जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 13/ 2016 तक्रार नोंदणी दि. :-17/2/2016
तक्रार निकाली दि. :-23/6/2016
निकाल कालावधी:-4 महीने 7 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्रीमती लक्ष्मीबाई परसुराम शेरकी,
वय – 51 वर्षे, व्यवसाय – घरकाम ,
रा.तळोधी (मो.), ता. चामोर्शी,
जिल्हा – गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफीस नं.2, अंबीका हाऊस,
शंकर नगर, नागपूर – 440010.
(2) मे.कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस
लिमिटेड, तर्फे श्री सुभाष आग्रे,
प्लॉट नं.101, करंदीकर हाऊस,
मंगला टॉकीजच्या शेजारी, शिवाजीनगर,
पुणे-411005.
(3) तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,
ता. चामोर्शी, जिल्हा – गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री उदय क्षीरसागर
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील :- अधि.श्री के.डी.देशपांडे
गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती रोझा फु.खोब्रागडे, सदस्य)
(पारीत दिनांक : 23 जून 2016)
1. अर्जदाराने सदर तक्रार अर्जदाराचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून मिळण्याबाबत दाखल केलेली आहे.
2. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील हजर होऊन नि.क्र.11 अन्वये लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 तर्फे कोणीही हजर झाले नाही.
3. गैरअर्जदार क्र. 3 तर्फे नि.क्र.12 अन्वये लेखी उत्तर दाखल केले.
- कारण मिमांसा –
4. सदर तक्रार न्यायप्रविष्ट असतांना, अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.14 अन्वये, आपसी समझौता झालेला असल्याने अंतिम आदेश पारीत करावा, असा संयुक्त अर्ज दाखल केला. त्याअनुषंगाने, पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
// नि.क्र.1 वर आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत अर्जदारास दयावी.
(3) गैरअर्जदार क्र. क्र.2 व 3 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
(4) अर्जदार व गैरअर्जदार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य दयावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/6/2016