निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 29/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 04/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 15/12/2011 कालावधी 7 महिने 16 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. तुकाराम बी. हरीभाऊ पारवे . अर्जदार वय 35 वर्षे धंदा शेती रा.गौर, अड.एम.टी.पारवे ता.पुर्णा, जि.परभणी. विरुध्द 1 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार. मंडळ कार्यालय क्र.2, अंबिका हाउस, अड.जी.एच.दोडीया शंकर नगर चौक, नागपुर - 440010,
2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. स्वतः विभागीय कार्यालय, भास्करायन एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग प्लॉट नं.7,सेक्टर ई 1, टाऊन सेंटर सिडको.औरंगाबाद. 3 कुषी अधिकारी, स्वतः पुर्णा, ता.पुर्णा, जिल्हा परभणी. . . ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अपघातात कायमचे अपंगत्व आल्याची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार गौर, ता.पुर्णा, जि. परभणी येथील रहिवाशी शेतकरी आहे . महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. त्या पॉलीसीचा अर्जदार हा देखील लाभार्थी होता. तारीख 16/07/2010 रोजी ट्रकने धडक दिल्याने अर्जदार अपघातात जबर जखमी झाला. एक पाय पुर्ण निकामी होवुन तो काढुन टाकावा लागला. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्ताव दाखल केला. त्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी गैरअर्जदार नं 2 यांचेकडे अर्जदाराचा विमा दावा सादर केला त्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास दिनांक 31.03.2011 चे पञ पाठवुन पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसांत क्लेम दाखल केला नाही या कारणास्तव नुकसान भरपाई देता येत नसल्याचे कळविले. अशारितीने विमा कंपनीने क्लेम नाकारुन मानसिक त्रास दिला म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतची तक्रार दाखल करुन विमा कंपनीकडून नुकसान भरपाई रुपये 75,000/- दाव्याच्या खर्चासह मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 16 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.15) तक्रार अर्जातून त्यांच्या विरुध्द केलेल्या विधानांचा इन्कार करुन प्रस्तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्द मुळीच चालणेस पात्र नाही. त्यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही. कारण पॉलिसी नियम अटीप्रमाणे पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसाच्या आंत क्लेम दाखल करणे आवश्यक होते. त्या ग्रेस पिरियेडमध्ये क्लेम विमा कंपनीकडे आलेला नसल्यामुळे तारीख 24.03.2011 च्या पञाव्दारे अर्जदाराचा विमा प्रस्ताव नियमानुसार नामंजुर केल्याचे कळविले होते. तक्रार अर्जातुन विमा कंपनी विरोधी केलेली इतर सर्व विधाने साफ नाकारली आहेत. तसेच अपघाता संबधीचा व अपंगत्वा संबधीचा मजकूरही वैयक्तिक माहिती अभावी नाकारलेला आहे. अतिरिक्त लेखी जबाबात पुढे असा खुलासा केला आहे की, शेतकरी विम्या संबंधी महाराष्ट्र सरकार व विमा कंपनी यांचे दरम्यान झालेल्या लेखी करारनाम्यानुसार तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडून कबाल इन्शुरन्स ब्रोकरला कागदपत्रे पाठविल्यानंतर ब्रोकरने त्याची छाननी करुन विमा कंपनीकडे पाठवावी लागतात. त्यानंतर एक महिन्यात विमा कंपनी क्लेम मंजूर अथवा नामंजुरीचा निर्णय घेते. त्यामुळे नियम अटीनुसार अर्जदार नुकसान भरपाई मिळयास पाञ नाही. सबब, तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपञ (नि.16) दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र.2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.12) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम मंजूरीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेण्यासाठी व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत तुकाराम पारवे याच्या विमा क्लेमची कागदपत्रे गैरअर्जदार क्रं 2 यांना दिनांक 07/01/2011 रोजी प्राप्त झाली. ती कागदपत्रे विमा कंपनीकडे मंजुरीसाठी आवश्यक तो शेरा मारुन दिनांक 28.01.2011 रोजी पाठवीली. त्यानंतर दिनांक 24.03.2010 च्या पत्राने विमा कंपनीने अर्जदाराचा क्लेम पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसाच्या मुदतीत दाखल केला नाही म्हणून नामंजूर करुन फाईल बंद केली तसेच अर्जदाराला देखील कळविले. सबब, गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत विमा कंपनीचे दिनांक 24.03.2010 च्या पञाची कॉपी दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.3 याने आपल्या लेखी जबाबात (नि.18) असा खुलासा केला आहे की, मयत तुकाराम पारवे याच्या अपघाती निधनाबद्दल शेतकरी विमा नुकसान भरपाई प्रस्तावाच्या सर्व कागदपञाची पुर्तता अर्जदाराकडून करून घेवुन दिनांक 29.12.2010 रोजी जिल्हा अधीक्षक कुषी अधिकारी यांच्या वतीने कबाल इन्शुरन्स प्रा.लि. यांच्याकडे पाठविला होता. प्रस्ताव सादर केल्यानंतर विमा कंपनीकडे 90 दिवसाच्या आंत प्रस्ताव दाखल न झाल्यामुळे क्लेम नामंजुर केला व तसे संबंधितास पञाने कळविले. गैरअर्जदार क्र.3 यांची अशा प्रकरणात मध्यस्थ व मार्गदर्शक सल्लागार म्हणुन काम पाहतात. त्यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही पुर्ण केली होती. सबब त्यांना या कामी दोषी धरण्यात येवू नये अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबासोबत शपथपञ (नि.19) दाखल केलें आहे. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.पारवे आणि गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड दोडिया यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदार 1 यानी अर्जदाराच्या अपघाती कायमचे अपंगत्वाची शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदार हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी शेतकरी होता हे अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या नि.4/4 वरील त्याच्या मालकीच्या शेतजमीनीचा 7/12 उतारा, नि.4/05 वरील होल्डींग प्रमाणपत्र, नि.4/3 वरील तलाठयाचा दाखला, या कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे. दिनांक 16.07.2010 रोजी अर्जदार टेम्पोमधुन राञी 10.00 वाजता घरी जात असतांना चाकण ते शिक्रापुर, जिल्हा पुणे रोडवर भोसेगावच्या हददीत टेम्पोने ट्रकला धडक दिल्याने अपघात होवुन अर्जदार जबर जखमी झाला होता. सुरवातीला त्याला संचेती हॉस्पीटल पुणे येथे उपचारासाठी अँडमीट केले. त्यानंतर बोजलवार आर्थो हॉस्पीटल नांदेड येथे दि.30.07.2010 ते 16.09.2010 पर्यन्त इनडोअर पेशंट म्हणुन पुढील उपचार घेतले. अपघातात डावा पाय निकामी झाल्यामुळे तो कापुन टाकावा लागला व त्यामुळे अर्जदारास कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे. ही वस्तूस्थिती पुराव्यातील चाकण, जिल्हा पुणे पोलीस स्टेशन अ.गु.र.नं. 190/10 मधील खबरी जबाब (नि.4/9) घटनास्थळ पंचनामा (नि.4/10), मेडीकल सर्टीफिकेट (नि.4/14), सीव्हील सर्जन परभणी यांचा अपंगत्वाचा दाखला (नि.4/15) या कागदोपत्री पुराव्यातुन शाबीत झालेले आहे अर्जदार हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे व अपघातात त्याच्या शारीरीक अवयवास कायमचे अंपगत्व राहील्यामुळे विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्याने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे विमा क्लेमसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती. हा अँडमिटेड फॅक्ट आहे. त्याच्या छायाप्रती अर्जदाराने पुराव्यात नि. 4 लगत दाखल केलेल्या आहेत. कागदपत्रामध्ये अपूर्णता होती असा गैरअर्जदाराचा आक्षेप नाही. विमा कंपनीने क्लेम नामंजूर करण्याचे दिलेल्या कारणाबद्यल अर्जदाराला दिनांक 24 मार्च 2010 रोजी पाठविलेल्या पत्रात (नि 4/2) एवढेच नमूद केलेले आहे की, ‘’करारानुसार आपण क्लेमसंबंधी कागदपञे पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसाचे आत न दिल्यामुळे आम्ही तुमचा नुकसान दावा देता येत नाही’’ विमा कंपनीने क्लेम नामंजूरीचे वरीलप्रमाणे दिलेले कारण अन्यायकारक असून अशा तांत्रीक कारणास्तव त्याना क्लेम मुळीच नाकारता अथवा नामंजूर करता येणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे या संदर्भात रिपोर्टेड केसेस (1) 2008 (2) All MR ( Journal) 13 (Maharashtra State Commission.) आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड विरुध्द सिधुताई खैरनार 2) अपील क्रमांक 1047/08 निकाल दिनांक 05.02.2009 ( राज्य आयोग औरंगाबाद सर्कीट बेंच ) 3) रिट पिटीशन क्रमांक 3329/07 ( राष्ट्रीय आयोग ) निकाल दिनांक 22.10.2007 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा वरील रिपोर्टेड केसेसमध्ये वरीष्ठ न्यायालयानी असे मत व्यक्त केले आहे की, 90 दिवसात क्लेम दाखल करणे ही अट मुळीच बंधनकारक नाही व मॅडेटरी नाही आणि या कारणास्तव विमा कंपनीला क्लेम नामंजूर करता येणार नाही हे मत प्रस्तूत प्रकरणाला ही लागू पडते त्यामुळे क्लेम नाकारुन गैरअर्जदारानी निश्चीतपणे सेवा त्रूटी केलेली आहे हे यातून सिध्द होते. गैरअर्जदार विमा कंपनीतर्फे सादर केलेंल्या नि.21 वरील शेतकरी विमा पॉलिसी कराराची पान क्र.8 वर उल्लेख केलेप्रमाणे शेतक-याचा अपघाती मुत्यु झाल्यास देण्यात येणारी नुकसान भरपाई रूपये 1,00,000/- आणि अपघातात शारीरीक अवयवास कायमचे अवंगत्व आल्यास वरील रक्कमेच्या 50 टक्के म्हणजे रूपये 50,000/- नुकसान भरपाई देण्याची हमी विमा कंपनीने घेतलेली असल्यामुळे ती नुकसान भरपाई करारातील अटीप्रमाणे अर्जदार मिळण्यास पाञ ठरतो. सबब वरील सर्व बाबी विचारात घेऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्र 1 यांनी आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्या शारीरीक कायमचे अपंगत्वाची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रुपये 50,000/- द.सा.द.शे 9 % दराने क्लेम नाकारले तारखेपासून म्हणजे तारीख 24 मार्च 2010 पासून होणा-या व्याजासह अर्जदारास दयावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष मा.2 सदस्यांनी दिलेल्या निकालपत्रातील आदेश क्रमांक 2 शी मी सहम नाही त्यामुळे आदेश क्र.2 मी वेगळा देत आहे. (सौ.अनिता ओस्तावाल.) (सदस्या – जिल्हा ग्राहक न्यायमंच) परभणी. कारण – गैरअर्जदाराने नजरचुकीने Repudiation letter दि. 24/03/2010 नमुद केलेली आहे,परंतु सदर प्रकरणात अर्जदारास दि.16/07/2010 रोजीच्या अपघातात अपंगत्व आलेले आहे.त्याने दि.19/10/2010 रोजी उपरोक्त योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे.त्यामुळे अर्जदाराचा प्रस्ताव दि.24/03/2011 रोजी नामंजूर करण्यात आला असावा चुकीने त्याऐवजी दि.24/03/2010 नमुद करण्यात आलेली आहे.त्यामुळे त्या तारखेपासून अर्जदारास नुकसान भरपाई पोटीच्या रक्कमेवर व्याज मिळावयास हवे असे मला वाटते.सबब मी खालील प्रमाणे आदेश क्र.2 पारीत करीत आहे. आदेश क्र.2 गैरअर्जदाराने क्र.1 यांनी आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदारास रक्कम रु.50,000/- द.सा.द.शे. 9 टक्के दराने दि.24/03/2011 पासून होणा-या व्याजासह अर्जदारास द्यावी. सौ.अनिता आस्तवाल. सदस्य (जिल्हा गाहक न्यायमंच परभणी)
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |