Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/12/701

Govind Ramchandra Lanjewar - Complainant(s)

Versus

United India Insurance Co.Ltd., Through Div.Manager - Opp.Party(s)

Adv. Pravin Dahat

09 Mar 2016

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/12/701
 
1. Govind Ramchandra Lanjewar
R/o. Sarra, Tah. Saoner,
Nagpur
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co.Ltd., Through Div.Manager
Zanshi Rani chowk, Sitabuldi,
Nagpur 440 012
M.S.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(आदेश पारित व्दारा - श्री शेखर पी मुळे मा. अध्यक्ष)

    - आदेश –

      ( पारित दिनांक 09  मार्च  2016 )

 

  1. तक्रारकर्त्याने या तक्रारीव्दारे विरुध्‍द पक्ष विमा कंपनी कडुन त्यांचे वाहनाच्या झालेल्या अपघाताबद्दल वाहनाची विमा रक्कम मागीतलेली आहे.
  2. तक्रारीचे थोडक्यात स्वरुप असे आहे की, तक्रारकर्ता हा ट्रॅक्टर क्रमांक एमएच-40, एल-1078 व ट्रॉली क्रं. एमएच-40, एल-1899 चा मालक आहे. ट्रॅक्टरचा विमा त्यांनी विरुध्‍द पक्षाकडुन काढलेला होता. जो दिनांक 18/9/2009 ते 17/9/2010 या कालावधीकरिता वैध होता. अशाप्रकारे तक्रारकर्ता हा  विरुध्‍द पक्षाचा ग्राहक होतो. त्या ट्रॅक्टरला दिनांक 1.5.2010 ला अपघात झाला व त्यात त्यांचे नुकसान झाले. घटनेची खबर पोलीस स्‍टेशन खापा येथे देण्‍यात आली.  तक्रारकर्त्याने नंतर ट्रॅक्टर प्रोव्हेशियल कंपनी कडुन दुरुस्‍त करुन घेतला. त्यानंतर त्यांनी आवश्‍यक दस्तएवेजांसह ट्रॅक्टरची विमा राशी विरुध्‍द पक्षाकडुन मागण्‍याकरिता अर्ज/‍विमा दावा केला. परंतु विरुध्‍द पक्षाने दि. 24/3/2011 चे पत्रान्वये त्याला कळविले की, त्यांनी विमा दाव्याचे अटी व शर्तीचा  भंग केला असल्याने त्यांचा विमा दावा फेटाळण्‍यात आला. तक्रारकर्त्याने कुठल्याही विमा कराराचा भंग केलेला नाही तरीपण त्याचा दावा फेटाळुन त्यांचे सेवेत कमतरता ठेवली या आरोपावरुन तक्रार दाखल केली आहे.
  3.  विरुध्‍द पक्ष मंचाची नोटीस मिळाल्यावर हजर झाले व नि.09 प्रमाणे आपला लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील मजकूर नाकबुल केला. प्राथमिक आक्षेप असा घेण्‍यात आला की, त्या ट्रॅक्टरचा विमा शेतातील कामाकरिता म्हणुन काढण्‍यात आला होता. ते ट्रॅक्टर व्यावसाईक कारणाकरिता वापरला जात होता आणि त्यामुळे विमा कराराचा भंग तक्रारकर्त्याने केला. तक्रारकर्ता ट्रॅक्टरचे मालक आहेत व ट्रॅक्टरचा विमा विरुध्‍द पक्षाने काढला आहे व त्याला अपघात झाला होता या सर्व बाबी विरुध्‍द पक्षाने नाकबुल केल्या आहेत. परंतु त्यांचे सेवेत कमतरता होती हे नाकबुल केले आहे. विमा कराराचा भंग झाल्या कारणावरुन विमा दावा फेटाळण्‍यात आला म्‍हणुन ही तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे.
  4. तक्रारकर्त्याने तक्रारीत 4 दस्तऐवज दाखल केले आहेत. त्यात विमा प्रपत्र पहिली खबर,गैरअर्जदाराने पाठविलेले पत्र, ट्रॅक्टर दुरुस्तीचे देयक यांचा समावेश आहे.
  5. तक्रारकर्ता आणि त्यांचे वकील ब-याच तारखांपासून गैरहजर राहत असल्याने ही केवळ दस्तऐवज आणि विरुध्‍द पक्षातर्फे करण्‍यात आलेल्या युक्तीवादावरुन निकाली करण्‍यात येते.

 

  •                  निष्‍कर्ष //*//  

 

  1. विमा कराराचा भंग झाला या व्यतिरिक्त कुठलाही वाद नसल्याने केवळ वादातीत मुद्दयावर चर्चा करीत आहे. विमा कराराची प्रत अभिलेखावर दाखल आहे. ती वाचल्यावर हे सिध्‍द होते की, ट्रॅक्टरचा विमा शेतातील कामासाठी काढण्‍यात आला होता. ट्रॅक्टर वापरण्‍यावर काही बंधन होते आणि त्या व्यतिरिक्त ट्रॅक्टरचा उपयोग इतर कामाकरिता होत असेल तर विमा कराराचा भंग होतो. ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुनच सिध्‍द हाते.
  2. दुसरा दस्तऐवज प्रथम खबर अहवालाची प्रत आहे. अपघाताची प्रथम खबर ट्रॅक्टरचे चालकाने दिली होती आणि त्या खबरेबरुन असे दिसते की, घटेनेचे दिवशी तक्रारकर्ता स्वतः ट्रॅक्टर चालवित होता. तो ट्रॅक्टरवरुन विटा भरुन रात्रीचे वेळी सावनेरला विटा खाली करण्‍यास जात असतांना चढाईवर ट्रॅक्टर पडला त्यामुळे एक मजूर मृत्यु पडला. या खबरीवरुन ही बाब सिध्‍द होते की, त्या ट्रॅक्टरचा वापर व्यावसाईक कारणाकरिता करण्‍यात येत होता. कमीत कमी घटनेचे दिवशी तरी ट्रॅक्टरचा उपयोग व्यावसाईक कारणाकरिता झाला होता. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने विमा कराराचा भंग केला म्‍हणुन याच कारणास्तव विरुध्‍द पक्षाने त्यांचा विमा दावा फेटाळला. यामधे विरुध्‍द पक्षाचे सेवेत कमतरता होती असे म्हणता येणार नाही.या कारणास्तव ही तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

 

         अं ती म  आ दे श  -

 

      1.     तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

      2.    उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.

      3.    आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्‍यात याव्या.

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.