जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 23/2016 तक्रार नोंदणी दि. :-24/5/2016
तक्रार निकाली दि. :- 14/10/2016
निकाल कालावधी :- 4 म.18 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्रीमती लताबाई मनोहर वाळके,
वय 45 वर्षे, व्यवसाय-घरकाम,
रा.जामगिरी पो.विष्णुपुर,ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफीस नं.3, अंबिका हाऊस,
शंकर नगर, नागपूर-400010.
(2) मे.कबाल इंशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड,
तर्फे श्री.सुभाष आग्रे, प्लॉट नं.101,
करंदीकर हाऊस, मंगला टॉकीजच्या शेजारी,
शिवाजी नगर, पुणे-411005..
(3) तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,
तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.उदय क्षिरसागर
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील :- अधि.श्री के.डी.देशपांडे
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकील :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
( मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य )
(पारीत दिनांक : 14 ऑक्टोंबर 2016)
तक्रारकर्तीने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्तीचे पती शेतीचा व्यवसाय करीत होते. शेतातील उत्पन्नावर तक्रारकर्तीचे पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचे पती श्री. मनोहर खुशाल वाळके हे दि.20.07.2010 रोजी आपले शेतात काम करीत असतांना अंगावर नैसर्गिक विज पडून मृत्यु झाला. शासनातर्फे तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- च्या विमा रकमेसाठी पाञ होती. अपघातात मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 कडे विमा योजने अंतर्गत दि.25.10.2010 ला रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेल्या दस्ताऐवजाची पुर्तता केली. तक्रारकर्ती महिलेच्या पतीच्या दाव्याबाबत सहा वर्ष लोटूनही गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने अर्जदाराने वकीलामार्फत दिनांक 8.3.2016 ला गैरअर्जदार क्र.3 ला नोटीस पाठविला व माहिती मागितली. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीचा दावा अकारण प्रलंबित ठेवून तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. शासनाने ज्या उद्देशाने मृत शेतक-याच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्ये ञृटी केली. त्यामुळे तक्रारकर्तीस मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.15.10.2010 पासून द.सा.द.शे. 18 % व्याजाने मिळण्याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 8 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.11 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.16 नुसार व गैरअर्जदार क्र.3 हे अनुपस्थित राहिले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदाराने पुढे त्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे की, सदर तक्रारीचे कारण दिनांक 20.7.2010 ला उदभवले असून सदर तक्रार मुदतबाहय आहे. अर्जदाराने सदर तक्रार दिनांक 24.5.2011 ला दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.3 कडून योग्य कागदपत्र गोळा करुन गैरअर्जदार क्र.1 कडे विमा प्रस्ताव सादर करणे हे गैरअर्जदार क्र.2 चे कर्तव्य होते. गैरअर्जदार क्र.1 कडे अर्जदाराचा दावा प्राप्त न झाल्यामुळे विमा दावा निकाली काढण्याचा प्रश्नच उदभवत नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपले कर्तव्य योग्य रितीने पार न पाडल्याने, अर्जदारास नुकसानभरपाई देण्यास गैरअर्जदार क्र.2 जबाबदार आहे. अर्जदार यांनी घटना घडल्यापासून 90 दिवसांचे आंत विमा दावा दाखल करणे आवश्यक होते. सदरची तक्रार मुदतबाहय असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.16 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदारक्र.1 ने राज्य शासनाकडून विमा प्रिमियम स्विकारुन जोखीम स्विकारली असल्यामुळे, अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहक आहेत. गैरअर्जदार क्र.2 हे केवळ विमा सल्लागार असून, ते विनामोबदला शासनास मदत करतात. मयत मनोहर खुशाल वाळके यांचा अपघात दिनांक 20.7.2010 ला झाला. त्याचा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली मार्फत 90 दिवसाचा वाढीव कालावधी संपल्यानंतर प्राप्त प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 ला दिनांक 14.11.2010 रोजी पाठविला असता, गैरअर्जदार क्र.1 ने सदर प्रस्ताव दिनांक 28.2.2011 ला नामंजूर करुन वारसदारास कळविल्याचे दिसून येते. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुध्द खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
5. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 2 यांनी दाखल केलेले लेखी बयान, शपथपञ, तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराचे पती हे शेतीचा व्यवसाय करीत होते व शेतीतील उत्पन्नावर अर्जदाराचे पती कुटुंबाचे पालनपोषण करीत होते, ही बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्या नि.क्र.2 वरील दस्तऐवजावरुन निदर्शनास येते. अर्जदाराच्या पतीच्या अपघाती मृत्युनंतर अर्जदार ही मृतक शेतक-याची वारसदार असल्यामुळे सदर विमा दाव्याची लाभधारी आहे. म्हणून, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
7. गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले लेखी उत्तरामध्ये असे म्हणणे आहे की, तक्रार वेळेवर दाखल करण्यात आली नाही. गैरअर्जदाराचे हे म्हणणे गृहीत धरण्यासारखे नाही. कारण अर्जदाराच्या पतीचे निधन दिनांक 20.07.2010 रोजी झाले व अर्जदाराने तिचा दावा दिनांक 15.10.2010 ला म्हणजेचे मुदतीच्या आंतच गैरअर्जदार क्र.3 कडे दाखल केला आहे व गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्सने आपल्या उत्तरात त्यांनी, गैरअर्जदार क्र.3 कृषि अधिकारी मार्फत दावा प्राप्त झाल्याचे मान्य केलेले आहे तसेच, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदार बाईचा विमा दावा नाकारल्याबाबत कोणतेही पत्र अर्जदारास दिलेले नाही व गैरअर्जदाराने आपल्या लेखी व तोंडी युक्तीवादात या मुद्दयाबाबत कोणतेही पुरावे दाखल केलेले नाही. गैरअर्जदारातर्फे पुराव्याअभावी व वरील कारण मिमांसेवरुन मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे व खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
1,00,000/- दिनांक 15.10.2010 पासून, द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह,
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
(5)
गडचिरोली.
दिनांक – 14.10.2016.
(सादिक मो.झवेरी) ( रोझा फु.खोब्रागडे )
सदस्य अध्यक्ष (प्र.)