटर्स प्रा.लि. कामठी रोड नागपूर यांचे रिटेल / टॅक्‍स इन्‍व्‍हाईस दि. 15.12.2018 रुपये 62,003/- नुसार तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचे नुकसान झाले ते तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष दाखल केलेले आहे.
  3.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष दाखल केलेल्‍या तक्रारीमध्‍ये नमूद केलेले वाहन क्रं. व गाडीचा विमा उतरविलेल्‍या पॉलिसीमध्‍ये नमूद असलेल्‍या वाहन क्रमांकामध्‍ये  फरक आहे. तक्रारीमध्‍ये नमूद वाहनाचा क्रमांक MH 34, AM 3700 हा आहे व विमा पॉलिसी मध्‍ये नमूद वाहनाचा क्रमांक MH 34, AM 3600. असा आहे. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा परवाना दर्शवितो की, तक्रारकर्त्‍याचया वाहन परवान्‍याचे दि. 20.12.2018 ला नुतनीकरण करण्‍यात आले व तो दि. 19.12.2021 पर्यंत वैध आहे. त्‍यामुळे अपघाताच्‍या दिवशी तक्रारकर्त्‍याजवळ वैध परवाना नव्‍हता. तसेच तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक दस्‍तावेज दाखल केलेले नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारण्‍यात आला.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कुठल्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिली नसल्‍याने प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

 

  1.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ    होय
  3. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

  निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत- तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून कडून वाहन क्रं. MH 34, AM 3600 हया वाहनाचा दिनांक 30.06.2018 ते 29.06.2019 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 2302083998P103927376 अन्‍वये विमाकृत केले होते, याबाबत उभय पक्षात वाद नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याच्‍या विमाकृत वाहनाचा दि. 03.12.2018 ला तक्रारकर्ता नागपूर वरुन चंद्रपूरला जात असतांना बुटीबोरीजवळ अपघात झाला. तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याजवळ वाहन परवाना (Non Transport) होता व तो दिनांक 17.09.2020 पर्यंत वैध होता. दिनांक 20.12.2018 रोजी तक्रारकर्त्‍याचे ट्रान्‍स्‍पोर्ट वाहनाबाबतचे नुतनीकरण हे करण्‍यात आले आणि ट्रान्‍स्‍पोर्ट वाहनाबाबतचा वाहन परवाना हा दि. 19.12.2021 पर्यंत नुतनीकरण करण्‍यात आला होता. परंतु तक्रारकर्त्‍याकडे दि. 20.10.2015 पासून दि. 17.09.2020 पर्यंत non transport या वाहनाचा परवाना वैध होता. सबब विरुध्‍द पक्ष यांनी वर्तमान प्रकरणात चुकिचा बचाव घेतलेला आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा प्रस्‍तावा सोबत संपूर्ण आवश्‍यक दस्‍तावेज सादर करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याजवळ अपघाताच्‍या दिवशी वैध परवाना नव्‍हता हे चुकिचे कारण सांगून विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केले असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.       

करिता खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विमाकृत वाहन दुरुस्‍तीचा खर्च रुपये 62,003/- तक्रारकर्त्‍याला त्‍वरित अदा करावा व सदरच्‍या रक्‍कमेवर दि. 18.12.2018 पासून ते रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याज  तक्रारकर्त्‍याला अदा करावा.  
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व  तक्रारीचा खर्च म्‍हणून  रुपये 10,000/- द्यावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.