Maharashtra

Dhule

CC/10/278

Rajendra yashwant Randive dhule - Complainant(s)

Versus

United India Insurance Comany Dhule - Opp.Party(s)

D D joshi

31 Dec 2012

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/10/278
 
1. Rajendra yashwant Randive dhule
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Comany Dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. D. D. Madake PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                             ग्राहक तक्रार क्रमांक    २७८/२०१०


 

                                             तक्रार दाखल दिनांक – १७/०९/२०१०


 

                                             तक्रार निकाली दिनांक – ३१/१२/२०१२


 

 


 

      राजेंद्र यशवंत रणदिवे


 

      उ.व.३५ वर्षे, धंदा - नोकरी,


 

रा.दहिवद ता.शिरपुर जि.धुळे                                         .......तक्रारदार


 

 


 

      विरुध्‍द


 

 


 

युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि.


 

नोटीसीची बजावणी म. शाखाधिकारी,


 

युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि.


 

दिनेश कॉम्‍प्‍लेक्‍स, दुसरा मजला,.                          


 

आग्रारोड, देवपूर,धुळे ता.जि.धुळे.                              ......विरुध्‍द पक्ष


 

 


 

 


 

 


 

कोरम


 

(मा.अध्‍यक्ष – श्री.डी.डी.मडके)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदार तर्फेः- अॅड.डी.डी. जोशी)


 

(विरुध्‍द पक्ष तर्फेः- अॅड.एस.आर. वाणी)


 

                                        


 

नि का ल प त्र


 

 


 

 


 

श्री.डी.डी.मडके, अध्‍यक्षः तक्रारदार यांचा विमा दावा चुकीचे कारण देऊन नाकारून विमा कंपनीने सेवेत त्रृटी केली म्‍हणुन तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

२.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, त्‍यांनी ऑगस्‍ट २००९ मध्‍ये महिंद्र मॅक्‍स २००९ क्रं. MH-18 –W-2191 ही गाडी धुळे येथे खरेदी केली. सदर गाडीचा दि.१९/०८/२००९ ते १८/०८/२०१० या कालावधीसाठी रू.१६,६२०/- भरून विरूध्‍द पक्ष युनाटेड इंडिया इन्‍श्‍ुरन्‍स कंपनी (यापुढे संक्षिप्‍ततेसाठी विमा कंपनी असे संबोधण्‍यात येईल) कडून कॉम्‍प्रीहॅन्‍सीव्‍ह विमा पॉलीसी क्रं.२३०५०२/३१/०९/०१/००००२१९१ घेतली व त्‍यात रू.४,७१,९००/- ची जोखीम विमा कंपनीने स्‍वीकारली.


 

 


 

     तक्रारदार यांनी पुढे असे म्‍हटले आहे की, घरामध्‍ये कोटा फरशी आणणेसाठी त्‍याने त्‍याचा मावसभाऊ भिमा अहिरे व ड्रायव्‍हर गौतम गवळी यांना दि.०५/१२/०९ रोजी कोटा येथे पाठविले होते. त्‍यावेळी दि.०६.१२.०९ रोजी १.३० च्‍या सुमारास निमच गावाजवळ  लघवीसाठी दोघे उतरले असता गाडीतील अज्ञात व्‍यक्‍तीने सदर गाडी चोरून घेवुन निघुन गेला. सदर घटनेची पोलीसांना माहीती देण्‍यात आली व पोलीसांच्‍या सांगणेनुसार बराच शोध घेण्‍यात आला परंतु गाडीचा शोध लागला नाही. त्‍यामुळे पोलीस स्‍टेशन निमच केंट येथे चोरीची फिर्याद देण्‍यात आली. त्‍याची नोंद गुन्‍हा क्रं.५१/१० अन्‍वये घेण्‍यात आली. पोलीसांनीही चौकशी केली परंतु गाडीचा शोध लागला नाही त्‍यामुळे पोलीसांनी मुख्‍य न्‍यायिक मॅजिस्‍ट्रेट निमच (म.प्र) यांचे न्‍यायालयात अहवाल देऊनप्रकरण बंद करणेबाबत विनंती केली व ती न्‍यायालयाने मान्‍य केली.     


 

 


 

४.    तक्रारदार यांनी पुढे असे म्‍हटले आहे की, गाडी चोरी गेल्‍याबाबत त्‍यांनी विमा कंपनीस त्‍वरीत कळवले होते व क्‍लेम्‍ फॉर्म व आवश्‍यक कागदपत्रे देऊन विमा पॉलीसीनुसार रक्‍कम रू.४,७१,९००/- मिळावेत अशी विनंती केली होती. परंतु विमा कंपनीने प्रथम रक्‍कम देण्‍याचे मान्‍य करुन शेवटी दि.१६/०८/२०१० रोजी लेखी पत्र देऊन `Risk is not covered due to negligence of insured’ असे कारण देऊन विमा दावा नामंजुर केला.


 

 


 

५.    तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीकडुन गाडीची किंमत रू.४,७१,९००/- व जानेवारी २०१० पासून त्‍यावर १२% दराने व्‍याज, मानसीक त्रासापोटी रम.२५,०००/- व अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे. 


 

 


 

६.    तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयार्थ नि.३ वर शपथपत्र तसेच नि.५ वरील कागदपत्रांच्‍या यादीनुसार ६ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्‍यात नि.५/१ वर विमा पॉलीस, नि.५/२ वर एफ.आय.आर. ची प्रत, नि.५/३ वर घटनास्‍थळ पंचनामा, नि.५/४ वर मुख्‍य न्‍यायीक मॅजीस्‍ट्रेट यांचा आदेश, नि.५/५ वर क्‍लेम फॉर्म व नि.५/६ वर विमा दावा नाकारल्‍याचे पत्र दाखल केले आहे.


 

 


 

     विमा कंपनीने आपले लेखी म्‍हणणे नि.१२ वर दाखल करून तक्रारदार यांची तक्रार अमान्‍य करून ती रदद करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे. विमा कंपनीने पुढे असे म्‍हटले आहे की, विमा दावे विमा करारातील अटी व शर्तीनुसार निकाली काढले जातात त्‍याच्‍या बाहेर जाऊन व तक्रारदारांच्‍या इच्‍छेनुसार निकाली काढले जाऊ शकत नाही.


 

 


 

     विमा कंपनीने पुढे असे म्‍हटले आहे की, तक्रारदार यांच्‍या दाव्‍या संदर्भात श्री. प्रभाकर पाटील धुळे यांना चौकशी करण्‍यासाठी नियुक्‍त करण्‍यात आले होते. त्‍यांच्‍या अहवालानुसार तक्रारदार यांनी भिमा अहीरे व ड्रायव्‍हर गौतम गवळी यांना बांधकामाचे साहित्‍य खरेदीसाठी पाठवले होते. ते दोघे शिरपुर येथुन ०५/१२/०९ रोजी ८.३० वाजता डीझेल भरून निघाले. त्‍यावेळी अज्ञात व्‍यक्‍तीने लिफट मागितली व तो गाडीत बसला. दुसरे दिवशी निमच शहरात ड्रायव्‍हर व अहिरे लघवीसाठी खाली उतरले परंतु त्‍यांनी गाडीची चावी तशीच ठेवली. त्‍याचा फायदा घेऊन गाडीतील अज्ञात इसम गाडी घेऊन निघुन गेला.


 

 


 

९.    विमा कंपनीने पुढे असे म्‍हटले आहे की, गाडीतुन उतरताना ड्रायव्‍हरने गाडीची चावी काढुन घेणे आवश्‍यक होते. त्‍याने चावी तशीच ठेऊन निष्‍काळजीपणा केला व त्‍याच्‍या निष्‍काळजीपणामुळे गाडी चोरीस गेली. विमा करारानुसार गाडीची काळजी घेणे आवश्‍यक असताना ड्रायव्‍हरने चावी तशीच ठेवली व गाडी चोरी गेली. सदर कृत्‍य विमा कराराचा भंग आहे व त्‍यामुळे विमा रक्‍कम देण्‍यास विमा कंपनी जबाबदार नाही. विमा कंपनीने योग्‍य विचाराअंती विमा दावा नाकारला आहे व तसे पत्र तक्रारदारास दिले आहे. यात कुठल्‍याही प्रकारे सेवेत त्रृटी केलेले नाही.


 

 


 

१०    विमा कंपनीने शेवटी तक्रारदार यांची तक्रार रदद करावीव कॉस्‍ट रू.५०००/- त्‍यांना देण्‍याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे.


 

 


 

११.   तक्रारदार यांनी नि.१२ वर शपथपत्र दाखल करून तक्रारदार यांचा खुलासा चुकीचा आहे व तक्रार मंजुर करावी असे म्‍हटले आहे.


 

 


 

१२.   तक्रारदार यांची तक्रार विमा कंपनीचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.


 

 


 

मुद्दे                                                                    उत्‍तर


 

 


 

१. तक्रारदार यांचा विमा दावा नाकारून                                              


 

   विमा कंपनीने सेवेत त्रृटी केली आहे काय?                                  होय.


 

३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे?                अंतिम आदेशा प्रमाणे.


 

४. आदेश काय?                                                  खालील प्रमाणे.


 

 


 

विवेचन


 

१३.   मुद्दा क्र.१- तक्रारदार यांच्‍या महिंद्रा मॅक्‍स गाडीचा विमा उतरवण्‍यात आला होता व सदर विमा कालावधीत गाडी अज्ञात व्‍यक्तीने चोरून नेली याबाबत काहीही वाद नाही. तक्रारदार यांनी गाडीचोरी गेल्‍यामुळे विमा दाखल केला असता विमा कंपनीने दि.१६.०६.१० रोजी पत्र देऊन तो नाकारला. त्‍यात त्‍यांनी `Risk is not covered due to negligence of insured’


 

 


 

१४. तक्रारदार यांनी आपल्‍या युक्‍तीवादात गाडी लघवीसाठी उभी करून ड्रायव्‍हर व त्‍याचा भाऊउतरले व त्‍यावेळी गाडी चोरी झाली, त्‍यावेळी गाडी त्‍यांच्‍या समक्ष उभी असल्‍यामुळे व लघवीसाठी लागणारा वेळ पाहता गाडी चोरीला जाऊशकते अशी शंका आली नाही. त्‍यामुळे गाडीची काळजी घेतली नाही असे म्‍हणता येणार नाही असे म्‍हटले आहे. विमा कंपनीचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनीही सदर बाब नमुद केली आहे परंतु गाडीची चावी न काढुन घेऊननिष्‍काळजीपणा केला आहे असे अहवालात नमुद केले आहे व विमा कंपनीने त्‍याआधारेच दावा नाकारला आहे. 


 

 


 

१५.  आम्‍ही दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. त्‍यावरून असे दिसुन येते की तक्रारदार यांच्‍या ड्रायव्‍हर व मावसभाऊ अहिरे यांनी गाडीमध्‍ये अज्ञात व्‍यक्‍तीस लिफट दिली होती व तो रात्रभर त्‍यांच्‍यासोबत प्रवास करत होता. दि.०६/१२/०९ रोजी १.३० वाजता म्‍हणजे तब्‍बल १७ तास सोबत असलेली व्‍यक्‍ती गाडी चोरून नेऊशकेल अशी शंका येण्‍यास बीलकुल वाव नव्‍हता. तसेच गाडी डोळयासमोरच उभी राहणार असल्‍यामुळे लघवीला जाताना त्‍याची चावी काढणे आवश्‍यक होते असे म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचे ड्रायव्‍हरने गाडीची व्‍यवस्‍थीत काळजी घेतली नाही असे म्‍हणता येणार नाही.


 

 


 

१६.   या संदर्भात आम्‍ही मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी IV(2010)CPJ297, नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. विरूध्‍द कमल सिंघल या न्‍यायीक दृष्‍टांताचा आधार घेत आहोत. त्‍यात पुढील प्रमाणे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे.


 

 


 

Repudiation of claim made by Insurance Company was also found to be invalid for the reason that since driver was not expected to carry key of the vehicle with him while getting down from the vehicle answer nature’s call. Particularly, when the vehicle was within his sight. We too, concur with the finding of Fora below about there being no clinching evidence suggesting violation of condition 3(A) & 4 of the policy authorizing the insurance company to defeat genuine claim of the insured.


 

 


 

१७.   शिवाय मा.सर्वोच्‍च न्‍यायालय, मा.राष्‍ट्रीय आयोग व मा.महाराष्‍ट्र राज्‍य आयोग यांनी अनेक न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये तांत्रिक कारणे देवून विमा दावे नाकारु नयेत असे मत व्‍यक्‍त केले आहे. यासंदर्भात आम्‍ही खालिल न्‍यायिक दृष्‍टांत विचारात घेत आहोत.


 

 


 

(1)   मा.सर्वोच्‍च न्‍यायालय 2010 CTJ 485 Amalendu Sahoo V/s Oriental Insurance Co.Ltd. 


 

(2)   मा.सर्वोच्‍च न्‍यायालय B.V.Nagaraju V/s M/S.Oriental Insurance Co.Ltd.Divisional Office Hassan 1996 (2) T.A.C.429 (S.C.)


 

(3)   मा.सर्वोच्‍च न्‍यायालय National Insurance Company Ltd. V/s Nitin Khandelwal 2008 CTJ 680.


 

 


 

 


 

१८.   वरिल विवेचनावरुन व न्‍यायीकदृष्‍टांमध्‍ये दिलेले तत्‍व पाहता विमा कंपनीने विमा दावा नाकरून सेवेत त्रृटी केली या मतास आम्‍ही आलो आहोत. म्‍हणुन मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

१९.  मुद्दा क्र.२- तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून पॉलीसीनुसार जोखीम स्‍वीकारलेनुसार रक्‍कम रू.४,७१,९००/- व त्‍यावर जानेवरी २०१० पासुन द.सा.द.शे. १२% दराने व्‍याज, मानसीक त्रासापोटी रू.२५०००/- व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांची गाडी १९.०८.०९ रोजी खरेदी केलेली असल्‍यामुळे व चोरी दि.०६/१२/०९ रोजी झालेली असल्‍यामुळे घसारा कमी करता येणार नाही परंतु मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी IV(2010)CPJ297, नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. विरूध्‍द कलम सिघल या न्‍यायीक दृष्‍टांतामध्‍ये नमुद केल्‍यानुसार नॉन स्‍टॅंण्‍डर्ड तत्‍वावर एकूण रक्‍कमेच्‍या ७५% रक्‍कम रू.३,५३,९२५/- व त्‍यावर विमा दावा नाकारल्‍याची तारीख दि.१६/०८/१० पासून द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च झालेला असल्‍यामुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.३०००/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रु.२०००/- मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे.


 

 


 

२०.   मुद्दा क्र.३-  वरिल विवेचनावरून आम्‍ही खलील प्रमाणे आदेश देत आहोत.


 

 


 

आ दे श


 

 


 

१.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.


 

२.    युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनीने तक्रारदार यांना रक्‍कम रू.३,५३,९२५/-


 

      व त्‍यावर विमा दावा नाकारल्‍याची दि.१६/०८/२०१० पासुन द.सा.द.शे. ९% दराने व्‍याज


 

      या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसांचे आत दृावेत.


 

३.    युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनीने तक्रारदार यांना मानसीक त्रासापोटी रू.३०००/- व


 

      तक्रार अर्जाचा खर्च रू.२०००/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन ३० दिवसाचे आत दृावेत.


 

 


 

 


 

    


 

 


 

                (सौ.सुधा जैन)                         (श्री.डी.डी.मडके)


 

                      सदस्‍या                                अध्‍यक्ष


 

                      जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MR. D. D. Madake]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.