Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/187

Mr. Shantaramji S/o Rajeramji Gajbhiye - Complainant(s)

Versus

United India Insurance Co.Ltd. Through its Branch Manager & Other - Opp.Party(s)

Shri. V.T. Bhoskar

10 Jul 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/187
 
1. Mr. Shantaramji S/o Rajeramji Gajbhiye
R/O ISAPUR( Budruk)At Post ISAPUR Tq. Katol
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co.Ltd. Through its Branch Manager & Other
Direct Agent Cell Mount Road,Opp Saraf Chambers Sadar Nagpur
Nagpur
Maharashtra
2. State Bank of India Through its Branch Manager
Nehru Bazar,KATOL
Nagpur
Maharashtra
3. Livestock Development Officer ( Extension)
Veterinary Hospital,Class- 1 ZILPA Th. KATOl
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde PRESIDENT
 HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar MEMBER
 
For the Complainant:Shri. V.T. Bhoskar, Advocate
For the Opp. Party:
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा श्रीमती मनिषा यशवंत येवतीकर, मा.सदस्‍या.)

(पारीत दिनांक10 जुलै, 2014)

1.   तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे   कलम-12 अन्‍वये विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3  विरुध्‍द दाखल केली आहे.

2.    तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय  येणे प्रमाणे-

       तक्रारकर्ता उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून त्‍याचा पशुपालनाचा व्‍यवसाय आहे आणि त्‍यावरच त्‍याचे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. महाराष्‍ट्र शासनाने पशुवैद्दकीय विभागा मार्फतीने नाविन्‍यपूर्ण योजना सन-2011-12 कार्यान्वित केली होती व त्‍यामध्‍ये तक्रारकर्ता लाभार्थी होता.  तक्रारकर्त्‍याने योजने अंतर्गत एकूण 06 जर्सी गायी ज्‍यांचा Ear Tag No. 1531 ते  1536 असा आहे, हया गायी खरेदी केल्‍या. योजने नुसार महाराष्‍ट्र शासना तर्फे पशु खरेदीचे किंमतीपैकी 75% रक्‍कम सबसिडी म्‍हणून व उर्वरीत 25%रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रं 2 स्‍टेट बँक ऑफ इंडीया मध्‍ये तक्रारकर्त्‍याने जमा केली.  विरुध्‍दपक्ष क्रं-2  स्‍टेट बँक ऑफ इंडीया तर्फे एकूण कर्जाची रक्‍कम रुपये-3,35,184/- मंजूर करण्‍यात आली होती, त्‍यापैकी रुपये-2,40,000/- सबसिडी म्‍हणून शासना तर्फे  देण्‍यात आली होती.

       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं 3 पशुवैद्दकीय अधिकारी यांनी तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या जर्सी गाईंचे वैद्दकीय प्रमाणपत्र दिलेत, त्‍यावरुन तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या जर्सी गाईंचा विमा दि.14.03.2012 रोजी  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून विमा पॉलिसी            क्रं 230105/47/11/01/00000215 नुसार उतरविण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे 25% हिश्‍श्‍याची रक्‍कम  रुपये-11,520/- विमा प्रिमिअम पोटी             वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे जमा केलेत. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष             क्रं 1 व 2 चा ग्राहक ठरतो.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, तो अनेक वर्षां पासून पशुपालनाचा व्‍यवसाय करीत असून योग्‍य ती काळजी आणि निगा राखतो. तसेच पशुनां योग्‍य तो चारा-पाणी घालतो. असे असताना जर्सी गाय Ear Tag No.-230105/01532 दि.10.03.2013 रोजी मृत्‍यू पावली. तक्रारकर्त्‍याने सदरची बाब  वि.प.क्रं 3 पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती झिलपा, तालुका काटोल, जिल्‍हा नागपूर यांना दि.10.03.2013 रोजीचे पत्रान्‍वये कळविली. दि.11.03.2013 रोजी सदर गायीचे शवविच्‍छेदन करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने सदरची बाब वि.प.क्रं 1 व 2  अनुक्रमे विमा कंपनी आणि बँकेस दि.10.03.2013 रोजी कळविली. सदर गाईचे मृत्‍यू पूर्वी तिचेवर पशुवैद्दकीय डॉक्‍टरां कडून दि.01.02.2013 ते 05.03.2013 या दरम्‍यान वैद्दकीय उपचार सुध्‍दा करण्‍यात आले होते. दि.11.03.2013 रोजीचे शव विच्‍छेदन अहवालामध्‍ये गाईचे मृत्‍यूचे कारण “Hepatic Hydatidosis” असे दर्शविण्‍यात आले होते. तक्रारकर्त्‍याने जर्सी गाय Ear Tag No.-230105/01532 चा विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दि.22.03.2013 रोजी सादर केला.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याने पशुंची योग्‍य ती काळजी, निगा राखलेली असताना तसेच योग्‍य अशा चारा-पाणीची व्‍यवस्‍था केलेली असतानाही आणखी एक जर्सी गाय Ear Tag No.-230105/01531 दि.10.04.2013 रोजी मृत्‍यू पावली. तक्रारकर्त्‍याने त्‍याच दिवशी दि.10.04.2013 रोजी वि.प.क्रं 3 पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती झिलपा यांनी त्‍याच दिवशी शवविच्‍छेदन केले. तसेच सदरची बाब दि.10.04.2013 रोजी  अनुक्रमे वि.प.क्रं 1 विमा कंपनी आणि वि.प.क्रं 2 बँकेस सुध्‍दा कळविण्‍यात आली. सदर गाईचे मृत्‍यू पूर्वी तिचेवर पशुवैद्दकीय डॉक्‍टरां कडून दि.01.04.2013 ते 09.04.2013 या दरम्‍यान वैद्दकीय उपचार केले होते आणि उपचारा दरम्‍यान सदर गाईचा मृत्‍यू दि.10.04.2013 रोजी झाला. दि.10.04.2013 रोजीचे शव विच्‍छेदन अहवालामध्‍ये गाईचे मृत्‍यूचे कारण “Hepatic Hydatidosis” असे दर्शविण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने जर्सी गाय Ear Tag No.-230105/01531 चा विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दि.03.05.2013 रोजी सादर केला.

      विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा जर्सी गाय क्रं 1532 चा विमा दावा क्रं -23010547120190000018 आणि जर्सी गाय क्रं-1531 चा विमा दावा क्रं-230105471301900000001 पशुंची योग्‍य ती काळजी व निगा न राखल्‍याचे कारणा वरुन दि.23.07.2013 रोजीचे पत्रान्‍वये नाकारला.

     तक्रारकर्त्‍याने या संदर्भात  विशेषत्‍वाने नमुद केले की, यापूर्वी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याची एक जर्सी गाय Ear Tag No-UTI-01534 हिचे मृत्‍यू संबधीचा विमा दावा जानेवारी, 2013 मध्‍ये रुपये-24,000/- मंजूर केला होता. त्‍यावेळी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे डॉ.श्री वरेट्टीवार यांची चौकशी अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती केली होती आणि त्‍यांचे दि.17.01.2013 रोजीचे चौकशी अहवालामध्‍ये उर्वरीत 5 गाईंची अवस्‍था व प्रकृती अत्‍यंत कमजोर असल्‍याने तसेच सदर गाईंना पशु खाद्द/वैरण न मिळाल्‍याने त्‍यांचे स्‍वास्‍थ निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याचे नमुद केले होते. डॉ.श्री वरेट्टीवार यांचे चौकशी अहवाला वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेस कारणे दाखवा नोटीस दि.23.01.2013 रोजीची देऊन तिची एक प्रत तक्रारकर्त्‍यास दिली होती आणि त्‍याव्‍दारे पॉलिसी रद्द का करण्‍यात येऊ नये अशी विचारणा केली होती. विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेने तक्रारकर्त्‍यास या बाबत दि.01.02.2013 रोजी अवगत केले. तक्रारकर्त्‍याने सदरचे कारणे दाखवा नोटीसला दि.04.02.2013 रोजी सविस्‍तर उत्‍तर वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केले. सदर उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्त्‍याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीने केलेले सर्व आरोप नाकारले होते. तक्रारकर्त्‍याचे अनुपस्थितीत चौकशी अधिका-यांनी पाहणी केली होती.

          तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने, विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेस दिलेल्‍या दि.23.07.2013 रोजीचे विमा दावा नाकारल्‍याचे पत्रात (ज्‍याची प्रतिलिपी तक्रारकर्त्‍यास दिलेली आहे) डॉ.श्री वरेट्टीवार चौकशी अधिकारी यांचे चौकशी अहवालाचा उल्‍लेख करुन पॉलिसी क्रं-2301054711010000215 दावा क्रं-23010547120190000018, टॅग क्रं-1532 आणि दावा क्रं-23010547130190000001, टॅग क्रं-1531 मृत्‍यू अनुक्रमे दि.10/03/2013 आणि दि.10/04/2013 चे अनुषंगाने  विमा दावा  जर्सी गाईंची योग्‍य ती निगा व काळजी न घेतल्‍याचे कारणावरुन पॉलिसीचे शर्त क्रं 5 अनुसार विमा धारकाने  जनावराची योग्‍य ती काळजी घेतली नाही आणि शर्त क्रं 10 प्रमाणे जनावराचा मृत्‍यू  विमाधारकाचे हयगय निष्‍काळजीपणामुळे झाला असल्‍यामुळे विमा दावा देय नाही या कारणावरुन नाकारला. तक्रारकर्त्‍याचे या संदर्भात असे म्‍हणणे आहे की, प्रथम गाय टॅग क्रं 1534 चा विमा दावा मंजूरीचे वेळीवेळी विमा कंपनी तर्फे चौकशी अधिकारी डॉ.श्री वरेट्टीवार यांचा दि.17.01.2013 रोजीचा चौकशी अहवाल तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दबाजूने असताना देखील प्रथम गाय टॅग क्रं 1534 चा विमा रुपये-24,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मंजूर केलेला होता आणि त्‍यावेळी केलेल्‍या डॉ.श्री वरेट्टीवार चौकशी  अधिका-यांचे अहवाला वरुन आता वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दोन्‍ही जर्सी गाय टॅग क्रं 1532 आणि 1531 चा विमा दावा नाकारुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार दोषपूर्ण सेवा दिली आहे.

      म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास दोन्‍ही जर्सी गाय टॅग क्रं-युटीआय-1531 आणि क्रं 1532 चे विमा दाव्‍याची रक्‍कम प्रत्‍येकी रुपये-40,000/- प्रमाणे एकूण रुपये-80,000/- दि.23.07.2013 पासून द.सा.द.शे.13.10% दराने व्‍याजासह देण्‍याचे आदेशित व्‍हावे. तसेच विरुध्‍दपक्षाचे अनुचित व्‍यचापारी प्रथेमुळे तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्‍हणून रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून  रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळावे अशा मागण्‍या केल्‍यात.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तरात तक्रारकर्ता हा पशु वैद्दकीय विभागा तर्फे राबविण्‍यात आलेल्‍या नाविन्‍यपूर्ण योजना सन-2011-12 लाभार्थी असल्‍याची बाब तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या एकूण 06 जर्सी गाईंचा विमा उतरविला असल्‍याची बाब मान्‍य केली. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे हिश्‍श्‍या दाखल विम्‍याची रक्‍कम रुपये-40,000/- जमा केल्‍याची बाब मान्‍य केली. सदर विमा पॉलिसी हया विरुध्‍दपक्ष क्रं 2 चे नावाने निर्गमित करण्‍यात आल्‍यात त्‍यामुळे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 2 पात्र आहे, तक्रारकर्ता नाही. तक्रारकर्त्‍याने 6 जर्सी गाईंची योग्‍य निगा राखल्‍याची  तसेच सकस चारापाणी दिल्‍याची बाब अमान्‍य केली. तक्रारकर्त्‍याने मुद्दामून विमा रक्‍कम मिळविण्‍यासाठी  गाईंची योग्‍य ती काळजी घेतली नाही. तक्रारकर्त्‍याचे निष्‍काळजीपणामुळे जर्सी गाय टॅग क्रं 1532 चा दि.12.03.2013 रोजी मृत्‍यू झाला. तक्रारकर्त्‍याने जर्सी गाईंची योग्‍य ती निगा राखली आणि योग्‍य तो सकस आहार दिला या बाबी प्रामुख्‍याने नाकारल्‍यात. प्रथम गाय टॅग क्रं 1534 मृत्‍यू पावल्‍या नंतर चौकशी अधिकारी डॉ. वरेट्टीवार यांनी जो चौकशी अहवाल दि.17.01.2013 रोजी सादर केला, त्‍यामध्‍ये त्‍यांनी गाईची योग्‍य ती निगा न राखल्‍याने तसेच योग्‍य तो आहार न पुरविल्‍याने मृत्‍यू झाल्‍याचे नमुद केले आणि उर्वरीत गाई सुध्‍दा योग्‍य तो आहार न मिळाल्‍याचे कारणा वरुन मृत्‍यू पावण्‍याची शक्‍यता वर्तविली होती. चौकशी अधिका-यांनी चौकशी अहवालात नमुद केल्‍या नुसार पुढे आणखी दोन गाईंचा  तीन महिन्‍याचे मुदतीचे आत मृत्‍यू झाला. तिनही गाईंचा मृत्‍यू हा एक वर्षाचे कालावधीत झाला. शवविच्‍छेदन अहवाला नुसार सदर  गाईचें मृत्‍यूचे कारण “Hepatic Hydatidosis” असे आहे. (This decease is a parasitic infection caused by small tapeworms living in dogs and goats and can cause anaphylaxis i.e. serious allergic reaction that is rapid in onset and may cause death.)

       डॉ. वरेट्टीवार चौकशी अधिका-यांचे चौकशी अहवाला वरुन सिध्‍द होते की, तक्रारकर्त्‍याने गाईंची योग्‍य ती काळजी न घेतल्‍याने, योग्‍य तो आहार न दिल्‍याने व गाई राहत असलेल्‍या शेडमध्‍ये योग्‍य ती स्‍वच्‍छता न ठेवल्‍याने गाईंचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे गाईंच्‍या झालेल्‍या मृत्‍यू बद्दल तक्रारकर्ता हा स्‍वतःच जबाबदार आहे. तक्रारकर्त्‍याने कारणे दाखवा नोटीस दि.23.01.2013 ला दिलेले उत्‍तर हे अमान्‍य करण्‍यात येते आणि ते चौकशी अधिका-यांचा अहवाल दि.17.01.2013 चे विरुध्‍द आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचे प्रथम मृत्‍यू पावलेल्‍या गाईचा विमा  नॉन स्‍टॅर्न्‍डड बेसीस म्‍हणून रुपये-24,000/- मंजूर केला होता ही बाब मान्‍य आहे परंतु प्रथम गाईचा विमा दावा मंजूर करण्‍याची विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कृती ही चुकीने झाली होती पुन्‍हा अशा चुकीचे कृतीची पुनरावृत्‍ती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी करणार नाही. तक्रारकर्ता हा स्‍वच्‍छ हाताने मंचा समक्ष आलेला नाही. जर्सी गाईंचे मृत्‍यू संबधाने तक्रारकर्त्‍याचा निष्‍काळजीपणा असल्‍यामुळे एक वर्षाचे कालावधीत तिनही गाईंचा मृत्‍यू झालेला आहे त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी उर्वरीत दोन जर्सी गाईंची  चौकशी अधिकारी डॉ.वरेट्टीवार यांचा चौकशी अहवाल लक्षात घेता विमा राशी देण्‍यास जबाबदार नाही. तक्रारकर्त्‍याची तक्रार चुकीची आणि खोटया आरोपांवर असल्‍यामुळे ती खर्चासह खारीज व्‍हावी असा उजर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे घेण्‍यात आला.

04.     प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये मंचाचे मार्फतीने यामधील विरुध्‍दपक्ष क्रं 2 व  क्रं 3 यांना मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍या बद्दल रजिस्‍टर पोच अभिलेखावर दाखल आहेत परंतु अशी नोटीस प्राप्‍त झाल्‍या नंतरही विरुध्‍दपक्ष क्रं 2 व             क्रं 3 हे मंचा समक्ष उपस्थित झाले नाही व लेखी उत्‍तर सादर केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 2 व क्रं 3 यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने दि.10.03.2014 रोजी पारीत केला.

05.     तक्रारकर्त्‍याने निशाणी क्रं 03 वरील यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या               प्रती  सादर केल्‍यात, ज्‍यामध्‍ये वि.प.क्रं 3 पशुवैद्दकीय अधिकारी यांचे तर्फे निर्गमित रिलीज लेटर, गाईंचा विमा प्रस्‍ताव फॉर्म, साऊंडनेस सर्टिफीकेट, पॉलिसीच्‍या प्रती, विमा दावा प्रती, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षांना दिलेल्‍या सुचना पत्रांच्‍या प्रती, शवविच्‍छेदन अहवाल, व्‍हॅल्‍युएशन सर्टिफीकेट, पंचनामा, विमा दावा नाकारल्‍याचे पत्र, विरुध्‍दपक्ष क्रं 1 चे कारणे दाखवा नोटीसला दिलेले उत्‍तर अशा दस्‍तऐवजांचे प्रतींचा समावेश आहे. तसेच प्रतीउत्‍तरा दाखल प्रतिज्ञालेख सादर केला.

06.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे वि भागीय व्‍यवस्‍थापक श्री सुनिल भावे यांनी प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. अन्‍य दस्‍तऐवज सादर केले नाहीत. तसेच पुरसिस दाखल करुन त्‍यांचे लेखी उत्‍तर हाच लेखी युक्‍तीवाद समजावा असे कळविले.

07.     प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री भोसकर तर वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री असगर हुसैनयांचा यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

08.    तक्रारकर्त्‍याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तर तसेच प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजां वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्‍यात आले.

           मुद्दा                               उत्‍तर

(1)    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने

       तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन

       दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द

       होते काय?......................................................होय.

(2)    काय आदेश?.....................................................तक्रार अंशतः मंजूर.

::  कारण मिमांसा व निष्‍कर्ष    ::

मुद्दा क्रं-1 व 2 -

09.    महाराष्‍ट्र शासनाचे पशुवैद्दकीय विभागा मार्फतीने नाविन्‍यपूर्ण योजना सन-2011-12 कार्यान्वित केली होती. सदर योजनेमध्‍ये तक्रारकर्ता हा लाभार्थी होता.  तक्रारकर्त्‍याने योजने अंतर्गत एकूण 06 जर्सी गायी ज्‍यांचा Ear Tag No. 1531 ते  1536 खरेदी केल्‍यात व तक्रारकर्त्‍यास योजने प्रमाणे सबसिडी मिळाली होती. तसेच तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या 06 जर्सी गाईंचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे उतरविण्‍यात आला होता या सर्व बाबी उभय पक्षांना मान्‍य आहे. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या  दोन विमाकृत जर्सी गायीपैकी,  Ear Tag No.-230105/01532 चा  दि.10.03.2013 रोजी आणि Ear Tag No.-230105/01531 चा दि.10.04.2013 रोजी मृत्‍यू झाला.  दोन्‍ही जर्सी गाईंचे शवविच्‍छेदन अहवाल अनुक्रमे दि.11.03.2013 आणि दि.10.04.2013 मध्‍ये गाईचे मृत्‍यूचे कारण “Hepatic Hydatidosis” असे दर्शविण्‍यात आले होते. गाईचें मृत्‍यू पूर्वी तक्रारकतर्याने Ear Tag No.-230105/01532 या  गाईवर पशुवैद्दकीय डॉक्‍टरां कडून दि.01.02.2013 ते 05.03.2013 या दरम्‍यान वैद्दकीय उपचार आणि Ear Tag No.-230105/01531 या गाईवर दि.01.04.2013 ते 09.04.2013 या दरम्‍यान वैद्दकीय उपचार केले होते या बाबी सुध्‍दा विवादास्‍पद नाहीत.

10.    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे जर्सी गाय Ear Tag No.-230105/01532 चा विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दि.22.03.2013 रोजी तर जर्सी गाय Ear Tag No.-230105/01531 चा विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दि.03.05.2013 रोजी सादर केला या बद्दल सुध्‍दा उभय पक्षांमध्‍ये कोणताही विवाद नाही.

11.    यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने, विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेस दिलेल्‍या दि.23.07.2013 रोजीचे विमा दावा नाकारल्‍याचे पत्रात (ज्‍याची प्रतिलिपी तक्रारकर्त्‍यास दिलेली आहे) डॉ.श्री वरेट्टीवार चौकशी अधिकारी यांचे चौकशी अहवालाचा उल्‍लेख करुन पॉलिसी क्रं-2301054711010000215 चे अनुषंगाने जर्सी गाय टॅग क्रं-1532 चा विमा  दावा क्रं-23010547120190000018, आणि जर्सी गाय टॅग क्रं-1531 चा विमा दावा क्रं-23010547130190000001  जर्सी गाईंची योग्‍य ती निगा व काळजी न घेतल्‍याचे कारणावरुन पॉलिसीचे शर्त क्रं 5 अनुसार विमाधारकाने आपल्‍या जनावराची योग्‍य ती काळजी घेतली नाही आणि शर्त क्रं 10 प्रमाणे जनावराचा मृत्‍यू  विमाधारकाचे हयगय निष्‍काळजीपणामुळे झाला असल्‍याने विमा दावा देय नाही या कारणावरुन नाकारला.

12.   तक्रारकर्त्‍याने या संदर्भात  विशेषत्‍वाने नमुद केले की, यापूर्वी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याची एक जर्सी गाय Ear Tag              No-UTI-01534 तिचे मृत्‍यू संबधीचा विमा दावा जानेवारी, 2013 मध्‍ये रुपये-24,000/- मंजूर केला होता. त्‍यावेळी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे डॉ.  श्री वरेट्टीवार यांची चौकशी अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती केली होती आणि त्‍यांनी दि.17.01.2013 रोजीचा चौकशी अहवाल वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केला होता. विमा कंपनी तर्फे चौकशी अधिकारी   डॉ.श्री वरेट्टीवार यांचा दि.17.01.2013 रोजीचा चौकशी अहवाल तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दबाजूने असताना देखील प्रथम गाय टॅग क्रं 1534 चा विमा रुपये-24,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मंजूर केला होता आणि त्‍यावेळी केलेल्‍या डॉ.श्री वरेट्टीवार चौकशी अधिका-यांचे अहवाला वरुन आता वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दोन्‍ही जर्सी गाय टॅग क्रं 1532 आणि 1531 चा विमा दावा नाकारुन तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार दोषपूर्ण सेवा दिली आहे. तक्रारकर्त्‍याचे असेही म्‍हणणे आहे की, उर्वरीत दोन्‍ही जर्सी गाईंचे मृत्‍यू नंतर कोणतीही चौकशी न करता प्रथम जर्सी गाईचे चौकशी अहवाला वरुन उर्वरीत दोन्‍ही जर्सी गाईंचा विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची नाकारण्‍याची कृती योग्‍य नाही.

13.     याउलट, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तरात नमुद केले की,  डॉ.श्री वरेट्टीवार यांचे दि.17.01.2013 रोजीचे चौकशी अहवालामध्‍ये तक्रारकर्त्‍याने गाईची योग्‍य ती निगा न राखल्‍याने तसेच योग्‍य तो आहार न पुरविल्‍याने मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे आणि उर्वरीत गाई सुध्‍दा योग्‍य तो आहार न मिळाल्‍याचे कारणा वरुन मृत्‍यू पावण्‍याची शक्‍यता वर्तविली होती. चौकशी अधिका-यांनी चौकशी अहवालात नमुद केल्‍या नुसार पुढे आणखी दोन गाईंचा  तीन महिन्‍याचे मुदतीचे आत मृत्‍यू झाला. तिनही गाईंचा मृत्‍यू हा एक वर्षाचे कालावधीत झाला. सदर  गाईचें मृत्‍यूचे कारण “Hepatic Hydatidosis” असे आहे. (This decease is a parasitic infection caused by small tapeworms living in dogs and goats and can cause anaphylaxis i.e. serious allergic reaction that is rapid in onset and may cause death.) सदर चौकशी अधिका-यांचे अहवालाचे पुराव्‍या वरुन सिध्‍द होते की, तक्रारकर्त्‍याने गाईंची योग्‍य ती काळजी न घेतल्‍याने, योग्‍य तो आहार न दिल्‍याने व गाई राहत असलेल्‍या शेडमध्‍ये योग्‍य ती स्‍वच्‍छता न ठेवल्‍याने गाईंचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे गाईंच्‍या झालेल्‍या मृत्‍यू बद्दल तक्रारकर्ता हा स्‍वतःच जबाबदार आहे. तक्रारकर्त्‍याने कारणे दाखवा नोटीस दि.23.01.2013 ला  दिलेले उत्‍तर हे अमान्‍य करण्‍यात येते आणि ते चौकशी अधिका-यांचा अहवाल दि.17.01.2013 चे विरुध्‍द आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचे प्रथम मृत्‍यू पावलेल्‍या गाईचा विमा  नॉन स्‍टॅर्न्‍डड बेसीस म्‍हणून रुपये-24,000/- मंजूर केला होता ही बाब मान्‍य आहे परंतु प्रथम गाईचा विमा दावा मंजूर करण्‍याची विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कृती ही चुकीने झाली होती परंतु पुन्‍हा अशा चुकीचे कृतीची पुनरावृत्‍ती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी करणार नसल्‍याचे नमुद केले.

14.   तक्रारकर्त्‍याने चौकशी अधिकारी डॉ. वरेट्टीवार यांनी प्रथम मृत्‍यू पावलेली गाय (Ear Tag No-UTI-01534) दि.17.01.2013 रोजीचे चौकशी अहवालाची प्रत अभिलेखावर दाखल केली. मंचा तर्फे सदर चौकशी अहवालाचे सुक्ष्‍मरितीने अवलोकन करण्‍यात आले. सदर चौकशी अहवालामध्‍ये खालील प्रमाणे बाबी उदधृत करण्‍यात आल्‍यात-

(1)   मृत गाय विमा दावा क्रं 23010547/201/90000017         संबधाने मोक्‍यावर जाऊन चौकशी केली असता मृत गाय बिल्‍लास क्रं-UTI-01534 ही पहिल्‍या तीन महिन्‍या पर्यंत प्रतीदिन 10 लिटर दुध देत होती. सदर गाय अशक्‍त झाल्‍याने पुढे तीने दुध देणे बंद केले. ती बाहेर करण्‍या करीता जाऊ शकत नव्‍हती. ती आजारी अवस्‍थेत असल्‍याने पशु चिकित्‍सा केंद्र श्रेणी -1 झिल्‍पा येथील पशुधन विकास अधिकारी यांनी लाभार्थीचे घरी येऊन औषधोपचार केलेला आहे.

(2)  लाभार्थीचे घरी जनावरानां बांधण्‍या करीता पुरेश्‍या प्रमाणात गोठा बांधल्‍याचे तसेच गोठया शेजारी पिण्‍याचे पाण्‍याची सोय करण्‍यात आली.

(3)   लाभार्थीचे घरी चौकशी केली असता असे आढळून आले की, गाईनां त्‍यांच्‍या आवश्‍यकते नुसार हिरवा चारा पुरेश्‍या प्रमणात पुरविल्‍या जात नाही तसेच क्षमते नुसार पशुखाद्द दिल्‍या जात नाही.

(4)  लाभार्थी कडील बिल्‍ला क्रं-UTI-01534 ही गाय दि.28.11.2012 रोजी मरण पावल्‍याची बाब सत्‍य आढळून आली.

(5)   लाभार्थी कडील जिवंत असलेल्‍या विमाकृत गाई कमजोर दिसून आल्‍यात व त्‍यांचे स्‍वास्‍थ निकृष्‍ट दिसून आले.

(6)   पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्दकीय दवाखाना श्रेणी-1 झिल्‍पा, तालुका काटोल, जिल्‍हा नागपूर यांनी मृत गाईवर आजारी कालावधीत वैद्दकीय उपचार केलेला आहे परंतु सविस्‍तर उपचाराची माहिती सादर केली नाही, ती मागविण्‍यात यावी. ती प्राप्‍त झाल्‍या नंतर गाईला झालेला रोग व दिलेला उपचार या बाबतचा अभिप्राय अवलोकन करुन देण्‍यात येईल.

(7)   विमाकृत बाकी 5 गाईची वैरण आणि पशुखाद्द पुरवठा या बाबत हीच परिस्थिती राहिल्‍यास हया गायींचा विमा कालावधी पूर्ण होण्‍याचे पूर्व काळात आणखी काही गाईंचा मृत्‍यू होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

       उपरोक्‍त नमुद डॉ.श्री वरेट्टीवार यांचे दि.17.01.2003 चे चौकशी अहवाला वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने वि.प.क्रं 2 बँकेस  गाईंना योग्‍य तो चारा मिळाला नसल्‍याचे कारणा वरुन उर्वरीत गाईंचा विमा का रद्द करण्‍यात येऊ नये अशी विचारणा दि.23.01.2013 रोजीचे पत्रान्‍वये केली होती व त्‍याची एक प्रत तक्रारकर्त्‍यास दिली होती.

15.     तक्रारकर्त्‍याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दि.23.01.2013 रोजीचे पत्रास दि.08.02.2013 रोजीचे उत्‍तरात नमुद केले की, विमाकृत जनावरांना सध्‍या शेतातील मका व बरसीम या उच्‍च प्रतीच्‍या वैरणीचा उपयोग आहारासाठी करण्‍यात येत आहे तसेच पुरेश्‍या प्रमाणात पशुखाद्द सुध्‍दा देत आहे. चौकशी अधिकारी मोटर सायकलने जेंव्‍हा तक्रारकर्त्‍याचे घरी आले त्‍यावेळी तक्रारकर्ता घरी नसल्‍यामुळे जनावराच्‍या व्‍यवस्‍थापना विषयी संपूर्ण माहिती सांगता आली नसल्‍याचे नमुद केले.

16.     विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने  चौकशी अधिका-याचे अहवाला नंतर तक्रारकर्त्‍याची सदर मृत गाय Ear Tag No-UTI-01534  संबधीचा विमा दावा जानेवारी, 2013 मध्‍ये रुपये-24,000/- चा मंजूर केला होता. परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने, विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेस दिलेल्‍या दि.23.07.2013 रोजीचे विमा दावा नाकारल्‍याचे पत्रात (ज्‍याची प्रतिलिपी तक्रारकर्त्‍यास दिलेली आहे) डॉ.श्री वरेट्टीवार चौकशी अधिकारी यांचे चौकशी अहवालाचा उल्‍लेख करुन पॉलिसी क्रं-2301054711010000215 दावा क्रं-23010547120190000018, बिल्‍ला क्रं-1532 आणि दावा क्रं-23010547130190000001, बिल्‍ला क्रं-1531, अनुक्रमे जर्सी गाईचा मृत्‍यू दि.10/03/2013 आणि दि.10/04/2013 चे अनुषंगाने  विमा दावा  जर्सी गाईंची योग्‍य ती निगा व काळजी न घेतल्‍याचे कारणावरुन पॉलिसीचे शर्त क्रं 5 अनुसार विमा धारकाने आपल्‍या जनावराची योग्‍य ती काळजी घेतली नाही आणि शर्त क्रं 10 प्रमाणे जनावराचा मृत्‍यू  विमाधारकाचे हयगय निष्‍काळजीपणामुळे झाला असल्‍यामुळे विमा दावा देय नाही या कारणावरुन नाकारला.

17.     मंचाचे मते ज्‍या डॉ.वरेट्टीवार चौकशी अधिकारी यांचे दि.17.01.2013 रोजीचे चौकशी अहवालावरुन विरुध्‍दपक्ष विमा कंपनी जर्सी गाय टॅग क्रं-1532 आणि क्रं 1531 चा विमा नाकारत आहे, त्‍याच चौकशी अहवालात खालील प्रमाणे नमुद केले-

      “पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्दकीय दवाखाना श्रेणी-1 झिल्‍पा, तालुका काटोल, जिल्‍हा नागपूर यांनी मृत गाईवर आजारी कालावधीत वैद्दकीय उपचार केलेला आहे परंतु सविस्‍तर उपचाराची माहिती सादर केली नाही, ती मागविण्‍यात यावी. ती प्राप्‍त झाल्‍या नंतर गाईला झालेला रोग व दिलेला उपचार या बाबतचा अभिप्राय अवलोकन करुन देण्‍यात येईल”.

             यावरुन असे सिध्‍द होते की, डॉ.वरेट्टीवार यांचा चौकशी अहवाल परिपूर्ण वस्‍तुस्थितीवर आधारीत नाही. मृत झालेल्‍या गायी हया केवळ त्‍यांना योग्‍य ते पशुखाद्द/चारा/वैरण मिळाले नाही म्‍हणूनच मृत्‍यू पावल्‍यात असा निष्‍कर्ष चौकशी अहवाला वरुन काढता येत नाही. चौकशी अधिका-यांनी पाहणीचे वेळी जिवंत गाई हया अशक्‍त असल्‍याचे कारणा वरुन त्‍यांना पुरेसे पशु खाद्द मिळत नाही म्‍हणून त्‍या कमजोर झाल्‍यात असा अहवाल दिला परंतु तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या स्‍पष्‍टीकरणात तो चौकशी अधिका-यांचे चौकशीचे वेळी उपस्थित नव्‍हता त्‍यामुळे जनावराच्‍या व्‍यवस्‍थापना विषयी संपूर्ण माहिती सांगता आली नसल्‍याचे नमुद केले. तसेच विमाकृत जनावरांना सध्‍या शेतातील मका व बरसीम या उच्‍च प्रतीच्‍या वैरणीचा उपयोग आहारासाठी करण्‍यात येत आहे तसेच पुरेश्‍या प्रमाणात पशुखाद्द सुध्‍दा देत असल्‍याचे तक्रारकर्त्‍याने स्‍पष्‍टीकरणात नमुद आहे. डॉ.वरेट्टीवार चौकशी अधिकारी यांचे चौकशी अहवालात पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्दकीय दवाखाना श्रेणी-1 झिल्‍पा, तालुका काटोल, जिल्‍हा नागपूर यांनी मृत गाईवर आजारी कालावधीत वैद्दकीय उपचार केलेला असल्‍याचेही नमुद आहे.

18.       तक्रारकर्त्‍याने पशुधन विकास अधिकारी, पशु वैद्दकीय दवाखाना श्रेणी-1 झिल्‍पा, तालुका काटोल, जिल्‍हा नागपूर येथे मृत जर्सी गाय टॅग             क्रं 01532 वर दि.01.02.2013 ते 05.03.2013 या कालावधीत वैद्दकीय उपचार केल्‍याचे तसेच उपचारास प्रतिसाद न मिळाल्‍याने सदर गाय दि.10.03.2013 रोजी मृत पावल्‍या बद्दल उपचाराचा दस्‍तऐवज सादर केला. तसेच  तक्रारकर्त्‍याने पशुधन विकास अधिकारी, पशु वैद्दकीय दवाखाना श्रेणी-1 झिल्‍पा, तालुका काटोल, जिल्‍हा नागपूर येथे मृत जर्सी गाय टॅग क्रं 01531 वर दि.01.04.2013 व 09.04.2013 रोजी वैद्दकीय उपचार केल्‍याचे व सदर गाय दि.10.04.2013 रोजी मृत पावल्‍या बद्दल उपचाराचा दस्‍तऐवज सादर केला.

         यावरुन सिध्‍द होते की, तक्रारकर्त्‍याने मृत पावलेल्‍या जर्सी गायींवर वैद्दकीय उपचार करुन, उपचारास प्रतिसाद न मिळाल्‍यामुळे त्‍या मृत्‍यू पावल्‍यात.

19.      मृत जर्सी गाय टॅग क्रं 01532 आणि जर्सी गाय टॅग क्रं 01531 चा  मृत्‍यू पशुधन विकासअधिकारी, पशु वैद्दकीय दवाखाना श्रेणी-1 झिलपा, ता.काटोल, जिल्‍हा नागपूर यांनी दिलेल्‍या शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये “Hepatic Hydatidosis” या कारणामुळे झाल्‍याचे नमुद आहे. मंचाचे मते सदर आजार हा गाईनां योग्‍य तो सकस आहार/चारा/वैरण न दिल्‍यामुळे झाला असा निष्‍कर्ष काढता येऊ शकत नाही व तसे कुठेही शवविच्‍छेदन अहवालात नमुद नाही. केवळ विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने चौकशी अधिका-यांचे चौकशी अहवालाचा आधार घेऊन विनाकारण तक्रारकर्त्‍याचा जर्सी गाय टॅग क्रं 01532 आणि 01531 विमा दावा नाकारला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी ज्‍या डॉ.वरेट्टीवार चौकशी अधिकारी यांचे अहवालावर आपली भिस्‍त ठेवीत आहेत, त्‍या डॉ.वरेट्टीवार यांचा प्रतिज्ञालेख पुराव्‍या दाखल प्रकरणात दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्ता विमाकृत गाईनां योग्‍य तो चारा/पशुखाद्द देत नव्‍हता हे   दर्शविणारा सक्षम पुरावा मंचा समक्ष आलेला नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा जर्सी गाय टॅक क्रं 01532 आणि क्रं 01531 चा विमा दावा दि.23.07.2013 रोजीचे पत्राव्‍दारे नाकारुन तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते.

20.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनीचे व्‍हॅल्‍युएशन सर्टिफीकेट नुसार मृत जर्सी गाईची किंमत प्रत्‍येकी रुपये-40,000/- एवढी दर्शविलेली आहे आणि तेवढी रक्‍कम विमा दावा नाकारल्‍याचे दिनांका पासून ते प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्‍याजासह मिळण्‍यास तक्रारकर्ता वि.प.क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र असल्‍याचे मंचाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा   दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून                रुपये-5000/- वि.प.क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहे.  विरुध्‍दपक्ष  क्रं 2 व क्रं 3 हे अनुक्रमे स्‍टेट बँक ऑफ इंडीया तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक काटोल आणि पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्दकीय दवाखना श्रेणी 1, झिलपा, तालुका काटोल जिल्‍हा नागपूर हे औपचारीक प्रतिपक्ष (Formal Parties) असल्‍याने व त्‍यांचे विरुध्‍द तक्रारकर्त्‍याची कोणतीही मागणी नसल्‍याने त्‍यांना त्‍यांना जबाबदारीतून मुक्‍त करण्‍यात येते. म्‍हणून मुद्दा क्रं 1 व 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविलेले असून मंचा तर्फे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

                      ::आदेश::

तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा माऊंट रोड, सदर, नागपूर यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

1)   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास विमाकृत मृत जर्सी गाय Ear Tag No.-UTI-1531 आणि Ear Tag No.-UTI-1532 मृत्‍यू संबधाने विमा राशी म्‍हणून प्रत्‍येकी रुपये-40,000/- प्रमाणे एकूण रक्‍कम रुपये-80,000/- (अक्षरी एकूण रुपये ऐंशी हजार फक्‍त) विमा दावा नाकारल्‍याचा दि.-23.07.2013 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्‍याजासह अदा करावी.

2)   तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या  शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल  रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास  द्दावेत.

3)    विरुध्‍दपक्ष क्रं- 2 व क्रं 3 यांना प्रस्‍तुत तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

4)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर      निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

5)    निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व  पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

      देण्‍यात यावी.           

[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.