जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 163/2010 तक्रार दाखल तारीख- 03/11/2010
श्रीमती. चंद्रभागाबाई वैजीनाथ पवळ,
वय – 60 वर्ष, धंदा – शेती
रा.चुंबळी ता.पाटोदा जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. युनायटेड इंडिया अश्युरन्स कंपनी,
रिजलन ऑफिस, अंबिका चौक, धरमपेठ, नागपूर
2. विभाग प्रमुख,
कबाल इंश्युरन्स ब्रोकिंग सर्व्हिस प्रा.लि,
शॉप नं. , राज अपार्टमेंट, गणपती मंदीराच्या
बाजूला, सिडको, औरंगाबाद. ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – ए.एस.पावसे,
सामनेवाले1तर्फे – वकील – एकतर्फा आदेश,
सामनेवाले2तर्फे – वकील – स्वत:,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा रा.चुंबळी, ता.पाटोदा,जि.बीड येथील रहिवाशी असुन त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे व त्यावर त्यांचा व त्यांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मयत तुकाराम वैजिनाथ पवळ हे तक्रारदाराचा मुलागा असुन दि.30.10.2009 रोजी इलेक्ट्रीकल शॉक लागुन मृत्यू पावले. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन, पाटोदा येथे केली असुन त्याचे वैधकीय श्वविच्छेदन करुन तक्रारदाराने अंत्यसंस्कार केले. तक्रारदाराने तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत सर्व कागदपत्राच्या साक्षांकीत करुन दि.26.11.2009 रोजी सामनेवाले नं.1 व 2 याचेकडे फाईल सादर केली.
तक्रारदाराने वारंवार सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे संपर्क साधला परंतु आजपर्यन्त मंजूर केले नाही. म्हणून सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने मयत मुलाचा जनता शेतकारी वैयक्तीक अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- त्यावर द.सा.द.शे. 18 टक्के व्याज, मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्ठयार्थ एकुण 12 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.1 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त होवूनही ते न्यायमंचात हजर नाहीत अथवा त्यांचे लेखी महणणे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे मुदती दाखल केले नाही, म्हणून सामनेवाले नं.1 यांचे विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याच्या निर्णय घेतला.
सामनेवाले नं.2 यांनी आपले लेखी म्हणणे दि.12.1.2011 रोजी न्यायमंचात दाखल केले असुन त्यात त्यांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे दि.2.10.2010 रोजी सर्व कागदपत्रासह प्रस्ताव पाठविला असुन तो आजपावेतो सामनेवाले नं.1 यांचेकडे निर्णयासाठी प्रलंबीत आहे, असे म्हंटले आहे.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, तक्रारदाराचा तोंडी युक्तीवाद ऐकला असता व त्याचे बारकाईने अवलोकन केले असता, सामनेवाले नं.2 यांनी सर्व कागदपत्रासह प्राप्त करुन दि.2.10.2010 रोजी प्राप्त झालेनंतर सामनेवाले नं.1 यांचेकडे संपूर्ण विमा प्रस्ताव पाठविल्याचे म्हंटले आहे. परंतु सामनेवाले नं.1 यांनी न्यायमंचाची नोटीस व सामनेवाले नं.2 यांचे दिलेले उत्तर हे सर्व प्राप्त होवूनही न्यायमंचात हजर नसल्यामुळे यावरुन तक्रारदाराची तक्रार ही सत्य असल्याचे दिसून येत आहे.
म्हणजेच सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदाराचे मयत मुलाचा जनता शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेच्या लाभाची रक्कम मुदतीत न देवून तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रूटी केली आहे, हे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराचा मयत मुलगा तुकाराम वैजीनाथ पवळ यांचे शेतकरी वैयक्ती अपघात विमा योजनेतील रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) दि.2.10.2010 पासुन आदेश तारखे पर्यन्त द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत तक्रारदारास अदा करावेत.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड