जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/309 प्रकरण दाखल तारीख - 22/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 19/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या दत्ता पि.गोविंदराव कदम, वय वर्षे 45, धंदा व्यापार रा.वाडी पुयड ता. जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द 1. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. शाखा तारासिंह मार्केट,नांदेड, गैरअर्जदार 2. शाखा व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. 10, अरिहंत, शिवाजी सर्कल,महेशनगर, मालेगांव .जि.नाशिक. 3. युनायटेड इंडिया इंशुरन्स कं.लि. मार्फत – मुख्य शाखा व्यवस्थापक, अंबिका चौक,धरमपेठ,नागपुर. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे वकील - अड.एस.जी.मडडे निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार यांनी शेख इस्माईल शेख अब्बास यांच्याकडुन तक्रारीतील चोरीला गेलेले वाहन क्र. एम.एच.23-6279 हे वाहन टिप्पर खरेदी केले ज्याची वाहन सुरक्षा पॉलिसी पुर्वीचे मालक यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांच्या कार्यालयातुन काढली ज्याचा पॉलिसी क्र.162301/31/08/01/00001835 असा असून रु.4,00,000/- च्या विम्याकरीता सदरची पॉलिसी काढण्यात आली. अचानक दि.08/02/2009 ते 09/02/2009 च्या रात्रीच्या दरम्यान सदर वाहन अज्ञात चोरांनी चोरुन नेले, ज्याबद्यल दि.16/02/2009 रोजी सदरचे टिप्पर चोरी गेल्याबद्यल लेखी फिर्याद दिली. ज्याबद्यलचा गुन्हा क्र. भा.द.वि.कलम 379 खाली 32/2009 चे दोषारोप पत्र क्र.37/2009 पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या मार्फत दाखल करण्यात आला. दि.04/03/2009 रोजी गैरअर्जदार यांच्या कार्यालयामध्ये विम्याचा लाभ मिळण्याकरीता लेखी अर्ज घेवून गेला व झालेली हकीकत गैरअर्जदारांना सांगीततले, अर्जदारांचा लेखी अर्ज स्विकारुनही आजतागत समाधानकारक प्रतिउत्तर दिले नाही. अर्जदाराने अनेक वेळास लेखी अर्ज व तोंडी विनंत्या व कळकळीची विनंती व सहानुभूतीपुर्वक आलेल्या भीषन परिस्थीतीत सहकार्याची भावना ठेवण्याविषयी प्रचंड विनंत्या केल्या परंतु गैरअर्जदार हे अर्जदार यांची कैफियत ऐकण्यास व त्यावर विचार करण्यास कुठल्याच प्रकारे तयार नाहीत. गैरअर्जदार हे ग्राहकांना विमा पॉलिसी काढण्यासाठी आकर्षीत करतात व सुरुवातीस प्रचंड प्रलोभन व हमी देतात परंतु संकट काळात जबाबदारीची वेळ आली की, त्यांच्या मनमानी कारभारात अर्जदारा सारख्या ग्राहकांची पिळवणुक करतात. अर्जदार यांनी गाडी विकत घेऊन स्वतःच्या नांवे नांदेड येथे ती ट्रान्सफर पॉलिसी करुन घेतली आहे. गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराचे वाहन क्र. एम.एच.23-6-279 बाबत उतरवीलेली विमा रु.4,00,000/- व्याजासह देण्याचे आदेश करावेत. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 हे वकीला मार्फत हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे वकीला मार्फत हजर झाले, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदारास प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करण्याचा कोणताही कायद्याने अधिकार नाही. अधिकार नसतांनासुध्दा प्रस्तुत तक्रारअर्ज मान्यवर न्यायमंचासमोर दाखल करुन मंचाची दिशाभूल करीत आहे, जे की, कायद्याने चुक असल्यामुळे तक्रारअर्ज प्रतीवादी क्र. 1 ते 3 यांच्या विरुध्द फेटाळण्यास योग्य आहे. अर्जदार यांनी खोटा दाववा दाखल करुन मान्यवर मंचाचा व प्रतीवादी क्र. 1 ते 3 यांचा अमूल्य वेळ,पैसा व ऊर्जेचे नाश करीत आहेत. करीता अर्जदारास दंड म्हणुन रु.25,000/- लावण्यात यावे ही विनंती आणि प्रस्तुत तक्रारअर्ज फेटाळण्यात यावी. अर्जदाराची तक्रार अपरिपक्व (Premature) आहे कारण अर्जदाराने प्रस्तुत दावा प्रतीवादी क्र. 1 ते 3 यांचेकडे दाखल केलाच नाही. जर क्लेम दाखलच केला नसेल तर प्रतीवादी क्र.1 ते 3 यांनी सदर न दाखल केलेला क्लेम नामंजुर करण्याचा किंवा क्लेम देण्यास टाळाटाळ करण्याचा किंवा विलंब करण्याचा किंवा सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. प्रस्तुत दाव्यासंबंधी प्रतीवादी क्र. 1 ते 3 यांची अर्जदाराप्रती कोणतीही जिम्मेदारी नाही. अर्जदार हा वाडी पुयड ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असल्याबद्यल कोणताही कागदोपत्री पुरावा मान्यवर मंचापुढे दाखल केला नाही. त्याच प्रमाणे वाहन क्र. एम.एच.23/6279 हे शेख इस्माईल शेख अब्बास यांच्याकडुन अर्जदाराने विकत घेतल्याबद्यल व सदर वाहन तथाकथीत घटनेपर्यंत अर्जदाराच्या नांवाने नांदेडच्या आर.टी.ओ.कार्यालयाच्या संबंधीत रेकॉर्डमध्ये नोंद असल्याबद्यल व ते त्यांच्या ताब्यात असल्याबद्यल व सदर वाहनाच्या माध्यमातून अर्जदार व्यवसाय करत असल्याबद्यल व स्वतःच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असल्याबद्यल कोणताही कागदोपत्री पुरावा मान्यवर मंचापुढे अर्जदाराने दाखल केला नाही. दि.08/02/2009 रोजी ते दि.09/02/2009 रोजीच्या रात्रीच्या दरम्यान सदर वाहन अर्जदाराच्या शेतातील आखाडयावर ठेवलेले नव्हते व सदर वाहन त्यावेळेस व त्या ठिकाणाहून चोरीस गेलेच नाही आणि त्याबाबतीत अर्जदाराने प्रतीवादी क्र. 1 किंवा प्रतीवादी क्र. 2 किंवा प्रतीवादी क्र. 3 यांच्याकडे कोणताही संबंधीत कागदोपत्री पुरावा दाखल केलाच नाही. अर्जदाराने प्रतीवादी क्र. 1 यांच्या कार्यालयात दि.04/08/2009 (04/08/2009) रोजी एक अर्ज दिला. अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीसोबत मान्यवर मंचापुढे दाखल केलेल्या पत्रामध्ये व अर्जदाराने प्रतीवादी क्र. 1 यांच्याकडे दाखल केलेल्या पत्रामध्ये तफावत आहे व अर्जदाराने सदरील पत्रामध्ये तारखेमध्ये जाणुन- बुजून खाडाखोड करुन मान्यवर मंचाची दिशाभूल करीत आहे व प्रतीवादीकडुन पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे तथाकथीत क्लेम/दाव्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र जसे संबंधीत पोलिस स्टेशन यांच्याकडुन एफ.आय.आर.,घटनास्थळ पंचनामा, सर्व तपास टिपणे व जवाब आणी फायनल रिपोर्टच्या सत्यप्रती व संबंधीत न्यायालयाचा (Concerned Court of J.M.F.C.) अ समरी आदेशाची सत्यप्रत व मुळ विमा पॉलिसी, मुळ वाहन नोंदवही ( आर.सी.बुक) मुळ फिटनेस व परमीट व गाडीचे सर्व संबंधीत मुळ कागदपत्र व गाडीची चावी, क्लेम फॉर्म इतयादी सर्व कागदपत्र अर्जदाराने प्रतीवादी क्र. 2 यांचेकडे दाखल करणे बंधनकारक आहे. अर्जदाराने प्रतीवादी क्र. 1 ते 3 यांचेकडे संबंधीत सर्व कागदपत्र दाखलच केले नाहीत. प्रतीवादी क्र. 2 हे आपले चौकशी अधिकारी (Investigator) नेमून सदर घटनेच्या सत्यतेबाबत पडताळणी करत होते. याचबरोबर आपला सर्व्हेअर (Surveyor) नेमून सदर वाहनाचा असेसमेंट ऑफ करेक्ट व्हॅल्यू (Assessment of Correct Value) किंमत काढली इसती परंतु अर्जदाराच्रूा चुकीमुळे प्रतीवादी तसे काही करु शकले नाही. अर्जदाराने प्रतीवादी क्र. 1 ते 3 यांच्या विरुध्द कोणतेही कारण नंसताना खोटा दावा दाखल करुन मान्यवर मंचाची दिशाभूल करत आहे त्यासाठी अर्जदारास दंड म्हणुन रु.25,000/- लावण्यात यावे. सदर वाहन अर्जदाराने शेख इस्माईल शेख अब्बास यांच्याकडुन विकत घेतले नाही व स्वतःच्या नांवे नांदेड येथे ट्रान्सफर पॉलिसी करुन घेतली नाही किंवा तसे काही कागदोपत्री पुराव्याआधारे अर्जदाराने सिध्द केले नाही. तथाकथीत घटनेच्या वेळी अर्जदार हा सदर वाहनाचा मालक किंवा विमाधारक नव्हता. वासतवात सदर वाहन चोरीस गेले नाही आणी त्यावेळेस सदर गाडीचे मालक व विमाधारक हे अर्जदाराच होते अस कागदोपत्री पुराव्या आधारे अर्जदाराने सिध्द केले नाही. गाडी चोरीस गेली त्या तारखेला सदर वाहन अर्जदाराच्या ताब्यात किंवा त्यांच्या आखाडयावरा नव्हते व ततो सदर वाहनाचा मालक किंवा विमाधारक नव्हता. अर्जदाराने प्रस्तुत खोटी तक्रारअर्ज दाखल करुन मान्यवर मंचाची दिशाभूल करुन प्रतीवादीकडुन केवळ पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत या कृत्यास अर्जदारास मान्यवर मंच दंड म्हणुन रु.25,000/- व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व दाव्याचा खर्च म्हणुन रु.6,500/- लावण्यात यावा व सदर रक्कम अर्जदाराने प्रतीवादी क्र. 1 ते 3 यांना देण्याचा हूकू करावा, असे म्हटले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व गैरअर्जदारांचे म्हणणे तपासुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय? होय. 2. अर्जदार यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय? आदेशाप्रमाणे. 3. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी खरेदी केलेले टीप्पर वाहन क्र. एम.एच.23/6279 हे याचे मुळ मालक शेख ईस्माईल शेख अब्बास हयांचे होते. अर्जदाराने सदर टीप्पर खरेदी नंतर गैअर्जदार ईन्शरन्स कंपनी यांना कळवून पॉलिसी स्वतःचे नांवावर करुन घेतली होती, त्याबद्यलचे पॉलिसी कागदपत्र अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेले आहेत त्यास्तव अर्जदार हे ग्राहक आहेत म्हणून मुद्या नं. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र. 2 – गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने फक्त एक साधा अर्ज त्यांच्या कार्यालयात दाखल केलेला आहे, त्याशिवाय ईतर कागदपत्र कुठलेच दाखल नाहीत म्हणून अर्जदाराने दाखल केलेला दावा हा Premature स्वरुपाचा आहे. सदरच्या तक्रार अर्जात अर्जदाराने सर्व कागदपत्रे जोडलेली आहेत. गैरअर्जदार यांना ती सर्व कागदपत्रे मिळालेली आहेत. यानंतरही जर अजून कांही कागदपत्रांची आवश्यकता गैरअर्जदार हयांना वाटल्यास त्यांनी स्वतंत्रपणे अर्जदारास पत्र देवून सदरची कागदपत्रे मागवून घ्यावीत व निकाल काळाले पासुन एक महिन्यात अर्जदाराचा क्लेम सेटल करावा. अर्जदार जर त्या क्लेम रक्कमेस नियमानुसार मान्यता देत असेल तर अर्जदाराने गैरअर्जदार हयांचेकडून रक्कम स्विकारावी व जर अर्जदार हे गैरअर्जदार हयांनी मंजुर केलेल्या रक्कमेवर समाधानी नसतील तर अर्जदार पुनश्च गैरअर्जदार हयांचे विरुध्द दावा दाखल करु शकतील. आदेश. 1. अर्जदार हयांचा क्लेम गैरअर्जदार हयांनी निकाल कळाल्यापासुन एक महिन्यात निकाली काढावा. 2. उभय पक्षांना निर्णय कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार. लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |