Maharashtra

Gadchiroli

CC/42/2016

Vijay Donuji Kambalwar - Complainant(s)

Versus

United India Insurance Company Limited Through Divisional Manager, Nagpur & 2 Others - Opp.Party(s)

Mr. Uday Kshirsagar

18 Jan 2017

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/42/2016
 
1. Vijay Donuji Kambalwar
At-Post-Tah-Chamorshi
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Company Limited Through Divisional Manager, Nagpur & 2 Others
Divisional Office No. 2, Ambiks House, Shankar Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. M/s. Cabal Insurance Broking Services Limited Through Mr. Subhash Agre
Plot No. 101, Karindikar House, Near Mangla Talkies, Shivajinagar, Pune
Pune
Maharashtra
3. Taluka Krishi Adhikari, Chamorshi
At-Tah- Chamorshi
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. Roza F. Khobragade PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 18 Jan 2017
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, गडचिरोली

 

ग्राहक तक्रार क्रमांक :-  42/2016            तक्रार नोंदणी दि. :- 7/9/2016

                        तक्रार निकाली दि. :- 18/01/2017

                                          निकाल कालावधी :-  4 म.11 दिवस

 

अर्जदार/तक्रारकर्ता      :-    श्री.विजय डोनुजी कंबलवार,

                              वय 48 वर्षे, व्‍यवसाय-शेती, 

                              रा.चामोर्शी, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.

                       

                        - विरुध्‍द -

गैरअर्जदार/विरुध्‍दपक्ष   :-   (1) युनायटेड इंडिया इंश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड,

  तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर,

         डिव्‍हीजनल ऑफीस नं.2, अंबिका हाऊस,

   शंकर नगर,, नागपूर-440010,

     (2) मे.कबाल इंशुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस लिमिटेड,

   तर्फे श्री.सुभाष आग्रे, प्‍लॉट नं.101,

    करंदीकर हाऊस, मंगला टॉकीजच्‍या शेजारी,

    शिवाजी नगर, पुणे-411005..

 

                             (3)  तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,

    तालुका चामोर्शी, जिल्‍हा गडचिरोली.

                               

अर्जदार तर्फे वकील                :-  अधि.श्री.उदय क्षिरसागर    

गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील        :-    अधि.मेघा वाणे

गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे          :-   स्‍वतः

 

गणपूर्ती         :-    (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्‍यक्ष (प्र.)

                                      (2) श्री सादिक मो‍हसिनभाई झवेरी, सदस्‍य

 

आ दे श  -

(मंचाचे निर्णयान्‍वये, सादिक मो.झवेरी, सदस्‍य)

(पारीत दिनांक : 18 जानेवारी 2017)

                                      

                              तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.          तक्रारकर्त्‍याचे वडील शेतीचा व्‍यवसाय करीत होते. शेतातील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्त्‍याची आई कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्त्‍याचे वडील डोनुजी नारायण कंबलवार यांचा दि.8.8.2010 रोजी नाल्‍याच्‍या पुलावर पाय घसरुन पडल्‍याने पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला.   शासनातर्फे तक्रारकर्त्‍याचे वडीलांचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा काढला असल्‍याने व तक्रारकर्त्‍याचे वडील शेतकरी असल्‍याने तक्रारकर्ता मृत  शेतक-याचा वारसदार म्‍हणून गैरअर्जदार क्र.1  कडून रुपये 1,00,000/- च्‍या विमा रकमेसाठी पाञ होता.  तक्रारकर्त्‍याचे वडीलांचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याने गैरअर्जदार क्र.3  कडे विमा योजने अंतर्गत दि.6.9.2010 ला रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेल्‍या दस्‍ताऐवजाची पुर्तता केली.  तक्रारकर्त्‍याचे वडीलांच्‍या दाव्‍याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांनी सहा वर्ष उलटूनही कोणताही निर्णय न घेतल्‍याने अर्जदाराने दिनांक 30.4.2016 ला माहिती अधिकार कायदयाखाली माहिती मागितली व गैरअर्जदार क्र.3 ने सदर दाव्‍याबाबत दिनांक 8.4.2011 रोजी गैरअर्जदार क्र.1 ने सदर दावा उशिरा सादर केल्‍याचे कारण दाखवून नामंजूर केल्‍याबाबत माहिती दिली. शासनाने ज्‍या उद्देशाने मृत शेतक-याच्‍या पत्‍नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्‍या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्‍ये ञृटी केली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांनी विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- दि.6.9.2010 पासून द.सा.द.शे. 18 % व्‍याजाने मिळण्‍याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्‍याचे आदेश व्‍हावे, अशी प्रार्थना केली.

 

2.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 9 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.9 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले, गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.14  व गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.11 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले.

 

3.          गैरअर्जदार क्र.1  ने  नि.क्र.9 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, मृतकाचा मृत्‍यु दिनांक 8.8.2010 रोजी नाल्‍याच्‍या पुलावर पाय घसरुन पडल्‍याने पाण्‍यात बुडून झाला व मृतकाचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा काढला असल्‍याचा पुरावा नसल्‍यामुळे तक्रारीतील आरोप अमान्‍य आहेत. हे म्‍हणणे अमान्‍य की, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचा दावा मान्‍य की अमान्‍य हे कळविले नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी दिनांक 8.4.2011 चे पत्रानुसार दावा अमान्‍य केल्‍याची सूचना दिलेली आहे. तक्रार दाखल करण्‍याची मुदत संपुष्‍टात आली असल्‍याने, विलंब माफीचा अर्ज करण्‍यापासून वाचण्‍याकरीता खोटे कारण मंचासमोर दिलेले आहे.

 

     गैरअर्जदार क्र.1 यांनी विशेष कथनामध्‍ये असे नमुद केले की, अर्जदाराचा दावा अमान्‍य केल्‍याची सूचना अर्जदारास दिलेली आहे. तसेच, गैरअर्जदार क्र.1, कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन व कबाल इंशुरन्‍स यांच्‍यात झालेल्‍या त्रिपक्षीय करारानुसार पॉलीसीची कालावधी दि.15.8.2009 ते 14.8.2010 पर्यंत होता. त्‍यानंतर 90 दिवसाचा कालावधी दावा स्विकारण्‍याकरीता दिलेला होता. मयत श्री.डोनुजी कंबलवार व गैरअर्जदार क्र.1 यांच्‍यामध्‍ये कुठलाच शेती विम्‍याचा करार झालेला नाही. अर्जदाराचे हे म्‍हणणे की, गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितल्‍यानंतर दावा नामंजूर केल्‍याचे कळले आहे. वास्‍तविक, गैरअर्जदार क्र.1 यांनी दावा नामंजूर केल्‍याचे दिनांक 8.4.2011 चे पत्रान्‍वये कळविले आहे. अर्जदाराचा विमा दावा योग्‍य रितीने फेटाळला असल्‍याने, सेवेमध्‍ये कुठलीही त्रृटी दिलेली नाही. अर्जदार यांनी सदर तक्रार दिनांक 7.9.2016 रोजी दाखल केली आहे. सदर तक्रार मुदतबाहय असून,विलंब माफीकरीता अर्जदार यांनी कोणताही अर्ज सादर केलेला नाही.  अर्जदार यांनी घटना घडल्‍यापासून विहित मुदतीचे आंत विमा म्‍हणजेच 90 दिवसांचे आंत दावा दाखल करणे आवश्‍यक होते. सदरची तक्रार मुदतबाहय असल्‍यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती केली. 

 

4.          गैरअर्जदार क्र.2  ने  नि.क्र.14 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, गैरअर्जदारक्र.1 ने राज्‍य शासनाकडून विमा प्रिमियम स्वि‍कारुन जोखीम स्विकारली असल्‍यामुळे, अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहक आहेत. गैरअर्जदार क्र.2 हे केवळ विमा सल्‍लागार असून, ते विनामोबदला शासनास मदत करतात. मयत  डोनुजी नारायण कंबलवार यांचा अपघात दिनांक 8.8.2010 ला झाला. त्‍याबाबतचा प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र.2 यांना प्राप्‍त झाल्‍यानंतर गैरअर्जदार क्र.1 कडे सादर केला असता अर्जदाराचा दावा गैरअर्जदार क्र.1 यांनी दिनांक 8.4.2011 रोजी नामंजूर केल्‍याचे कळविले आहे. त्‍यामुळे, अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती केली.

 

 

5.          गैरअर्जदार क्र.3  ने  नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, अर्जदाराचा प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र.3 कडे दिनांक 6.9.2010 ला प्राप्‍त झालेला होता. सदर प्रस्‍तावामध्‍ये त्रृटी असल्‍याने दिनांक 16.9.2010 ला प्रस्‍ताव परत करण्‍यात आला होता. त्रृटींची पुर्तता करुन दिनांक 3.11.2010 ला गैरअर्जदार क्र.3 ला प्रस्‍ताव प्राप्‍त झाला. प्राप्‍त प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी, गडचिरोली यांना दिनांक 24.11.2010 ला सादर केलेला होता. परंतु त्‍यामध्‍ये त्रृटी असल्‍याने परत पाठविण्‍यात आला. दिनांक 23.3.2011 ला जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी, गडचिरोली मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडे प्रस्‍ताव सादर करण्‍यात आलेला असून, विमा कंपनीने दिनांक 8.4.2011 ला दावा नामंजूर केल्‍याचे कळविले आहे व त्‍याबाबतची माहिती अर्जदारास देण्‍यात आलेली असल्‍याने, गैरअर्जदार क्र.3 विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती केली.

 

6.          अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1  ने दाखल केलेले तोंडी व लेखी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                       :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे काय ?        :   होय

2)    गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्‍याप्रती सेवेत न्‍युनतापूर्ण       :   होय

व्‍यवहार केला आहे काय ?

3)    अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ   :   होय

मिळण्‍यास पाञ आहे काय ?

4)    आदेश काय ?                                      : अंतिम आदेशाप्रमाणे 

                                                      

- कारण मिमांसा

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-    

 

     

7.          अर्जदाराचे वडीलांचे नावाने नि.क्र.2 नुसार दाखल दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होते की, अर्जदाराच्‍या वडीलांची शेतजमीन होती व आहे. तसेच, अर्जदार हा वडीलांच्‍या आकस्मिक मृत्‍युनंतर शेतकरी जनता अपघात विमा दाव्‍याचा लाभार्थी आहे.  म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

       

 मुद्दा क्रमांक 2 बाबत :-   

 

8.          तक्रारकर्त्‍याच्‍या वडीलांचा मृत्‍यु हा पाण्‍यात पाय घसरुन पडल्‍याने झाला हे पोस्‍टमॉर्टम रिपोर्ट, पोलीसांचे रिपोर्ट तसेच घटनास्‍थळ पंचनामा यावरुन सिध्‍द होत आहे. तसेच ज्‍या वेळेस अर्जदाराच्‍या वडीलांचा मृत्‍यु झाला त्‍यावेळेस शासन परिपत्रकानुसार विमा पॉलीसी लागू होती. त्‍यामुळे, गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे चुकीचे आहे की, विमा पॉलीसी काढलेली नाही. गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात स्‍वतः कथन केले आहे की, पॉलीसीचा कालावधी हा 15.08.2009 ते 14.08.2010 पर्यंत होता व अर्जदाराच्‍या वडीलांचा मृत्‍यु दिनांक 8.8.2010 ला झालेला आहे. गैरअर्जदार क्र.3 च्‍या म्‍हणण्‍यानुसार अर्जदाराचा प्रस्‍ताव दिनांक 6.9.2010 ला प्राप्‍त झालेला होता. यावरुन अर्जदाराने दावा वेळेवर दाखल केलेला असल्‍याचे निदर्शनास येते. तसेच, अर्जदाराने वेळोवेळी ञृटींची पुर्तता केल्‍याचेही निदर्शनास येते. यावरुन गैरअर्जदार क्र.1 चे म्‍हणणे की, करारानुसार क्‍लेम संबंधित कागदपत्रे पॉलीसी संपल्‍यानंतर 90 दिवसांच्‍या आंत न दिल्‍यामुळे नुकसानभरपाई देता येत नाही, हे सारासार चुकीचे आहे. गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे गृहीत धरता येत नाही की, गैरअर्जदाराने दिनांक 8.4.2011 रोजी पाठविलेल्‍या पत्रानुसार दावा फेटाळलेला आहे. कारण सदर पत्र अर्जदारास मिळाल्‍याबाबतचा कोणताही पुरावा गैरअर्जदाराने सादर केलेला नाही. मा.राष्‍ट्रीय आयोग व मा.राज्‍य आयोगाव्‍दारे पारीत अनेक न्‍यायनिवाडयामध्‍ये म्‍हटले आहे की, जोपर्यंत कोणतेही पत्र अर्जदारास मिळत नाही किंवा त्‍याबाबतचा पुरावा दाखल करीत नाही, तोपर्यंत तक्रार मुदतबाहय आहे, हे गृहीत धरता येत नाही.

 

            एकंदरीत, गैरअर्जदाराने शेतक-यांना मिळणा-या लाभापासून त्‍यांना वंचित ठेवण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. गैरअर्जदाराचे सदर कृत्‍य हे न्‍युनतापुर्ण सेवा व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे, असे या न्‍यायमंचाचे मत असल्‍यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

           

मुद्दा क्रमांक 3 बाबत :-

 

9.          मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.3 ने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन अर्जदार हा विमा दाव्‍याचा लाभ घेण्‍यासाठी पात्र आहे, हे सिध्‍द होते व त्‍यानुसार हे मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.

 

 

       - अंतिम आदेश

 

 

(1)

 

(2)

             1,00,000/- दावा दाखल केल्‍यापासून म्‍हणजेच दिनांक 6.9.2010

             पासून, द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह, आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45

             दिवसांत द्यावे.

 

(3)

    त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची

    प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसांत द्यावे.

 

(4)

 

 

 

 

(5)

 

गडचिरोली.

दिनांक – 18.01.2017.

 

 
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.