Maharashtra

DCF, South Mumbai

CC/09/321

Smt.Roshan madan - Complainant(s)

Versus

United India Insurance co.ltd. - Opp.Party(s)

M/s A & A Law

31 Jul 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/09/321
 
1. Smt.Roshan madan
T1,Cusrow baug, S.B.Singh Road,
Mumbai-01
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance co.ltd.
D.O.No.14,mehta house,3rd floor,Mumbai samchar marg,
mumbai-01
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE PRESIDENT
  Shri S.S. Patil , HONORABLE MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष

1) ग्राहक वाद संक्षिप्‍त स्‍वरुपात खालील प्रमाणे -  
    तक्रारदार हया 75 वर्षाच्‍या जेष्‍ठ नागरिक असून त्‍यांनी सामनेवाला यांचेकडून तक्रारअर्जात खालीलप्रमाणे नमूद केलेल्‍या एकूण तीन मेडिक्‍लेम पॉलिसी घेतल्या.
Sr.No.
Period
Policy No.
1
27/03/2007 to 26/03/2008
021400/48/06/20/00004204
2
27/03/2008 to 26/03/2009
021400/48/07/97/00003651
3
27/03/2009 to 26/03/2010
021400/48/08/20/00003980


 त्या पॉलिसीसाठी तक्रारदारांनी सामनेवाला यांना प्रिमियम म्‍हणून पॉलिसीत नमूद केलेल्‍या रकमा दिल्‍या. त्‍या पॉलिसीमध्‍ये तक्रारदारांना 5 लाख रुपये आश्‍वासित रक्‍कम देण्‍यात आली होती. वरील पॉलिसी घेण्‍यापूर्वी तक्रारदारांना कोणताही आजार नव्‍हता. तसेच वरील पॉलिसीच्‍या कालावधीत त्‍यांनी कोणताही क्‍लेम सामनेवाला यांचेकडे दाखल केला नाही. मार्च, 2008 मध्‍ये सामनेवाला यांनी तक्रारदारांना पॉलिसीचे नुतनीकरण करणेसाठी नोटीस पाठविली. सदरच्‍या नोटीसमधील मजकूर वाचल्‍यानंतर तक्रारदारांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला कारण सामनेवाला यांनी एकतर्फा मेडिक्‍लेम पॉलिसीच्‍या अटी व शर्तींत बदल करण्‍याचा निर्णय घेतला होता. वास्‍तविक मार्च, 2008 मध्‍ये पूर्वीच्‍याच पॉलिसीचे त्‍याच अटी व शर्तींवर नुतणीकरण करायचे होते. सामनेवाला यांनी पॉलिसीच्‍या अटीशर्तीमध्‍ये जे बदल नमूद केले होते ते विमाधारकाच्‍या हिताच्‍या विरुध्‍द होते. मेडिक्‍लेम पॉलिसीमध्‍ये ‘नो क्‍लेम बोनस’ विमाधारकास देण्‍यात आला होता तो नो क्‍लेम बोनस नवीन पॉलिसीध्‍ये देण्‍यात आला नव्‍हता. नवीन पॉलिसीमधील काही अटी व शर्ती हया पॉलिसीच्‍या मूळ हेतूस बाधक होत्‍या. सामनेवाला यांनी प्रिमिअमच्‍या रक्‍कम रु.12,636/- मध्‍ये वाढ करुन ती रक्‍कम रु.21,772/- केली. प्रिमियमच्‍या रकमेत करणेत आलेली वाढ ही 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त होती. तसेच नवीन पॉलिसीमध्‍ये काही आजारांसाठी दिलेले विमा संरक्षण काढून घेण्‍यात आले होते. तक्रारदारांना नो क्‍लेम बोनस म्‍हणून दिलेली रु.1,50,000/- ही रक्‍कम काढून घेणेत आलेली होती. तथापि, आश्‍वासित रक्‍कम रु.5 लाख तेवढीच ठेवणेत आली होती.
 

2) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी दि.08/03/08 रोजी त्‍यांचे गा-हाणे सामनेवाला यांचे मॅनेजर व ग्रिव्‍हन्‍स डिपार्टमेंट यांना पत्र पाठवून कळविले. परंतु सामनेवाला यांचेकडून सदर पत्रास कसलाही प्रतिसाद दिला मिळाला नाही. तक्रारदारांनी त्‍यानंतर दि.07/06/08 व 02/01/09 रोजी सामनेवाला यांना स्‍मरणपत्र पाठवून सुध्‍दा सामनेवाला यांनी त्‍यासही उत्‍तर पा‍ठविले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांना पॉलिसी नुतनीकरण करणेसाठी नोटीस पाठविली त्‍यामध्‍ये तक्रारदारांना देणेत आलेली रक्‍कम रु.5 लाखाहून रु.4 लाख करणेत आली व तसेच प्रिमिअमची रक्‍कम रु.21,772/- ची 21,902/- अशी करणेत आली. तक्रारदारांनी त्‍याबाबत दि.06/03/09 रोजी पत्र पाठविले असताना सुध्‍दा त्‍यास सामनेवाला यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. 
 
3) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे मेडिक्‍लेम पॉलिसीच्‍या अटी व शर्तींमध्‍ये एकतर्फा विमाधारकाच्‍या हितास बाधा येईल असे बदल करणे ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता असून सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे म्‍हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता असून सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असे तक्रारदारांचे म्‍हणणे आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.1,50,000/- व्‍याजासहीत दयावेत असा सामनेवाला यांना आदेश द्यावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी त्‍यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.50,000/- व या अर्जाच्‍या खर्चासाठी रु.15,000/- ची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रांच्‍या प्रती तक्रारदारांनी दाखल केल्‍या आहेत.
 
4) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्‍य केली. सामनेवाला विमा कंपनीस आय.आर.डी.च्‍या मार्गदर्शकाखाली काम करावे लागते. आय.आर.डी.ए.चे नियम व मार्गदर्शक तत्‍वे सामनेवाला विमा कंपनीवर बंधनकारक आहेत. पॉलिसीसंबंधी आय.आर.डी.ए.च निर्णय घेत असून तिचा निर्णय सामनेवाला यांचेवर बंधनकारक असतो.
 
5) तक्रारदारांनी सन 2007-08 मध्‍ये सामनेवाला यांचेकडून मेडिक्‍लेम पॉलिसी घेतली ती पॉलिसी दि.27/03/07 ते 26/03/08 या कालावधीसाठी होती. सदर पॉलिसीध्‍ये तक्रारदारांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण व कम्‍युलेटीव्‍ह बोनस रु.1,50,000/- देण्‍यात आला होता व त्‍यावर प्रिमियम म्‍हणून रक्‍कम रु.12,836/- आकारणेत आले होते. सामनेवाला विमा कंपनीच्‍या मुख्‍य कार्यालयाच्‍या परिपत्रकाप्रमाणे दि.27/03/08 पासून मेडिक्‍लेम पॉलिसीच्‍या ऐवजी इन्‍डीव्‍हयूजूअल हेल्‍थ पॉलिसी सुरु करणेत आली. बदललेल्‍या इन्‍डीव्‍हूजूअल इन्‍शुरन्‍स पॉलिसीखाली तक्रारदारांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण देणेत आले. तथापि, क्‍युम्‍युलेटीव्‍ह बोनस रद्द करणेत आला. क्‍युम्‍युलेटीव्‍ह बोनस रद्द केल्‍यामुळे तक्रारदारांना प्रिमियममध्‍ये 20 टक्‍के सवलत देणेत आली. तक्रारदारांकडून एकूण प्रिमियम म्‍हणून रु.17,418/- वसुल करणेत आली. तक्रारदारांनी सन् 2009-2010 सालासाठी पॉलिसीचे नुतनीकरण केले त्‍यावेळी त्‍यांनी प्रिमियमचा धनादेश आश्‍वासित रक्‍कम रु.4 लाखासाठी दिला त्‍यामुळे सामनेवाला यांनी नवीन पॉलिसीमध्‍ये आश्‍वासित रक्‍कम रु.4 लाख नमूद करण्‍यात आली. तसेच क्‍युम्‍युलेटीव्‍ह बोनस रु.1 लाख पॉलिसीत नमूद करण्‍यात आले. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या मुख्‍यः कार्यालयाने दि.26/06/07 रोजी पाठविलेल्‍या परिपत्रकाची छायांकीत प्रत कैफीयतसोबत दाखल केली असून सदरचे परिपत्रकाला आय.आर.डी.ए.ने मान्‍यता दिली असे म्‍हटले आहे. 
 
6) सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या सेवेत कसलीही कमतरता नसून त्‍यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला नाही. तक्रारअर्जात केलेले सर्व आरोप सामनेवाला यांनी नाकारले आहेत. पॉलिसीमध्‍ये केलेले बदल आय.आर.डी.ए.च्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार केलेले असून सामनेवाला यांनी स्‍वतःहून कोणतेही बदल केलेले नाहीत परंतु केलेले बदल हे आय.आर.डी.ए.च्‍या सुचनेप्रमाणे व मार्गदर्शक तत्‍वानुसार केलेले असल्‍यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करणेस पात्र आहे. कैफीयतच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांचे सिनियर डिव्‍हीजनल मॅनेजर, श्री.पी.आर. हिंगर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 
 
7) तक्रारदारांनी दि.17/09/10 रोजी तक्रारअर्जात दुरुस्‍तीचा अर्ज दाखल केला. त्‍यावर सामनेवाला यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल करुन त्‍यास हरकत घेतली. तक्रारदारांच्‍या प्रतिनिधीने तक्रार दुरुस्‍तीच्‍या अर्जाची चौकशी मुळ तक्रारअर्जासोबत करावी अशी विनंती केली व त्‍यास सामनेवाला वकीलांनी सहमती दिली.
 
8) तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला तसेच सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदारांच्‍या वतीने त्‍यांचे अधिकृत प्रतिनिधी श्री. होमीयार मदन व सामनेवाला यांचेतर्फे वकील श्री.जे.डी.कारंजकर यांचा तोंडी युक्तिवाद ऐकणेत आला.
 
9) तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केल्‍याप्रमाणे दि.27/03/09 रोजी सामनेवाला यांचेकडून त्‍यांनी मेडिक्‍लेम पॉलिसी घेतली होती व सदर पॉलिसी दि.26/03/08 पर्यंतच्‍या कालावधीसाठी होती. त्‍यानंतर रेग्‍यूलर प्रिमियम भरुन तक्रारदारांनी त्‍या पॉलिसीचे दोन वेळा नुतनीकरण केले होते ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तक्रारदारांना दि.27/03/07 रोजी दिलेल्‍या इन्‍डीव्‍हूज्‍युअल पॉलिसीमध्‍ये आश्‍वासित रक्‍कम रु.5 लाख देणेत आली होती व क्‍युम्‍युलेटीव्‍ह बोनसची रक्‍कम रु.1,50,000/- देणेत आली होती. सामनेवाला यांनी तक्रारदार दि.27/03/08 ते 26/03/09 या कालावधीसाठी इन्‍डीव्‍युज्‍युअल पॉलिसी दिली होती. या पॉलिसीमध्‍ये आश्‍वासित रक्‍कम रु.5 लाख देणेत आली होती व त्‍याचे प्रिमियम म्‍हणून रक्‍कम रु.12,636/- आकारणेत आली होती. या पॉलिसीच्‍या अटी व शर्ती इन्‍डीव्‍युज्‍युअल मेडिक्‍लेम पॉलिसीच्‍या अटी व शर्तींपेक्षा काहीशा वेगळया होत्‍या. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी स्‍वतःहून तक्रारदारांना कोणतीही पूर्व कल्‍पना न देता मेडिक्‍लेम पॉलिसीच्‍या अटी शर्तीत बदल केला. तसेच पुढील वर्षी त्‍यानंतर दि.27/03/09 ते 26/03/2010 या कालावधीसाठी देणेत आलेल्‍या इन्‍डीव्‍युज्‍युअल हेल्‍थ इन्‍शुरन्‍स पॉलिसीमध्‍ये आश्‍वासित रक्‍कम फक्‍त रु.4 लाख देणेत आली. क्‍युम्‍युलेटीव्‍ह बोनस रक्‍कम फक्‍त रु.1 लाख त्‍यांच्‍या नांवापुढे लिहिणेत आली. प्र‍िमियम रक्‍कम रु.21,902/- आकारणेत आली. या सर्व बाबी सामनेवाला यांना मान्‍य आहेत. सामनेवाला वकीलांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे आय.आर.डी.ए.ने मेडिक्‍लेम पॉलिसीच्‍या अटी व शर्तीमध्‍ये बदल करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याप्रमाणे सामनेवाला यांचे मुख्‍य कार्यालयाने तसे परिपत्रक काढले. त्‍यामुळे सामनेवाला यांनी मेडिक्‍लेम पॉलिसीच्‍या अटी व शर्तीमध्‍ये बदल केला. सन् 2008 मध्‍ये तक्रारदारांना इन्‍डीव्‍युज्‍युअल मेडिक्‍लेम पॉलिसी देण्‍याऐवजी नवीन स्‍वरुपातील इन्‍डीव्‍युज्‍युअल हेल्‍थ इन्‍शुरन्‍स पॉलिसी देणेत आली. आय.आर.डी.ए.चे नियम व परिपत्रकातील सुचना व मार्गदर्शक तत्‍वे हे सामनेवाला विमा कंपनीवर बंधनकारक असल्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व शर्तीमध्‍ये बदल करणेत आले. पॉलिसीत केलेले बदल सामनेवाला यांनी स्‍वतः हून केलेले नाहीत त्‍यामुळे ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता आहे असे म्‍हणता येणार नाही असे सामनेवाला यांच्‍या वतीने सांगण्‍यात आले.
 
10) तक्रारदार प्रतिनिधींच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या पूर्वसंमतीशिवाय एकतर्फा मेडिक्‍लेम पॉलिसीच्‍या अटी व शर्तींमध्‍ये बदल केला व केलेला बदल हा विमाधारकाच्‍या हिताचा नाही. अशा त-हेने बदल करणे हा सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता आहे. तक्रारदारांच्‍या प्रतिनिधीने मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या Biman Krishna Bose V/s. United India Insurance Co. Ltd. (2201-(002)-CPR-0111-SC) या निकालाचा आधार घेतला व वरील निकालपत्रात मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने असे नमूद केले आहे की,
             “A renewal of an insurance Policy means repetition of the original policy. When renewed, the policy is extended and the renewed policy in the the identical terms from a different date of its expirtation comes into force. In common parlance, by renewal, the old policy is revived and it is sort of a substitution of obligations under the old policy unless such policy provides otherwise. It may be that on renewal, a new contract comes into being, but the said contract is on the same terms and conditions as that of the original policy.”
             सामनेवाला वकीलांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींमध्‍ये सामनेवाला यांनी आय.आर.डी.ए.च्‍या मार्गदर्शक तत्‍वाप्रमाणे बदल केलेले आहेत. आय.आर.डी.ए.चे मार्गदर्शक तत्‍वे सामनेवाला यांचेवर बंधनकारक असल्‍यामुळे पॉलिसीत केलेले बदल ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता मानता येणार नाही.
 
11) सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर प्रलंबित असताना सामनेवाला यांनी तक्रारदारांना पाठविलेल्‍या दि.30/12/2011 च्‍या पत्राची प्रत तक्रारदारांनी दाखल केली. सदर पत्रामध्‍ये तक्रारदारांनी केलेल्‍या तक्रारींच्‍या अनुषंगाने तक्रारदारांना देण्‍यात आलेल्‍या पॉलिसींची तपासणी सामनेवाला यांनी केली व त्‍यामध्‍ये ज्‍या चुका आढळून आल्‍या त्‍यामध्‍ये दुरुस्‍ती करुन पूर्वीच्‍याच अटी व शर्तींवर तक्रारदारांना मेडिक्‍लेम पॉलिसी देण्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे. सदर पत्रामध्‍ये आश्‍वासित रकमेत केलेला बदल तसेच जुन्‍या पॉलिसीच्‍या अटी व शर्तींप्रमाणे तक्रारदारांना देवू करण्‍यात आलेले कम्‍युलेटीव्‍ह बोनस इत्‍यादी नमूद करणेत आले आहे व प्रिमियमच्‍या फरकापोटी तक्रारदारांकडून रक्‍कम रु.20,536/- ची मागणी करण्‍यात आली. तक्रारदारांनी दि.27/02/2012 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून त्‍यासोबत प्रिमियमच्‍या रकमेतील फरकाचा रु.20,536/- चा धनादेश सामनेवाला यांना पाठविला असे दिसते. वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांची मुख्‍य मागणी ही त्‍यांची मेडिक्‍लेम पॉलिसी पूर्वीच्‍या अटी व शर्तींवर करावी ही सामनेवाला यांनी सदरचा अर्ज प्रलंबित असताना मान्‍य केली आहे व सामनेवाला यांच्‍या मागणीप्रमाणे तक्रारदारांनी त्‍या रकमेचा फरक सुध्‍दा सामनेवाला यांना दिलेला आहे. 
 
12) तक्रारदार प्रतिनिधीच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या मेडिक्‍लेम पॉलिसीमध्‍ये तक्रारदारांच्‍या अपरोक्ष जे बदल केले ते तक्रारदारांच्‍या हितास बाधा आणणारे होते व त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला याबाबत तक्रारदारांनी वेळोवेळी विनंती करुन सुध्‍दा सामनेवाला यांनी दाद दिली नाही म्‍हणून तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल करावा लागला आहे. तक्रारदारांनी तक्रार दुरुस्‍तीचा अर्ज दि.17/09/2010 रोजी या मंचासमोर दाखल केला होता, परंतु वर नमूद केल्‍याप्रमाणे सदरचा अर्ज मूळ अर्जासोबत चालवावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. मूळ तक्रारअर्जाच्‍या चौकशीच्‍या वेळी तक्रारदारांनी दुरुस्‍तीअर्जाबद्दल काहीही म्‍हटलेले नाही. तक्रारदारांनी तक्रारअर्जात सामनवेाला यांचेकडून नुकसानभरपाई दाखल रक्‍कम रु.1,50,000/-, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- ची मागणी केली असून या अर्जाच्‍या खर्चापोटी रु.15,000/- मागितले आहेत. तथापि, तक्रारअर्जासोबत तक्रारदारांनी त्‍यांच्‍या मागणीचा तपशील (स्‍टेटमेंट ऑफ क्‍लेम) दाखल केला असून त्‍यामध्‍ये मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.50,000/- व या अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.15,000/- अशी एकूण रक्‍कम रु.65,000/- सामनेवाला यांचेकडे मागणी केली आहे. सामनेवाला वकीलांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांची मुख्‍य मागणी तक्रारअर्ज प्र‍लंबित असतानाच मंजूर केली आहे. तक्रारदारांनी केलेली नुकसानभरपाईची मागणी अवास्‍तव जादा आहे. तक्रारदारांची मूळ मागणी मान्‍य केलेली असल्‍यामुळे तक्रारदारांना नुकसानभरपाई देण्‍यात येवू नये असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे. वर नमूद केल्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या संमतीशिवाय मेडिक्‍लेम पॉलिसीच्‍या अटी व शर्तींमध्‍ये तक्रारदारांच्‍या हितास बाधा आणणारे बदल केले व त्‍यासाठी तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला असे दिसते. या प्रकरणातील वस्‍तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व या अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.4,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल. सबब वर नमूद केलेल्‍या कारणास्‍तव तक्रार अंशतः मंजूर करुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
 
अं ति म आ दे श
 
1.तक्रारअर्ज क्रमांक 321/2009 अंशतः मंजूर करणेत येतो.

 
2.सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- (रु.दहा हजार मात्र), तसेच या अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.4000/- (रु.चार हजार मात्र) द्यावेत.

 
3. सामनेवाला यांनी वरील आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 1 महिन्‍याचे आत करावी.

 
4. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.

 

 
 
[ SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE]
PRESIDENT
 
[ Shri S.S. Patil , HONORABLE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.