Maharashtra

Gondia

CC/04/51

Motiram Easru Bhendarkar - Complainant(s)

Versus

United India Insurance Co.Ltd. Gondia - Opp.Party(s)

Adv.A.N.Kamble

28 Apr 2005

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGAON ROAD, GONDIA
 
Complaint Case No. CC/04/51
 
1. Motiram Easru Bhendarkar
Gusobatola, Tah. Arjuni/Morgao,
Gondia
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co.Ltd. Gondia
Through Branch Manager, Atre Mension Rail toly, Gondia
Gondia
Maharastra
2. State Bank of India
Branch Manager, Baranch Office, Sangadi, Tah. Arjuni/Morgao, Gondia
Gondiya
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 
PRESENT:
 
ORDER

 

(मंचाचे निर्णयान्‍वये सौ.व्‍ही.एन.देशमुख, अध्‍यक्षा )            
                                    - आदेश --
                              (पारित दि. 28 एप्रिल 2005)
      अर्जदाराने सदरची तक्रार त्‍याच्‍या विमाकृत पावलेल्‍या विमाकृत म्‍हशीच्‍या रक्‍कमे संबंधी दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे -.
 
      अर्जदाराने गैरअर्जदार 2 बँकेकडून 2 म्‍हशीकरिता कर्जाऊ रक्‍कम घेतली होती. घेतलेल्‍या  दोनही म्‍हशींचा विमा गैरअर्जदार-1 यांचेकडून काढण्‍यात आला. सदर दोन्‍ही म्‍हशीचे कानाचे बिल्‍ले क्रमांक अनुक्रमे 78888 व 78861 असे होते. त्‍यांचा विमा कालावधी 3.1.2001 ते 2.1.2006 असा होता.
 
      दिनांक 4.8.2003 रोजी बिल्‍ला क्रमांक 78861 या क्रमांकाची म्‍हैस पहाटे मरण पावली.अर्जदाराने याबाबतची सुचना गैरअर्जदार 2 यांना त्‍वरित दिली. सदर म्‍हशीच्‍या कानाचा बिल्‍ला हरवल्‍याबाबतचे लेखी पत्र अर्जदाराने गैरअर्जदार-2 यांना दिनांक 4.5.2001 रोजीच दिले. परंतु लेखी सुचना देऊनही गैरअर्जदार-1 व 2 यांनी नवीन बिल्‍ला लावून दिला नाही. म्‍हैस मरण पावल्‍यानंतर अर्जदाराने पंचासमक्ष सदर म्‍हशीचा पंचनामा केला व क्‍लेम फॉर्मसह इतर सर्व कागदपत्रे गैरअर्जदार-2 मार्फत गैरअर्जदार-1 कडे दिनांक 6.8.2003 ला पाठविण्‍यात आली. गैरअर्जदार-1 यांनी अर्जदाराचा दावा दिनांक 25.01.2003 लाच नामंजूर केल्‍याबाबत अर्जदाराला दिनांक 24.08.2004 रोजी समजले. परंतु गैरअर्जदार-1 यांनी अर्जदारास पोस्‍टाद्वारे लौकर कळविले नाही. तसेच चुकिचा निष्‍कर्ष काढून अर्जदाराचा दावा नामंजूर करण्‍यात आला. करिता गैरअर्जदार-1 व 2 हे दोघेही सदर नामंजुरीकरिता जबाबदार ठरत असून संपूर्ण विमा रक्‍कम रु.11,500/- व आर्थिक नुकसानीपोटी रु.6000/- अशी सव्‍याज रकमेची मागणी अर्जदाराने केली आहे.
      आपल्‍या कथनापृष्‍ठयर्थ अर्जदाराने निशाणी क्रं. 3 अन्‍वये एकूण 9 दस्‍तऐवज दाखल केले असून त्‍यामध्‍ये गैरअर्जदार-1 यांनी पाठविलेले दावा नामंजुरीचे पत्र, पंचनामा, गैरअर्जदार-1 व 2 यांचेमधील पत्र व्‍यवहार, शवविच्‍छेदन अहवाल, दावा अर्ज यांचा समावेश आहे.
 
      गैरअर्जदार-1 यांनी निशाणी क्रं. 12 अन्‍वये आपले लेखी बयाना दाखल केले असून अर्जदाराने 2 म्‍हशीकरिता विमा पॉलिसीज काढल्‍याचे व सदर म्‍हशीचे टॅग नं. अनुक्रमे 78888 व 78861 असल्‍याचे मान्‍य केले आहे. परंतु दिनांक 8.3.2003 ला मरण पावलेल्‍या म्‍हशीचा बिल्‍ला हरवल्‍याबाबत गैरअर्जदार-2 बँकेने दिनांक 4.5.2001 ला कळविल्‍याचे मात्र नाकारले आहे. त्‍यामुळे “ No Tag No Claim ” या गैरअर्जदार यांच्‍या तरतुदीनुसार अर्जदार हा कोणतीही रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरत नाही असे नमूद केले असून म्‍हैस मरण पावल्‍याची सूचना व त्‍याबाबतची इतर सर्व कागदपत्रे मात्र प्राप्‍त झाल्‍याचे मान्‍य केले आहे. म्‍हशीची किंमत विमा करतांना रु.11,500/- असली तरी ती मरण पावतांना देखील तीच किंमत असल्‍याचे मात्र अमान्‍य केले आहे. तसेच अर्जदाराने मागणी केलेल्‍या नुकसानीची रक्‍कम रु.6000/- देखील नाकारली आहे. आपल्‍या विशेष उत्‍तरामध्‍ये अर्जदाराच्‍या विमाकृत मयत म्‍हशीच्‍या कानाचा बिल्‍ला हरवलयाबाबतची सुचना अर्जदाराने बँकेला दिलेली असली तरी सदर सुचना बँकेने कधीही विमा कंपनीस दिली नव्‍हती. सदर म्‍हैस मरण पावल्‍यानंतर प्रथमच दावा अर्जात बिल्‍ला हरवल्‍याबाबतची सुचना नमूद करण्‍यात आली होती. तसेच घटनास्‍थळ पंचनाम्‍यामध्‍ये मरण पावलेल्‍या म्‍हशीची शिंगे लांब असल्‍याचे नमूद केले असून शवविच्‍छेदन अहवालात मात्र तिची शिंगे आखूड, गोल असल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे. करिता सदरचा परस्‍पर विरोधाभास विचारात घेता व टॅगही नसल्‍यामुळे गैरअर्जदार यांनी मरण पावलेली म्‍हैस तीच असल्‍याचे सिध्‍द न झाल्‍यामुळे अर्जदाराचा दावा अर्ज नामंजूर करण्‍यात कोणतीही सेवेतील त्रुटी केलेली नाही. जनावराचा बिल्‍ला हरवल्‍यानंतर गैरअर्जदार-2 यांनी गैरअर्जदार-1 विमा कंपनीस कळविल्‍यानंतर Live Stock Officer कडून पुन्‍हा बिल्‍ला लावून घेणे आवश्‍यक होते. परंतु बँक आपली जबाबदारी टाळण्‍याचा प्रयत्‍न करीत असल्‍याचे आपल्‍या उत्‍तरात नमूद केले आहे. करिता अर्जदाराची तक्रार खर्चासहीत खारीज करण्‍याची मंचास विनंती केली आहे.
      निशाणी क्रमांक 13 अन्‍वये गैरअर्जदार-2 बँकेने आपले लेखी बयान दाखल केले असून अर्जदारस 2 म्‍हशी विकत घेण्‍याकरिता दिनांक 05.12.2000 रोजी कर्ज मंजूर केल्‍याचे व 31.03.2003 पर्यंत त्‍याचेकडे रु.30,911/- येणे बाकी असल्‍याचे नमूद केले आहे. अर्जदाराने म्‍हशीच्‍या कानाचा बिल्‍ला हरवल्‍याबाबत सुचना दिल्‍यानंतर बँकेने दिनांक 10.05.2001 रोजीच विमा कंपनीला त्‍याबाबत सूचना दिली होती. त्‍यामुळे बँकेची कोणतीही सेवेतील त्रुटी नसून गैरअर्जदार विमा कंपनीन नामंजूर केलेल्‍या विमा रकमेकरिता बँकेला जबाबदार ठरविता येणार नाही. उलटपक्षी अर्जदाराची सर्व कागदपत्रे दावा अर्जासोबत पाठवून नामंजुरीचे पत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर याबाबत पुन्‍हा विचार करण्‍याकरिता बँकेने पुरेपुर प्रयत्‍न केला असल्‍यामुळे बँकेची कोणतीही सेवेतील त्रुटी नाही.  करिता बँके विरुध्‍द अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍याची मंचास विनंती केली आहे. आपल्‍या कथनापृष्‍ठयर्थ बँकेने आपल्‍या शाखा व्‍यवस्‍थापकांचे शपथपत्र मंचासमोर दाखल केले आहे.
            अर्जदाराने आपल्‍या प्रतिउत्‍तरात अर्जदाराकडून कोणतीही कसुरी नसतांना गैरअर्जदार-1 व 2 हे आपली जबाबदारी टाळण्‍याचा प्रयत्‍न करीत असून अर्जदाराची तक्रार मंजूर करण्‍याची मंचास विनंती केली आहे.
      अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍या विद्यमान वकिलाचे तोंडी युक्तिवाद मंचाने ऐकले. युक्तिवादाच्‍या वेळी अर्जदाराने त्‍याचेकडे एकूण दोनच म्‍हशी होत्‍या. पैकी 1 जीवंत असल्‍याचे व दोनही म्‍हशी विमाकृत असल्‍याचे सांगितले.
      अर्जदार व गैरअर्जदार यांचे उभय पक्षांचे युक्तिवाद, मंचासमोर दाखल केलेली सर्व कागदपत्रे, शपथपत्रे यांचे अवलोकन केले असता मंचाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
      गैरअर्जदार-1 यांनी नामंजुरीच्‍या पाठविलेल्‍या दिनांक 25.11.2003 च्‍या पत्रात अर्जदाराच्‍या मयत म्‍हशीच्‍या शिंगांच्‍या फरकामुळे दावा अर्ज नामंजूर केल्‍याचे दिसून येते. अर्जदारानेच दाखल केलेल्‍या पंचनाम्‍यामध्‍ये सदर म्‍हशीची शिंगे लांब असल्‍याचे नमूद केले असले तरी दावा अर्ज, विमा अर्ज, तक्रार अर्ज, व शवविच्‍छेदन अहवाल या सर्व कागदपत्रांमध्‍ये सदर म्‍हशीची शिंगे आखूड, गोल असल्‍याचेच नमूद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी हा शासकीय अधिकारी असल्‍यामुळे त्‍याने नमूद केलेले वर्णन हे ग्राहय ठरविणे न्‍यायोचित ठरते. गैरअर्जदार यांनी केवळ पंचनामा व शवविच्‍छेदन अहवाल यामधील शिंगांच्‍या वर्णनावरुन अर्जदाराचा दावा अर्ज नामंजूर करणे न्‍यायोचित ठरत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. अर्जदाराकडे केवळ दोनच म्‍हशी असून त्‍या दोनही म्‍हशी विमाकृत होत्‍या व त्‍यापैकीच मरण पावलेल्‍या एका म्‍हशीच्‍या विमा रकमेची अर्जदाराने मागणी केली आहे. सदर म्‍हशीची सर्व कागदपत्रे गैरअर्जदार-1 यांना प्राप्‍त देखील झाली आहेत. त्‍यामुळे विमाकृत म्‍हैस मरण पावली होती हे मंच ग्राहय ठरविते.
      मयत विमाकृत म्‍हशीच्‍या कानाचा बिल्‍ला हरविल्‍याचे अर्जदाराने आपल्‍या तक्रार अर्जात नमूद केले आहे. गैरअर्जदार-2 बँकेने अर्जदाराने दिनांक 4.5.2001 रोजी बिल्‍ला हरवल्‍याबाबतचे पत्र दिल्‍याचे मान्‍य केले असून याबाबतची सुचना बँकेने दिनांक 10.05.2001 रोजी विमा कंपनीला दिल्‍याचे नमूद केले असले तरी सदर पत्र विमा कंपनीला प्राप्‍त झाल्‍याबाबत कागदोपत्री पुरावा मात्र (जावक क्रमांक) दाखल केलेला नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार-2 बँकेने सदर पत्र विमा कंपनीला पाठविल्‍याबाबत साशंकता निर्माण होते व गैरअर्जदार-2 बँकेची ही सेवेतील त्रुटी आहे असे मंच ठरविते. गैरअर्जदार-1 विमा कंपनीने केवळ बिल्‍ला हरवल्‍याबाबतचे पत्र प्राप्‍त न झाल्‍यामुळे आपली जबाबदारी टाळणे न्‍यायोचित ठरत नाही. अर्जदाराने सदर म्‍हैस कर्जाऊ घेतली असून त्‍याची परतफेड देखील तो आजतागायत करु शकला नसल्‍याचे त्‍याच्‍या थकित रकमेवरुन निदर्शनास येते. दाखल कागदपत्रांवरुन म्‍हशीच्‍या कानाला छिद्र होते म्‍हणजेच बिल्‍ला हरवल्‍याचे व सदर म्‍हैस विमाकृत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा दावा सहानुभूतीपूर्वक विचार करुन कानाच्‍या बिल्‍ल्‍याअभावी “ Non Standard Claim ” ठरविणे न्‍यायोचित ठरेल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
      अर्जदाराने मयत म्‍हशीची संपूर्ण विमा रकमेची मागणी केली असली तरी दिनांक 4.5.2001 रोजी बिल्‍ला हरवल्‍यानंतर म्‍हैस मरण पावलेल्‍या दिनांकापावेतो म्‍हणजेच दिनांक 4.8.2003 पर्यंत अर्जदाराने पुन्‍हा बिल्‍ला लावून घेतलेला दिसत नाही. सदरचा कालावधी विचारात घेता अर्जदार हा देखील अंशतः जबाबदार ठरतो. विमा अर्जामध्‍ये सदर म्‍हशीची किंमत रु.11,000/- दर्शविली आहे. “ Non Standard Claim ” नुसार सदर रकमेच्‍या 75 टक्‍के रक्‍कम अंदाजे रु.8,000/- गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास देणे न्‍यायोचित ठरेल. अर्जदाराने इतर नुकसानीपोटी मागणी केलेल्‍या रकमेकरिता कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल न केल्‍यामुळे सदर रक्‍कम मिळण्‍यास तो पात्र ठरत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.     
            वरील सर्व कारणांकरिता खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
                                    आदेश
1                                 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
2                                 गैरअर्जदार-1 यांनी अर्जदारास एकूण विमा रकमेपैकी 75 टक्‍के रक्‍कम म्‍हणजेच रुपये 8000/- दावा नामंजूर केल्‍या दिनांकापासून 9 टक्‍के व्‍याजासह अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यावर आदेश पारित झाल्‍याच्‍या दिनांकापासून 1 महिन्‍याचे आंत जमा करावेत.
3                                 गैरअर्जदार-2 बँकेने सेवेतील त्रुटीकरिता रु.1000/- अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यातवर जमा करावेत.
4                                 गैरअर्जदार 1 च 2 यांनी तक्रार खर्चादाखल      प्रत्‍येकी रु.500/- आदेश पारित झाल्‍याच्‍या  दिनांकापासून 1 महिन्‍याच्‍या आत अर्जदारास द्यावेत.
 
 
 
 
(सौ.व्‍ही.एन.देशमुख)
     अध्‍यक्षा
                                                                                                        जिल्‍हा ग्राहक मंच, भंडारा
                                   (श्री.पी.एस.चोपकर)                                                                                              (श्रीमती आश्‍लेषा दिघाडे)
                                           सदस्‍य                                                                                                                       सदस्‍या
                              जिल्‍हा ग्राहक मंच, भंडारा                                                                                          जिल्‍हा ग्राहक मंच, भंडारा
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.