Maharashtra

Jalgaon

CC/10/374

Sunandabai D. Patil - Complainant(s)

Versus

United India Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

Adv Trivedi

17 Apr 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/10/374
 
1. Sunandabai D. Patil
At- Janve Tq- Amalner.
Jalgaon
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co.Ltd
Jalgaon
Jalgaon
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vishwas D. Dhawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Poonam N.Malik MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर.
                        तक्रार क्रमांक 374/2010
                        तक्रार दाखल तारीखः-   08/03/2010
                        तक्रार निकाल तारीखः-   17/04/2013
 
1.     सुनंदाबाई देवराम पाटील,                          ..........तक्रारदार
उ व3,धंदा घरकाम,
2.    कल्‍पेश देवराम पाटील,
      उ व 9,धंदा शिक्षण,
3.    दिपमाला देवराम पाटील,
      उ व 7, धंदा शिक्षण
      अर्जदार नं. 2 व 3 ची अ.पा.क.आई
      अर्जदार नं. 1. आहे.
सर्व रा.मु.पो.जानवे ता.अमळनेर जि.जळगांव.
 
            विरुध्‍द
 
1.         युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि,                  .....सामनेवाला.
      मानसिंग मार्केट, दुसरा मजला, रेल्‍वे स्‍टेशन जवळ,
जळगांव.
सामनेवालेचे समन्‍स/नोटीस डिव्‍हीजनल मॅनेजर,
      बजविण्‍यात यावी)
                        कोरम
                     श्री.विश्‍वास दौ.ढवळे.               अध्‍यक्ष.
                     श्रीमती.मनिष बी.वानखेडे.            सदस्‍य.
                     श्रीमती.पुनम नि. मलिक.            सदस्‍या.
                                               --------------------------------------------------
                        तक्रारदार तर्फे अड.ओम.बी.त्रिवेदी.
                        सामनेवाला तर्फे अड.एस.बी.अग्रवाल.
                                 नि का ल प त्र
 
श्रीमती.पुनम नि.मलिक.सदस्‍या..  ः  सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा रक्‍कम मंजूर न करुन सेवेत त्रुटी केली म्‍हणुन तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
 
            तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार ही मयत देवराम खंडु पाटील रा.जानवे ता.अमळनेर जि.जळगांव यांची विधवा पत्‍नी असुन तक्रारदार नं. 2 व 3 ही मयताची अज्ञान मुले आहेत.   मयत देवराम खंडु पाटील यांनी सामनेवाला विमा कंपनीकडुन अपघाती विमा रक्‍कम रु.1,00,000/- चा काढला होता, त्‍याचा पॉलिसी क्र.230500/47/09/5100000104 असा आहे. मयत देवराम खंडू पाटील हे दि.22/06/2009 रोजी सकाळी 10.00 च्‍या सुमारास त्‍यांचे घरासमोरील मोठया निंबाच्‍या झाडाखाली सावलीमध्‍ये ओटयावर खाट टाकून झोपले होते. त्‍याठिकाणी देवराम खंडु पाटील यांच्‍या उजव्‍या पायाचे घोटयाजवळ सापाने चावा घेतला. त्‍यानंतर देवराम खडू पाटी यांना ताबडतोब अमळनेर येथे दवाखान्‍यात नेतांना रस्‍त्‍यातच देवराम खंडु पाटील यांचा मृत्‍यु झाला. 
 
                        त्‍यांनतर मयताचे भाऊ जयराम खंडु पाटील यांनी अमळनेर पोलिस स्‍टेशनला खबर दिली. त्‍यानुसार अपघाती मृत्‍यु रजि.क्र.46/09 प्रमाणे पोलिस स्‍टेशनला नोंद झाली आहे. पोलिस स्‍टेशन अमळनेर यांनी मयताचा मरणोत्‍तर पंचनामा केला व घटनास्‍थळ पंचनामा केला. त्‍यानंतर मयताचा शवविच्‍छेदन केल्‍यानंतर मयताचा मृत्‍यु हा सर्प दंशाने झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली व मयताच्‍या मृत्‍यु बाबत आकस्‍मात म्‍हणुन रजि.क्र.46/09 नोंद केली आणि समरी मंजुर होण्‍यासाठी उपविभागीय अधिकारी,अमळनेर यांचेकडे अहवाल पाठविला. तदनंतर उपविभागीय अधिकारी अमळनेर यांनी परिस्‍थीती व कागदपत्र अवलोकनाअंती कै.देवराम खंडु पाटील यांचा मृत्‍यू साप चावल्‍याचे कारणास्‍तव झाला असे मत नोंदवून त्‍याबाबत अकस्‍मात मृत्‍यु म्‍हणुन आदेश कायदेशिर तरतुदीप्रमाणे केली. त्‍यानंतर मयताने विमा कंपनीकडे विमा काढलेला असल्‍यामुळे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी तक्रारदार क्र.1 हीने क्‍लेम फॉर्म, पॉलिसीची प्रत, मयताचे मृत्‍यु संबंधीसंपुर्ण कागदपत्र, पोलिस स्‍टेशनला दिलेली खबर, मरणोत्‍तर पंचनामा, घटनास्‍थळ पंचनामा, उपविभागीय अधिकारी यांचे आदेश इ.कागदपत्र सादर केले. त्‍यानंतर दि.07/01/2010 रोजीचे सामनेवाला यांनी त्‍यांचे पत्रानुसार तक्रारदार यांचा विमा क्‍लेम खोटे कारण देवुन नामंजुर केला. सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा क्‍लेम न देवून सेवेत त्रुटी केली म्‍हणुन तक्रारदार हीने सामनेवालाकडुन विम्‍याचे रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर द.सा.द.शे.12 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळावे व शारिरीक व आर्थीक त्रासापोटी रु.25,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
            सदर प्रकरणांमध्‍ये सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. त्‍यांना नोटीस मिळुन ते मंचात हजर झाले व आपला लेखी खुलासा सादर केला. त्‍याचे म्‍हणणे असे की, तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील म्‍हणणे व मागणे खोटे व लबाडीचे आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, पोष्‍ट मार्टम करणा-या डॉक्‍टरांनी  पोष्‍ट मार्टम रिपोर्ट मध्‍ये नमुद केलेले मत हे अंतीम नाही. मयताचा मृत्‍यु सर्पदंशामुळे झाला किंवा काय याबाबत अंतीम मत मिळावे म्‍हणुन मेडिकल ऑफिसर, रुरल हॉस्‍पीटल,अमळनेर यांनी मयताचे पोटाचे भाग,लहान आतडयाचे भाग, लिव्‍हर,किडनी, स्पिलीनचे भाग तपासणीकरीता रिजनल फोरॅन्‍सीक सायन्‍स लॅबोरेटरी, स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र, पंचवटी, नाशिक यांच्‍याकडे पाठविले होते व त्‍या शाररीक भागांची रिजनल फोरॅन्‍सीक सायन्‍स लॅबोरेटरी, स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र,पंचवटी, नाशिक यांनी तपासणी केली असता त्‍यांना कुठलेही विष त्‍यात आढळुन आले नाही. त्‍याबाबतचे दि.06/11/2009 तारखेचे रिझल्‍ट ऑफ अनॅलेसीस रिजनल फोरॅन्‍सीक सायन्‍स लॅबोरेटरी, स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र पंचवटी,नाशिक यांनी मेडिकल ऑफीसर, रुरल हॉस्‍पीटल,अमळनेर यांना पा‍ठविले होते. वरील कारणांमुळे मयताचा मृत्‍यु सर्पदंशामुळे झाल्‍याचे निष्‍पन्‍न झालेले नाही, सबब मयताचा मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु या सदरात मोडत नाही. त्‍यामुळे सदरहु विमा कंपनी तक्रारदारांना काही एक रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाही, असे म्‍हटले आहे. तक्रारदार यांनी केलेली इतर सर्व विपरीत विधाने सामनेवाला यांनी नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा.
तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा व युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर व दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍या समोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
            मुद्ये                                             उत्‍तर.
1.     तक्रारदारास विमा क्‍लेमची रक्‍कम न देवुन सामनेवाला
यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय?                          होय.  
2.    आदेश काय                                    खालीलप्रमाणे.
मुद्या क्र. 1 व 2 - सदर प्रकरणांमध्‍ये कै.देवराम खंडु पाटील यांनी सामनेवाला विमा कंपनीकडुन अपघाती विमा रक्‍कम रु.1,00,000/- चा काढला होता, त्‍याचा पॉलिसी क्र.230500/47/09/5100000104 असा आहे. कै. देवराम खंडू पाटील हे दि.22/06/2009 रोजी सकाळी 10.00 च्‍या सुमारास त्‍यांचे घरासमोरील मोठया निंबाच्‍या झाडाखाली सावलीमध्‍ये ओटयावर खाट टाकून झोपले होते. त्‍याठिकाणी कै.देवराम खंडु पाटील यांच्‍या उजव्‍या पायाचे घोटयाजवळ सापाने चावा घेतला. त्‍यानंतर देवराम खडू पाटील यांना ताबडतोब अमळनेर येथे दवाखान्‍यात नेतांना रस्‍त्‍यातच देवराम खंडु पाटील यांचा मृत्‍यु झाला. मयताचे भाऊ जयराम खंडु पाटील यांनी अमळनेर पोलिस स्‍टेशनला खबर दिली. त्‍यानुसार अपघाती मृत्‍यु रजि.क्र.46/09 प्रमाणे पोलिस स्‍टेशनला नोंद करण्‍यात आली. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांनी परिस्‍थीती व कागदपत्र अवलोकनाअंती कै.देवराम खंडु पाटील यांचा मृत्‍यू साप चावल्‍याचे कारणास्‍तव झाला असे मत नोंदवून कायदेशिर आदेश केला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे सर्व कागदपत्रांसह विमा क्‍लेम दाखल केला. परंतु सामनेवाला यांनी दि.07/01/2010 रोजी खोटे कारण देवुन विमा क्‍लेम नामंजुर केला.   सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये असा आक्षेप घेतला की, मयताचा पोष्‍ट मार्टम करणा-या डॉक्‍टरांनी पोष्‍ट मॉर्टेम रिपोर्ट मध्‍ये नमुद केलेले मत हे अंतीम नाही, परंतु तक्रारदार यानी दाखल केलेले पोष्‍ट मॉर्टेम रिपोर्ट मध्‍ये अनुक्रमांक 9 मध्‍ये मयतास सपदंर्श झाल्‍याचे ठसे आहेत असे स्‍पष्‍टपणे म्‍हटले आहे. तसेच पोष्‍ट मॉर्टेम रिपोटमधील अनुक्रमांक 23 मध्‍ये मयतास ( The deiesed deoram khandu patil died due to cardio resperity failure due to snake bite) सर्पदंश झाल्‍याने त्‍याला हार्ट अटॅक आला. त्‍यामुळे त्‍याचा मृत्‍यू झाला ही बाब प्रथमदर्शनी दिसुन येते.  तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या रिजनल फोरॅन्‍सीक सायन्‍स लॅबोरेटरी, स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र पंचवटी,नाशिक यांनी दिलेल्‍या तपासणी अहवालामध्‍ये मयताच्‍या शरीराच्‍या अवयवामध्‍ये कुठलेही रासायनिक विष आढळुन आलेले नाही असा उल्‍लेख केलेला आहे. परंतु सदरच्‍या अहवालात सापाचे विष (Snake Venom) असले किंवा नसल्‍याबाबत काहीही उल्‍लेख दिसुन येत नाही. त्‍यामुळे सदरचा अहवाल हा या प्रकरणी ग्राहय धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
      या संदर्भात आम्‍ही 2005 All MR (Journal)27, महाराष्‍ट्र राज्‍य आयोग, मुंबई, लक्ष्‍मण माणीकराव गव्‍हाणे आणि इतर विरुध्‍द ब्रँच मॅनेजर, दि.युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. या न्‍यायिक दृष्‍टांताचा आधार आम्‍ही घेत आहोत. सदरहू न्‍यायिक दृष्‍टांतामधील अनुक्रमांक 10 मध्‍ये खालिल प्रमाणे तत्‍व विषद केलेले आहे.
      The Distric Forum is very much impressed by the negative findings recorded by the Chemical Analyser.   The Venom was not detected in the Viscera. The District Forum ignored the best possible evidence and attached too much importance to the Report of Chemical Analyser. Death due to snake bite need not be proved beyond reasonable doubt.
 
      It is common knowledge that from variety of reasons poison may not be detected during analysis of the Viscera. If death is from poison even though the Chemical analyzer failed to detect poison in the Viscera the Judge is required to take in to consideration the symptoms, Postmortem appearance and moral (sic) evidence. In the case in hand, the Medical Officer attached to the primary Health Centre, Newasa had noticed marks of snake bite on the right forearm of Mangala. He diagnosed the case as snake bite. Similar kind of entries are also found in the case papers, which were prepared in the primary Health Centre, Newasa. The inquest panchanama would reveal that there were marks of snake bite on the right forearm of the dead body of mangala. The Postmortem Report would go to show that the marks of snake bite were noticed on the right forearm at the time of postmortem examination of the dead body. Having tested this material on the touchs lone of probability, there is irresistible conclusion that the death occurred due to snake bite.   The complainants have successfully established that death of mangala was due to snake bite.       
या प्रकरणांस सदरील न्‍यायिक दृष्‍टांमध्‍ये केलेले  तत्‍व विषद लागु होते. या तक्रारदाराच्‍या प्रस्‍तुत प्रकरणांत पोष्‍ट मॉर्टेम अहवालामध्‍ये मयताच्‍या शरीरावर साप चावल्‍याचे खुण असल्‍याचे स्‍पष्‍ट नमुद केलेले आहे. म्‍हणून मयताचा मृत्‍यु हा सपदंशाने झाल्‍यामुळे अपघाती मृत्‍यु झाला असे आमचे मत झालेले आहे. मयताने सामनेवाला यांचेकडे अपघाती विमा काढलेला होता. त्‍यासबंधात मयताचे वारस म्‍हणजे त्‍यांची पत्‍नी तक्रारदार हीने सामनेवाला यांचेकडे विम्‍याचे फायदे मिळण्‍याकरीता मागणी केलेली विमा रक्‍कम न देवून सामनेवाला यांनी सेवेत कसुर केलेला आहे या मतास आम्‍ही आलेलो आहोत. म्‍हणुन मुद्या क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.
      तक्रारदार यांनी सामनेवालाकडुन विम्‍याचे रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर द.सा.द.शे.12 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळावे व शारिरीक व आर्थीक त्रासापोटी रु.25,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. आमच्‍य मते तक्रारदार विम्‍याचे रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर तक्रार दाखल तारीख दि.08/03/2010 पासुन द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चापोटी रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत.
वरील विवेचनावरुन आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
                            आदेश.
1.     तक्रारदाराची तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येतो.
2.    सामनेवाला युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि यांनी तक्रारदार यांना विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- आदेशापासुन 30 दिवसांत द्यावे.  
3.    सामनेवाला युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चा पोटी रु.3,000/- आदेशापासुन 30 दिवसांत द्यावे. सामनेवाल यांनी वरील रक्‍कम 30 दिवसांच्‍या आंत न दिल्‍यास त्‍यावर तक्रार दाखल तारीख दि.08/03/2010 पासुन द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याजतो द्यावे.
4.    सदरील आदेशाची प्रत उभयपक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.
 
 
    (श्री.विश्‍वास दौ.ढवळे)    (श्री.मनिष बी.वानखेडे)    (श्रीमती.पुनम नि.मलिक)
          अध्‍यक्ष                सदस्‍य                सदस्‍या
                               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव.
 
 
[HON'ABLE MR. Vishwas D. Dhawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Poonam N.Malik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.