Maharashtra

Nagpur

CC/10/609

Plasto Containers (I) Pvt. Ltd. - Complainant(s)

Versus

United India Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Sachin Sambre

21 Jul 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/609
1. Plasto Containers (I) Pvt. Ltd.C/o. Mohan S. Rughani, J-3, MIDC, Hingna, NagpurNagpur 440016Maharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. United India Insurance Co.Ltd.24, Whites Road, ChennaiChennai 600014Tamilnadu2. United India Insurance Co.ltd.Div. Manager, Office No. 2, 19, Dharampeth Extn. Shankar Nagar Chowk, NagpurNagpur 44010Maharashtra3. IROS MOTORS PVT. LTD.Imamwada Road, Gujratwadi, opp. Purohit Dalda Factory, NagpurNagpur 440018Maharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :

Dated : 21 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये सौ. जयश्री येंडे, सदस्‍या.
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 21/07/2011)
 
1.           तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की, त्‍यांच्‍या मालकीचा स्‍वराज मझदा मिनी ट्रक क्र. एम एच 31 / ए पी 5762 असून, सदर वाहनाचा तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांचेकडे विमा पॉलिसी क्र. 230200/31/08/01/00000033 अन्‍वये विमा दि.03.04.2008 ते 02.04.2009 या कालावधीकरीता काढला होता.
 
            सदर वाहनाचा हिंगोलीवरुन नागपूरकडे येत असतांना दि.04.03.2009 रोजी अपघात होऊन त्‍यात वाहनाचे बरेच नुकसान झाले. सदर वाहन संदेश रोडलाईन्‍स यांच्‍या मदतीने नागपूरला पोचते करण्‍यात आले. तत्‍पूर्वी श्री. हरीश जे. जोतवानी (सर्व्‍हेयर) यांचेकडून वाहनाचा स्‍पॉट सर्व्‍हे करण्‍यात आला. सदर ट्रक गैरअर्जदार यांचे प्राधिकृत डिलर ‘इरोज मोटर्स’ गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडे दुरुस्‍तीसाठी देण्‍यात आला. इरोज मोटर्स यांनी दिलेले खर्चाचे ईस्‍टीमेट व विमा दावा प्रपत्र तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार विमा कंपनीकडे सादर केले व त्‍यानंतर दि.11.05.2009 रोजी सदर वाहन दुरुस्‍तीचे देयकदेशील गैरअर्जदार विमा कंपनीकडे सादर करण्‍यात आले. परंतू यानंतरही गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा निकाली काढला नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने पत्रव्‍यवहार केला असता गैरअर्जदार यांनी सर्व्‍हेयरने सर्व्‍हे रीपोर्ट सादर करण्‍यास उशिर झाल्‍यामुळे सदर दावा निकाली काढण्‍यास उशिर झाल्‍याचे सांगितले.
            दि.03.10.2009 रोजी गैरअर्जदार यांनी विमा दावापोटी रु.53,000/- तक्रारकर्त्‍यास अदा केले. सदर रक्‍कम प्रत्‍यक्षात केलेल्‍या खर्चापेक्षा फारच कमी असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने हरकत नोंदवून सदर रक्‍कम स्विकारली. वास्‍तविक तक्रारकर्त्‍यास वाहन दुरुस्‍तीपोटी रु.2,74,711/- इतका खर्च आलेला होता व सदर रक्‍कम दि.03.11.2009 रोजी चेकद्वारे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना अदा केली. सदर देयकाची शहानिशा करण्‍याकरीता गैरअर्जदार विमा कंपनीने ऍड. देवानंद धांडे यांची नेमणूक केली होती व त्‍यांनीदेखील दिलेल्‍या बिलांची शहानिशा केली. गैरअर्जदार यांनी सदर दुरुस्‍तीबाबतची रक्‍कम रु.2,74,711/- न देता केवळ रु.53,000/- तक्रारकर्त्‍यास दिले ही गैरअर्जदार यांची सेवेती कमतरता आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन रु.2,21,771/- ही रक्‍कम व्‍याजासह मिळावी, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई मिळावी आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
2.          सदर तक्रार मंचासमोर आल्‍यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस काढला असता गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस मिळूनही त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍त दाखल केले नाही किंवा ते मंचासमोर उपस्थितही झाले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला.
 
3.          गैरअर्जदार क्र. 2 यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याने सदर कालावधीसाठी गैरअर्जदार यांचेकडे स्‍वराज मझदा या मिनी ट्रकेचा विमा काढल्‍याचे म्‍हणणे मान्‍य केलेले आहे. परंतू इतर आरोप अमान्‍य केलेले आहे.
            गैरअर्जदार यांचे कथनानुसार विमा कंपनी वाहनाच्‍या नुकसानीची शहानिशा करण्‍यासाठी सर्व्‍हेयर नेमते, ते गैरअर्जदार कंपनीचे नोकर नसून ते परवानाप्राप्‍त स्‍वतंत्र यंत्रणा असतात व त्‍यांना नुकसानीचे मुल्‍यमापन करण्‍याचे शास्‍त्रशुध्‍द ज्ञान असते. त्‍यानुसार ते वाहनाची संपूर्ण तपासणी करुन वाहन किती जुने आहे त्‍याची टक्‍केवारी ठरवून लावलेले भाग, जास्‍त लावलेले चार्जेस याची तपासणी करुन आपला रीपोर्ट सादर करतात. त्‍यानंतर विमा कंपनी दुसरा सर्व्‍हेयर नेमून रीपोर्टचे पूर्ण निरीक्षण करुन त्‍यानंतर अंतिम दावा ठरवून तो तक्रारकर्त्‍यास देण्‍यात येतो. त्‍यामुळे वेळ लागतो.
 
            गैरअर्जदाराने विमा दाव्‍यापोटी तक्रारकर्त्‍यास रु.53,000/- देऊ केले होते. परंतू तक्रारकर्त्‍याने वाद हक्‍कासोबत स्विकारण्‍याचे कबूल केले. गैरअर्जदार विमा कंपनी वाद हक्‍कासोबत दावा देण्‍यात तयार झाले नाही. विमा कंपनी दावा देण्‍यात तयार आहे. जर दोन्‍ही पक्षात रकमेबाबत एकवाक्‍यता नसेल तर विमा पॉलिसीचे लवाद नेमून त्‍याबाबत निर्णय करण्‍याबाबत प्रावधान केलेले आहे. त्‍यामुळे सदर वाद या मंचासमोर उपस्थित होऊ शकत नाही.
 
            गैरअर्जदार यांचे मते तक्रारकर्त्‍याने केवळ सदर तक्रारीत विमा पमाणपत्र जोडलेले आहे. तसेच ऍड. देवानंद धांडे यांनी केलेल्‍या तपासात तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 3 यांनी संगनमताने खोटे फुगवून दिलेले ईस्‍टीमेट व देयके तपासणीत खोटे आढळून आली. तसेच तक्रारकर्त्‍याने सादर केलेली देयके व पावत्‍या आणि चेकने दिलेले पैसे बाबतचा मजकूर खोटा आढळला. सर्व्‍हेयरने निश्चित केलेली रक्‍कम योग्‍य आहे. तक्रारकर्त्‍यास 100 टक्‍के क्षतिपूर्ती देण्‍यास गैरअर्जदार बांधील नाही. करारात निर्देशित केलेल्‍या टक्‍केवारीने व वगळलेले व्‍याज सोडून केवळ सर्व्‍हेयरने निश्चित केलेली व योग्‍य तीच क्षतिपूर्ती देय आहे.
 
            वरील सर्व बाबी लक्षात घेता तक्रारकर्त्‍याची तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. 2 यांनी केलेली आहे.
 
4.          गैरअर्जदार क्र. 3 यांच्‍या कथनानुसार वाहन दुरुस्‍ती करुन त्‍याचे देयक पाठविणे एवढेच गैरअर्जदार क्र. 3 चे कार्य आहे. वाहन दुरुस्‍ती करुन त्‍याची शहानिशा होऊन व तक्रारकर्त्‍याची त्‍यावर खात्री पटल्‍यावर, अंतिम देयक सादर करण्‍यात येते. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍यास त्‍याचे वाहन दुरुस्‍तीचे रु.2,74,711/- देयक देण्‍यात आले, ते योग्‍य आहे. तक्रारकर्त्‍याने दि.11.05.2009 रोजी सदर देयकापोटी रक्‍कम गैरअर्जदार क्र. 3 यांना प्राप्‍त झालेली आहे.
 
            गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास विम्‍यापोटी सदर रक्‍कम न देता केवळ अर्धवट रक्‍कम अदा केलेली आहे. वास्‍तविक पाहता तक्रारकर्त्‍याची सदर देयकाची रु.2,74,711/- मागणी योग्‍य आहे. सदर संपूर्ण रक्‍कम न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार विमा कंपनीविरुध्‍द सदर तक्रार दाखल केली. त्‍याच्‍याशी गैरअर्जदार क्र. 3 याने सहमती दर्शविलेली आहे.
 
 
5.          सदर प्रकरण मंचासमोर युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर मंचाने तक्रारकर्ता, गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचा युक्‍तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी उभय पक्षांकडून दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
6.                     वरीष्‍ठ न्‍यायालयांनी वेळोवेळी दिलेल्‍या निवाडयाचा विचार करता करारामध्‍ये लवादाची अट असली तरी या मंचास ग्रा.सं.का. 1986 कलम 3 चा विचार करता या मंचास सदर तक्रार चालविण्‍याचा अधिकार आहे.
 
7.          दोन्‍ही पक्षांचे म्‍हणणे, त्‍यांनी केलेला युक्‍तीवाद, तसेच दाखल पुरावे पाहता या मंचाच्‍या असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांचेकडे त्‍यांच्‍या स्‍वराज मझदा मिनी ट्रक क्र. एम एच 31 / ए पी 5762 या वाहनाचा रु.3,50,000/- एवढया रकमेसाठी विमा उतरविलेला होता. तसेच पॉलिसीच्‍या वैध कालावधीमध्‍ये दि.04.03.2009 रोजी सदर वाहनास अपघात झाला होता.  तसेच दस्‍तऐवज क्र. 5 वरुन हेही निदर्शनास येते की, गैरअर्जदार यांनी सदर वाहनाच्‍या विमा दाव्‍यापोटी तक्रारकर्त्‍यास रु.53,000/- दि.08.10.2009 रोजी अदा केलेले होते व ते तक्रारकर्त्‍याने हरकत नोंदवून स्विकारले.
 
8.          तक्रारकर्त्‍याची महत्‍वाची तक्रार अशी आहे की, सदर अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍तीपोटी तक्रारकर्त्‍यास रु.2,74,711/- एवढा खर्च आलेला असतांना गैरअर्जदार यांनी सदर वाहनाच्‍या विमा दाव्‍यापोटी केवळ रु.53,000/- तक्रारकर्त्‍यास अदा केलेले आहे. गैरअर्जदार यांच्‍या मते सर्व्‍हेयरने दिलेल्‍या रीपोर्टनुसार सदर वाहनाच्‍या विमा दाव्‍यापोटी रु.53,000/- ठरविण्‍यात आलेले आहे.
9.          दस्‍तऐवज क्र. 2 वरील गैरअर्जदार क्र. 3 नें स्‍वराज मझदा कंपनीचे ऑथोराईज्‍ड डिलर आहे. त्‍यांनी दिलेली पावती लक्षात घेता या मंचाच्‍या असे निदर्शनास येते की, सदर अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍तीपोटी तक्रारकर्त्‍यानें गैरअर्जदार क्र. 3 यांना रु.2,74,711/- एवढया रकमेचे देयक दि.05.11.2009 रोजी चेकद्वारे अदा केलेले होते व गैरअर्जदार क्र. 3 यांनी देखील आपल्‍या जवाबात सदर वाहनाच्‍या दुरुस्‍तीपोटी रु.2,74,711/- एवढया रकमेचे देयक तक्रारकर्त्‍यास दिले होते, ते योग्‍य आहे व सदर रक्‍कम गैरअर्जदार क्र. 4 यांना प्राप्‍त झालेली आहे असे नमूद केलेले आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार यांनी विमा दाव्‍यापोटी दिलेले रु.53,000/- एवढी रक्‍कम तक्रारकर्त्‍याने प्रत्‍यक्षात केलेला खर्च व अदा केलेला खर्च पाहता संयुक्‍तीक वाटत नाही.
 
            वरील वस्‍तूस्थिती पाहता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यास सदर अपघातग्रस्‍त वाहनाचे दुरुस्‍तीपोटी रु.2,74,711/- इतका खर्च झाला असतांना विमा दाव्‍यापोटी केवळ रु.53,000/- तक्रारकर्त्‍यास अदा करणे संयुक्‍तीक वाटत नाही. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने सर्व्‍हेयरने रीपोर्ट देण्‍यास उशिर झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास दावा देण्‍यास उशिर झाला असे आपल्‍या उत्‍तरात नमूद केले आहे. ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांची कृती तक्रारकर्त्‍यास दिलेल्‍या सेवेतील कमतरता आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी दिलेल्‍या सेवेत कुठलीही कमतरता नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या नुकसानीस जबाबदार धरता येणार नाही. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 3 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
3)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्‍तीक वा संयुक्‍तरीत्‍या तक्रारकर्त्‍यास    रु.2,21,711/- (रु.2,74,711/-  - रु.53,000/-) एवढी रक्‍कम द्यावी.
4)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्‍तीक वा संयुक्‍तरीत्‍या तक्रारकर्त्‍यास मानसिक व      शारिरीक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे.
5)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्‍तपणे किंवा पृथ्‍‍थकपणे आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT