जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/279 प्रकरण दाखल तारीख - 23/11/2010 प्रकरण निकाल तारीख – 25/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. पार्वतीबाई भ्र.शंकर कंदूरके वय 47 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार रा. आरळी ता.बिलोली जि. नांदेड विरुध्द. 1. व्यवस्थापक युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन 19, तिसरा मजला, धरमपेठ एक्सटेंशन, शंकर नगर चौक, नागपूर 440 010 गैरअर्जदार 2. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. संत कृपा मार्केट,जी.जी.रोड, नांदेड. 3. मा.व्यवस्थापक, कबाल इन्शूरंन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नं.2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भूरे गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे - अड.एस.जी.मद्ये गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्यक्ष ) 1. अर्जदार पार्वतीबाई ही मयत शंकर यांची पत्नी आहे. मयत शंकर हे शेतकरी व्यवसाय करुन त्यांचे कूटूंबीयाचे व त्यांचे पालनपोषन करीत होते. त्यांचे नांवे शेत गट नंबर 412 मध्ये क्षेञफळ 35 आर आणि स्थित मौजे आरळी ता.बिलोली येथे आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यास व त्यांचे कूटूंबियास सामाजिक न्याय देण्याच्या हेतूने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्यामध्ये मयत शंकर यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 ते 3 मार्फत उतरविण्यात आला आहे. सदर विम्याचा कालावधी ऑगस्ट 2009 ते ऑगस्ट 2010 असा होता. अर्जदाराच्या पतीचा दि.23.02.2010 रोजी आरळी येथे वादळामुळे झाड भिंतीवर पडल्यामूळे भिंत अंगावर पडून गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.. अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायतचे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा इत्यादी आवश्यक त्या सर्व नियमानुसार कागदपञासह शेतकरी अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन बिलोली ता.बिलोली येथे गुन्हा नंबर 01/2010 कलम 174 सी.आर.पी.सी. द्वारे गून्हा नोंदविला आहे. घटनास्थळ पंचनामा व तपास केला. अर्जदाराने अर्जासोबत घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, 7/12 उतारावरील होल्डींग, आठ अ चा उतारा,बॅंकेचे पासबूकचे सत्यप्रत, वारसा प्रमाणपञ, तलाठीचे प्रमाणपञ इत्यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. नूकसान भरपाई म्हणून रु.1,00,000/- व त्यावर सन 2009 पासून 12 टक्के व्याजाने मागणी केली आहे. तसेच अर्जदारास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. 2. गैरअर्जदार क्र,1 व 2 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी सदर तक्रारीमध्ये तालुका कृषी अधिकारी बिलोली यांना पक्षकार केलेले नाही. ज्यामध्ये गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार ही मयत शंकर यांची पत्नी होती याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही ? तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत शंकर हे शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही ? तसेच मयत शंकर यांनी प्रत्यक्षरित्या गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे पॉलिसी उतरविलेली नाही. मयत शंकर हे दि.25.12.2009 रोजी आरळी येथे वादळामुळे झाड भिंतीवर पडल्यामूळे भिंत अंगावर पडून गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला हे अर्जदाराने सिध्द केलेले नाही ? अर्जदाराचा अपघात झाला हे गैरअर्जदार यांना मान्य नाही ? अर्जदाराच्या नांवामध्ये फरक असल्यामूळे नेमके अर्जदाराचे नांव काय आहे हे सिध्द होत नाही. अर्जदाराचा अर्ज ते मान्य करु शकत नाही. अर्जदार यांची शेतकरी अपघात विमा पॉलिसी होती हे त्यांना मान्य आहे. अर्जदार यांने हे सिध्द करावे की, गैरअर्जदाराच्या सेवेत ञूटी आहे. अर्जदाराची तक्रार ही अपरिपक्व आहे कारण अर्जदाराने क्लेम हा गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे दाखल केलेला नाही. सदर तक्रार ही गैरअर्जदार यांना मानसिक ञास देण्यासाठी दाखल केलेली आहे म्हणून त्यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह अमान्य करण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे तर्फे श्री. भगवान रामाजी कोठाळे यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. 3. गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.23.02.2010 रोजी झाला व दावा दि.20.08.2010 रोजी त्यांना मिळाला पण तो अपूर्ण असल्यामूळे म्हणजे जसे की, बँक पासबूक, मृत्यू प्रमाणपञ मूळ, 7/12 मूळ, तलाठी प्रमाणपञ, मूळ मृत्यू प्रमाणपञ हे नसल्याबददल त्यांना दि.7.9.2010 रोजी पञ पाठविले परत दि.06.10.2010 रोजी पञ पाठविण्यात आले परंतु अर्जदाराने वरील कागदपञ दाखल केले नाही. म्हणून क्लेम हा गैरअर्जदार क्र. 3 कडेच आहे जसे अर्जदाराने कागदपञ दिले तसाच तो क्लेम गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे पाठविण्यात येईल.. म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 4. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात ते मूदे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. (फक्त गैरअर्जदार क्र.1 व 2) 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- 5. अर्जदारांनी मयत शंकर यांचे नांवे असलेल्या शेतीचा सातबारा दाखल केलेला आहे. त्यावरुन मयत शंकर हे शेतकरी होते हे सिध्द होते. त्यांचप्रमाणे अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ व वारसा प्रमाणपञ दाखल केलेले आहे.यामधील नोंदीनुसार मृत भोगवटदाराचे नांव शंकरराव संभाजी दाखवलेले आहे. ज्यामध्ये पार्वतीबाई ही शंकर यांची पत्नी आहे असे लिहीलेले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे ओळखपञ दाखल केले आहे त्यात पार्वतीबाई हिचे पतीचे नांव शंकर असे दाखविलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत शंकर यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. म्हणून अर्जदार ही त्या योजनेचा लाभ घेण्यास हक्कदार आहे. अर्जदार ही मयत शंकर यांची पत्नी आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- 6. अर्जदार ही मयत शंकर यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत शंकर यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत शंकर हे दि.23.02.2010 रोजी आरळी येथे वादळामुळे झाड भिंतीवर पडल्यामूळे भिंत अंगावर पडून गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला व त्यात अर्जदाराचे पती हे मरण पावले. हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे, हे म्हणणे बरोबर नाही. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये अर्जदाराचा मृत्यू हा वादळामूळे झाड भिंतीवर पडल्यामूळे व भिंत अंगावर पडून गंभीर मार लागून झालेला होता अशी माहीती पोलिस स्टेशन बिलोली ता. बिलोली येथे दिलेली आहे. त्याबददल जवाब घेण्यात आला व घटनास्थळ पंचनामा व पोस्ट मार्टेम अहवाल दाखल केला. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत शंकर हे वादळामूळे झाड भिंतीवर पडल्यामूळे व भिंत अंगावर पडून गंभीर दूखापत झाली व त्यात ते मरण पावले हे सिध्द झालेले आहे. सन 2009-10 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये शंकर यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ती प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार ही ग्राहक आहे. त्यामूळे अर्जदार ही विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्यू दाखला प्रमाणपञ, बँकेचे पासबूक, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्यादी कागदपञासह तहसील बिलोली यांचेकडे अर्ज दाखल केला आहे.अर्जदार ही अडाणी असल्यामूळे व योजनेची माहीती नसल्यामूळे क्लेम दाखल करण्यास विलंब झाला परंतु शासनाच्या नियमानुसार असा विलंब माफ करावा असे शासनाचे निर्देश आहेत. तरी अर्जदाराला दावा रक्कम दिली नाही असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केलेली आहे. सदरील सर्व कागदपञ तहसील कार्यालय बिलोली यांनी कबाल इन्शूरन्स यांचेकडे पाठविले आहेत. कंपनीने अर्जदाराने कागदपञ अपूर्ण दिल्यामळे कंपनीकडे पाठविलेला नाही. यावरुन अर्जदाराने क्लेम तहसील यांचेकडे वेळेत पाठविला होता व त्यांनी तो कबाल इन्शूरन्स यांचेकडे पाठविला आहे हे सिध्द होते. 7. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचंचे कार्यक्षेञ हे इतर पर्यायी सुवीधेसाठी पुरक आहे, त्यामुळे ही तक्रार या मंचासमोर चालू शकते. गैरअर्जदारांनी याबददल तोंडी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आहे पण त्या आक्षेपा पूष्टयर्थ कांहीही पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेले वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु,2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. 8. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दयावे लागेल. 5. गैरअर्जदार क्र.3 विरुध्द आदेश नाही. 6. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |