निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 19/07/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 19/07/2013
तक्रार निकाल दिनांकः- 07/01/2014
कालावधी 05 महिने. 18 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
1 श्रीमती संगीता भ्र.नामदेव रोडगे, अर्जदार
वय 30 वर्षे. धंदा.शेती. अॅड.पी.व्ही.सराफ.
रा. जांभरुन बु.पोष्ट पुसेगाव.
ता.सेनगाव जि.हिंगोली.
2 कु.दिपाली पिता नामदेव रोडगे.
वय 12 वर्षे.धंदा.शिक्षण.
3 कु.गायत्री पिता नामदेव रोडगे.
वय 10 वर्षे.धंदा.शिक्षण.
4 वैभव पिता नामदेव रोडगे.
वय 8 वर्षे.धंदा.शिक्षण
अर्जदार 2 ते 4 साठी अज्ञान पालनकर्ती
अर्जदार क्रमांक 1 त्यांची आई मार्फत.
विरुध्द
1 युनाइटेड इंडिया इन्शोरन्स कं.लि. शाखा. परभणी. गैरअर्जदार.
दयावान कॉम्प्लेक्स,दुसरा मजला, अॅड.जी.एच.दोडीया.
स्टेशन रोड, परभणी 431401.
2 महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्वतः
शाखा पुसेगाव,ता.सेनगाव जि.हिंगोली.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचे मयत पतीचा किसान क्रेडीट पॉलिसी अंतर्गत विमा नुकसान भरपाई रक्कम देण्याचे टाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही मयत नामेदव आनंदा रोडगे यांची धर्मपत्नी असून अर्जदार क्रमांक 2 ते 4 हे अर्जदाराची अपत्ये आहेत व अर्जदार ही मौजे जांभरुन (बु) पो.पुसेगाव ता.सेनगाव येथील रहिवाशी आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराचे पती दिनाक 05/01/2012 रोजी सकाळी 6 वाजता गावातून आपले बैल शेताकडे घेवुन जात असतांना, त्याचा बैल अर्जदाराची नजर चुकवून इलेक्ट्रीक पोलकडे जात होता व तो त्या बैलला हकालण्यासाठी गेला असता दरम्यान डी.पी.मधील चालु लाईनचे केबल अचानक मयत अर्जदाराच्या पतीच्या अंगावर पडले व करंट लागल्यामुळे अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला. या घटने बाबत संबंधीतानी नर्सी नामदेव येथील पोलीस स्टेंशनला माहिती दिली व अकस्मात मृत्यू घटना क्रमांक 1/12 प्रमाणे नोंद झाली. संबंधीत पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा केला व नर्सी नामदेव येथील दवाखान्यात मयताचा पोस्टमार्टेम केला व त्यात Electric Shock लागल्याने मृत्यू झाला असे सांगीतले.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराचे मयत पती हे शेती व्यवसाय करत होते व त्याने इ.स. 2010 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 बँकेकडून किसान क्रेडीटकार्ड या योजने अंतर्गत पिक कर्ज घेतले होते, त्यावेळेस बँकेने अर्जदाराच्या मयत पतीचा या योजने अंतर्गत दिनांक 01/11/2010 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीकडे पॉलिसी काढली होती, ज्याचा नं. 230601/47/10/43/00001605 होता. गैरअर्जदार बँकेने परस्पर सदर पॉलिसीचा हप्ता गैरअर्जदार विमा कंपनीकडे भरला होता. व सदर पॉलिसी येाजने अंतर्गत शेतक-याचा अपघाती मृत्यू झाला तर, नुकसान भरपाई रु. 50,000/- देण्याचे नमुद केले होते. सदरची पॉलिसी 01/11/2010 ते 31/10/2013 पर्यंत वैध होती व अर्जदाराच्या मयत पतीचा अपघाती मृत्यू दिनांक 05/01/2012 रोजी झाला व तो पॉलिसीच्या वैध कालावधीत झाला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी अर्जदाराने सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 2 कडे अर्ज केला व गैरअर्जदार बँकेनी तो प्रस्ताव गैरअर्जदार नं. 1 विमा कंपनीकडे दिनांक 06/03/2012 रोजी दिला, परंतु आजतागयत पर्यंत गैरअर्जदाराने विम्याची रक्कम अर्जदारास दिलेली नाही, त्यानंतर अर्जदार ही स्वतः गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीस स्वतः भेटली व विमा दाव्याच्या संबंधी चौकशी केली असता, त्याने असे सांगीतले की, बँकेने M.S.E.B. चा अहवाल दिला नाही. म्हणून अपघात विमा रक्कम देता येत नाही असे सांगीतले, म्हणून अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश करावा की, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मयत पतीचा किसान क्रेडीटकार्ड योजने अंतर्गत काढलेल्या पॉलिसी नुसार नुकसान भरपाई म्हणून 50,000/- रु. अर्जदारास द्यावे व तसेच गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 10 कागदपत्रांच्या यादीसह 10 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये पॉलिसी कव्हरनोटची प्रत, अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट, अर्जदाराने गैरअर्जदार नं. 2 यास लिहिलेला अर्ज, गैरअर्जदार नं. 2 ने विमा कंपनीस लिहिलेले पत्र, ( दिनांक 17/03/2012 ) बॅंकेने विमा कंपनीस दिनांक 22/06/2012 रोजी लिहिलेले पत्र, बँकेने विमा कंपनीस 06/07/2012 रोजी लिहिलेले पत्र, अर्जदाराने दिनांक 04/12/2012 रोजी बँकेला लिहिलेला अर्ज, एम.एस.इ.बी.चे पत्र, तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 20 वर 5 कागदपत्रांच्या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये, अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्टची प्रत, Copy Of Death Report ची प्रत, पंचनाम्याची प्रत, इंनक्वेस्ट पंचनाम्याची प्रत, पोस्टमार्टेम रिपोर्ट अहवाल, कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला, व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून Consumer Protection Act प्रमाणे सदरची तक्रार मंचासमोर चालु शकत नाही. व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे आहे की, त्याने अर्जदाराचा विमादावा योग्य ते कारण दाखवुनच फेटाळले आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास दिनांक 08/05/2011 रोजी व 17/07/2012 पत्राव्दारे कळविले होते की, त्याने एम.एस.इ.बी चा अहवाल दाखल लवकर करावा, परंतु अर्जदाराने आज पर्यंत एम.एस.इ.बी.चा रिपोर्ट दाखल केला नाही, म्हणून दिनांक 17/12/2012 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमा देवु शकत नाही, म्हणून कळविले.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, पोलीसांचा अहवाल पाहिला असता असे निर्दशनास आले की, अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा त्याने बेकायदेशिर लाईट कनेक्शनमुळे झालेला आहे, त्यामुळे अर्जदार एम.एस.इ.बी.चा अहवाल मुद्दाम विमा कंपनीकडे दाखल केला नाही. विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 स्वतः मंचासमोर हजर व नि. क्रमांक 6 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची तक्रार योग्य आहे व अर्जदाराच्या पतीने किसान क्रेडीटकार्ड अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पॉलिसी काढली होती. अर्जदाराचे मयत पती हे आमचे ग्राहक होते व आमच्या मार्फतच विमा कंपनीकडे त्यांचे पॉलिसी काढली होती, बँकेचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या पतीच्या मृत्यू नंतर अर्जदाराने सर्व कागदपत्रांसह विमा रक्कम मिळावी म्हणून त्यांचेकडें अर्ज केला होता व तो अर्ज त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठवला, परंतु अद्याप पर्यंत विमा कपनीने अर्जदाराचे विमा रक्कम दिली नाही व त्यास विमा कंपनीच जबाबदार आहे. आम्ही अर्जदारास कोणतीही सेवा त्रुटी दिली नाही, म्हणून सदरची तक्रार आमच्या विरुध्द खारीज करण्यात यावी.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत पतीचा किसान क्रेडीट
कार्ड पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई विमा रक्कम अर्जदारास
देण्याचे टाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे मयत पती नामदेव रोडगे यांचा दिनांक 05/01/2012 रोजी इलेक्ट्रीक पोलचे केबल अंगावर पडून करंट लागुन मृत्यू झाला होता, ही बाब नि.क्रमांक 20/3 वरील दाखल केलेल्या पोलीस स्टेशन नर्सी नामदेव ता.सेनगाव Crime No. 01/12 च्या एफ.आय.आर. च्या कॉपीवरुन सिध्द होते.
अर्जदाराचे मयत पती हे गैरअर्जदार क्रमांक 2 चे ग्राहक होते ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदाराचे मयत पतीने इ.स. 2010 मध्ये किसान क्रेडीटकार्ड अंतर्गत पिक कर्ज घेतले होते, सदर कर्ज घेते वेळी बँकेने अर्जदाराच्या मयत पतीचा शासनाच्या धोखा प्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमा काढला होता ही बाब देखील अॅडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर सदर विम्याचा लाभ मिळावा म्हणून गैरअर्जदार नं. 2 बँकेकडे अर्ज केला होता, ही बाब देखील गैरअर्जदार बँकेने आपल्या लेखी जबाबात मान्य केली आहे.
सदर अर्जदाराचा विमादावा बँकेकडे मिळाल्यानंतर तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे पाठवला व तो विमादावा दिनांक 17/12/2012 रोजी विमा कंपनीने MSEB Report दिला नाही, तर आपला दावा मंजूर करता येणार नाही. असे कारण दर्शवुन अर्जदाराचा विमादावा मंजूर करण्याचे प्रलंबीत ठेवले आहे. ही बाब नि.क्रमांक 18/2 वरील विमा कंपनीने बँकेस लिहिलेले पत्रावरुन सिध्द होते. सदरचे गैरअर्जदार विमा कंपनीचे कारण मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराच्या पतीचा मृत्यू इलेक्ट्रीक वायर अंगावर पडून करंट लागुन अपघाती मृत्यू झाला, ही बाब एफ.आय.आर. च्या प्रत वरुन व पोस्टमार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते व तो कागदपत्र अर्जदाराने विमादावा दाखल करतांना विमा कपंनीकडे पाठवले होते, यावरुन अर्जदाराच्या पतीचा मृत्यू अपघाती झाला हे सिध्द होते व सदरील दोन कागदपत्र पुरेशी आहेत. केवळ एम.एस.इ. बी. चा अहवाल मागवुन अर्जदाराचा विमादावा प्रलंबीत ठेवुन निश्चितच गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, असे
मंचाचे ठाम मत आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
अर्जदारास (अर्जदार क्रमांक 1 ते 4 तर्फे अर्जदार क्रमांक 1 यास) किसान
क्रेडीट पॉलिसी अंतर्गत रु. 50,000/- फक्त ( अक्षरी रु.पन्नासहजार फक्त )
द्यावेत.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 ने तक्रार अर्ज खर्चापोटी अर्जदारास रु. 2,500/- फक्त
(अक्षरी रु. दोनहजार पाचशे फक्त) आदेश मुदतीत द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.