Complaint Case No. CC/72/2017 | ( Date of Filing : 04 Feb 2017 ) |
| | 1. Smt. Manoti Shrawan Inwate | R/o. Tuyapar Post Belda, Tah. Ramtek, Dist. Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. United India Insurance Co.Ltd., Through Chief Regional Manager | Office- Shankar Nagar, Nagpur 440010 | Nagpur | Maharashtra | 2. Zill Krushi Adhikari | Office- Kadimbag, Civil Lines, Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | (आदेश पारित व्दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्य) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
- तक्रारकर्ती ही मौजा टुयापार, पोस्ट बेलदा, तहसिल रामटेक, जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचा पती श्रावण रंगीलाल इनवाते याच्या मालकीचे मौजा मौजा टुयापार, पोस्ट बेलदा, तहसिल रामटेक, जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्रमांक ६७, पटवारी हलका क्रमांक ३२, खाते क्रमांक ९६ एकूण २.०३ हेक्टर आर ही शेतजमीन होती. तक्रारकर्तीचा पती हा शेतीचा व्यवसाय करीत होता.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ही विमा कंपनी व विरुध्द पक्ष क्रमांक २ शासनाच्या वतीने शेतकरी व्यक्तिगत अपघात योजनेअंतर्गत दावा स्वीकारतात व मंजूर करतात. सदर दावा विरुध्द पक्ष क्रमांक २ चाचणी करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे पाठवितात. तक्रारकर्तीचा पती श्रावण रंगीलाल इनवाते चा रुपये १,००,०००/- इतक्या रकमेचा विमा महाराष्ट्र शासनातर्फे उतरविण्यात आला होता. सदर विमा शासनातर्फे जरी उतरविण्यात आला असला तरी तक्रारकर्ती ही मयत श्रावण रंगीलाल इनवाते यांची पत्नी असल्याने सदर विम्याची लाभधारक आहे.
- तक्रारकर्तीचा पती श्रावण रंगीलाल इनवाते हा दिनांक ४/८/२०११ रोजी सायंकाळी १७.०० वाजता चे सुमारास घराचे समोरील लाकडी मंडपावर बसून घराचे कवेलू हाताने स्वतः सावरत असतांना मंडपावरुन खाली पडून झालेल्या अपघातात उपचारादरम्यान दिनांक ५/८/२०११ रोजी मृत्यु पावला. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे मार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ ला रितसर अर्ज दिनांक ३/१/२०१२ रोजी पाठविण्यात आला. संपूर्ण कागदपञांची पूर्तता करुनही विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याचे न कळविल्याने तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाने सेवेमध्ये ञुटी केली आहे. विरुध्द पक्षावर विमा पॉलिसी प्रमाणे तक्रारकर्तीला सदर दाव्याची रक्कम देणे क्रमप्राप्त असल्याने तक्रारकर्तीला आवश्यक ती सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्याने सदरचा अर्ज विद्यमान न्यायमंचामध्ये नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता दाखल करीत आहे.
- तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रुपये १,००,०००/- तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे प्रस्ताव दिल्यापासून म्हणजे दिनांक ५/८/२०११ पासून द.सा.द.शे. १८ टक्के व्याजासह देण्याचे आदेश द्यावे.
- मा. व शारीरिक ञासाकरिता व तक्रारीचा खर्च देण्याचे आदेशीत करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ चे कथनानुसार विरुध्द पक्ष क्रमांक २ हे जिल्हा कृषी अधिकारी असून त्यांनी जबाबात नमूद केले की, मयत शेतकरी मृतक श्रावण रंगीलाल इनवाते, मौजा टुयापार, पोस्ट बेलदा, तहसिल रामटेक, जिल्हा नागपूर यांचा उंचावरुन पडून दिनांक ५/८/२०११ रोजी अपघाती मृत्यु झाला त्याअनुषंगाने तालुका कृषी अधिकारी, रामटेक यांचेकडून या कार्यालयास अपघात विमा प्रस्ताव प्राप्त झाला व सदर अपघात विमा प्रस्ताव दिनांक ३/१/२०१२ रोजी मे. कबाल इंशुरंस ब्रोकर सर्व्हिसेस प्रायवेट लिमी. नागपूर यांचेकडे मार्फत सादर करण्यात आला.
- मे.युनाईटेड इंशुरंस कंपनी लिमी. नागपूर यांनी सदर प्रस्ताव मृत्युझाल्यानंतर पॉलिसी कालावधी संपल्यानंतर म्हणजे ९० दिवसानंतर लाभार्थी शेतक-यांनी सादर केल्याचा कारणास्तव नामंजूर केल्याचे अहवालामध्ये कळविले आहे. तरीही तक्रारकर्तीने तक्रार दाखल केलेली असल्याचे दिसून येते. या कार्यालयामार्फत शेतक-याचे प्रस्ताव ब्रोकर कंपनीमार्फत विमा कंपनीकडे सादर करणे हे अभिप्रेत असून विमा कंपनीची विमा दावा मंजूर करण्याची जबाबदारी आहे. या कार्यालयाने कर्तव्याबाबत कोणतीही कसूर केली नसल्याने हे कार्यालय निर्दोष आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतून या कार्यालयास वगळण्यात यावे ही विनंती.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ चे कथनानुसार विरुध्द पक्ष क्रमांक १ ने त्याचे विशेष कथनात नमुद केले की, जे.पी.ऐ. पॉलिसी दिनांक १५/८/२०१० ते दिनांक १४/८/२०११ पर्यंत सुरु होती. मृतक शेतक-याचा मृत्यु दिनांक ४/८/२०११ रोजी झाला. त्यामुळे तक्रारकर्तीने सदर विमा दावा ९० दिवसाचे आंत सादर करावयास पाहिजे होता किंवा जर दाखल केला नसेल तर महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या नियम व रेगुलेशन नुसार विशेष कारण नमुद करुन सादर करावयास पाहिजे होता. परंतु पाच वर्षे लांब कालावधीनंतर विरुध्द पक्ष कंपनी यांनी पाठविलेले पञ Proof म्हणून दाखविण्यास असमर्थ आहे. तक्रारकर्ती मुदतीमध्ये असल्याचे फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सदर तक्रार खारीज होण्यास पाञ आहे व तक्रारकर्ती भरपाई मिळण्यास पाञ नाही आहे. विरुध्द पक्षाने त्याचे लेखी युक्तिवादात नमुद केले की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक ५/८/२०११ रोजी झाला व तीने विमा दावा दिनांक ३/१/२०१२ रोजी सादर केला. तक्रारकर्तीने विमा दावा ५ महिणे उशीराने सादर केला व त्याबाबत कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. जे.पी.ऐ. पॉलिसी हा ञिपक्षीय करार आहे व तक्रारकर्तीने तिचा विमा दावा ९० दिवसाचे आंत सादर करावयास पाहिजे. तक्रारकर्तीने तिचा विमा दावा दिनांक १४/८/२०११ पर्यंत सादर करावयास पाहिजे होता परंतु तक्रारकर्तीने दिनांक १४/८/२०११ किंवा त्यापूर्वी तिच्या पतीच्या मृत्युनंतर ९० दिवसाचे आत विमा दावा सादर करावयास पाहिजे होता. त्यामुळे तक्रारकर्तीने कोणतेही सबळ कारण न देता विमा दावा सादर करण्यात केलेला विलंब माफ होण्यास पाञ नाही आहे.
- तक्रारकर्तीने दिनांक ३/१/२०१२ पासून मा. मंचासमोर विमा दावा मिळणेबाबत अर्ज सादर करणेपर्यंत तिचा विमा दावा बाबत चौकशी केली नाही व ५ वर्षे ३ महिण्यानंतर तक्रार दाखल केली. विमा कंपनीच्या नेहमीच्या पद्धतीनुसार विमा कंपनीने ५ वर्षाआधी केलेल्या पञव्यवहाराचे दस्तावेज विमा कंपनी दाखलविण्यात असमर्थ आहे. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला कोणतीही ञुटीपूर्ण सेवा दिली नाही आहे. कारण जुना दस्तऐवज कंपनीजवळ उपलब्ध नाही आहे. विमा दावा नाकारण्याचे पञ तक्रारकर्तीला दस्ताऐवज पुरविण्याबाबत कळविले आहे त्यामुळे तक्रारकर्ती विमा दावा मिळण्यास पाञ नाही.
- उभयपक्षाने सादर केलेले दस्तऐवज, लेखी जबाब व लेखी युक्तिवाद याचे वाचन केल्यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्यात आले.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष - तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा - तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ (१,२,३,४ आणि ५) वर दाखल गा.न.क्र. ७, ७अ व १२ गांवनमुना ८, गांवनमुना ६क, फेरफार पञक चे अवलोकन केल्यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी होता व तक्रारकर्ती ही त्याची कायदेशीर वारसदार आहे. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ (६,७,८) वर दाखल पोलीस स्टेशन पंचानामा, घटनास्थळी पंचानामा, आकस्मीक मृत्युची खबर, मृत्युप्रमाणपञ व इतर दस्तऐवजाचे अवलोकन केल्यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्तीचा पतीचा मृत्यु अपघाताने दिनांक ५/८/२०११ रोजी झाला. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ (९) वर दाखल दस्तऐवजाचे अवलोकन केल्यावर असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक ३/१/२०१२ रोजी पाठविण्यात आला व विरुध्द पक्ष क्रमांक २ कृषी अधिकारी यांनी त्यांचे लेखी जबाबात तक्रारकर्तीचा विमा दावा कबाल इंशुरंस कंपनी यांचे मार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ ला सादर केल्याचे कबुल केले आहे. परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा ९० दिवसाचे आत सादर न केल्याचे कारणास्तव नाकारला असल्याचे दस्तऐवज निशानी क्रमांक ८ वर अनुक्रमांक १४ वर नमूद केले आहे.
- महाराष्ट्र शासनाचे शेतकरी जनता अपघात विमा योजना २००९-१० च्या दिनांक ३०/०९/२००९ च्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतक-याचा विमा प्रस्ताव विहीत कागदपञासह विमा योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे कंपनीला बंधनकारक राहील असे नमूद आहे. तसेच अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्यापासून ९० दिवसापर्यंत विमा प्रस्ताव स्वीकारावे. समर्थनीय कारणास्तव ९० दिवसानंतर प्राप्त दावे स्वीकारावे. तथापि अपघाताचे सूचनापञ विमा कालावधी संपल्यानंतर ९० दिवसापर्यंत घेणे बंधनकारक राहील व त्यानुसार सविस्तर प्रस्तावावर कार्यवाही करणे कंपनीस बंधनकारक राहील असे परिपञकात नमुद असतानाही विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा ९० दिवसाचे आंत सादर न केल्या कारणास्तव नामंजूर केला आहे, ही विरुध्द पक्षाची तक्रारकर्ती प्रती ञुटीपूर्ण सेवा होय. तक्रारकर्तीने तिच्या पतीचे अपघाती निधन दिनांक ५/८/२०११ रोजी झाल्यानंतर दिनांक ३/१/२०१२ रोजी सादर केला. सदर विमा योजनेचा कालावधी हा दिनांक १५/८/२०१० ते १४/८/२०११ पर्यंत होता. तक्रारकर्ती ही अशिक्षीत आहे आणि तिला शासकीय शेतकरी विमा योजनेबाबत माहिती नव्हती. त्यामुळे तिला विमा दावा सादर करण्यास २ महिणे विलंब झाल्यामुळे विमा कंपनीने तक्रारकर्तीचा खराखुरा विमा नामंजूर केला व तसे तक्रारकर्तीला विमा दावा मंजूर केला किंवा नाही याबाबत कळविले नाही व ते सिद्ध करण्यात विरुध्द पक्ष अपयशी ठरला आहे. त्यामुळे तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा मिळण्यास पाञ आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ला निर्देश देण्यात येते की, विरुध्द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्तीला शेतकरी जनता अपघात विमा अंतर्गत देय असलेली विमा रक्कम रुपये १,००,०००/- त्वरीत अदा करावी व सदर रकमेवर दिनांक ३/१/२०१२ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याजासह रक्कम तक्रारकर्तीला प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत अदा करावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ला निर्देश देण्यात येते की, विरुध्द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारीरिक ञासाकरिता तक्रारकर्तीला रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे विरुध्द दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात येत आहे.
| |