निकालपत्र :- (दि.11/10/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याय्य व योग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारुन सेवा त्रुटी केल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील सामनेवाला क्र.1 ही विमा व्यवसाय करणारी वित्तीय कंपनी असून सामनेवाला क्र.2 हे एलपीजी चे स्थानिक डिलर आहेत व सामनेवाला क्र.2 यांची सामनेवाला क्र.1 यांचेकडे एलपीजी डिलर्स पॅकेज पॉलीसी क्र.160503/46/08/22200000046 असा असून कालावधी हा दि.22/6/2009 ते 21/06/2010 असा आहे. यातील तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांचे घरगुती गॅसचे ग्राहक असून त्यांचा सामनेवाला क्र.2 कडील गॅस कनेक्शन नं.639205 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीच दि.26/6/2009 रोजी दुपारी 4.25 वाजताचे दरम्यान रेग्युलेटर लिकेजमुळे तक्रारदाराचे घरात आगीचा भडका उडून झालेल्या स्फोटात प्रापंचिक साहित्याचे सुमारे रक्कम रु.92,500/- नुकसान झाले. तक्रारदारांनी सदर नुकसानीबाबत सामनेवाला क्र.2 यांना वकील नोटीसीने दि.10/10/2009 रोजी मागणी केली. परंतु सामनेवाला क्र.2 यांनी अदयाप त्याची पूर्तता केलेली नाही. तसेच सामनेवाला क्र.1 यांचेकडेदेखील आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन क्लेम रक्कम रु.92,500/- ची मागणी केली आहे. परंतु वारंवार तोंडी व लेखी मागणी करुनही सामनेवाला क्र.1 किंवा 2 यांनी तक्रारदारांचा क्लेम न दिलेने सदर तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या क्लेमची रक्कम रु.92,500/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-, तक्रारीचा खर्च रु.2,000/- वसुल होऊन मिळावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत पॉलीसी कव्हर नोट, सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे क्लेमबाबत केलेला पत्रव्यवहार, क्लेम फॉर्म, सामनेवाला क्र.1 यांना दिलेली नोटीस, हिंदुस्थान पेट्रोलियम यांना दिलेली नोटीस, सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.1यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, सामनेवालांनी पॉलीसी क्र.160503/46/08/22200000046 असा असून कालावधी हा दि.22/06/2009 ते 21/06/2010 असा आहे. सदर पॉलीसी ही सामनेवाला क्र.2 यांना दिली होती. पॉलीसीच्या अटी व शर्तीतील कलम 7 पब्लीक लायबलेटीनुसार तक्रारदाराचा क्लेम योग्य कारणास्तव नाकारलेला आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नाही. सामनेवाला क्र.2 यांचे कर्मचा-यांनी सदर गॅस सिलेंडर इन्स्टॉल केले असते तर कंपनीची जबाबदारी आली असती. सबब प्रस्तुत सिलेंडर हे तक्रारदाराने स्वत: गॅसला जोडलेले आहे. याचा विचार करता प्रस्तुतची बाब पॉलीसीच्या कक्षेच्या बाहेर असलेने दि.08/09/2010 चे पत्रानुसार क्लेम अदा केलेला नाही. यामध्येम सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ विमा पॉलीसी व अकौन्ट स्टेटमेंट, सर्व्हे रिपोर्ट इतयादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे,दाखल कागदपत्रे व उभय पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाच्या मुद्दयाचा विचार करावा लागेल. तक्रारदाराची तक्रार सामनेवालांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांवरुन सामनेवाला क्र.2 हया गॅस वितरकांनी तक्रारदारास दिलेले सिलेंडर तक्रारदाराने त्याचे घरी गॅसला जोडले असता सिलेंडरचा स्फोट होऊन तक्रारदाराचे घराचे नुकसान झालेचे निदर्शनास येते. सदर नुकसानीचा अहवाल सामनेवाला क्र.1 विमा कंपनीचे पाटील सर्व्हेअर यांनी दिलेला आहे. सदर अहवालानुसार रक्कम रु.37,860/- इतकी अंतिम नुकसानी निश्चित केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये सिलेंडरचा स्फोट झालेने नुकसानी झालेली आहे. मात्र तक्रारदाराने सिलेंडर उत्पादित करणा-या हिंदूस्थान पेट्रोलियम या कंपनीस आवश्यक पक्षकार म्हणून समाविष्ट केलेला नाही. सबब नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टी या तत्वाचा बाध येत असलेने प्रस्तुतची तक्रार काढून टाकणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच नमुद कंपनीस आवश्यक पक्षकार म्हणून समावेश करुन तक्रार पुन:श्च दाखल करणेबाबत मुभा तक्रारादारास देणेत येते. सबब आदेश. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार काढून टाकण्यात येते. (2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |