( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक : 22 जुलै, 2011 ) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात वास्तव्य करणा-या शेतक-यांचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा काढलेला होता. तक्रारकर्तीचे पती शेतकरी होते व त्यांची सामाईक शेती होती. तक्रारकर्तीच्या पतीचे दिनांक 22.11.2009 रोजी शेतीमध्ये किटकनाशक औषधींची फवारणी करीत असताना किटकनाशक नाका तोंडात गेल्यामुळे मृत्यु झाला म्हणुन तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडे विमा दावा सादर केला. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा विमा दाव्याचे निराकरण केले नाही म्हणुन गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द ही तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला विमादाव्यापोटी रुपये 1,00,000/- अपघात झाल्याचे तारखेपासुन द.सा.द.शे 15टक्के दराने रक्कम परत करावे. तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 20,000/- व दाव्याचे खर्चापोटी रुपये 5,000/- देण्याचे आदेशीत व्हावे अशी मागणी केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 11 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात विमा रक्कम मिळविण्याकरिता अर्ज दावा प्रपत्राची प्रत, 7/12 ची प्रत, फेरफार पत्रकाची प्रत, मृत्यु प्रमाणपत्रकाची प्रत, व इतर कागदपत्रे दाखल केलीत. यात गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार क्रं 2 व 3 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं.1 यांना नोटीस प्राप्त होऊनही हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 4/1/2011 रोजी पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्रं.2 यांचे कथनानुसार त्यांना तक्रारकर्तीचे विमा दावा प्रपत्र प्राप्त झाले नाही त्यामुळे त्यांचे निराकरण करण्यात आले नाही. गैरअर्जदार क्रं.3 यांचे कथनानुसार तक्रारकर्तीने दावा प्रपत्र क्रं.3 व 4 सहपत्र तालुका कृषी अधिकारी, पारशिवनी कु.एच.पी.चरपे यांची सही घेऊन गैरअर्जदार क्रं.1 यांचे कंपनी कडे परस्पर सादर केला असावा. परंतु गैरअर्जदार क्रं. 3 कडे तसा दावा प्रपत्र सादर केल्याचा कुठलाही पुरावा नाही. तक्रारकर्तीने सदर कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असता अथवा संपर्क केला असता तर विहित मार्गाने प्रस्ताव सादर करुन विमा दावा निकाली काढणे शक्य झाले असते. गैरअर्जदार क्रं.3 यांनी दोन प्रतिज्ञालेख दाखल केलेले आहेत.
#0#- कारणमिमांसा -#0# सदर प्रकरणातील वस्तुस्थिती, गैरअर्जदार कृषी पर्यवेक्षक क्रं. 3 यांनी दाखल केलेले कृषी अधिकारी पारशिवनी जि.नागपूर व कु.एच.पी.चरपे (लिपीक) तालूका कृषी अधिकारी, पाशिवनी, नागपूर यांचे शपथपत्र व कागदपत्र पाहता तक्रारकर्तीचा विमा दावा गैरअर्जदारास प्राप्त झाल्याचे दिसुन येत नाही. तक्रारकर्तीने आपल्या प्रतिउत्तरात विमा प्रपत्र आवश्यक दस्तऐवजांची जुळवाजुळव करुन गैरअर्जदार क्रं.3 यांचेकडे सादर करण्यास तयार असल्याचे नमुद केलेले आहे. ते पाहता तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडे विमा दावा आवश्यक त्या कागदपत्रासह दाखल करावा. गैरअर्जदार क्रं. 3 यांनी त्यावर योग्य ती कारवाई करावी. विमा कंपनीने दिलेला निर्णय मान्य न झाल्यास तक्रारकर्ती या मंचापुढे न्याय मागु शकेल. या निरिक्षणासह सदरची तक्रार निकाली काढणात येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार वरील निरिक्षणासह निकाली काढण्यात येते. 2. उभय पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |